Drupal/C3/Finding-and-Evaluating-Modules/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या 'Finding and Evaluating Modules' वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोतः
|
00:15 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:29 | पाठांच्या मालिकेत Modules द्वारे वेबसाईटचा विस्तार करण्याबाबत म्हटले होते. |
00:34 | आणि ड्रुपल सोबत येणा-या काही 'Modules' बद्दल शिकलो. |
00:38 | मागील पाठात devel माॅड्यूल इन्स्टॉल सुध्दा केले. |
00:43 | आता चांगली Modules शोधून त्यांचे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ. |
00:48 | 'drupal.org/project/modules' वर जाऊ. |
00:53 | येथे ड्रुपलसाठी अंदाजे 18000 'Modules' उपलब्ध आहेत. |
00:58 | लक्षात घ्या, Drupal Module फक्त त्याच ड्रुपल वर्जन बरोबर काम करेल, ज्यासाठी ते बनवले आहे. |
01:05 | म्हणून आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनची Core compatibility अपडेट करणे आवश्यक आहे. |
01:12 | हा पाठ Drupal 8 रिलीज होण्यापूर्वी तयार करण्यात आला आहे.
आपण Drupal 8 साठी सर्च केल्यावर केवळ 1000 Modules दिसतील. |
01:23 | या डेमोमधे, Modules बद्दल काही चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी मी Drupal 7 वापरत आहे. |
01:30 | Search वर क्लिक करा. Drupal 7 साठी 11000 Modules आहेत. हा फरक खूप मोठा आहे. |
01:38 | काळाबरोबर Drupal 8 च्या Modules ची संख्या झपाट्याने वाढेल. |
01:42 | दरम्यान, चांगल्या Modules चे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ. |
01:47 | या पेजवर, आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनच्या Core compatibility वर फिल्टर करू.
ह्या सूचीचा क्रम Most installed किंवा Most popular असा लावता येतो. |
01:59 | Chaos tool suite किंवा ctools आणि Views, ही ड्रुपलची सर्वकाळ लोकप्रिय असलेली Modules आहेत. |
02:07 | 'Views' क्लिक करा. |
02:09 | चांगल्या Module चे मूल्यांकन करण्यासाठी 3 साध्या स्टेप्स आहेत. |
02:14 | समजा आपण लायसन्स ब्यूरोमधे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास किंवा कार रजिस्टर करण्यासाठी गेलो. |
02:21 | बहुतांश 'US' मधील राज्यांमधे याला dmv किंवा Department of Motor Vehicles म्हणतात.
म्हणून आपण 'd m' आणि 'v' ही अक्षरे लक्षात ठेवा. |
02:34 | 'd' म्हणजे 'डॉक्युमेंटेशन', 'm' म्हणजे 'maintainers' आणि 'v' म्हणजे 'versions' |
02:42 | Project Information आणि Downloads खाली दिलेली माहिती बघा. |
02:48 | 'd' ने सुरूवात करू. 'Views' हे कायम लोकप्रिय दुसरे Module आहे. |
02:53 | खरे तर Drupal 8 मधे हे समाविष्ट करण्यात येत आहे, आणि आपण या पाठात Views चा खूप वेळा उपयोग केला आहे. |
03:02 | डॉक्युमेंटेशन वाचण्याव्यतिरिक्त एखादे Module योग्य आहे वा नाही हे समजण्यासाठी ओपन सोर्समधे अन्य कोणताही शॉर्टकट नाही. |
03:11 | Module काय करते हे समजण्यासाठी नेहमी डॉक्युमेंटेशन वाचा. |
03:16 | समस्या काय आहेत हे समजण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा. |
03:20 | help उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? 'डॉक्युमेंटेशन' वाचा. |
03:25 | Module इन्स्टॉल केल्यावर कोणते भाग सुरू करायचे हे जाणून घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा. |
03:32 | 'डॉक्युमेंटेशन' वाचणे अत्यंत महत्वाचे आहे. |
03:36 | ओपन सोर्समधे, एखाद्या Module मुळे साईट नष्ट झाल्यास, तुम्ही काही करू शकत नाही. |
03:42 | डॉक्युमेंटेशन वाचून तुम्ही साईटवर जे तयार केले आहे त्याला Module जुळणारे आहे का ते निश्चित करा. |
03:50 | याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. ही सर्व माहिती तुम्ही येथे क्लिक करून वाचा.
|
04:01 | आणि या Module मधे काय आहे ते शोधा. हे d आहे. |
04:06 | 'm' म्हणजे maintainers |
04:09 | हे विशिष्ट मॉड्युल merlinofchaos द्वारे सुरू केले होते. |
04:13 | या नावावर क्लिक केल्यावर हे आपल्याला त्याची Drupal profile दाखवेल. |
04:19 | या मालिकेत नंतर आपली Drupal profile बनवायला शिकू. |
04:24 | येथे आपल्याला दिसेल की Earl Miles याने Drupal Project मधे मोठे योगदान दिले आहे – त्याच्या 6300 हून अधिक commits आहेत. आणि तो Chaos tools आणि Views चा मुख्य निर्माता आहे. |
04:36 | येथे या विशिष्ट Module साठी अनेक maintainers आहेत. |
04:42 | Modules मधे आपल्याला दिसेल - Modules चे व्यवस्थापन केवळ एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा संघ बघत आहेत. |
04:50 | दोन्हीही ठीक आहेत. |
04:53 | जर Module मधे maintainer हाताळू शकत नसलेली गंभीर अडचण निर्माण झाल्यास आपल्यापुढे मोठीच समस्या निर्माण होते. |
05:00 | त्यामुळे यावर विचार करायला हवा. |
05:03 | शेवटी खाली, Project information आणि Versions म्हणजेच आपला v आहे. |
05:09 | मेंटेनेंस स्टेटस V चा अर्थ, सध्या हे co-maintainers शोधत आहे. आपण याकडे लक्ष देण्याची गरज नाही. |
05:15 | Views ला आधीच Drupal 8 मधे समाविष्ट केले आहे. त्यामुळे ते कदाचित मदत शोधत असावेत. |
05:24 | हे under active development आहे. |
05:27 | हे लाखो साइट्सवर आहे आणि आकडेवारीनुसार 7.6 दशलक्ष डाउनलोड आधीच केले गेले आहेत. |
05:35 | हे महत्वाचे आहे. जर Project abandoned किंवा “I’ve given up” असे दाखवत असल्यास हे Module वापरणे टाळा. |
05:42 | असे आपल्याला फारसे दिसणार नाही. |
05:46 | तुमच्या 'Drupal installation' च्या वर्जनशी जुळत असलेलेच Module नेहमी वापरा. |
05:52 | Drupal 8 हे वर्जन येथे नाही कारण Views आधीच core मधे समाविष्ट आहे. |
05:57 | परंतु मी Drupal 7 इन्स्टॉल केलेले असल्यास मी या लिंकवर क्लिक करणार नाही. |
06:04 | हे आपल्याला या Module ची सविस्तर माहिती देणा-या नोडवर घेऊन जाईल. |
06:09 | त्याऐवजी 'tar' किंवा 'zip' वर राइट क्लिक करून Copy Link वर क्लिक करा. |
06:15 | devel इन्स्टॉल करताना हे आपण नमूद केले होते. |
06:19 | Module आपल्यासाठी योग्य आहे हे कसे निश्चित करायचे. |
06:23 | d m v इतकेच सोपे आहे. |
06:26 | सतत विचारल्या जाणा-या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे Module कसे शोधायचे? |
06:31 | एक पर्याय म्हणजे 'durpal [dot] org slash project slash modules' वर जा आणि, |
06:37 | पर्याय अनेक असल्यामुळे त्यापैकी Core compatibility या Categories वर फिल्टर करा. |
06:42 | अन्यथा drupal [dot] org साठी Modules शोधणे अशक्य आहे. |
06:48 | अनुभवी युजर हे सहज शोधू शकेल. परंतु येथे अनेक Modules च्या सूचीमुळे नवीन युजर गोंधळून जाण्याची शक्यता आहे. |
06:57 | पुन्हा कोणते Module माझ्यासाठी योग्य आहे हा प्रश्न आहेच. |
07:02 | 'Google' आपला दोस्त आहे. |
07:04 | तुम्ही Date field संबंधी Drupal Module शोधत असल्यास टाइप करा drupal module date |
07:10 | आपल्याला Date Module प्रथम दिसेल. |
07:13 | हे आपणास URL च्या नावावरून कळेल. drupal [dot] org slash project slash date |
07:20 | आपल्याला Rating system हवी आहे काय? |
07:23 | टाइप करा "drupal module rating system". |
07:26 | आता आपल्याला 2 पर्याय मिळतील.
|
07:34 | आपल्याजवळ 2 Modules आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे. |
07:42 | आपल्याला webform पाहिजे आहे का? |
07:45 | टाइप करा: "drupal module webform". |
07:48 | आपल्याला Webform नावांचा प्रोजेक्ट मिळेल. |
07:52 | नवीन लोकांनी Modules शोधण्याची ही सर्वात चांगली पध्दत आहे. |
07:57 | Drupal module आणि आपल्या Module च्या कामाचे वर्णन. |
08:02 | आपल्याला याची नक्कीच मदत होईल. मॉड्युल शोधण्यासाठी गुगल हा चांगला पर्याय आहे. |
08:08 | कोणती Module आपल्यासाठी चांगली आहेत हे समजण्यासाठी, d m आणि v लक्षात ठेवा. |
08:14 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:18 | थोडक्यात,
या पाठात शिकलो,
|
08:29 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
08:38 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
08:45 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
08:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:03 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |