ExpEYES/C3/Transient-Response-of-Circuits/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Transient Response of circuits वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत:
|
00:24 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
|
00:33 | या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:44 | प्रथम सर्किटच्या ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजेच क्षणिक प्रतिसादाची व्याख्या पाहू. |
00:49 | ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजे कपॅसिटर्स किंवा इन्डक्टर्समधील संचित उर्जेला सर्किटचा प्रतिसाद.
कपॅसिटर किंवा इन्डक्टर मधील संचित उर्जा रेझिस्टरद्वारे मुक्त होऊ शकते. |
01:03 | आता RC सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू. |
01:07 | या प्रयोगात,
|
01:18 | या प्रयोगासाठी, OD1 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे. |
01:24 | 1uF (एक मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर A1 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे.
ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
01:34 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
01:36 | प्लॉट विंडोवरील, EXPERIMENTS वर क्लिक करा. RC सर्किट पर्याय निवडा. |
01:43 | Transient response of RC Circuit आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील.
स्किमॅटिक विंडो RC Circuit Transient दाखवेल. |
01:52 | Transient response of RC Circuit विंडोवरील 0 ते 5V STEP वर क्लिक करा.
स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
02:03 | नंतर 5 ते 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
02:11 | Calculate RC वर क्लिक करा. RC =1.14 msec असे दाखवत आहे. |
02:20 | विंडो क्लियर करण्यासाठी Clear वर क्लिक करा. |
02:24 | CC Charge वर क्लिक करा. 4.5 volts वर आडवी रेष दिसेल. |
02:31 | आता आपण पाहू:
|
02:41 | या सर्किटमधे 1K रेझिस्टर OD1 च्या ऐवजी CCS ला जोडणार आहोत. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
02:51 | विंडो क्लियर करण्यासाठी CLEAR वर क्लिक करा. |
02:55 | CC Charge वर क्लिक करा. कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब घातांकीय पध्दतीने वाढेल. |
03:03 | Calculate RC वर क्लिक करा. RC= 5.81 mSec ही व्हॅल्यू दाखवत आहे. |
03:12 | आता RL सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू. |
03:17 | या प्रयोगात:
|
03:26 | या प्रयोगात,
IN1 हे OD1 ला जोडले आहे. OD1 हे 1K रेझिस्टरच्या माध्यमातून A1 ला जोडले आहे. A1 हे GND ला कॉईलद्वारे जोडले आहे. |
03:38 | ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
03:41 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
03:44 | प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RL सर्किट पर्याय निवडा. |
03:51 | Transient response of RL Circuit आणि स्किमॅटिक विंडो उघडतील.
स्किमॅटिक विंडो RL Circuit Transient दाखवेल. |
04:02 | Transient response of RL Circuit या विंडोवरील 0 to 5V STEP वर क्लिक करा.
स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
04:12 | 5 to 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
04:20 | व्हॅल्यूज दाखवण्यासाठी Calculate R/L वर क्लिक करा. |
04:26 | L/R ची व्हॅल्यू =0.083mSec(मिली सेकंद) आहे.
Rind ची व्हॅल्यू = 529 ओहम आहे. |
04:35 | इंडक्टन्सची व्हॅल्यू =127.6mH(मिली हेन्री) आहे.
येथे R हा रेझिस्टन्स, L हा इंडक्टन्स आणि Rind हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे. |
04:50 | असाईनमेंट म्हणून,
दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या RL सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा. |
04:57 | आता LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज पाहू. |
05:02 | या प्रयोगात, OD1 हे A1 ला कॉईलच्या माध्यमातून जोडले आहे. |
05:07 | A1 हे GND ला 0.1uF(0.1 मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटॅन्सच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
05:15 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
05:18 | प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RLC Discharge पर्याय निवडा. |
05:25 | EYES Junior: RLC Discharge आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RLC Circuit Transient दाखवत आहे. |
05:35 | EYES Junior: RLC Discharge विंडोवरील 5->0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल. |
05:45 | mS/div चा स्लायडर हलवा 5->0V STEP वर क्लिक करा. Under damped discharge कर्व्ह दाखवला जाईल. |
05:55 | व्हॅल्यूज दाखवण्यासाठी FIT वर क्लिक करा.
Resonant Frequency=1.38 KHz आणि Damping = 0.300. |
06:08 | असाईनमेंट म्हणून,
- LCR सर्किटचा 2K रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
06:18 | आता RC इंटीग्रेशनबद्दल जाणून घेऊ. |
06:21 | या प्रयोगात, स्कवेअर वेव ट्रँग्युलर वेवमधे बदलणार आहोत. |
06:28 | येथे SQR2 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
06:34 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
06:38 | प्लॉट विंडोवर SQR2 ची 1000 Hz ही व्हॅल्यू सेट करा. SQR2 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
06:45 | वारंवारतेचा स्लायडर सरकवा. |
06:48 | वेव ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div स्लायडर सरकवा. स्क्वेअर वेव तयार होईल. |
06:56 | याच जोडणीमधे A1 हा GND ला 1uF (एक मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
07:05 | ट्रँग्युलर वेव तयार होईल. RC इंटीग्रेट केल्यावर स्क्वेअर वेव ही ट्रँग्युलर वेव मधे बदलेल. |
07:14 | ट्रँग्युलर वेवचा ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा. |
07:20 | आता RC differentiation बद्दल जाणून घेऊ. |
07:24 | या प्रयोगात स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलणार आहोत. |
07:31 | या प्रयोगात, SQR2 हे A1 ला 1uF (एक मायक्रो फॅराड) कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
07:40 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
07:43 | स्क्वेअर वेव तयार झालेली दिसेल. |
07:46 | याच जोडणीमधे A1 हे GND ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
07:55 | प्लॉट विंडोवर SQR2 ची व्हॅल्यू 100 Hz वर सेट करा. |
08:00 | वेव्ज ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div चा स्लायडर सरकवा. नॅरो स्पाईक्स वेव तयार होईल. |
08:08 | RC डिफरन्शीएट केल्यावर स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलेल. |
08:15 | ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा. |
08:19 | थोडक्यात, |
08:21 | या पाठात आपण शिकलो:
|
08:36 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
|
08:44 | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
|
08:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
08:57 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|