Biogas-Plant/C3/Assembly-of-the-Biogas-plant/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:20, 17 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार, बायोगॅस संयंत्राच्या एकत्रीकरण या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:10 | या ट्यूटोरियल मध्ये, आपण खालील एकत्रीकरण कसे करणे हे जाणून घेऊ. |
00:16 | घुमट सह डायजेस्टर टॅंक |
00:18 | मिश्रण टॅंक आणि |
00:21 | मळी टॅंक |
00:23 | कृपया लक्षात ठेवा ही ३ दिवसाची क्रिया आहे. |
00:30 | सुरवात करू |
00:32 | तारेच्या जाळीचा घूमट प्रत्यक्ष संयंत्राच्या साइट येथे स्थानांतरीत करा. |
00:38 | डायजेस्टर टॅंकच्या उंच असलेल्या भिंतीवर घूमट ठेवा. |
00:44 | एकदा हे पूर्ण झाले की, घुमटाच्या वरील भागात १ इंच व्यासाची मुख्य गॅस पाईप बसवा. |
00:53 | हे करण्यासाठी - पाईपच्या वरती बाहेरच्या पेचने धरून ठेवा. |
01:00 | ३ तारी थरांच्या चिद्रामध्ये पाईपला आत समाविष्ट करा आणि थोडं फिरवा. |
01:10 | तो घट्टपणे ठेवला आहे का ते तपासा. |
01:13 | जेव्हा घुमटाची बाहेरील भिंत प्लास्टर केली जाईल तेव्हा पाईप ह्याच स्थिती मध्ये कायमचे बसवले जाईल. |
01:24 | लक्षात ठेवा: गॅस पाईप वरील बाहेरचा पेच रबरी नळीला घट्ट करण्यास मद्दत करेल. |
01:33 | गॅस पाईपवरील बाहेरच्या पेच कडे लक्ष द्या. |
01:38 | एक महत्वाची गोष्ट केली जाईल, पुढे, खालील प्रमाणे- |
01:44 | घुमटाच्या जवळच एका बाजूला, जेथे मिश्रण टॅंक ठेवले जाईल तेथे |
01:51 | पाया घट्ट बनवून घ्या, मिश्रण टॅंक ठेवण्यासाठी हा पाया घुमटापेक्षा ४ फूट आणि ५ इंच, वर असला पाहिजे. |
02:06 | पुढे, मिश्रण टॅंकच्या समोरूनच घुमटाच्या एका बाजूला ताराची जाळी कापा. |
02:16 | जाळी कपण्यास कात्रीचा वापर करून ६ इंच व्यासाचा एक होल तयार करा. |
02:27 | ह्या होला मधून आतल्या पाईपचा एक टोक ४५ डिग्रीच्या दृष्टीकोनातून आत समाविष्ट केला जाईल. |
02:38 | मिश्रण टॅंकच्या पाया कडे राहिलेला आतल्या पाइपचा दुसरा टोक सिमेंट मिश्रणाने प्लास्टर करून घ्या. |
02:52 | जैव-कचरा ह्या आतल्या पाईपपातून डायजेस्टर टॅंक मध्ये पोहोचेल. |
03:00 | घुमटाच्या आतमधून हा आतला पाईप अश्या प्रकारे दिसेल. |
03:09 | एकदा गॅस पाईप घट्ट बसवून झाले की, आपल्याला घुमटाच्या बाहेरून प्लास्टर करावे लागेल. |
03:18 | एक मजेशीर तथ्य घुमटाला दोन वेळेच प्लास्टर केले आहे आणि प्लास्टर केलेले दोन्ही थरासाठी रेती व सिमेंटचे विविध प्रमाण आहेत. |
03:35 | पहिला थर प्लास्टर करण्यासाठी, खालील गोष्टी वापरा- |
03:42 | रेती - २०० किलो |
03:45 | सिमेंट - १०० किलो |
03:50 | १५० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, २० लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळून पुरेसे पाणी घालून घ्या. |
04:04 | येथे तुम्ही पाहता की, गवंडी प्लास्टरचा पहिला थर घुमटावर वापरत आहे. |
04:13 | घुमटाची बाहेरची भिंत पूर्णपणे प्लास्टर करण्यापूर्वी- डायजेस्टर टॅंकचा पाया दुसर्या वेळेच प्लास्टर करणे आवश्यक आहे. |
04:27 | सिमेंट मिश्रणाचे प्रमाण खालील प्रमाणे वापरले जाऊ शकते- |
04:33 | रेती- ९० किलो |
04:37 | सिमेंट- ५० किलो |
04:42 | १०० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, १५ लिटर पाण्यात मिसळून |
04:53 | आधी सांगितल्या प्रमाणे पुरेसे पाणी घालून घ्या. |
05:00 | तुम्ही पाहता की येथे गवंडी सिमेंट मिश्रणामध्ये वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य घालत आहे. |
05:11 | लक्ष्यात ठेवा – प्लास्टर थराचा जाडेपणा फक्त ३ इंचा पर्यन्त असावा. |
05:22 | आता पुढे घुमटासह मळी टॅंकचे भिंती जोडूया. |
05:30 | मळी टॅंकचा होल घुमटापेक्षा ६ इंच खाली असणे आवश्यक आहे. |
05:38 | हे खात्री करेल की मळी टॅंकमध्ये मळीची मुक्तपणे वाहतुक होते. |
05:47 | घुमटाच्या प्रवेशद्वारात एकतर बाजूस मळी टॅंकच्या तिरपे भिंती ठेवा. |
05:58 | हुक सह, घुमटाच्या पायथ्याशी आणि मळी टॅंकच्या भिंतीच्या काठावर अतिरिक्त ताराची जाळी एकमेकांशी गुंथवून घ्या. |
06:12 | काळजीपूर्वक, घुमटाला भिंती जोडण्याकरिता ताराची जाळी सुरक्षित पणे घट्ट बांधून घ्या. |
06:23 | सांधे भरण्यासाठी पुरेसे पाणी घालून सिमेंट मिश्रण वापरा. |
06:34 | हे मिश्रण काळजीपूर्वक लावा त्यामुळे तेथे रिकामी जागा राहणार नाही. |
06:44 | कृपया लक्षात ठेवा की या टप्प्यावर, आपण मळी टॅंकसाठी ७ भिंतीन पैकी ३ भिंती वापरले आहेत. |
06:57 | प्लास्टर केलेले घुमट आता सुखण्यास ६-८ तास तसेच ठेवा. |
07:06 | घुमट सुखण्यासाठी ठेवा, आता आपण मिश्रण टॅंक जोडू. |
07:15 | आधी सांगितल्या प्रमाणे- मिश्रण टॅंक घुमटापेक्षा ४ फूट आणि ५ इंच वर ठेवला जाईल त्यामुळे पाणी साठणे टाळले जाईल. |
07:29 | मिश्रण टॅंक आतल्या पाईपद्वारे डायजेस्टर टॅंकला जोडलेले आहे. |
07:38 | ठेवण्यापूर्वी, मिश्रण टॅंकच्या पायथ्याशी होल तपसा. |
07:44 | होल अगदी ६ इंच व्यासाचा आतल्या पाईपच्या समोर ठेवलेला पाहिजे. |
07:52 | लक्ष्यात ठेवा – ६ इंच व्यासाचा हा आतला पाईप आधीच ४५ डिग्रीच्या दृष्टीकोनातून घुमटाच्या आत समाविष्ट केलेला आहे. |
08:09 | मिश्रण टॅंकच्या होला साठी आणि आतला पाईप एकमेकांशी सरळ रेषेत असावे, ह्यासाठी खालील गोष्टी करा- |
08:20 | ह्या दोघान भोवती ३ विटा ठेवा आणि सिमेंटने प्लास्टर करा. |
08:29 | प्लास्टर केल्यानंतर, रात्रभर हे सुखण्यासाठी सोडा. |
08:35 | एक कार्यशील बायोगॅस संयंत्रामध्ये हे अश्या प्रकारे दिसेल- |
08:43 | आता, घुमटाची बाहेरची भिंत दुसर्या वेळेच प्लास्टर करून घ्या आणि तसेच घुमटाची आतील भिंत. |
08:58 | सिमेंट मिश्रण खालील प्रमाणे तयार करा- |
09:03 | रेती - १८० किलो |
09:07 | सिमेंट - १०० किलो |
09:11 | २५० मिली लिटर वाटर प्रूफिंग द्रव्य साहित्य, २० लिटर पाण्यात मिसळून घ्या. |
09:21 | आणि पुरेसे पाणी घालून घ्या. |
09:26 | घुमटाच्या बाहेरच्या भिंतीवर समान रीतीने हे मिश्रण पसरवा. |
09:33 | आणि तसेच घुमटाच्या आतल्या भिंतीवर पसरवा. |
09:39 | लाकडी थापी वापरुन प्लास्टर सपाट करून घ्या. |
09:46 | संपूर्ण रचना १७ दिवस सुखण्यासाठी सोडा. |
09:54 | आपण ३ ऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:00 | ४ थ्या दिवशी, आपण खालील गोष्टी करू- |
10:06 | खालील टॅंकच्या बाजूच्या भिंती जवळ दोन आयताकृती खड्डे खणा. |
10:15 | परिमाणे १ फूट ५ इंच लांबी, १ फूट ५ इंच रुंदी आणि २ फूट उंची असेल. |
10:32 | येथे दर्शवल्या प्रमाणे खालील टॅंक समोर दुसरा खड्डा खणणे. |
10:42 | परिमाणे १० इंच लांबी, २८ इंच रुंदी आणि २ फूट उंची असेल. |
10:58 | खडी, सिमेंट आणि रेतीचे मिश्रण वापरुन दोन्ही बाजूंच्या जवळचा पाया आणि खालील टॅंकचे समोरील बाजू तयार करा. |
11:18 | पूर्वी सांगितल्या प्रमाणे, खडी, रेती आणि सिमेंट सारख्याच प्रमाणात मिसळले आहे. |
11:30 | आता, मळी टॅंकच्या वर चार भिंती जोडा. |
11:38 | भिंतीच्या काठांना सिमेंटने प्लास्टर करा. |
11:45 | होल असलेले भिंतीचे दार शेताकडे असल्यामुळे, ह्या होल मधून मळीचे वाहतुक सहजतेने बाहेर पडण्यासाठी मदत होते. |
12:00 | घुमटाकडे परत येऊ, घुमटावर अंदाजे २५ कापडी गोणपाट ठेवा. |
12:11 | दिवसातून दोन वेळा, घुमटावर पाणी शिंपडणे सुरु करा. |
12:18 | घुमटाची बाहेरची भिंत ओली होण्यास जास्तीत जास्त पाणी शिंपडणे आवश्यक आहे. |
12:27 | बाहेरच्या भिंती वरील ठेवलेली कापडी गोणपाट पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते. |
12:36 | हे घुमटाला अधिक तसासाठी ओले ठेवेल. |
12:44 | शेवटी, संपूर्ण घुमट २-४ खांब्यांच्या दरम्यान ताडपत्रीने झाकून घेतले पाहिजे. |
12:57 | ही ताडपत्री खूप प्रमाणात सूर्यप्रकाशापासून, खूप जास्त कोरडेपणा टाळण्यास घुमटाचे रक्षण करेल. |
13:11 | आपण ४ थ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
13:17 | सुखण्याच्या १५ व्या दिवशी- |
13:22 | २ लीटर पाणीचे मिश्रण तयार करा. |
13:29 | २५० ग्राम कृत्रिम चिकट पट्टी चिकटवण्यास आणि २ किलो पांढरे सिमेंट. |
13:41 | घुमटाच्या आत तडा आला असेल तर भरण्यासाठी, हे मिश्रण डायजेस्टर टॅंकच्या आत लावा. |
13:52 | ह्या टप्प्यावर, बायोगॅस संयंत्राचे बांधकाम पूर्ण झाले. |
14:00 | आता आपण स्वंपकघरात मुख्य वायुनलिका जोडणे शिकूया. |
14:07 | येथे दाखवल्याप्रमाणे, डायजेस्टर टॅंक मधून मुख्य वायू नियंत्रण व्हाल्व्हला मुख्य वायुनलिका जोडा. |
14:22 | मुख्य वायूनलिका आणि मुख्य वायू नियंत्रण व्हाल्व्ह यांच्या मधील सांधा उत्तम प्रकारे हवाबंद असावे. |
14:35 | नाहीतर, ह्या सांधा मुळे वायूची गळती सहज थांबविले जाऊ शकत नाही. |
14:46 | मुख्य वायू नियंत्रण व्हाल्व्ह मधून, आपल्याला गॅस वाहकनळी जोडायचे आहे. |
14:57 | पुन्हा एकदा, सरळ सांधा वापरुन जोडा आणि तो हवाबंद आहे याची खात्री करा. |
15:11 | गॅस वाहकनळी स्वंपकघरापर्यन्त वाढवून नेली जाते. |
15:20 | स्वंपक घराच्याआत, एक सरळ सांधा वापरुन गॅस वाहकनळीला सुरक्षित व्हाल्व्ह जोडा. |
15:33 | सुरक्षित व्हाल्व्हच्या दुसर्या टोकाला आणखी एक सरळ सांधा जोडा. |
15:43 | खात्री करा की सर्व सांधे हवाबंद आहेत. |
15:50 | शेवटी, स्टोव्हला रब्बररी नळी जोडा. |
15:58 | सर्व जोडण्या करून झाल्यानंतर, बायोगॅस संयंत्र वापरण्यासाठी तयार आहे. |
16:09 | १७ दिवसांच्या पूर्ण सुखावण्याच्या वेळे नंतर, बायोगॅस संयंत्रात कच्चा माल टाकले जाऊ शकते. |
16:23 | बायोगॅसचे प्रारंभिक उत्पादनासाठी ६ दिवस लागतील. |
16:31 | त्या नंतर, ते एक नियमित दररोजचे उत्पादन असेल. |
16:39 | आता बायोगॅस निर्मिती केली आहे किंवा नाही हे तपासूया? खालील गोष्टी करा. |
16:50 | गॅस पोहोचविला जाण्यासाठी दोन्ही सुरक्षा व्हाल्व्ह उघड्या स्थितीत आहेत याची खात्री करा. |
17:01 | बर्नर पेटवा आणि बायोगॅसची ज्योत तपासा. |
17:11 | दुसरा मुद्दा म्हणजे पाणी जमा होणे, त्यामुळे पाणी जमा होणे कसे टाळले जाऊ शकते. |
17:23 | घुमटा पासून स्वंपाक घरापर्यन्त गॅस वाहकनळी नेहमी ऊर्ध्वगामी दिशेने असावे. |
17:36 | जर असे असेल तर, वाहकनळीच्या आत पाणी जमा होणे उपेक्षणीय आहे. |
17:45 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
17:51 | थोडक्यात- |
17:53 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील एकत्रीकरण कसे करणे हे शिकलो |
18:02 | घुमट सह डायजेस्टर टॅंक |
18:07 | मिश्रण टॅंक आणि |
18:10 | मळी टॅंक |
18:14 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
18:26 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
18:33 | मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |