Inkscape/C2/Align-and-distribute-objects/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:46, 11 December 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 इंकस्केप मधील “Align and distribute objects” या पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत -
00:09 * विविध ऑब्जेक्टस अलाईन आणि डिस्ट्रीब्यूट करणे
00:12 * ऑब्जेक्टस rows आणि columns मधे ठेवणे
00:16 * ऑब्जेक्टस मधे स्पेस सेट करणे आणि टाईल पॅटर्न बनवणे.
00:22 या पाठासाठी वापरणार आहोत,
00:24 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:27 इंकस्केप वर्जन 0.48.4
00:31 Dash home वर जाऊन Inkscape टाईप करा.
00:35 लोगोवर क्लिक करा.
00:37 मी आधीच सेव्ह केलेले Inkscape चे डॉक्युमेंट उघडत आहे.
00:44 कॅनव्हासवर पाच वेगवेगळे आकार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले दिसतील.
00:50 तुमच्या कॅनव्हासवर पाच आकार काढून ते येथे दाखवल्याप्रमाणे त्या जागी ठेवा.
00:55 आता ऑब्जेक्टस अलाईन करू.
00:59 Object मेनू खालील Align and Distribute वर क्लिक करा.
01:04 Align and Distribute चा डायलॉग बॉक्स interface च्या उजव्या बाजूला उघडेल.
01:09 येथे स्थान ठरवण्याच्या दोन पध्दती आहेत.
01:12 Align म्हणजे ऑब्जेक्टसच्या कडा किंवा मध्य एका रेषेत एकमेकांना जुळवून घेणे.
01:18 Distribute म्हणजे ऑब्जेक्टस त्यांच्या कडा किंवा मध्यांच्या संदर्भाने उभे किंवा आडवे पसरून ठेवणे.
01:29 हे पर्याय आणि त्यांच्या उपपर्यायांच्या सहाय्याने, ऑब्जेक्टस विविध पध्दतीने अलाईन करता येतात.
01:36 Relative to हे आणखी एक महत्वाचे फीचर आहे.
01:39 हे वापरून ऑब्जेक्टस कशाच्या तरी संदर्भाने अलाईन करता येतात.
01:44 येथील पर्याय बघण्यासाठी ड्रॉप डाऊन सूचीवर क्लिक करा.
01:47 येथे Last selected, First selected, Biggest object, Smallest object, Page, Drawing आणि Selection हे पर्याय आहेत.
02:00 डिफॉल्ट रूपात ऑब्जेक्टस Page ला अलाईन होतात.
02:04 म्हणजेच निवडलेली ऑब्जेक्टस Align and Distribute ऑपरेशन्समधे Page च्या मोजमापानुसार प्रतिसाद देतात.
02:13 कॅनव्हासवरील सर्व ऑब्जेक्टस निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.
02:17 पहिले 5 आयकॉन ऑब्जेक्टसना उभ्या पध्दतीने अलाईन करतील.
02:22 पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
02:25 टूल टीपनुसार ऑब्जेक्टसच्या उजव्या कडा anchor च्या डाव्या कडांना अलाईन होतील.
02:32 येथे Relative to चा संदर्भ Page असल्याने anchor point हा page आहे.
02:38 हे दोन ऑब्जेक्टस एकमेकांवर ठेवले गेले आहेत.
02:43 मागील रचनेत ऑब्जेक्टस खूप जवळ असल्यास ते एकमेकांवर ठेवले जाऊ शकतात.
02:48 Distribute पर्यायाखालील Remove overlaps वर क्लिक करून हे दुरूस्त करू शकतो.
02:56 आता ऑब्जेक्टस वेगळी झाली आहेत.
02:58 ऑब्जेक्टसमधील उभ्या आणि आडव्या दिशांची अंतरे नीट करण्यासाठी H आणि V पर्याय वापरा.
03:06 Align खालील पर्यायांवर क्लिक करून ऑब्जेक्टस कशाप्रकारे अलाईन होतात ते पहा.
03:14 अलाईनमेंटबद्दल नीट समजून घेण्यासाठी CTRL + Z/undo पर्याय वापरा.
03:21 अलाईनमेंट नीट समजण्यासाठी टूल टीप्स खूप उपयोगी आहेत.
03:28 शेवटचा आयकॉन केवळ टेक्स्टवर कार्य करतो. त्याबद्दल पुढील पाठात पाहू.
03:35 ऑब्जेक्टसमधील अंतर नीट करण्यासाठी Distribute पर्याय वापरू.
03:40 ऑब्जेक्टस उभी ठेवलेली असल्यामुळे Distribute मधले शेवटचे चार पर्याय वापरावे लागतील.
03:48 प्रथम मध्यात अलाईन करू.
03:51 Distribute खालील पर्यायावर क्लिक करा. ऑब्जेक्टस कसे अलाईन होतात ते पहा.
03:58 अलाईनमेंट नीट समजण्यासाठी CTRL + Z/undo पर्याय वापरा.
04:07 अलाईनमेंट नीट समजण्यासाठी टूल टीप्स खूप उपयोगी आहेत.
04:13 Relative to पर्यायाखाली Treat selection as group हा पर्याय आहे.
04:19 हे एक ग्रुप म्हणून ही सर्व ऑब्जेक्टस अलाईन करेल.
04:22 check-box वर क्लिक करा.
04:24 प्रत्येक आयकॉन्स वर क्लिक करून बघा. सर्व ऑब्जेक्टस स्वतंत्ररित्या अलाईन न होता ग्रुपने अलाईन होतील.
04:34 बॉक्स अनचेक करा.
04:36 आता ऑब्जेक्टस स्वतंत्ररित्या अलाईन होतील.
04:40 आता ऑब्जेक्टस Last selected हा पर्याय वापरून अलाईन आणि डिस्ट्रीब्यूट करू.
04:45 Relative to चा पर्याय बदलून Last selected करा.
04:49 आता सर्व ऑब्जेक्टस कॅनव्हासच्या आत आणून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
05:01 एकेक करून ऑब्जेक्टस निवडा. वर्तुळ सर्वात शेवटी निवडा.
05:06 आधीप्रमाणेच एकेक करून आयकॉनवर क्लिक करा.
05:10 शेवटी निवडलेले ऑब्जेक्ट वर्तुळ असल्यामुळे ऑब्जेक्टस वर्तुळानुसार अलाईन होतील.
05:19 याच प्रकारे Relative to मधील उपलब्ध पर्याय वापरून ऑब्जेक्टसची अलाईनमेंट कशी होते ते पहा.
05:26 Align and Distribute च्या डायलॉग बॉक्समधील ऍडव्हान्स पर्यायांबद्दल पुढील पाठात शिकू.
05:32 आता हा डायलॉग बॉक्स बंद करू.
05:37 पुढे rows आणि columns मधे ऑब्जेक्टस ठेवण्याबद्दल जाणून घेऊ.
05:41 Object मेनूखालील,
05:43 Rows and Columns वर क्लिक करा.
05:46 Rows and Columns चा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:50 हा पर्याय वापरून ऑब्जेक्टस आवश्यक स्पेस देऊन rows आणि columns मधे ठेऊ शकतो.
05:57 कॅनव्हासवर ऑब्जेक्टस वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
06:01 आता ऑब्जेक्टस 2 rows आणि 3 columns मधे ठेवू.
06:05 Row चा पॅरामीटर बदलून 2 करा.
06:09 Row चा पॅरामीटर बदलल्यावर Column चा पॅरामीटर आपोआप बदललेला दिसेल.
06:15 उजवीकडे खाली असलेल्या Arrange बटणावर क्लिक करा.
06:19 Align हा पर्याय ऑब्जेक्टस उजव्या बाजूला मध्यात आणि डाव्या बाजूला अलाईन करेल.
06:29 प्रत्येक पर्याय वापरून बघा आणि होणारे बदल पहा.
06:37 Set spacing पर्याय वापरून rows आणि columns दोन्हीसाठी ऑब्जेक्टस मधील स्पेस सेट करता येते.
06:45 row आणि column दोन्हीसाठी स्पेस पॅरामीटर बदलून ते 5 करा.
06:50 Arrange वर क्लिक करा.
06:53 ऑब्जेक्टसमधील स्पेस बघा.
06:56 Align and Distribute द्वारे पॅटर्न कसा बनवायचा ते पाहू.
07:01 माझ्याकडे चार वेगळ्या आकारांचे आणि रंगांचे चौरस असलेली नवी Inkscape फाईल आहे.
07:06 सर्व चौरस सिलेक्ट करून असे फिरवा म्हणजे ते डायमंडच्या आकाराचे दिसतील.
07:12 Align and Distribute चा डायलॉग बॉक्स उघडेल.
07:15 Centre on vertical axis वर क्लिक करा.
07:18 Centre on horizontal axis वर क्लिक करा.
07:22 कॅनव्हासवर आता tile पॅटर्न तयार झाला आहे.
07:25 हे पर्याय कल्पकतेने वापरल्यास अनेक वैशिष्ट्यपूर्ण पॅटर्न तयार करू शकतो.
07:30 थोडक्यात, पाठात शिकलो:
07:34 * विविध ऑब्जेक्टस अलाईन आणि डिस्ट्रीब्यूट करणे
07:37 * ऑब्जेक्टस rows आणि columns मधे ठेवणे
07:40 * ऑब्जेक्टस मधे स्पेस सेट करणे आणि टाईल पॅटर्न बनवणे.
07:45 ह्या दोन असाईनमेंट करा.
07:47 येथे दिलेल्या डायमेन्शन्सची पाच वर्तुळे काढा.
07:54 कॅनव्हासवर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ती सर्व सिलेक्ट करा.
07:59 Align and Distribute वापरुन Relative to पर्याय Biggest object मध्ये बदला.
08:04 Align left edges वर क्लिक करा.
08:06 Centre on horizontal axis वर क्लिक करा.
08:10 100 * 100 पिक्सेल आकाराचे आणि निळ्या रंगाचे 9 चौरस काढा.
08:17 सर्व चौरस सिलेक्ट करून Rows and columns पर्याय उघडा.
08:21 हे 3 rows आणि 3 columns मधे ठेवा.
08:25 vertical आणि horizontal साठी स्पेस पॅरामीटर 20 ठेवा.
08:29 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल.
08:35 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:43 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:51 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:03 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:07 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:09 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana