Inkscape/C3/Create-an-A4-Poster/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:23, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Inkscape वापरून “Create an A4 Poster” बनवण्याच्या पाठात आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत- |
00:10 | डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे |
00:12 | A4 आकाराच्या पोस्टरची रचना करणे |
00:14 | पोस्टर 'pdf' फॉरमॅटमधे सेव्ह करणे. |
00:17 | या पाठासाठी वापरणार आहोत- |
00:19 | उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:22 | इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:26 | इंकस्केप उघडू. |
00:28 | File मेनू खालील New वर क्लिक करा. |
00:32 | हे कॅनव्हासचे डिफॉल्ट रूपात उपलब्ध असलेले आकार आहेत. |
00:37 | डिफॉल्ट रूपात माझा कॅनव्हास A4 आकारात आहे. |
00:41 | तो मी तसाच ठेवत आहे. |
00:44 | जर तुमच्या मशीनवर तसे नसल्यास A4 आकार निवडा. |
00:49 | आता काही सेटींग्ज बदलू. |
00:51 | File मेनूखालील Document properties वर क्लिक करा. |
00:54 | अनेक टॅब आणि पर्याय असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. |
00:59 | त्याबद्दल आपण एकेक करून जाणून घेऊ. |
01:03 | Page या पहिल्या टॅबमधील Default units या ड्रॉपडाऊन वर क्लिक करा. |
01:08 | एकेकावर क्लिक केल्यास मोजपट्टीच्या एकेकात बदल होताना दिसेल. |
01:13 | pixels हे युनिट ठेवू. |
01:16 | Background पर्याय वापरून बॅकग्राऊंडचा रंग व पारदर्शकता बदलता येते. |
01:21 | त्यावर क्लिक केल्यावर नवा डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:24 | RGB स्लायडर्स डावीकडे आणि उजवीकडे सरकवा. |
01:29 | कॅनव्हासवरील बॅकग्राऊंडचे रंग दिसण्यासाठी alpha slider उजवीकडे सरकवा. |
01:35 | यामुळे पारदर्शकता दिलेल्या 'RGB' व्हॅल्यूजना बदलेल. |
01:40 | Document properties विंडोमधे मी बदल करत असताना बॅकग्राऊंड पर्यायाचे रंग बदलताना दिसतील. |
01:47 | Alpha स्लायडर डावीकडच्या टोकाला सरकवून डायलॉग बॉक्स बंद करा. |
01:52 | Page size खाली अनेक पर्याय आहेत. |
01:55 | हे पर्याय वापरून कॅनव्हासचा आकार बदलू शकतो. |
02:00 | येथे क्लिक केल्यावर कॅनव्हासच्या आकारात झालेला बदल लक्षात घ्या. |
02:04 | पानाचा आकार A4 ठेवू. |
02:08 | Orientation मधे Portrait किंवा Landscape हे पर्याय निवडू शकता. |
02:12 | कॅनव्हासमधे होणारे बदल बघण्यासाठी दोन्ही पर्याय वापरून बघा. |
02:17 | Width आणि Height हे पॅरामीटर्स वापरून कॅनव्हासची रुंदी आणि उंची बदलू शकतो. |
02:23 | Units च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. येथे गरजेनुसार एकेक बदलू शकतो. |
02:31 | आता युनिटस बदलून ते pixels करू. |
02:34 | Resize page to content वर क्लिक करा. |
02:37 | उपलब्ध असलेले अनेक पर्याय उघडतील. |
02:41 | येथे सर्व बाजूंसाठी मार्जिन सेट करू शकतो. |
02:45 | मार्जिन सेट केल्यावर Resize page to drawing or selection वर क्लिक करणे गरजेचे आहे. |
02:51 | पुढे Border हा पर्याय आहे. येथे 3 चेक बॉक्सचे पर्याय दिसतील. |
02:57 | हे पर्याय वापरून बघण्यासाठी प्रथम अशाप्रकारे ellipse काढू. |
03:03 | पहिला पर्याय पानाच्या बॉर्डरचा आहे जो कॅनव्हासची बॉर्डर दाखवतो. |
03:08 | हा पर्याय अनचेक करा. बॉर्डर्स दिसेनाशा होतील. |
03:13 | पुन्हा पर्याय निवडा. बॉर्डर्स पुन्हा आलेल्या दिसतील. |
03:18 | दुसरा पर्याय चित्राच्या वरच्या बाजूला बॉर्डर सेट करेल ज्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसेल. |
03:25 | पुन्हा एकदा हे पर्याय निवडा आणि काढून टाका आणि कॅनव्हासवर होणारे बदल बघा. |
03:31 | तिसरा पर्याय कॅनव्हासची सावली उजवीकडे आणि खालच्या बाजूला दाखवेल. |
03:36 | येथे उजव्या आणि खालच्या बाजूची बॉर्डर इतर दोन बाजूंपेक्षा थोडी जाडसर दिसत आहे. |
03:42 | तिसरा पर्याय अनचेक केल्यावर ही सावली गेलेली दिसेल. |
03:47 | हे सर्व पर्याय आपण पसंती आणि गरजेनुसार वापरू शकतो. |
03:52 | Border color हा पर्याय वापरून बॉर्डरचा रंग निवडता येतो. |
03:57 | आपण डिफॉल्ट रंगच ठेवणार आहोत. |
04:01 | पुढे Guides टॅबवर क्लिक करा. |
04:03 | Guides टेक्स्ट आणि ग्राफिक ऑब्जेक्टस कॅनव्हासवर अलाईन करण्यास मदत करतात. |
04:08 | आपण येथे रुलर गाईडस बनवू शकतो. |
04:12 | उभ्या मोजपट्टीवर क्लिक करून गाईडलाईन ड्रॅग करा. |
04:15 | Show Guides हा पहिला पर्याय एकदा निवडा आणि मग काढून टाका. |
04:19 | कॅनव्हासवर गाईडलाईन आलेली आणि दिसेनाशी झालेली दिसेल. |
04:25 | Guide color हा guideline चा रंग आहे. |
04:28 | Highlight color हा गाईडलाईन एखाद्या विशिष्ट जागेपर्यंत ड्रॅग करताना दिसणारा रंग आहे. |
04:33 | guide आणि highlight चे डिफॉल्ट रंग येथे दिसत आहेत. |
04:37 | तुम्ही ते पसंतीनुसार बदलू शकता. |
04:41 | मी डिफॉल्ट रंगच ठेवत आहे. |
04:44 | ड्रॅगिंग करताना Snap guides while dragging पर्यायामुळे ऑब्जेक्टस किंवा बाऊंडिंग बॉक्स नजीकच्या गाईडलाईन्सना snap करतात. |
04:52 | पुढे Grids टॅबवर क्लिक करा. |
04:54 | हा पर्याय वापरून कॅनव्हासवरील कलाकृतीच्या मागे grid सेट करू शकतो. |
05:00 | ह्या ग्रीडसचा उपयोग कॅनव्हासवर ऑब्जेक्टस योग्य जागी ठेवण्यासाठी होतो. ग्रीडस प्रिंट होत नाहीत. |
05:07 | ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा. |
05:09 | Rectangular grid आणि Axonometric grid हे ग्रीडसचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. |
05:16 | Rectangular grid निवडून New वर क्लिक करा. |
05:20 | लगेचच कॅनव्हासवर बॅकग्राऊंडला ग्रीड तयार झालेले दिसेल. |
05:25 | उपलब्ध पर्याय वापरून गरजेनुसार ग्रीडच्या प्रॉपर्टीज सेट करता येतात. |
05:31 | खालच्या बाजूचे Remove बटण क्लिक करून grid काढून टाकू शकतो. |
05:36 | याचप्रकारे Axonometric grid चे पर्याय वापरून बघू शकता. |
05:41 | पुढील 3 टॅब्जमधील पर्यायांबद्दल ऍडव्हान्स लेव्हल्सच्या पाठात जाणून घेऊ. |
05:47 | आता पोस्टर बनवायला सुरूवात करू. |
05:50 | प्रथम ellipse आणि guideline काढून टाकू. |
05:53 | आपल्या पोस्टरसाठी प्रथम बॅकग्राऊंडची रचना करून घेऊ. |
05:58 | Rectangle टुलवर क्लिक करा. |
06:00 | संपूर्ण canvas चा समावेश होईल एवढा मोठा आयत काढा. |
06:06 | त्याला फिकट निळा ग्रॅडियंट रंग द्या. |
06:08 | Bezier tool च्या सहाय्याने कॅनव्हासच्या वरच्या भागात header area |
06:16 | आणि खालच्या भागात footer area काढा. |
06:23 | त्याला निळा रंग देऊ. |
06:25 | आता Spoken Tutorial चा लोगो इंपोर्ट करू. |
06:28 | हा लोगो Code Files च्या लिंकवर दिलेला आहे. |
06:32 | प्रथम हा पाठ थांबवा. Code Files वर क्लिक करून zip file डाऊनलोड करा. |
06:39 | फोल्डर unzip करून फाईल्स मशीनवर योग्य ठिकाणी सेव्ह करा. |
06:45 | आता इंकस्केप डॉक्युमेंटवर क्लिक करा. |
06:47 | File मेनूखालील Import वर क्लिक करा. |
06:51 | लोगो सेव्ह केलेल्या फोल्डरवर जा. |
06:54 | Spoken Tutorial चा लोगो सिलेक्ट करून Open क्लिक करा. |
06:59 | नवा डायलॉग बॉक्स उघडेल. OK क्लिक करा. |
07:03 | आता हा लोगो canvas वर इंपोर्ट केला जाईल. |
07:06 | त्याचा आकार बदलून 100×100 पिक्सेल्स करा. |
07:09 | header area च्या डाव्या कोप-यात वरती हे नेऊन ठेवा. |
07:14 | आता “Spoken Tutorial” हे टेक्स्ट टाईप करा. |
07:18 | ते बोल्ड करा. |
07:20 | टेक्स्टच्या फाँटचा आकार बदलून तो 48 करा. |
07:24 | हे टेक्स्ट, लोगोच्या उजव्या बाजूला नेऊन ठेवा. |
07:27 | त्यानंतर “partner with us...help bridge the digital divide” टेक्स्ट टाईप करा. |
07:35 | या टेक्स्टचा आकार बदलून 20 करा. |
07:39 | पुढे काही टेक्स्ट समाविष्ट करा. |
07:42 | हे टेक्स्ट मी लिबर ऑफिस रायटरमधे सेव्ह करून ठेवले आहे. |
07:47 | हे टेक्स्ट Code Files मधे दिलेले आहे. |
07:51 | तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधे ही फाईल शोधा. |
07:54 | आता पोस्टरवरील रिकाम्या भागात हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा. |
08:00 | फाँटचा आकार 28 करा. |
08:04 | लाईन स्पेसिंग सेट करा. |
08:06 | प्रत्येक वाक्याच्या आधी याप्रकारे bullets द्या. |
08:10 | त्याखाली 2 इमेजेस समाविष्ट करणार आहोत. |
08:13 | पूर्वी प्रमाणेच एकेक इमेज इंपोर्ट करू. |
08:17 | मी त्या images या फोल्डरमधे सेव्ह केलेल्या आहेत. |
08:20 | या इमेजेस Code Files मधे दिलेल्या आहेत. |
08:24 | त्या सेव्ह केलेल्या फोल्डरमधे शोधा. |
08:27 | इमेजेस सिलेक्ट करून त्यांचा आकार बदला. |
08:30 | आणि पोस्टरच्या खालच्या भागात त्या नेऊन ठेवा. |
08:33 | footer area मधे संपर्काचा तपशील लिहू. |
08:37 | पुन्हा एकदा लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटमधून हे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करा. |
08:42 | फाँटचा आकार 18 करा. |
08:45 | आपले पोस्टर तयार झाले आहे. |
08:47 | पुढे हे pdf फॉरमॅटमधे कसे सेव्ह करायचे ते पाहू. |
08:51 | File खालील Save As वर क्लिक करा. |
08:55 | डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:58 | फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा. |
09:00 | मी डेस्कटॉप निवडत आहे. |
09:02 | डायलॉग बॉक्सच्या खाली उजवीकडे असलेल्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून pdf हा फॉरमॅट निवडा. |
09:09 | येथे Name या फिल्डमधे Spoken-Tutorial-Poster.pdf असे टाईप करा. |
09:16 | Save वर क्लिक करा. |
09:18 | आपले पोस्टर डेस्कटॉपवर सेव्ह झाले आहे. |
09:21 | डेस्कटॉपवर जाऊन पोस्टर पाहू. |
09:25 | आपले पोस्टर pdf फॉरमॅटमधे आहे. |
09:28 | आपण शिकलो ते थोडक्यात, |
09:32 | डॉक्युमेंट प्रॉपर्टीज बदलणे |
09:34 | A4 पोस्टरची रचना करणे |
09:36 | पोस्टर 'pdf' मधे सेव्ह करणे. |
09:38 | असाईनमेंट. |
09:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी A4 पोस्टर बनवा. |
09:44 | असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसणे अपेक्षित आहे. |
09:48 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल |
09:54 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:01 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:10 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:14 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:16 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |