LibreOffice-Suite-Draw/C3/Edit-Curves-and-Polygons/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | लिबर ऑफिस ड्रॉच्या Editing Curves आणि Polygons वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात कर्व्हज आणि पॉलिगॉन्स एडिट कसे करायचे याबद्दल शिकणार आहोत. |
00:13 | यासाठी तुम्हाला लिबर ऑफिस ड्रॉचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:23 | येथे आपण उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू. |
00:32 | आपले Routemap चे ड्रॉईंग पुन्हा उघडू. |
00:37 | मागील भागात कर्व्हज आणि पॉलिगॉन्स काढायला शिकलो. आता ते एडिट करायला शिकू. |
00:42 | आता School Campus च्या आकारात बदल करू. |
00:48 | ह्यासाठी Edit Points टूलबार वापरू. |
00:52 | मेन मेनूवरील View वर क्लिक करा. Toolbars सिलेक्ट करून Edit Points वर क्लिक करा. |
01:00 | एडिट पॉईंटसचा टूलबार उघडेल. |
01:04 | आता School Campus चा पॉलिगॉन सिलेक्ट करा. |
01:09 | Edit Points टूलबारवरील Points आयकॉनवर क्लिक करा. |
01:12 | आकृतीमधे हिरव्या रंगाचे सिलेक्शन हँडल्स बदलून आता ते निळ्या रंगाचे एडिट पॉईंटस होतील. हे तुम्ही एडिट पॉईंटमधे असल्याचे दाखवते. |
01:23 | Edit Points टूलबारवरील Insert points आयकॉनवर क्लिक करा. |
01:29 | आता ड्रॉ पेजवर जा. कर्सर अधिकच्या चिन्हात बदललेला दिसेल. |
01:35 | हे अधिकचे चिन्ह School Campus या पॉलिगॉनच्या डाव्या बाजूवर न्या. |
01:41 | माऊसचे डावे बटण दाबून ते उजव्या बाजूला ड्रॅग करा आणि सोडून द्या. आपण बिंदू समाविष्ट केला आहे. |
01:51 | Edit Points टूलबारमधील पर्याय आता वापरता येतील. |
02:00 | Symmetric Transition वर क्लिक करा. |
02:03 | बिंदूच्या पुढे ठिपके असलेली कंट्रोल लाईन दिसेल. |
02:07 | शाळेच्या परिसराचा आकार बदलण्यासाठी कंट्रोल लाईन बाहेरच्या बाजूला ड्रॅग करा. आकार बदललेला दिसेल. |
02:16 | Edit Points टूलबारमधून बाहेर पडण्यासाठी Points वर क्लिक करा. |
02:21 | आता शाळेचा परिसर उजव्या बाजूने मोठा करणार आहोत. |
02:26 | विशेषतः फक्त उजवीकडील वरच्या बाजूचा शेवटचा बिंदू हलवू. |
02:30 | School Campus चा पॉलिगॉन सिलेक्ट करा. |
02:34 | Edit Points टूलबार उघडू. |
02:38 | आकृतीवर निळ्या रंगाचे एडिट करण्यासाठीचे बिंदू दिसतील. हा बिंदू निवडू. |
02:45 | Edit Points टूलबारवरील Move points वर क्लिक करा. |
02:50 | आपण निवडलेला बिंदू गडद निळ्या रंगाचा झालेला दिसेल. |
02:54 | आता हा बिंदू उजवीकडे ड्रॅग करू. |
02:58 | गरजेनुसार आकृती योग्य जागी ठेवण्यासाठी आपण ग्रीडचा उपयोग करू शकतो. |
03:03 | अशाप्रकारे School Campus चा आकार बदलला आहे. |
03:09 | हा पाठ थांबवून ही असाईनमेंट करा. |
03:12 | एक कर्व्ह काढून Edit Points टूलबारवरील सर्व पर्याय वापरून बघा. Edit Points टूलबारवर कौशल्य मिळवण्यासाठी खूप सराव गरजेचा आहे. |
03:25 | शेवटी नकाशावरील सर्व आकृत्यांचा एकत्रित संच करू. कीबोर्डवरील Ctrl + A ही बटणे दाबा आणि काँटेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करा. |
03:35 | Group हा पर्याय निवडा. आता सर्व आकृत्यांचा ग्रुप झाला आहे. |
03:43 | अशाप्रकारे नकाशा पूर्ण झाला आहे. बिल्डिंगला रंग देखील देता येईल. रेषांच्या सहाय्याने रस्ते, ट्रॅफिक सिग्नल्स आणि इतर गोष्टी आवश्यकतेप्रमाणे समाविष्ट करा. |
03:56 | हा नमुन्यादाखल तयार केलेला रंगीत routemap आहे. |
04:00 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. येथे कर्व्हज आणि पॉलिगॉन्स मधे बदल करण्याबद्दल जाणून घेतले. |
04:10 | आणखी एक असाईनमेंट. या स्लाईडवर दाखवल्याप्रमाणे नकाशा बनवा. |
04:16 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04:27 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04:37 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
04:45 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
05:00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
05:11 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |