LibreOffice-Suite-Draw/C4/Set-Draw-preferences/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 23:31, 28 October 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Setting Preferences वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात हे preferences सेट करायला शिकणार आहोत :
  • प्रॉपर्टीज
  • फाईल्सची वर्जन्स बनवणे
  • ड्रॉईंग color/grayscale/black-and-white स्वरूपात बघणे.
00:18 येथे उबंटु लिनक्स वर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिबर ऑफिस सुटचे वर्जन 3.3.4 वापरू.
00:29 या आधी सेव्ह केलेली '3D ObjectsChart' ही फाईल उघडून त्याच्या पहिल्या पानावर जा.
00:40 समजा पुढील संदर्भासाठी या फाईलसाठी काही स्पष्टीकरण समाविष्ट करायचे आहे.
00:45 यासाठी मुख्य मेनूतील File खालील Properties पर्याय निवडा.
00:50 Properties चा डायलॉग बॉक्स उघडेल.
00:56 General टॅबवर क्लिक करा. फाईलशी संबंधित असलेल्या सर्व माहितीची सूची येथे दिसेल.
01:02 लक्षात ठेवा येथे आपल्याला केवळ फाईलचा तपशील बघता येतो, बदल करता येत नाही.
01:09 Description टॅबवर क्लिक करा.
01:13 येथे गरजेप्रमाणे तुम्ही Title, Subject, Keywords आणि Comments देऊ शकता.
01:20 ही माहिती आपण संदर्भासाठी वापरू शकतो.
01:25 Title फिल्डमधे "3D Objects Chart" असे टाईप करा.
01:30 Subject फिल्डमधे "3D Objects Comparisons" असे टाईप करा.
01:37 Keywords मधे "3D and 3D Effects" असे टाईप करू.
01:42 शेवटी Comments मधे "Learning about File Properties" असे टाईप करू.
01:48 ड्रॉ फाईलशी संबंधित असलेली माहिती येथे देणे केव्हाही उत्तमच.
01:54 Description टॅब मधील properties व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच्या प्रॉपर्टीज सेट करू शकता.
02:00 उदाहरणार्थ समजा तुम्हाला डॉक्युमेंट तयार केल्याची तारीख,
02:05 डॉक्युमेंटचा एडिटर,
02:07 हे डॉक्युमेट कुठल्या क्लायंटसाठी बनवले इत्यादी माहिती हवी आहे.
02:11 ड्रॉ मधे ही माहिती समाविष्ट करण्याचे फीचर उपलब्ध आहे.
02:17 प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्समधे Custom Properties वर क्लिक करा.
02:23 येथे Name, Type आणि Value ही तीन फिल्डस दिसतील.
02:30 उजवीकडे खाली असलेल्या Add बटणावर क्लिक करा.
02:33 प्रत्येक फिल्डखाली आता ड्रॉपडाऊन बॉक्सेस दिसतील.
02:40 Name च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Date Completed हा पर्याय निवडा.
02:46 Type च्या ड्रॉप डाऊनमधे Date Time हा पर्याय निवडा.
02:51 Value फिल्ड आता तारीख आणि वेळ दाखवेल.
02:55 तारीख तशीच ठेवू.
02:57 Time फिल्डमधे 10:30:33 असे टाईप करा.
03:05 आता तुम्हाला हे डॉक्युमेंट तयार करण्याची तारीख माहित आहे.
03:09 आता आणखी एक फिल्ड समाविष्ट करण्यासाठी Add वर क्लिक करा.
03:14 ड्रॉप डाऊन बॉक्सेसची दुसरी सूची दिसेल.
03:21 Name च्या ड्रॉप डाऊनमधे Checked by पर्याय निवडा.
03:25 Type फिल्डमधे Text पर्याय निवडा.
03:29 Value मधे “ABC” हे टेक्स्ट टाईप करा.
03:33 OK क्लिक करा. अशाप्रकारे प्रॉपर्टीज ड्रॉ फाईलमधे समाविष्ट करू शकता.
03:39 तयार केलेल्या प्रॉपर्टीज डिलीट कशा करायच्या ते पाहू.
03:44 मुख्य मेनूच्या File मधील Properties वर क्लिक करा.
03:51 Properties च्या डायलॉग बॉक्समधे Custom Properties वर क्लिक करा.
03:55 Checked by ही पहिली प्रॉपर्टी डिलीट करू.
04:01 उजव्या बाजूला असलेल्या Remove Property बटणावर क्लिक करा. प्रॉपर्टी डिलीट झाली आहे.
04:07 OK क्लिक करा.
04:11 ड्रॉ फाईलची अनेक वर्जन्स आपण सेव्ह करू शकतो. या फीचरला Versions म्हणतात.
04:17 उदाहरणार्थ पहिल्या दिवशी ऑब्जेक्टस समाविष्ट करून फाईल सेव्ह केली.
04:22 दुस-या दिवशी तुम्ही ड्रॉईंगमधे काही बदल केले.
04:24 समजा मूळ ड्रॉईंग आणि बदल केलेले ड्रॉईंग या दोन्ही फाईल्स आपल्याला हव्या आहेत.
04:31 Versions पर्याय वापरून फाईल सेव्ह करू.
04:33 मुख्य मेनूतील File खालील Versions वर क्लिक करा.
04:39 Versions चा डायलॉग बॉक्स उघडेल.
04:42 Save New Version बटणावर क्लिक करा.
04:47 Insert Version Comment चा डायलॉग बॉक्स दिसेल.
04:51 "Version One" अशी कॉमेंट टाईप करा.
04:55 OK क्लिक करून नंतर Close करा.
05:00 आता टायटल मधले टेक्स्ट बदलून ते "Geometry in Two D Shapes and Three D Shapes" असे करा.
05:07 टेक्स्टचा रंग बदलून तो निळा करा.
05:18 Versions पर्याय वापरून फाईल सेव्ह करू.
05:22 मुख्य मेनूतील File खालील Versions वर क्लिक करा.
05:26 Save New Version बटणावर क्लिक करा.
05:30 Insert Version Comment चा डायलॉग बॉक्स दिसेल.
05:34 Version Two अशी कॉमेंट टाईप करा.
05:36 OK क्लिक करा.
05:40 आता येथे Version One आणि Version Two अशी दोन वर्जन्सची सूची दिसेल.
05:46 Version One या फाईलचे टायटल काळ्या रंगात आहे.
05:51 आणि Version Two या फाईलचे टायटल निळ्या रंगात आहे.
05:54 Version One सिलेक्ट करून Open क्लिक करा.
06:00 या वर्जनमधील फाईलचे टायटल काळ्या रंगात दिसेल.
06:05 प्रत्येक वेळी ड्रॉ फाईल बंद करताना फाईलचे नवे वर्जन आपोआप सेव्ह करता येते.
06:11 त्यासाठी फाईल खालील Versions वर क्लिक करा.
06:15 येथे "Always save a version on closing" असा चेक बॉक्स उपलब्ध आहे.
06:23 हा बॉक्स निवडा.
06:24 ड्रॉ फाईल बंद केल्यावर प्रत्येक वेळी ह्या फाईलचे नवे वर्जन सेव्ह होईल. Close वर क्लिक करा.
06:34 तुमच्या ड्रॉ फाईलसाठी viewing preferences देखील सेट करू शकता.
06:38 आपण ड्रॉईंग Color, Gray scale किंवा Black and White स्वरूपात बघू शकतो.
06:44 डिफॉल्ट रूपात ड्रॉ फाईल रंगीत दिसते.
06:48 आता हा बदलून Gray Scale मधे बघू.
06:53 View वर क्लिक करून Color/Grayscale वर क्लिक करा. Gray Scale सिलेक्ट करा.
06:59 आता ऑब्जेक्टस राखाडी रंगात दिसत आहेत.
07:03 आता हे बदलून कृष्णधवल म्हणजेच Black and White रंगात बघू.
07:08 मुख्य मेनूतील View खालील Color/Grayscale वर क्लिक करा. Black and White सिलेक्ट करा.
07:17 आपल्याला सर्व ऑब्जेक्टस कृष्णधवल स्वरूपात दिसतील.
07:25 आपण हे पुन्हा रंगीत स्वरूपात बघू शकतो.
07:29 त्यासाठी View खालील Color/Grayscale वर क्लिक करा. Color पर्याय निवडा.
07:36 ड्रॉईंग पुन्हा रंगीत स्वरूपात दिसेल.
07:43 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:45 आपण ड्रॉ मधे हे प्रेफरन्सेस सेट करायला शिकलो:
  • ड्रॉ फाईलच्या प्रॉपर्टीज
  • ड्रॉ फाईल्सची वर्जन्स बनवणे
  • ड्रॉईंग color/grayscale/black-and-white रूपात बघणे.
07:59 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:06 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
  • Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  • परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:21 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:29 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:33 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:40 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
08:54 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana