LibreOffice-Suite-Draw/C3/Flow-Charts-Connectors-Glue-Points/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | लिबर ऑफिस ड्रॉच्या Flowcharts, Glue Points आणि Beizer curves वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात Beizer curvesआणि Flowcharts काढायला शिकू. |
00:14 | तसेच Connectors आणि Glue points च्या सहाय्याने Flowcharts कसे जोडायचे हे जाणून घेऊ. |
00:20 | येथे उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू. |
00:29 | प्रथम Bezier Curves जाणून घेऊ. |
00:33 | कॉम्प्युटर ग्राफिक्समधे Bezier Curves मुख्यत्वे कर्व्हज (वक्ररेषा) सफाईदार काढण्यासाठी वापरतात. |
00:40 | हे कर्व्हज वापरून तुम्हाला विविध आकाराच्या लहान मोठ्या वक्ररेषा काढता येतील. |
00:45 | सर्व वक्ररेषांना आरंभ आणि अंतिम बिंदू असतो. |
00:50 | वक्र रेषांवरील बिंदूंना नोडस म्हणतात. |
00:54 | Routemap फाईलवर जाऊ. |
00:58 | आता Home वरून Commercial Complex कडे जाऊ. |
01:03 | त्यासाठी Parking Lot वरून उजवीकडे वळणे आवश्यक आहे. |
01:08 | याआधी ह्या आकृत्यांचा आपण ग्रुप केला होता. आता अनग्रुप करू. |
01:14 | आता ड्रॉईंग टूलबारवरील Curve वर क्लिक करून Curve सिलेक्ट करा. |
01:20 | ड्रॉ पेजवर मार्गाच्या आरंभ बिंदूवर म्हणजेच Home वर क्लिक करा. |
01:27 | माऊसचे डावे बटण दाबून ठेवा आणि कर्सर Play Ground पर्यंत ड्रॅग करा. |
01:32 | एक सरळ रेष दिसेल. |
01:36 | माऊसचे बटण सोडून द्या. |
01:39 | माऊसचा पॉईंटर Commercial Complex वर न्या. |
01:43 | माऊस सरकेल त्याप्रमाणे रेषा वक्र झालेली दिसेल. |
01:47 | अंतिम बिंदू म्हणजेच Commercial Complex वर डबल क्लिक करा. |
01:52 | अशाप्रकारे आपण वक्र रेषा काढली. |
01:55 | लक्षात घ्या की वक्र रेषा सफाईदार आली आहे. |
01:59 | Edit Points टूलबारच्या सहाय्याने या वक्ररेषेवरील बिंदू एडिट करू. |
02:05 | curve वर क्लिक करा. |
02:07 | Edit Points टूलबार उघडण्यासाठी कर्व्हवर राईट क्लिक करून Edit Points पर्याय निवडा. |
02:14 | कर्व्हच्या दोन्ही कडेच्या बिंदूवर निळे बॉक्स दिसले की आपण कर्व्ह एडिट करू शकतो. |
02:21 | कर्व्हच्या आरंभ बिंदूवर क्लिक करा. |
02:24 | कंट्रोल पॉईंट असलेली एक तुटक रेषा दिसेल. |
02:29 | कर्व्हचा आकार गरजेप्रमाणे कमी जास्त करण्यासाठी तुम्ही ही तुटक रेषा ड्रॅग करू शकता. |
02:35 | एकदा बदल करून झाला की ड्रॉच्या पानावर कुठेही डबल क्लिक करा. |
02:41 | सफाईदार कर्व्ह काढण्यासाठी Edit Points टूलबारने कर्व्हवर बिंदू समाविष्ट, डिलीट करू शकता किंवा ते हलवू शकता. |
02:50 | ही असाईनमेंट करा. |
02:54 | Bezier curve काढा आणि Edit Points टूलबारवरील |
02:59 | सर्व पर्याय वापरून बघा. |
03:02 | आता Flowcharts कसे काढायचे ते पाहू. |
03:05 | RouteMap फाईलमधे दोन नवी पाने समाविष्ट करा. |
03:10 | ड्रॉ मधील ड्रॉईंग टूलबारमधे Flowcharts साठी स्वतंत्र पर्याय आहेत. |
03:17 | हा फ्लो चार्ट स्पोकन ट्युटोरियलच्या कार्यपध्दतीतील सर्व पाय-या दाखवेल. |
03:22 | हा फ्लो चार्ट बनवू. |
03:26 | ड्रॉईंग टूलबारवरील Flowcharts वर क्लिक करा. |
03:30 | छोट्या काळ्या त्रिकोणावर क्लिक करून Flowchart: Process पर्याय निवडा. |
03:37 | ड्रॉ पेजवर कर्सर नेऊन माऊसचे डावे बटण दाबून ते खाली ड्रॅग करा. |
03:44 | आपण Process बॉक्स काढला आहे. |
03:47 | प्रोसेस बॉक्स संपूर्ण प्रक्रियेतील एखादा टप्पा किंवा घटना दाखवते. |
03:54 | आपण फ्लोचार्ट ऑब्जेक्टसमधेही टेक्स्ट समाविष्ट करू शकतो. |
03:59 | प्रोसेस बॉक्सवर डबल क्लिक करून त्यात Create the Tutorial Outline to chunk content into 10-minute scripts असे टाईप करा. |
04:13 | Flowcharts मधील फॉरमॅटिंग पर्याय इतर ऑब्जेक्टसप्रमाणेच आहेत. |
04:20 | आता Process बॉक्समधील टेक्स्ट अलाईन करू. |
04:24 | टेक्स्ट सिलेक्ट करू. |
04:27 | काँटेक्स्ट मेनू बघण्यासाठी राईट क्लिक करून Text वर क्लिक करा. |
04:32 | Text डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:35 | Text डायलॉग बॉक्समधील Resize shape to fit text width चा चेकबॉक्स सिलेक्ट करा. OK क्लिक करा. |
04:43 | तुम्हाला दिसेल की Process बॉक्सचा आकार टेक्स्ट सामावून घेण्यासाठी बदलेल! |
04:49 | ही क्रिया undo करण्यासाठी CTRL+Z दाबा. |
04:55 | पुन्हा सिलेक्ट करा. |
04:59 | मुख्य मेनूतील Format मेनूखालील Text पर्यायावर क्लिक करा. |
05:05 | Text डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:08 | Word wrap text in shape हा पर्याय निवडून OK क्लिक करा. |
05:15 | टेक्स्ट चा आकार बदलेल आणि ते Process बॉक्स सामावून घेईल. |
05:21 | अशाच प्रकारे पहिल्या बॉक्स खालोखाल आणखी एक Process बॉक्स काढू. |
05:28 | त्यात Create Scripts असे टेक्स्ट समाविष्ट करू. |
05:33 | आता Decision बॉक्स काढून त्यामधे Review Okay? असे टेक्स्ट टाईप करा. |
05:42 | निर्णय घेण्याची क्रिया दाखवण्यासाठी Decision बॉक्स वापरतात. |
05:46 | घेतलेल्या निर्णयावर आधारित हा आपल्याला पुढील प्रोसेसवर घेऊन जाईल. |
05:52 | आता डिसीजन बॉक्सच्या खाली आणखी एक प्रोसेस बॉक्स काढा. |
05:58 | त्यामधे Record Video हे टेक्स्ट टाईप करा. |
06:04 | पुढे Review Okay? असे टेक्स्ट लिहिलेल्या डिसीजन बॉक्सची आवश्यकता आहे |
06:12 | आपण काढलेला डिसीजन बॉक्स कॉपी करून तो येथे पेस्ट करू. |
06:18 | त्यासाठी डिसीजन बॉक्स सिलेक्ट करून कीबोर्डवरील CTRL+C दाबा. |
06:25 | आता CTRL+V दाबा. |
06:29 | हा बॉक्स या प्रोसेस बॉक्सच्या खाली नेऊन ठेवू. |
06:35 | त्यामधे Review Okay असे टेक्स्ट टाईप करा. |
06:40 | शेवटी flowchart-connector काढून त्यामधे A टाईप करा. |
06:48 | फ्लो चार्ट कनेक्टर फ्लो चार्टचे दोन भाग एकमेकांना जोडतो. |
06:53 | समजा फ्लो चार्टचा पहिला भाग पहिल्या पानावर आहे. |
06:58 | आणि दुसरा भाग दुस-या पानावर आहे. |
07:02 | आपण पहिल्या पानावर फ्लो चार्टच्या शेवटी फ्लो चार्ट कनेक्टर काढणार आहोत. |
07:08 | नंतर आपण तसाच कनेक्टर दुस-या पानाच्या सुरवातीला काढणार आहोत. |
07:13 | ऑब्जेक्टस जोडण्यापूर्वी ड्रॉ मधील Connector Lines आणि Glue Points बद्दल जाणून घेऊ. |
07:21 | Connectors हे रेषा किंवा बाण असतात ज्यांची टोके दुस-या ऑब्जेक्टला जोडलेली असतात. |
07:28 | Glue points हे त्यांच्या नावाप्रमाणे कनेक्टर्स ऑब्जेक्टला चिकटवतात. |
07:35 | सर्व ऑब्जेक्टसना ग्लू पॉईंटस असतात. |
07:39 | ते आपल्याला दिसत नाहीत; |
07:41 | ड्रॉईंग टूलबारमधून कनेक्टर सिलेक्ट केल्यावर किंवा माऊस पॉईंटर ऑब्जेक्ट वरून फिरवल्यास ते आपल्याला दिसू शकतात. |
07:51 | Glue points हँडल्सप्रमाणे नसतात. |
07:54 | आपण हँडल्सचा उपयोग ऑब्जेक्टसचा आकार बदलण्यासाठी करतो. |
07:58 | ग्लू पॉईंटसचा उपयोग ऑब्जेक्टला कनेक्टर चिकटवण्यासाठी केला जातो. |
08:02 | आता फ्लो चार्टमधील ऑब्जेक्टस कनेक्टर्सच्या सहाय्याने जोडू. |
08:07 | ड्रॉईंग टूलबारवर जाऊन कनेक्टर या पर्यायावर क्लिक करा. |
08:12 | कनेक्टर्सचे विविध प्रकार बघण्यासाठी काळ्या रंगाच्या छोट्या त्रिकोणावर क्लिक करा. |
08:18 | Straight Connector ends with Arrow हा पर्याय निवडा. |
08:23 | कनेक्टर सिलेक्ट केल्यावर ड्रॉ पेज मधील सर्व ऑब्जेक्टस वर फुलीचे चिन्ह दिसेल. |
08:31 | हे glue points आहेत. |
08:34 | आता पहिल्या प्रोसेस बॉक्सच्या ग्लू पॉईंटपासून त्याच्या पुढील प्रोसेस बॉक्सच्या ग्लू पॉईंटपर्यंत एक रेषा काढा. |
08:44 | आपण फ्लो चार्टमधील सर्व ऑब्जेक्टस कनेक्टर्सच्या सहाय्याने वरून खाली अशा पध्दतीने जोडणार आहोत. |
08:52 | तुम्हाला दिसेल की कर्सर कुठेही नेऊन ठेवला तरी प्रत्येक रेष तिच्या जवळच्या ग्लू पॉईंटला आपोआप जोडली जात आहे. |
09:03 | आता प्रोसेस आणि डिसीजन बॉक्सेस एकमेकांना जोडू. |
09:08 | ड्रॉईंग टूलबारवरील Connector ends with Arrow पर्याय निवडा. |
09:14 | आता प्रोसेस बॉक्स त्याच्या पुढील डिसीजन बॉक्सला जोडा. |
09:19 | तसेच पुढील प्रोसेस बॉक्स देखील खालील डिसीजन बॉक्सला जोडा. |
09:25 | तुम्ही कनेक्टरवर देखील टेक्स्ट लिहू शकता. |
09:29 | डिसीजन बॉक्सपासून प्रोसेस बॉक्सपर्यंत काढलेल्या कनेक्टरवर No टाईप करू. |
09:35 | कनेक्टर सिलेक्ट करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
|
09:39 | end control points कार्यरत होत आहेत. |
09:43 | तसेच टेक्स्ट कर्सर आलेला दिसेल. |
09:46 | No हे टेक्स्ट टाईप करा. |
09:49 | आता हेच सगळे दुस-या कनेक्टरसाठी करू. |
09:54 | आपण साधा फ्लो चार्ट बनवला आहे! |
09:57 | Ctrl+S ही बटणे दाबून फ्लो चार्ट सेव्ह करू. |
10:03 | रेषा आणि बाणांच्या सहाय्याने तुम्ही ऑब्जेक्टस देखील जोडू शकता. |
10:08 | परंतु यावेळी ऑब्जेक्टसचा ग्रुप करणे गरजेचे असते. |
10:11 | ह्याचे कारण बाण हे ऑब्जेक्टसशी जोडलेले रहात नाहीत. |
10:16 | कनेक्टर्स हे रेषा आणि बाणांपेक्षा वेगळे कसे? |
10:21 | कनेक्टर्स ह्या अशा प्रकारच्या रेषा किंवा बाण आहेत. |
10:24 | ज्याचे अंतिम बिंदू ऑब्जेक्टच्या |
10:28 | ग्लू पॉईंटसला आपोआप जोडले जातात. |
10:31 | परंतु रेषा किंवा बाण आपोआप जोडले जात नाहीत. |
10:36 | हा पाठ थांबवून असाईनमेंट करा. |
10:40 | स्पोकन ट्युटोरियच्या फ्लो चार्टचा दुसरा भाग तयार करा. |
10:45 | processes बॉक्सेसला रंग द्या. |
10:48 | कनेक्टर काढून त्यात A हे अक्षर टाईप करा. |
10:51 | हे ह्या फ्लो चार्टमधील पहिले ऑब्जेक्ट असले पाहिजे. |
10:55 | हे असे दिसले पाहिजे. |
10:59 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
|
11:02 | या पाठात आपण फ्लो चार्टस, कनेक्टर्स, आणि ग्लू पॉईंटस बद्दल शिकलो.
|
11:09 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
11:13 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:17 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
|
11:22 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
11:24 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:28 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:32 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
11:40 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:45 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
11:53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
12:05 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |