Introduction-to-Computers/C2/Compose-Options-for-Email/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Compose Options for Emails वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्यात आपण शिकणार आहोत. |
00:10 | * ईमेल प्राप्त कर्त्यां बद्दल जसे To, Cc, Bcc. |
00:16 | * ईमेल टेक्स्टचा फॉर्मॅट |
00:19 | * ईमेल्स मध्ये फाइल्स संलग्न करणे. |
00:22 | * Google Drive(गूगल ड्राइव) द्वारे फाइल्स शयेर करणे. |
00:25 | * एक ईमेल मध्ये एक फोटो किंवा लिंक समाविष्ट करणे. |
00:29 | * आणि Compose window पर्यायांबद्दल. |
00:33 | या ट्युटोरियलसाठी, आपल्याला एक काम करणार्या इंटरनेट कनेक्शन |
00:38 | आणि एक वेब ब्राउज़रची आवश्यकता आहे. |
00:40 | या प्रदर्शनासाठी, मी Firefox वेब ब्राउज़रचा वापर करणार आहे. |
00:45 | सुरुवात करू. |
00:46 | आपला वेब ब्राउज़र उघडा आणि टाईप करा : http://gmail.com. |
00:55 | Login पेज उघडेल. |
00:58 | संबंधित टेक्स्ट बॉक्ससमध्ये username आणि password प्रविष्ट करा. |
01:04 | जर 'लोगिन पेज' यूज़रनेम सोबत उघडतो तर याचा अर्थ असा आहे की आपण आधीच आपल्या मशीन मधून ह्या अकाउंटला एक्सेस केले आहे. |
01:12 | पासवर्ड प्रविष्ट करा. |
01:15 | आणि Sign in बटणवर क्लिक करा. |
01:18 | आपण आपल्या Gmail पेज वर आहोत. |
01:21 | आता, एक ईमेल लिहिण्यासाठी उपलब्ध पर्यायांना बघूया. |
01:26 | तर, प्रथम आपण Compose बटणावर क्लिक करूया. |
01:31 | Compose window उघडेल. |
01:34 | To सेगमेंट, जेथे आपण प्राप्तकर्त्यांचे विवरण देतो. |
01:38 | येथे 3 पर्याय आहेत, To, Cc आणि Bcc. |
01:44 | Cc चा अर्थ कार्बन कॉपी आणि Bcc चा अर्थ ब्लाइंड कार्बन कॉपी आहे. |
01:51 | आपल्याला To क्षेत्रमध्ये त्या व्यक्तीचा ईमेल अड्रेस लिहायचा आहे ज्याला आपण ईमेल पाठवीत आहोत. |
01:58 | येथे screenshot आहे. |
02:01 | जर आपल्याला तोच ईमेल एका पेक्षा अधिक लोकांना पाठवायचा असेल तर फक्त To क्षेत्रमध्ये email-ids जोडा. |
02:09 | येथे screenshot आहे. |
02:12 | इतरांना ईमेलची एक कॉपी मार्क करण्यासाठी Cc पर्यायचा वापर करा. |
02:18 | To आणि Cc क्षेत्रातील मार्क केलेले सर्व प्राप्तकर्ता इतर सर्व प्राप्तकर्त्यांनां पाहू शकतात. |
02:25 | येथे screenshot आहे. |
02:28 | आम्ही इतरांना ईमेलची ब्लाइंड म्हणजे गुप्त कॉपी मार्क करण्यासाठी Bcc पर्याय देखील वापरू शकतो. |
02:34 | ह्या पर्यायमध्ये, To आणि Cc मधील प्राप्तकर्ता Bcc मध्ये जोडलेल्या प्राप्तकर्त्यांनां पाहू शकत नाही. |
02:42 | Bcc मधील प्राप्तकर्ता To आणि Cc च्या प्राप्तकर्त्यांनां पाहू शकतात. |
02:47 | पण Bcc चे इतर प्राप्तकर्त्यांनां पाहू शकत नाही. |
02:51 | ईमेल पाठवणारा, प्राप्तकर्त्यांची पूर्ण सूची पाहू शकतो. |
02:55 | येथे एक screenshot आहे. |
02:58 | महत्त्वाची टीपः |
03:00 | आपण प्राप्तकर्त्यांचे क्षेत्र जसे - To, Cc आणि Bcc मध्ये कितीही email-ids जोडू शकतो. |
03:08 | पण दर दिवशी अधिकतम प्राप्तकर्त्यांची मर्यादा '500' आहे. |
03:13 | प्रत्येक मेल-आयडी स्पेस किंवा कॉमा किंवा कोलन ने विभाजीत असले पाहिजे. |
03:20 | Gmail कंपोज़ विंडोवर परत जाऊ. |
03:25 | डिफॉल्ट रूपाने, कर्सर To क्षेत्रमध्ये आहे. |
03:29 | खालील प्रमाणे प्राप्तकर्त्यांचे अड्रेस प्रविष्ट करूया- |
03:33 | To क्षेत्रमध्ये, इमेल-आयडी "ray.becky.0808@gmail.com" देऊ. |
03:46 | Cc क्षेत्रमध्ये "0808iambecky@gmail.com". |
03:55 | Bcc क्षेत्रमध्ये "stlibreoffice@gmail.com" आणि "info@spoken-tutorial.org". |
04:10 | Subject ओळीत क्लिक करा आणि आपल्या ईमेलचा अल्प वर्णन प्रविष्ट करा. |
04:15 | मी टाईप करेल: Partner with us. |
04:19 | कॉंटेंट क्षेत्रमध्ये, आता मेसेज टाईप करा: |
04:24 | Spoken Tutorial Project is helping to bridge the digital divide. |
04:29 | Gmail आपल्या इमेलच्या मुख्य भागात टेक्स्टवर मूलभूत फॉरमॅटिंग करण्याची परवानगी देतो. |
04:35 | डिफॉल्ट रूपाने, हे Compose window मध्ये खाली दिसते. |
04:41 | जर नाही, तर फॉरमॅटिंग टूलबार एक्सेस करा, Formatting options बटणावर क्लिक करा. |
04:47 | येथे, आपल्याकडे अशे विविध पर्याय आहे जसे, fonts, sizes, bold, italic, underline, text color, align, numbered आणि bulleted lists आणि indentation. |
05:03 | हे पर्याय खरोखर कोणत्याही वर्ड प्रोसेसर अप्लिकेशन सारखेच आहे. |
05:08 | आपण स्वा:हून या पर्यायचा अन्वेषण करू शकतो. |
05:12 | मी अशे आपल्या टेक्स्टला फॉर्मॅट केले. |
05:16 | फॉरमॅटिंग टूलबार लपवण्यासाठी, Formatting options बटणावर क्लिक करा. |
05:22 | Compose window मध्ये, फाइल्स, फोटोस, लिंक्स आणि इमोटिकॉन्स ला संलग्न करण्याचे पर्याय आहेत. |
05:32 | फाइल्स किंवा डॉक्युमेंट्स इतरांसह शेअर करण्यासाठी, |
05:35 | आपण Attach files किंवा Insert files using Drive पर्यायांना वापरु शकतो. |
05:41 | सर्व Mail मध्ये फाइल्सला attachment म्हणून पाठवण्याची सुविधा असते. |
05:46 | आपण फाईलची साइज 25 मेगाबाइट्स (MB) पर्यंत संलग्न करू शकतो. |
05:51 | या पेक्षा मोठ्या साइजची फाइल्स पाठवण्यासाठी, आपण Insert files using Drive पर्याय वापरू शकतो. |
05:59 | प्रथम आपण एक pdf file संलग्न करूया, जी 1Mb साइज पेक्षा कमी आहे. |
06:04 | Attach file आइकन वर क्लिक करा जी एक पेपर क्लिप सारखे दिसते. |
06:09 | हे फाइल ब्राऊजर उघडेल. |
06:12 | फाईल ब्राऊज करून निवडा जी आपल्याला मेल द्वारे पाठवायची आहे. |
06:16 | डेस्कटॉप वरुन, मी "myscript.pdf" निवडेन आणि Open वर क्लिक करेन. |
06:23 | आपण पाहू शकतो की आपली फाईल मेल मध्ये संलग्न होत आहे. |
06:27 | Attach files पर्याय वापरून त्याच मेल मध्ये अनेक फाईल्स देखील संलग्न केले जाऊ शकतात. |
06:34 | मेसेज सह संलग्न केलेली फाइल काढून टाकण्यासाठी, फाइल-नेम च्या उजवीकडील 'x' चिन्हा वर क्लिक करा. |
06:41 | आता, एक फाईल संलग्न करू जी सुमारे 30Mb ची आहे. |
06:46 | माझ्याकडे डेस्कटॉप वर एक zip file आहे ज्याची साइज सुमारे 30Mb आहे. |
06:52 | पुन्हा एकदा Attach files आइकन वर क्लिक करा. |
06:56 | 30Mb 'ज़िप फाईल' ब्राऊज करून निवडा आणि Open वर क्लिक करा. |
07:02 | आपल्याला पॉपअप मेसेज मिळेल: |
07:04 | "The file you are trying to send exceeds the 25mb attachment limit". |
07:09 | आणि तो आपल्याला Send using Google drive चा पर्याय देतो. |
07:14 | Send using google drive बटणावर क्लिक करा. |
07:18 | आता मी एका क्षणसाठी हे डॉक्युमेंट बंद करते. |
07:21 | Insert files using Drive पर्यायवर क्लिक करणे तसेच आपल्या आधीच्या विंडो वर घेऊन जाईल. |
07:28 | येथे, आपण 3 टॅब्स पाहू शकतो. |
07:31 | My Drive, Shared with me आणि Upload. |
07:36 | डिफॉल्ट रूपात, फाइल्स जे आधीच अपलोड केले आहेत My Drive टॅब मध्ये उपलब्ध असतील. |
07:43 | येथे आपण फाइल पाहू शकतो. |
07:46 | हे खाते निर्मितीच्या वेळी गूगल टीम द्वारे शेअर केले होते. |
07:51 | Shared with me टॅब वर क्लिक करा. |
07:55 | येथे आपण मेसेज पाहू शकतो - "No one's shared any files with you yet!" |
08:00 | जर कोणालाही आपल्या सोबत फाइल शेअर करायची असेल तर हे Shared with Me tab मध्ये उपलब्ध असेल. |
08:06 | आता, नवीन फाइल अपलोड करण्यासाठी Upload टॅब वर क्लिक करा. |
08:12 | Select files from your computer बटणावर क्लिक करा. |
08:16 | आपल्या मशीन मधून ती फाईल ब्राऊज करा आणि निवडा, जी आपल्याला अपलोड करायची आहे Open वर क्लिक करा. |
08:23 | जर आपल्याला जास्त फाइल्स जोडयच्या असतील, तर Add more files बटण वर क्लिक करा, |
08:27 | मी आतासाठी हे सोडून देते आणि फक्त एकच फाइल अपलोड करते. |
08:33 | फाइल जोडल्यानंतर, आपल्याला उल्लेख करायचा आहे की ह्याला आपल्या मेलमध्ये कसे समाविष्ट करणे. |
08:40 | लक्षात घ्या खाली उजव्या बाजूला दोन बटणे आहेत जे असे- |
08:44 | Insert as Drive link आणि |
08:46 | Attachment |
08:48 | डिफॉल्ट रूपात, Insert as Drive link निवडलेले आहेत. |
08:52 | जर आपण Attachment निवडल्यास, नंतर फाईल अटॅचमेंट म्हणून समाविष्ट केले जाईल. |
08:57 | आपण हे असेच सोडणार आहोत. |
09:00 | स्क्रीनच्या खाली डाव्या कोपऱ्यात Upload बटणावर क्लिक करा. |
09:05 | अपलोड सुरू होईल परंतु आपल्या इंटरनेटच्या गतीवर अवलंबून काही वेळ लागू शकतो. |
09:11 | एकदा पूर्ण झाल्यानंतर, आपण कॉंटेंट क्षेत्रात, अपलोड केलेली फाइलची लिंक पाहू शकतो. |
09:17 | आता ईमेल मध्ये इमेजेस समाविष्ट करण्यासाठी Insert Photo पर्याय वर क्लिक करा. |
09:24 | Upload Photos विंडो उघडते. |
09:27 | आपण आपल्या कंप्यूटर मधून किंवा इमेज चा website address देऊन 'फोटोज' अपलोड करू शकतो. |
09:34 | आता साठी, कोणतेही इमेज अपलोड करण्याची माझी इच्छा नाही. |
09:38 | त्यामुळे, मी Cancel बटणावर क्लिक करेन. |
09:41 | आपण ह्या पर्यायचा अन्वेषण आपण स्वत: करू शकतो. |
09:44 | पुढील पर्याय Insert Link आहे. त्यावर क्लिक करू. |
09:49 | Edit Link डायलॉग बॉक्स उघडतो. |
09:53 | Text to display क्षेत्रात, तो टेक्स्ट टाइप करा जो आपल्याला लिंक म्हणून पाहिजे. |
09:58 | मी Spoken Tutorial टाईप करेन. |
10:02 | Link to सेक्शन मध्ये, डिफॉल्ट रूपात, Web address पर्याय निवडलेले आहेत. |
10:08 | टेक्स्ट क्षेत्रात, url टाईप करा http://spoken-tutorial.org |
10:20 | आणि OK बटणावर क्लिक करा. |
10:23 | आता, कॉंटेंट क्षेत्रात, आपण Spoken Tutorial टेक्स्ट पाहू शकतो आणि हे 'हाइपरलिंक' झाले आहे. |
10:29 | आता मी 'हाइपरलिंक' केलेल्या टेक्स्टवर क्लिक करते. |
10:32 | टेक्स्टच्या खाली छोटी pop window उघडते. |
10:35 | इथं म्हटलंय Go to link: |
10:38 | प्रदर्शित केलेल्या URL वर क्लिक केल्यास, स्पोकन ट्युटोरियल वेबसाइटच्या 'होमपेज' वर घेऊन जाईल. |
10:45 | URL बदलण्यास किंवा लिंक काढून टाकण्यास, आपण अनुक्रमे Change किंवा Remove पर्यायांवर क्लिक करू शकतो. |
10:53 | आपण या emoticon आइकनच्या मदतीने विविध चित्रमय प्रतीनिधीत्वांना देखील समाविष्ट करू शकतो. |
10:59 | आपल्या इमेल संवाद मध्ये कुठेही आवश्यक तेथे हे वैशिष्ट्य वापरा. |
11:04 | लक्षात घ्या Saved, Trash आइकानच्या बिलकुल आधी आहे. |
11:08 | जेव्हा पण आपण कॉंटेंट जोडू किंवा काढू तेव्हा, आमचे ईमेल डीफॉल्टनुसार Drafts folder मध्ये स्वयं सेव्ह होईल. |
11:16 | वीज गेल्यावर किंवा इंटरनेट खंडित बाबतीत, येथे आपले टाईप केलेले मेसेज पुनर्प्राप्त करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. |
11:24 | जर आपल्याला हा मेसेज काढून टाकायचा असेल तर Trash आइकन वर क्लिक करा. |
11:28 | ही क्रिया Drafts folder मधून देखील ईमेलला काढून टाकेल. |
11:34 | More options बटणावर क्लिक करा जो Trash आइकनच्या नंतर आहे. |
11:39 | Default to full-screen पर्याय Compose window ला मोठा करेल. |
11:44 | Label – आपण ह्या वैशिष्ट्य बद्दल भविष्यातील ट्यूटोरियल्स मध्ये शिकू. |
11:49 | सर्व फॉरमॅटिंग जी आपण आधी केली होती Plain text mode पर्याय त्याला काढून टाकेल आणि मेल प्लेन टेक्स्ट मध्ये रूपांतरित होईल. |
11:57 | Print पर्याय लिहिलेल्या मेल ला डिफॉल्ट रूपात, संरचीत प्रिंटरला पाठवेल. |
12:03 | Check Spelling टाइप केलेली कॉंटेंट चे शब्दलेखन-तपासणी करणार आहे. |
12:07 | मेल पाठविण्यासाठी तयार आहोत. |
12:09 | Send बटणावर क्लिक करा. |
12:12 | स्क्रीन वर खालील मेसेज मिळतो- |
12:15 | This Drive file isn't shared with all recipients. |
12:19 | कारण, आम्ही ज्यांना या मेलमध्ये मार्क केलेले आहेत त्यांच्याशी ही फाइल शेर केलेली नाही. |
12:25 | Share & Send बटणावर क्लिक करा. |
12:29 | स्क्रीन वर,दोन्ही मधून कुठलाही एक मेसेजस दिसेल: |
12:32 | Your message is sending. |
12:34 | किंवा Your message has been sent. |
12:38 | पाठवलेली मेल पाहण्यासाठी, View Message लिंक वर क्लिक करा. |
12:43 | आपण येथे त्या ईमेलच्या कॉंटेंटला पाहू शकतो जो आपण पाठवला आहे. |
12:47 | एक एक करून तपासूया. |
12:50 | येथे attachments आहे. |
12:52 | आणि येथे URL link आहे. |
12:55 | मेल अड्रेसच्या खाली, एक उल्टा त्रिकोण आहे जे हेडरचे तपशिल दाखवतो. |
13:00 | त्यावर क्लिक करू. |
13:03 | आपण To, Cc आणि Bcc क्षेत्रांमध्ये सर्व प्राप्तकर्त्यांचे Email-ids पाहू शकतो. |
13:11 | पाहूया की प्राप्त कर्त्यांना ईमेल कसा दिसेल. |
13:16 | हे Cc मध्ये मार्क केलेले प्राप्तकर्त्यांची 'mail-id' आहे. |
13:21 | आपण तो मेसेज पाहू शकतो जो आता पाठवला आहे. मी हे वाचण्यासाठी उघडते. |
13:27 | Show Details वर क्लिक करा. |
13:29 | येथे To आणि Cc च्या प्राप्तकर्त्यांना दाखवतो परंतू Bcc चे नाही दाखवत. |
13:35 | हे Bcc मधील मार्क केलेली कोणत्या तरी एका प्राप्तकर्त्याची मेल – आइडि आहे. |
13:41 | आपण तो मेसेज पाहू शकतो जो आता पाठवला आहे. |
13:43 | मी हे वाचण्यासाठी उघडते. |
13:46 | Show Details वर क्लिक करा. |
13:49 | आपण To, Cc आणि Bcc चे प्राप्तकर्त्यांचे विवरण पाहू शकतो. |
13:55 | आता मी पाठवणार्याच्या जीमेल अकाउंट वर परत येते. |
13:59 | येथे पहा, आम्ही Bcc मध्ये दोन प्राप्तकर्त्यांचे उल्लेख केले. |
14:04 | पण येथे आपण फक्त एक email id पाहू शकतो. दुसरा नाही दिसत. |
14:10 | Bcc वैशिष्ट्य ह्या प्रकारे कार्य करतो. |
14:13 | आशा करते की आपण फरक करण्यास स्पष्टपणे सक्षम आहात. |
14:17 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
14:20 | थोडक्यात |
14:22 | या ट्युटोरियलमध्ये, आपण शिकलो |
14:25 | * ईमेल प्राप्त कर्त्यां बद्दल जसे To, Cc, Bcc. |
14:30 | *ईमेल टेक्स्टचा फॉर्मॅट |
14:33 | * ईमेल्स मध्ये फाइल्स संलग्न करणे. |
14:36 | * Google Drive(गूगल ड्राइव) द्वारे फाइल्स शयेर करणे |
14:39 | एक ईमेल मध्ये एक फोटो किंवा लिंक समाविष्ट करणे. |
14:43 | आणि * Compose window पर्यायांबद्दल. |
14:47 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
14:52 | व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता. |
14:55 | कार्यशाळा चालविते ,परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते |
15:01 | अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
15:04 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. |
15:11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
15:16 | या ट्युटोरियलला स्पोकन ट्युटोरियल टीम, IIT बॉमबे ने योगदान केले आहे. |
15:21 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |