BOSS-Linux/C3/The-sed-command/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:48, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: The-sed-command

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Time Narration


00:01 sed - दि स्ट्रीम एडिटर वरील पाठात आपले स्वागत.
00:07 ह्या पाठात sed कमांडचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:11 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
00:14 ह्या पाठासाठी,
00:16 आपण लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU BASH वर्जन 4.2.24 वापरणार आहोत.
00:26 पाठाच्या सरावासाठी GNU bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू.
00:33 तसेच तुम्हाला
00:35 लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:38 संबंधित पाठांसाठी आमच्या http://spoken-tutorial.org या वेबसाईटला भेट द्या.
00:44 आता sed बद्दल जाणून घेऊ.
00:47 sed हा स्ट्रीम एडिटर आहे.
00:50 Sed, फाईलमधील विशिष्ट जागी टेक्स्टचा एखादा पॅटर्न शोधते.
00:57 ही कमांड, टेक्स्ट दर्शवण्याचे किंवा एडिट करण्याचे कार्य करते.
01:01 जसे की जुळलेल्या टेक्स्टच्या जागी टेक्स्ट समाविष्ट करणे, पुसणे किंवा बदलून लिहिणे यासारखी एडिटिंगची कामे.
01:10 प्रथम काही उदाहरणांद्वारे सुरूवात करू.
01:13 sed कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू.
01:18 माझ्याकडे होम डिरेक्टरीमधे seddemo.txt नामक फाईल आहे.
01:23 त्यातील घटक पाहू.
01:26 ह्या फाईलमधे आपल्याकडे roll no, name, stream, marks, pass किंवा fail आणि stipend amountअशा एंट्रीज आहेत.
01:38 समजा फाईलची दुसरी ओळ प्रिंट करायची आहे.
01:43 त्यासाठी टर्मिनल उघडावे लागेल.
01:47 आता टाईप करा sed space सिंगल कोटसमधे ‘2p’ सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
01:57 एंटर दाबा.
02:00 येथे दुसरी ओळ दाखवण्यासाठी 2 हा अंक आहे.
02:05 p हे अक्षर प्रिंटीग ही कृती दाखवत आहे.
02:09 आता आऊटपुट पहा.
02:11 हे संपूर्ण फाईल दाखवत आहे. पण दुसरी ओळ दोनदा प्रिंट झाल्याचे दिसेल.
02:18 हे p ह्या कृतीचे डिफॉल्ट बिहेवियर आहे.
02:22 केवळ दुसरी ओळ प्रिंट करण्यासाठी,
02:25 टाईप करा sed space -n space (सिंगल कोटसमधे) 2p सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
02:37 एंटर दाबा.
02:40 केवळ दुसरी ओळ प्रिंट झालेली दिसेल .
02:44 -n म्हणजे ‘silent mode’ जे सर्व अनावश्यक आऊटपुट काढून टाकते.
02:51 स्ट्रीममधे सांगितलेले लोकेशन एडिट करायचे किंवा दाखवायचे आहे.
02:57 आपल्याला दुसरी ओळ सिलेक्ट करायची आहे.
03:00 p हे कृती सांगते. म्हणजेच दुसरी ओळ प्रिंट करायची आहे.
03:06 आणि seddemo.txt हे फाईलचे नाव आहे.
03:11 हा sed कमांडचा सर्वसाधारण सिंटॅक्स आहे.
03:15 आता फाईलची शेवटची ओळ प्रिंट करू.
03:20 प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ.
03:24 आता टाईप करा. sed space -n space सिंगल कोटसमधे (dollar) $p सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
03:36 एंटर दाबा.
03:39 शेवटची ओळ प्रिंट झालेली दिसेल.
03:42 आता टेक्स्ट एडिटरवर जा.
03:45 समजा 3पासून 6 पर्यंतच्या एंट्रीज प्रिंट करायच्या आहेत.
03:50 त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा:
03:54 sed space -n space सिंगल कोटसमधे '3 (comma) , 6p' सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
04:07 एंटर दाबा.
04:09 तिस-या ओळीपासून सहाव्या ओळीपर्यंत आऊटपुट दाखवले जाईल.
04:14 कृतीच्या आधी उद्गारचिन्ह दिल्याने कुठलीही कृती उलट केली जाते.
04:21 समजा 3पासून 6पर्यंतच्या ओळी सोडून बाकी सर्व ओळी प्रिंट करायच्या असल्यास टाईप करा: sed space -n space सिंगल कोटसमधे ‘3 (comma) ,6 (exclamation mark) !p'
04:38 सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
04:45 एंटर दाबा. अशाप्रकारे आऊटपुट दिसेल.
04:49 स्लाईडस वर परत जाऊ.
04:52 लाईन अॅड्रेसिंग आणि काँटेक्स्ट अॅड्रेसिंग.
04:56 आतापर्यंत ज्यावर कृती करायची आहे ती फाईलमधील ओळ क्रमांक नमूद करीत होतो.
05:02 त्याला लाईन अॅड्रेसिंग म्हणतात.
05:05 ओळीच्या क्रमांकाने अॅड्रेस नमूद केला जातो.
05:08 ही अॅड्रेसिंगची एक पध्दत आहे.
05:11 अॅड्रेसिंगची दुसरी पध्दत म्हणजे काँटेक्स्ट अॅड्रेसिंग .
05:16 अशा ओळी ज्यात विशिष्ट काँटेक्स्ट असेल जसे की विशिष्ट शब्द.
05:21 विशिष्ट शब्द असलेल्या ओळीवर कृती करायची असल्यास काँटेक्स्ट अॅड्रेसिंग वापरू.
05:29 आपण रेग्युलर एक्सप्रेशन्स वापरू शकतो.
05:32 आता उदाहरण पाहू.
05:35 आपल्या एडिटरवर जाऊ.
05:38 समजा computers हा शब्द असलेल्या ओळी प्रिंट करायच्या आहेत.
05:44 टर्मिनलवर जाऊ.
05:46 टाईप करा
05:48 sed space -n space (सिंगल कोटसमधे) (front slash)(चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) omputers/p(front slash) सिंगल कोटस नंतरspace seddemo.txt
06:14 एंटर दाबा.
06:16 आपण computers हा शब्द असलेल्या ओळी बघू शकतो.
06:22 आपण पॅटर्न चौकटी कंसात लिहितो.
06:24 यामुळे चौकटी कंसातील कोणतेही एक किंवा दोन्ही अक्षरे जुळवून पाहिली जातील.
06:30 पॅटर्न जुळवून बघायचा असतो त्यावेळी तो front slashesमधे लिहितात.
06:37 आपण तो फाईलमधे प्रिंट करू शकतो किंवा w option वापरू शकतो.
06:43 त्यासाठी टाईप करा: sed space -n space (सिंगल कोटसमधे) (front slash) (चौकटी कंस सुरू) cC (चौकटी कंस पूर्ण) Computers/w space computer_student.txt सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
07:11 एंटर दाबा.
07:14 आता जुळणा-या सर्व ओळी computer_student.txt ह्या फाईलमधे पाठवल्या जातील.
07:21 आता computer_studentमधील घटक पाहू.
07:25 टाईप करा cat space computer_student.txt
07:32 एंटर दाबा.
07:35 आपण ह्या एंट्रीज पाहू शकतो.
07:37 आपण पॅटर्न्स वेगवेगळ्या फाईल्स मधे पाठवू शकतो.
07:42 प्रॉम्प्ट क्लियर करा.
07:45 टाईप करा sed space -n space -e space (सिंगल कोटसमधे) (front slash) ‘/electronics/w space electro.txt’ सिंगल कोटस नंतर space -e space (सिंगल कोटसमधे) (front slash) ‘/civil/w space civil.txt’ सिंगल कोटस नंतर space seddemo.txt
08:18 एंटर दाबा.
08:22 येथे -e चा वापर अनेक मेथडस एकत्र करण्यासाठी केला आहे.
08:27 हे electro.txt आणि civil.txtह्या दोन फाईल्स बनवेल.
08:34 त्यामधे काय आहे ते बघण्यासाठी टाईप करा:
08:37 cat space electro.txt
08:42 electronicsहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे.
08:47 आता civil फाईलमधील घटक पाहू.
08:50 टाईप करा cat space civil.txt
08:55 एंटर दाबा.
08:57 civilहा शब्द असलेल्या एंट्रीज दाखवत आहे.
09:01 आपण आणखी कमांडसचा संच पुढील पाठांत पाहू.
09:05 त्यासाठी हाच प्रोग्रॅम वापरू.
09:08 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:11 स्लाईडवर परत जाऊ.
09:14 थोडक्यात, या पाठात आपण शिकलो ,
09:18 sedद्वारे प्रिंट करणे. लाईन अॅड्रेसिंग.
09:21 काँटेक्स्ट अॅड्रेसिंग.
09:23 असाईनमेंट म्हणून,
09:25 seddemo.txt ही टेक्स्टफाईल वापरून,
09:28 6व्या पासून 12व्या ओळीपर्यंतची रेकॉर्डस प्रिंट करा.
09:33 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:36 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:39 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:46 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:49 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:53 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:00 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:04 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:11 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:17 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana