BASH/C2/Arithmetic-Comparison/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:30, 9 December 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of Script: Arithmetic comparison in BASH Author: Manali Ranade Keywords: video tutorial, Bash shell, -eq, -ne, -gt, -ge, -lt, -le


Time Narration
00:01 नमस्कार.Arithmetic Comparison in BASH वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:09 * equal to
 * not equal to
 * less than
 * less than equal to
  • greater than आणि
  • greater than equal to ह्या कमांडस.
00:19 हे उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ.
00:23 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:26 *उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:30 *GNU BASH वर्जन 4.1.10
00:34 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:39 आपल्याकडे गणिती क्रियांवरील काही उदाहरणे आहेत.
00:43 ती पाहू.
00:45 आपल्याकडे example1.sh ही फाईल आहे.
00:50 ही फाईल तुमच्या पसंतीच्या एडिटर मधे उघडा आणि दाखवलेला कोड टाईप करा.
00:56 हे कसे करायचे हे तुम्हाला आतापर्यंत माहित झाले असेलच.
01:00 या प्रोग्रॅममधे फाईल रिकामी आहे की नाही ते तपासणार आहोत.
01:06 आता कोड समजून घेऊ.
01:08 ही shebang line आहे.

.

01:10 प्रथम कंसोलवर “Enter filename” असे दाखवले जाईल.
01:15 स्टँडर्ड इनपुट कडून आलेला डेटा read कमांड वाचेल.
01:20 ही कमांड backticksमधे लिहिलेली आहे.
01:24 Backtick ला विशिष्ट अर्थ आहे.
01:27 backtickमधे टाईप केलेल्या प्रत्येकाचे मूल्यमापन केले जाते.
01:32 cat कमांड फाईल मधील घटक दाखवते.
01:37 wc कमांड प्रत्येक फाईलसाठी नव्या ओळीत शब्दसंख्या आणि बाईट संख्या प्रिंट करेल.
01:43 - (hyphen) w शब्दसंख्या प्रिंट करेल.
01:47 काय होते ते पाहू -
01:49 * प्रथम cat कमांड ही फाईल वाचेल.
01:53 ही इनपुट फाईल आहे.
01:55 * ही नंतर wc कमांडकडे पाईप केली म्हणजेच पाठवली जाईल.
02:00 * आता हे स्टेटमेंट दिलेल्या फाईलमधील शब्दसंख्या मोजेल.
02:05 * आऊटपुट x या व्हेरिएबलमधे संचित केले जाईल.
02:08 हे if स्टेटमेंट आहे.
02:10 - (hyphen) eq ही कमांड शब्दांची संख्या शून्य आहे का तपासेल.
02:16 जर कंडिशन true असेल तर “File has zero words” हा मेसेज प्रिंट करू.
02:22 fi नी पहिली if कंडिशन पूर्ण होईल.
02:26 येथे आणखी एक if कंडिशन आहे.
02:28 येथे - (hyphen) ne कमांड शब्द संख्या शून्य नाही ना हे तपासेल.
02:35 कंडिशन true असल्यास “File has so-and-so words” असा मेसेज दाखवू.
02:40 $ (dollar) x शब्द संख्या दाखवेल.
02:43 येथे दुसरी if कंडिशन पूर्ण होईल.
02:46 प्रोग्रॅम फाईल सेव्ह करा.
02:48 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:51 टर्मिनल उघडा.
02:53 प्रथम list.txt फाईल बनवू.
02:57 टाईप करा: touch list.txt
03:01 आता फाईलमधे ओळ समाविष्ट करू.
03:04 टाईप करा:

echo डबल कोटसमधे “How are you” डबल कोटसनंतर greater than sign list.txt

03:13 आता स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यायोग्य बनवू.
03:16 टाईप करा:

chmod plus x example1 dot sh

03:21 आता टाईप करा dot slash example1.sh
03:26 Enter filename असे दाखवले जाईल.
03:28 टाईप करा:

list.txt

03:31 list.txt has 3 words असे आऊटपुट दाखवले जाईल.
03:36 आता आणखी ऑपरेटर्स बघू.
03:40 दुसरी फाईल घेऊ.
03:43 ही example2.sh नावाची फाईल आहे.
03:46 तुमच्या एडिटरमधे फाईल उघडून तिला example2.shअसे नाव द्या.
03:52 आता दाखवलेला कोड तुमच्या example2.sh फाईलमधे टाईप करा.
03:58 कोड समजून घेऊ.
04:00 हा प्रोग्रॅम शब्दांची संख्या तपासेल.
04:04 * ती एक पेक्षा कमी आहे का जास्त?
04:07 * ती एक आणि शंभरच्या मधे आहे का शंभरपेक्षा जास्त आहे?
04:11 ही shebang line आहे.
04:14 read स्टेटमेंट युजरकडून फाईलचे नाव इनपुट म्हणून स्वीकारेल.
04:19 येथे बाईटची संख्या प्रिंट करण्यासाठी - (hyphen) c कमांड वापरू.
04:24 if स्टेटमेंट - (hyphen) lt कमांड शब्दसंख्या एकपेक्षा कमी आहे का ते तपासेल.
04:31 कंडिशन true असल्यास “No characters present in the file” असे दाखवू.
04:37 fi नी if कंडिशन पूर्ण होईल.
04:40 पुढे if स्टेटमेंटमधे गुंफलेले दुसरे if स्टेटमेंट आहे.
04:45 प्रथम - (hyphen) gt ही कमांड शब्दसंख्या एक पेक्षा जास्त आहे ते तपासेल.
04:51 असल्यास हे echo स्टेटमेंट कार्यान्वित होईल.
04:56 if स्टेटमेंटमधे अनेक कंडिशन्स आहेत.
05:01 या if मधे
  • - (hyphen) ge कमांड शब्दसंख्या एक किंवा त्यापेक्षा जास्त आहे का ते तपासेल.
05:09 * आणि - (hyphen) le कमांड शब्दसंख्या शंभर किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासेल.
05:17 जर दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्यास मेसेज प्रिंट करू:
05:21 Number of characters ranges between 1 and 100.
05:25 संपूर्ण if कंडिशन पूर्ण होण्यासाठी दोन्ही कंडिशन्स true असणे गरजेचे आहे.
05:33 कारण आपण दोन्ही कंडिशन्समधे अँपरसँडचा समावेश केला आहे.
05:39 fi ने if स्टेटमेंट पूर्ण केले आहे.
05:43 नंतर पुढील if स्टेटमेंटचे मूल्यमापन केले जाईल.
05:47 - (hyphen) gt कमांड शब्दसंख्या शंभरपेक्षा जास्त आहे का ते तपासेल.
05:53 ही कंडिशन पूर्ण झाल्यास, Number of characters is above hundredअसे प्रिंट केले जाईल.
06:00 fi नेif स्टेटमेंट पूर्ण केले आहे.
06:04 येथे दुसरे if स्टेटमेंट पूर्ण केले आहे.
06:07 टर्मिनलवर जा.
06:10 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06:13 chmod plus x example2 dot sh
06:18 dot slash example2 dot sh
06:22 टाईप करा list.txt
06:25 हे आऊटपुट मिळेल list.txt has more than one character.
06:31 Number of characters ranges between one and hundred
06:36 आता list.txt फाईलमधे काही अक्षरे वाढवा किंवा कमी करा.
06:40 आणि कोणते if स्टेटमेंट कार्यान्वित होते ते बघा.
06:46 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:49 थोडक्यात,
06:51 पाठात शिकलो,
  • equal to
  • not equal to
  • less than
  • less than equal to
  • greater than आणि
  • greater than equal to ह्या कमांडस
07:03 असाईनमेंट म्हणून, not equal to ऑपरेटरचा उपयोग करून प्रोग्रॅम लिहा.
07:09 मदत: - (hyphen) ne
07:12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:15 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.


07:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:25 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:28 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:32 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.


07:43 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:56 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.


08:02 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.

 

08:06 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana