BASH/C2/Array-Operations-in-BASH/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 21:50, 11 December 2014 by Madhurig (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Array Operations In BASH

Author: Manali Ranade

Keywords: Video tutorial, Bash shell, Array


Time Narration
00:01 नमस्कार. Array operations in BASH वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोत,
  • Array घोषित करून त्याला व्हॅल्यू देणे.
00:12 * घोषित करताना अॅरेला प्राथमिक व्हॅल्यूज देणे.
00:15 * अॅरेची लांबी आणि n क्रमांकाचे एलिमेंट मिळवणे.
00:20 *अॅरे प्रिंट करणे.
00:22 ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:27 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:33 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:37 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:41 * GNU Bash वर्जन 4.1.10
00:45 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:50 आता अॅरेची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
00:55 * अॅरे हे अनेक व्हॅल्यूज असणारे व्हेरिएबल आहे.
01:01 * या व्हॅल्यूज एकाच किंवा अनेक टाईप्सच्या असू शकतात.
01:04 * अॅरेच्या आकाराला काही कमाल मर्यादा नाही.
01:08 * अॅरेचे सदस्य अनुक्रमाने लागोपाठचे असण्याची गरज नसते.
01:12 * अॅरे इंडेक्सची सुरूवात नेहमीचे शून्याने होते.
01:16 अॅरे घोषित करून त्याला व्हॅल्यू कशी द्यायची ते पाहू.
01:21 अॅरे घोषित करण्याचा सिंटॅक्स
01:24 declare hyphen `a` arrayname
01:28 declare हा कीवर्ड अॅरे घोषित करण्यासाठी वापरला आहे.
01:31 ही Bash मधील बिल्ट इन कमांड आहे.
01:35 अॅरेला व्हॅल्यू देण्यासाठीचा सिंटॅक्स -
01:38 Name चौकटी कंसात index equals to सिंगल कोटस मधे व्हॅल्यू.
01:46 अॅरे घोषित करताना त्याला प्राथमिक व्हॅल्यू कशी द्यायची ते पाहू.
01:51 * अॅरे एकाच वेळी घोषित करून त्यास प्राथमिक व्हॅल्यूज देता येतात.
01:56 * प्रत्येक एलिंमेंट स्पेसद्वारे वेगळे केले असले पाहिजे.
02:00 प्रत्येक एलिंमेंट कंसात असले पाहिजे.
02:03 सिंटॅक्स declare hyphen `a` arrayname equal-to गोल कंसात सिंगल कोटसमधे 'element1' , 'element2' and 'element3'.
02:19 त्याचे उदाहरण पाहू.
02:21 Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
02:28 आता टाईप करा,

gedit space array.sh space &

02:36 अँपरसँडचा उपयोग प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी केला जातो. एंटर दाबा.
02:41 येथे दाखवलेला कोड तुमच्या array.sh फाईलमधे टाईप करा.
02:47 ही ओळ Linux नावाचा अॅरे खालील एलिमेंटस सहित घोषित करेल.
  • Debian,
  • Redhat,
  • Ubuntu आणि
  • Fedora
02:57 येथे hyphen `a` हा फ्लॅग आहे.
03:00 हे आपल्याला अॅरेला व्हॅल्यूज देण्याची आणि त्या वाचण्याची परवानगी देते.
03:05 स्लाईडसवर जाऊ.
03:07 अॅरेची लांबी या सिंटॅक्सद्वारे मिळवता येते.
03:12 Dollar sign महिरपी कंस सुरू hash arrayname चौकटी कंसात At sign आणि महिरपी कंस पूर्ण
03:22 n क्रमांकाच्या एलिमेंटची लेंथ मिळवण्याचा सिंटॅक्स:
03:28 Dollar sign महिरपी कंस सुरू hash arrayname चौकटी कंसात `n` आणि महिरपी कंस पूर्ण.
03:37 येथे n हा एलिमेंटचा नंबर आहे ज्याची लेंथ मिळवायची आहे.
03:42 अॅरेची सर्व एलिमेंटस प्रिंट करण्याचा सिंटॅक्स-
03:48 Dollar sign महिरपी कंस सुरू arrayname चौकटी कंसात `At sign` आणि महिरपी कंस पूर्ण.
03:57 टेक्स्ट एडिटरवर जाऊ.
04:00 ही ओळ Linux अॅरेतील एलिमेंटसची एकूण संख्या दाखवेल.
04:06 hyphen `e` मुळे backslash escapes चा अर्थ लावला जातो.
04:11 आपल्या ओळीत शेवटी बॅकस्लॅश `n` असल्यामुळे हे समाविष्ट केले आहे.
04:18 पुढील ओळ Linux अॅरेचे सर्व एलिमेंटस दाखवेल.
04:23 ही ओळ Linux अॅरेचे तिसरे एलिमेंट दाखवेल.
04:28 लक्षात घ्या अॅरेचा इंडेक्स नेहमी शून्याने सुरू होतो.
04:34 शेवटी ही ओळ तिस-या एलिमेंटसमधे असलेल्या अक्षरांची एकूण संख्या आपल्याला दाखवेल.
04:40 आता टर्मिनलवर जा.
04:42 फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा.

chmod space plus x space array.sh आणि एंटर दाबा.

04:56 टाईप करा,

dot slash array.sh आणि एंटर दाबा.

05:01 आऊटपुट दाखवले जाईल.
05:04 `Linux ` अॅरेची लांबी किंवा एलिमेंटसची संख्या एकूण चार आहे.
05:10 Debian, Redhat, Ubuntu आणि Fedora हे Linux अॅरेतील एलिमेंटस आहेत.
05:18 Ubuntu हे Linux अॅरेतील तिसरे एलिमेंट आहे.
05:22 अपेक्षेप्रमाणेच तिस-या एलिमेंटस मधील अक्षरांची संख्या सहा आहे.
05:29 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05:32 स्लाईडस वर परत जाऊ. थोडक्यात,
05:35 आपण शिकलो,
05:40 * अॅरे घोषित करून त्याला व्हॅल्यू प्रदान करणे
05:43 * अॅरे घोषित करताना त्याला प्राथमिक व्हॅल्यू देणे
05:46 * अॅरेची लांबी आणि n क्रमांकाचे एलिमेंट मिळवणे.
05:51 * संपूर्ण अॅरे प्रिंट करणे.
05:53 असाईनमेंट म्हणून,
05:55 7 लांबी असलेला names अॅरे घोषित करा आणि
06:00 * एलिमेंटसची एकूण संख्या मिळवा.
06:02 * सर्व एलिमेंटस प्रिंट करा.
06:04 * आणि 5 वे एलिमेंट प्रिंट करा.
06:06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:13 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
06:20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:24 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:27 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:40 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
06:52 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
06:58 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
07:02 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali