Ngspice/C2/DC-Sweep-Analysis/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:14, 17 December 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of the Script: DC sweep analysis in ngspice

Author: Ranjana Bhamble

Keywords: video tutorial, ngspice.

Time Narration
00:01 Ngspice मधिल “DC sweep analysis” वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:09 DC sweep analysis आणि Nested DC sweep analysis कार्यान्वित करणे.
00:14 'इलेक्ट्रॉनिक सर्किट' चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे.
00:19 'उबंटू लिनक्स' आणि 'शेल कमांड्स' चे मूळ ज्ञानदेखील आवश्यक आहे.
00:25 Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टम, ngspice version 23 सह वापरून स्थापन केली.
00:33 दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू.
00:36 सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत, “1”, “2” आणि “3”.
00:40 या व्यतिरिक्त, एक चौथा नोड "रेफरेन्स" किंवा डाटम नोड 0 म्हणून चिन्हांकित करणे आवश्यक आहे.
00:47 हे कोणत्याही "सर्किट"साठी अनिवार्य आहे.
00:51 आधी दर्शविलेले सर्किट स्किमॅटिक संबंधित ngspice netlist example.cir फाईल, टेक्स्ट एडिटरमध्ये उघडूया.
01:00 मी आधीच ही फाईल gedit टेक्स्ट एडिटरमध्ये उघडली आहे.
01:04 लक्षात ठेवा, नेट लिस्ट फाईल .cir एक्सटेंशनने सेव केलेली आहे.
01:10 आपण सर्व घटक जसे, व्होल्टेज सोर्स, रेसिसटर्स आणि तसेच नोडस् एकत्र जोडण्याची माहिती पाहू.
01:18 dc sweep analysis कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट dc command वापरले जाते.
01:25 dc कमांड वापरण्यासाठी, सामान्य फॉर्म दाखविल्याप्रमाणे आहे.
01:29 dot DC SRCNAM VSTART VSTOP VINCR
01:35 जिथे,
01:37 SRCNAM हे एका स्वतंत्र व्हॉल्टेज आणि करंट सोर्सचे नाव आहे.
01:42 VSTART, VSTOP आणि VINCR हे अनुक्रमे सुरवात, अंतिम व वाढत्या मूल्यांच्या सोर्ससाठी आहेत.
01:51 तुम्ही पाहु शकता कि आपण 1 च्या वाढ सह 24 वोल्ट्सच्या सिंगल वॅल्यूसाठी व्हॉल्टेज सोर्स V1 स्वीप करत आहोत.
02:02 आपण सर्किट सिम्युलेट करू आणि वेगवेगळ्या नोड्सवर व्हॉल्टेज वॅल्यूज शोधून काढू.
02:08 टर्मिनलद्वारे ngspice उघडू.
02:11 Control Alt T एकत्रित दाबा.
02:14 हे 'टर्मिनल' विंडो उघडेल.
02:18 आता मी त्या फोल्डरवर जाईल, जिथे नेट लिस्ट फाईल सेव केलेली आहे.
02:23 मी हे खालीलप्रमाणे करते:
02:26 cd downloads फोल्डरसाठी पाथ आणि एंटर दाबा.
02:33 आपण ngspice फाईल सिम्युलेट करू.
02:36 आपण हे कसे करता येईल ते पाहूया
02:39 टर्मिनलवर,
02:40 टाईप करा ngspice स्पेस example.cir आणि एंटर दाबा.
02:51 व्हॉल्टेज v1 ची व्हॅल्यू 24 व्होल्ट्स आहे.
02:56 व्हॉल्टेज v2 ची व्हॅल्यू 9.746 व्होल्ट्स आहे.
03:01 अन्य नोड व्हॉल्टेजेसदेखील प्रदर्शित केले आहेत.
03:05 नंतर आपण nested dc sweep analysis कसे करायचे पाहूया.
03:10 ह्यासाठी सामान्यीकृत फॉर्म म्हणून दर्शविले जाते.
03:14 Dot DC SRCNAM VSTART VSTOP VINCR SRC2 START2 STOP2 INCR2
03:24 जिथे,
03:26 SRCNAM हे प्रायमरी स्वीप वेरिएबल आणि SRC2 हे सेकेंडरी स्वीप वेरिएबल आहे.
03:33 सेकेंडरी स्वीप वेरिएबल बाह्य लूप बनवतो.
03:36 सेकेंडरी स्वीप वेरिएबलच्या प्रत्येक वाढीसाठी, पहिली स्वीप वेरिएबल वॅल्यूज संपूर्ण श्रेणीद्वारे उतरली आहे.
03:45 जे आपण सिम्युलेट करणार आहोत ते सर्किटच्या उदाहरणाने अधिक स्पष्ट होईल.
03:50 कॉमन बेस कॉनफिगरेशनवर आधारित सर्किट, Bipolar junction transistor वापरू.
03:56 प्रायमरी स्वीप वेरिएबल, जे व्हॉल्टेज Vin आहे ते एमिटर आणि बेस टर्मिनल्ससह जुडलेले आहे.
04:03 सेकेंडरी स्वीप वेरिएबल, हे load resistor Rload असेल.
04:08 आपण load resistor च्या वेगवेगळ्या वॅल्यूजना आऊटपुट व्हॉल्टेज विरूद्ध इनपुट व्हॉल्टेज प्लॉट करू.
04:14 आऊटपुट व्हॉल्टेज Rload च्या पलीकडे व्हॉल्टेज आणि इनपुट व्हॉल्टेज Vin आहे.
04:21 नेटलिस्टशी सुसंगत असे कॉमन बेस ट्रान्झिस्टर सर्किट खालीलप्रमाणे आहे.
04:26 सर्किटमधील ट्रॅनसिस्टर mod1 साठी वापरले जाणारे NPN, हे डिफॉल्ट मॉडेल आहे.
04:33 तुम्ही पाहू शकता की Vin 0.2 वोल्ट्सपासून 2 वोल्ट्सपर्यंत , 0.02 वोल्ट्स पायरीने वाढलेला आहे.
04:45 Rload, 5kilo Ohms पासून 10 kilo Ohms पर्यंत 2kilo Ohms पायरीने वाढलेला आहे.
04:53 Rload च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजसाठी, Vin 0.2 ते 2 संपूर्ण श्रेणीद्वारे स्वीप केले जाते.
04:59 आऊटपुट व्हॉल्टेज विरूद्ध इनपुट व्हॉल्टेजचे आलेख प्रत्येक ठिकाणी प्लॉट केले जाते.
05:05 Plot v of 3,4, नोड्स 3 आणि 4 यांच्यातील व्हॉल्टेज ड्रॉपला प्लॉट करतो, जे Rload च्या पलिकडचा व्हॉल्टेज आहे.
05:15 आपण सर्किट सिम्युलेट करून निकाल पाहू.
05:19 टर्मिनलवर टाईप करा, source स्पेस example nested.cir आणि एंटर दाबा.
05:35 हे सिम्युलेशन कार्यान्वित करेल.
05:37 ngspice सिम्युलेटर एन्वार्यनमेंटमधून netlist सिम्युलेट करण्यासाठी सोर्स कमांड वापरली जाते.
05:44 तुम्ही पाहू शकता की load रजिस्टरच्या विविध वॅल्यूजसाठी आऊटपुट व्हॉल्टेज विरूद्ध इनपुट व्हॉल्टेजचे आलेख प्लॉट केले आहे.
05:52 ngspice सिम्युलेटरमधून बाहेर पडण्यासाठी Quit टाईप करून एंटर दाबा.
05:59 आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:02 या पाठात शिकलो,
06:04 दिलेल्या सर्किटचे DC sweep analysis कार्यान्वित करणे.
06:08 दिलेल्या सर्किटचे Nested DC sweep analysis कार्यान्वित करणे.
06:12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:22 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम,
06:24 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:31 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06:37 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:41 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:51 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
06:58 जूडण्यासाठी धन्यवाद.
06:59 आशा करते की हे ट्युटोरिअल उपयुक्त ठरेल.
07:02 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana