Scilab/C2/Scripts-and-Functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:21, 6 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | सायलॅबच्या स्क्रिप्टस आणि फंक्शन्स वरील पाठात स्वागत. |
00:06 | सायलॅबमधील फाईल फॉरमॅट बद्दल जाणून घेऊ. |
00:12 | अनेक कमांडस एकत्रित कार्यान्वित करण्यासाठी सायलॅब एडिटरद्वारे ती स्टेटमेंटस फाईलमधे लिहिणे अधिक सोयीचे असते. |
00:21 | ह्याला स्क्रिप्ट फाईल्स म्हणतात. |
00:24 | स्क्रिप्ट फाईलमधील लिहिलेल्या कमांडस कार्यान्वित करण्यासाठी exec फंक्शन वापरून त्याच्या पुढे स्क्रिप्ट फाईलचे नाव लिहितात. |
00:34 | ह्या फाईलमधील घटकांप्रमाणे फाईलचे एक्सटेन्शन .sce किंवा .sci असते. |
00:42 | .sci हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब मधील किंवा युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात. |
00:51 | कार्यान्वित केलेल्या .sci फाईल्स सायलॅबमधे फंक्शन्स लोड करतात. परंतु ती कार्यान्वित करत नाहीत. त्याऐवजी, |
01:00 | .sce हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात . |
01:08 | लक्षात घ्या की, .sce आणि .sci एक्सटेन्शन्स देण्याच्या पध्दती हे काही नियम नसून सायलॅब कम्युनिटीने पाळलेले संकेत आहेत. |
01:21 | संगणकावर सायलॅब कन्सोल विंडो उघडू . |
01:27 | तुम्ही चालू डिरेक्टरीमधे आहात का हे तपासण्यासाठी कमांड प्रॉम्पटवर pwd टाईप करा. |
01:35 | सायलॅब कन्सोल च्या टास्क बारवर जाऊन सायलॅब एडिटर उघडण्यासाठी एडिटर वर क्लिक करा. |
01:49 | मी काही कमांडस, फाईलमधे आधीच टाईप करून ती फाईल helloworld.sceनावाने सेव्ह केलेली आहे. ती फाईल Open a file(ओपन अ फाइल) च्या शॉर्टकट आयकॉनवर क्लिक करून उघडणार आहे. |
02:03 | helloworld.sce फाईल सिलेक्ट करून Open(ओपन) क्लिक करा. |
02:10 | तुम्ही नव्या फाईलमधे कमांडस टाईप करून, फाईल मेनूमधून ही फाईल helloworld.sce नाव देऊन चालू डिरेक्टरीत सेव्ह करू शकता. |
02:20 | सायलॅब एडिटरच्या मेनूबारवरील Execute(एक्सेक्यूट) बटणावर जाऊन Load into( लोड इंटू) सायलॅब पर्याय निवडा. |
02:29 | हा सायलॅब कन्सोलवर ती फाईल लोड करेल. |
02:34 | फाईल कन्सोलवर लोड झाल्यानंतर ती स्क्रिप्ट आपल्याला हे आऊटपुट देईल. |
02:43 | ह्यामधे कमांडस आणि संबंधित कमांडसचे आऊटपुट, दोन्हींचा समावेश आहे. |
02:49 | आता a ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा. |
02:55 | एडिटरमधे File(फाइल) मेनूवर जाऊन Save(सेव) क्लिक करा. |
03:02 | तसेच exec(एग्ज़ेक) कमांड आणि स्क्रिप्ट फाईलचा पाथ देऊन सायलॅब इंटरप्रीटरवर स्क्रिप्ट थेट कार्यान्वित करता येते. |
03:12 | exec कंसात डबल कोटस मधे helloworld.sce म्हणजेच फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा. |
03:31 | स्क्रिप्ट फाईल exec(एग्ज़ेक) फंक्शनद्वारे तेच आऊटपुट देते. |
03:37 | आता फंक्शन्सबद्दल जाणून घेऊ. |
03:39 | फंक्शनची सुरूवात function( फंक्शन) ह्या कीवर्डपासून आणि शेवट endfunction(एण्ड फंक्शन) ह्या कीवर्डने होतो. |
03:46 | आपण सायलॅब एडिटरद्वारे function.sci ही फंक्शन फाईल आधीच सेव्ह केली होती. |
03:57 | ती फाईल उघडू. |
04:03 | येथे घोषित केलेले फंक्शन बघू शकता. |
04:08 | येथे डिग्रीज हे आऊटपुट आणि रेडियन्स हे इनपुट पॅरामीटर आहे. |
04:21 | radians2degrees हे संबंधित फंक्शनचे नाव आहे. |
04:26 | Execute(एक्सेक्यूट) ह्या मेनू पर्यायाद्वारे हे फंक्शन सायलॅब मधे लोड करूया. |
04:40 | हे सायलॅब कन्सोलवर लोड झाले आहे. |
04:44 | हे exec(एग्ज़ेक) ह्या कमांडद्वारे देखील लोड करता येते. |
04:47 | एकदा फंक्शन लोड झाले की इतर सायलॅब फंक्शनप्रमाणेच योग्य ती अर्ग्युमेंटस देऊन ते कॉल करता येते. |
04:56 | percent(पर्सेंट) चे चिन्ह देण्याचे व ते वापरण्याचे कारण लक्षात ठेवा. |
05:02 | आता radians2degrees कंसात %pi/2 आणि radians2degrees कंसात (%pi/4) च्या व्हॅल्यू काढू. |
05:17 | % pi/2 एंटर दाबा. आणि radians2degrees % pi/4 एंटर दाबा. ह्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. |
05:28 | आता एकापेक्षा अधिक इनपुट आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू. |
05:33 | हे फंक्शन इनपुट अर्ग्युमेंट म्हणून पोलार कोऑर्डिनेटस आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस म्हणून रेक्टँग्युलर कोऑर्डिनेटस घेतात. |
05:44 | मी आधीच टाईप करून ठेवलेली फाईल उघडत आहे. |
05:51 | x आणि y हे आऊटपुट पॅरामीटर्स, r आणि theta हे polar2rect फंक्शनचे इनपुट पॅरामीटर्स असल्याचे दिसेल. |
06:06 | हे फंक्शन exec(एग्ज़ेक) ह्या कमांडद्वारे सायलॅबमधे लोड करत आहोत. |
06:21 | फंक्शन लोड झाल्यावर ते कॉल करणे गरजेचे आहे. ह्या फंक्शनला दोन इनपुट आणि दोन आऊटपुट अर्ग्युमेंटस ची गरज असते. |
06:31 | म्हणून r = 2; |
06:37 | theta = 45 |
06:44 | आता ते कॉल करण्यासाठी टाईप करा. x1 कॉमा y1 हे आऊटपुट पॅरामीटर्स आहेत.is equal to फंक्शनचे नाव polar2rect कंसात r कॉमा theta आणि एंटर दाबा. |
07:25 | x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज दिसतील. |
07:29 | एका .sci फाईलमधे कितीही फंक्शन्स घोषित करू शकतो. हे सायलॅबचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. |
07:38 | हे करताना लक्षात ठेवा की डिफॉल्ट रूपात फंक्शनमधे घोषित केलेले सर्व व्हेरिएबल्स लोकल असतात. एखाद्या फंक्शनमधे वापरलेल्या व्हेरिएबल्सच्या स्कोपचा शेवट endfunction (एण्ड फंक्शन) कीवर्डने होतो. |
07:55 | ह्या वैशिष्ट्याचा फायदा म्हणजे त्याच नावाचे व्हेरिएबल्स वेगळ्या फंक्शनमधे वापरू शकतो. |
08:05 | जोपर्यंत ग्लोबल हा पर्याय वापरत नाही तोपर्यंत ह्या व्हेरिएबल्सची सरमिसळ होत नाही. |
08:10 | ग्लोबल व्हेरिएबल्स विषयी जाणून घेण्यासाठी help global(हेल्प ग्लोबल) टाईप करा. |
08:18 | फंक्शनमधील एखाद्या व्हेरिएबलवर आपल्याला लक्ष ठेवायचे असेल तर disp(डिस्प ) वापरावे लागते. |
08:26 | फंक्शन फाईलमधे स्टेटमेंटच्या शेवटी सेमीकोलन टाईप करून त्याचा परिणाम काय होतो ते पाहा. |
08:34 | तसेच हे disp(डिस्प ) स्टेटमेंटसाठी देखील तपासा. |
08:38 | Inline ( इनलाइन ) फंक्शन्स. हे कोडचे भाग असून त्यांना निश्चित असे इनपुटस, आऊटपुटस आणि लोकल व्हेरिएबल्स असतात. |
08:46 | अशी फंक्शन घोषित करण्याची सोपी पध्दत म्हणजे deff(डेफ्फ) कमांडचा वापर. |
08:53 | कोड छोटा असलेली फंक्शन्स in-line ( इन-लाइन )फंक्शन्स म्हणून तयार करण्याची सुविधा सायलॅब देते. |
09:02 | हे deff()(डेफ्फ) च्या मदतीने शक्य आहे. |
09:07 | हे दोन स्ट्रिंग पॅरामीटर्स घेते. |
09:10 | पहिली स्ट्रिंग फंक्शनचा इंटरफेस निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातील स्टेटमेंटस असतात. |
09:19 | deff(डेफ्फ) कमांड सायलॅबमधे फंक्शन घोषित करते. तसेच लोड देखील करते. |
09:26 | deff(डेफ्फ) कमांडद्वारे घोषित केलेले फंक्शन एक्झीक्यूट मेनूद्वारे लोड करण्याची गरज नाही . |
09:34 | ह्यासाठी एक उदाहरण पाहू. |
09:41 | आधीच बनवलेली inline( इनलाइन ) फंक्शनची फाईल inline.sci उघडू. |
09:51 | एडिटर विंडोच्या आकारात थोडा बदल करू. |
09:57 | आधी सांगितल्याप्रमाणे पहिली स्ट्रिंग फंक्शन डिक्लरेशन निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातली स्टेटमेंटस असतात. |
10:13 | आपण हे फंक्शन सायलॅब एडिटर मधे लोड करून त्याचा उपयोग degrees2radians of 90 आणि degrees2radians of 45 ह्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वापरू. |
10:54 | एखादे फंक्शन इतर फंक्शन्स कॉल करू शकते तसेच स्वतःला सुध्दा कॉल करते. |
11:00 | ह्याला फंक्शनचे "रिकर्सिव्ह" कॉलिंग म्हणतात. |
11:03 | पूर्णांक संख्येचे फॅक्टोरियल काढणारे फंक्शन लिहिण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. |
11:10 | सायलॅबमधील फाईल फॉरमॅटबद्दल अधिक जाणून घेऊ. |
11:14 | आधी सांगितल्याप्रमाणे सायलॅब दोन प्रकारचे म्हणजेच SCE आणि SCI फाईल फॉरमॅट वापरते. |
11:23 | .sce फाईल एक्सटेन्शन असलेली फाईल ही स्क्रिप्ट फाईल असते. ज्यामधे सायलॅब सेशन दरम्यान आपण टाईप केलेल्या कमांडसचा समावेश असतो. |
11:35 | त्यात फंक्शन बद्दल माहिती देणा-या कमेंट लाईन्स असतात तसेच EXEC(एग्ज़ेक) कमांडने कार्यान्वित होणारे स्क्रिप्टही वापरलेले असतात. |
11:52 | .sci हे एक्सटेन्शन असलेली फाईल ही फंक्शन फाईल असते जिची सुरूवात फंक्शन स्टेटमेंटने होते. |
12:00 | एका .sci फाईलमधे अनेक फंक्शन्स घोषित केलेली असू शकतात ज्यात फंक्शन्सच्या अर्ग्युमेंटसवर कार्य करणारी अनेक सायलॅब स्टेटमेंटस असू शकतात. तसेच त्याद्वारे आऊटपुट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काढल्या जातात. |
12:20 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
12:25 | सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ. |
12:31 | सायलॅब लिंक्स बघत रहा. |
12:33 | हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे. |
12:40 | FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता. |
12:50 | यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
12:56 | अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या. |
13:06 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
13:10 | सहभागाबद्दल धन्यवाद. |