Ruby/C2/Ruby-Methods/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:40, 7 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Ruby-Methods

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 Ruby Methodsवरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोत,
00:07 मेथड म्हणजे काय?
00:09 मेथडचा सिंटॅक्स.
00:11 आणि काही उदाहरणे पाहू.
00:13 आपण उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि रूबी 1.9.3 वापरणार आहोत.
00:21 या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:28 आता मेथडसची ओळख करून घेऊ.
00:31 मेथड म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट करणारा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम.
00:37 इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधील फंक्शनप्रमाणेच रुबीतील मेथड आहे.
00:42 मेथडच्या नावाची सुरूवात लोअर केसमधील अक्षरांनी होणे आवश्यक आहे.
00:45 मेथडस कॉल करण्यापूर्वी त्या घोषित करणे आवश्यक आहे.
00:49 आता मेथडचा सिंटॅक्स पाहू.
00:52 कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव देऊन मेथडस घोषित करता येतात.
00:57 अर्ग्युमेंटसद्वारे मेथडला व्हॅल्यूज पास करून, त्यावर कार्य केले जाते.
01:02 रुबी कोड सेक्शन हे मेथडचे मुख्य अंग योग्य ते कार्य करून देते.
01:09 मेथडचे मुख्य अंग हे वरती त्याच्या घोषणेने सुरू होऊन खाली end कीवर्डने संपते.
01:16 ह्याला अर्ग्युमेंटस असलेली मेथड म्हणतात.
01:19 मेथडचा आणखी एक सिंटॅक्स असा आहे-
01:23 कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव आणि अर्ग्युमेंटची रिकामी सूची.
01:28 त्यानंतर रुबी कोड सेक्शन जो मेथडचे मुख्य अंग असतो .
01:32 आणि end कीवर्ड ज्याने मेथड संपते.
01:36 ह्याला अर्ग्युमेंटस नसलेली मेथड म्हणतात.
01:39 मेथड कशी वापरायची ते पाहू.
01:42 मी gedit एडिटरमधे प्रोग्रॅम आधीच टाईप करून ठेवला आहे.
01:46 तो उघडू.
01:48 येथे फाईलचे नाव method hyphen without hyphen argument dot rb आहे.
01:55 मी ही फाईल rubyprogram नामक फोल्डरमधे सेव्ह केली आहे.
01:59 ह्या प्रोग्रॅममधे मेथडद्वारे दोन अंकांची बेरीज करणार आहे.
02:03 प्रोग्रॅम समजून घेऊ.
02:05 येथे a हे ग्लोबल व्हेरिएबल घोषित केले आहे.
02:08 आणि त्याला 5 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02:13 ग्लोबल व्हेरिएबलच्या नावाच्या आधी dollar चिन्ह ($) दिलेले असते.
02:17 रुबी प्रोग्रॅम मधे ग्लोबल व्हेरिएबल्स कुठुनही ऍक्सेस करता येते. ते कुठे घोषित केले आहे यास महत्त्व नाही.
02:25 येथे कुठलेही अर्ग्युमेंट नसलेली add मेथड घोषित केली आहे.
02:31 येथे युजरला दुसरी संख्या द्यायला सांगणार आहोत.
02:35 युजर व्हॅल्यू देईल.
02:38 gets मेथड कंसोल वरून स्ट्रिंग फॉरमॅटमधे इनपुट घेईल.
02:44 त्यामुळे ते to_i मेथडद्वारे इंटीजरमधे बदलणे आवश्यक आहे.
02:50 रूपांतरित व्हॅल्यू नंतर b व्हेरिएबल मधे संचित होईल. b हे लोकल व्हेरिएबल आहे.
02:56 ते व्हेरिएबल ज्या मेथड मधे घोषित केले आहे त्यातच उपलब्ध असते.
03:01 येथे ग्लोबल व्हेरिएबल a आणि व्हेरिएबल b च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत.
03:07 नंतर तो रिझल्ट sum ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
03:10 नंतर sum प्रिंट करणार आहोत.
03:13 स्ट्रिंगमधे व्हेरिएबल समाविष्ट करण्याची ही एक पध्दत आहे .
03:18 येथ sum मधील व्हॅल्यू ही स्ट्रिंग म्हणून परत दिली जाते. व बाहेरच्या स्ट्रिंगमधे लिहिली जाते.
03:25 end ने मेथडचा शेवट होतो.
03:28 मेथडस दोन प्रकारच्या असतात.
03:31 User-defined method – जसे की add मेथड.
03:35 Pre-defined method - जसे print, gets आणि to_i मेथड्स.
03:42 येथे add मेथड कॉल करणार आहोत.
03:45 बेरजेची क्रिया केली जाईल. रिझल्ट प्रिंट केला जाईल.
03:50 Saveवर क्लिक करा.
03:53 आधी सांगितल्याप्रमाणे हा प्रोग्रॅम rubyprogram फोल्डरमधे सेव्ह होईल.
03:59 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:02 Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
04:07 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल.
04:11 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी rubyprogram सबडिरेक्टरीमधे जाणे आवश्यक आहे .
04:16 टाईप करा cd space Desktop/rubyprogram आणि एंटर दाबा.
04:26 टाईप करा ruby space method hyphen without hyphen argument dot rb आणि एंटर दाबा.
04:40 Enter the second number असे दाखवले जाईल.
04:44 मी 4 टाईप करत आहे. आता एंटर दाबा.
04:48 आपल्याला Sum of two numbers 5 and 4 is 9 हे आऊटपुट मिळेल.
04:53 आता अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचे उदाहरण पाहू .
04:58 मी हा प्रोग्रॅम आधीच gedit एडिटरमधे लिहून ठेवला आहे. तो उघडा.
05:03 आपल्या फाईलचे नाव method hyphen with hyphen argument dot rb असे आहे.
05:10 मी ही फाईल rubyprogram ह्या फोल्डरमधे सेव्ह केली आहे.
05:15 हा प्रोग्रॅम समजून घेऊ.
05:18 येथे addनामक मेथड घोषित केली आहे. a, b ही add ह्या मेथडची अर्ग्युमेंटस आहेत.
05:26 येथे a आणि b च्या व्हॅल्यूजची बेरीज होईल.
05:29 आणि मेथडच्या कॉलला बेरीज परत करेल.
05:31 end ने मेथडचा शेवट होईल.
05:35 येथे युजरला इनपुट द्यायला सांगणार आहोत.
05:38 युजर a आणि bची व्हॅल्यू टाईप करेल.
05:41 त्या व्हॅल्यूज अनुक्रमे व्हेरिएबल a आणि bमधे संचित होतील.
05:46 येथे add ही मेथड कॉल करणार आहोत.
05:49 नंतर a आणि b ही अर्ग्युमेंटस देणार आहोत.
05:52 बेरजेची क्रिया झाल्यावर add ही मेथड जी व्हॅल्यू देईल ती c मधे संचित होईल.
05:59 येथे c मधे संचित असलेली बेरीज प्रिंट करणार आहोत.
06:03 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
06:07 प्रथम टर्मिनल क्लियर करण्यासाठी क्लियर टाईप करून एंटर दाबा.
06:14 आपण आधीपासूनच rubyprogram ह्या सबडिरेक्टरीत आहोत.
06:17 मागील कमांडसाठी दोन वेळा अप ऍरो की दाबा .
06:22 method hyphen without hyphen arguments dot rb च्या जागी method hyphen with hyphen arguments dot rb टाईप करा
06:32 आणि एंटर दाबा.
06:35 Enter the values of a and b दाखवले जाईल.
06:38 मी 8 आणि 9 टाईप करणार आहे.
06:41 टाईप करा 8 आणि एंटर दाबा.
06:43 टाईप करा 9 आणि एंटर दाबा.
06:46 पुढील आऊटपुट मिळेल.
06:47 Sum of two numbers 8 and 9 is 17.
06:52 आता रुबी मेथडचे एक महत्त्वाचे फीचर बघू.
06:56 टेक्स्ट एडिटरमधील प्रोग्रॅममधे जाऊ .
06:59 return कीवर्ड डिलीट करा.
07:02 Save वर क्लिक करा.
07:05 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
07:09 मागील कमांड साठी अप ऍरो की दाबा. एंटर दाबा.
07:14 Enter the values of a and b दाखवले जाईल.
07:18 मी 10 आणि 15 टाईप करणार आहे.
07:21 10टाईप करून एंटर दाबा. 15 टाईप करून एंटर दाबा.
07:27 पुढील आऊटपुट मिळेल.
07:29 Sum of two numbers 10 and 15 is 25.
07:33 returnहा कीवर्ड डिलीट केल्यावरही प्रोग्रॅम कुठलीही एरर न देता कार्यान्वित झाला.
07:40 याचे कारण रुबी मेथड कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आपोआप रिटर्न करतो.
07:46 रुबीच्या मेथडसमधे return हा कीवर्ड ऐच्छिक आहे.
07:50 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत.
07:53 स्लाईडस वर जाऊ.
07:55 थोडक्यात,
07:57 या पाठात शिकलो,
07:59 मेथडस म्हणजे काय?
08:01 अर्ग्युमेंटस नसलेल्या आणि
08:04 अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचा सिंटॅक्स
08:06 मेथड कडून मिळणारी रिटर्न व्हॅल्यू.
08:08 आता असाईनमेंट.
08:10 चौरसाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा.
08:13 त्यासाठी मेथड वापरा.
08:14 युजरकडून इनपुट घ्या.
08:17 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:33 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:36 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:49 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:04 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana