Scilab/C2/Scripts-and-Functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:48, 24 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 सायलॅबच्या स्क्रिप्टस आणि फंक्शन्स वरील पाठात स्वागत.
00:06 सायलॅबमधील फाईल फॉरमॅट बद्दल जाणून घेऊ.
00:12 अनेक कमांडस एकत्रित कार्यान्वित करण्यासाठी सायलॅब एडिटरद्वारे ती स्टेटमेंटस फाईलमधे लिहिणे अधिक सोयीचे असते.
00:21 ह्याला स्क्रिप्ट फाईल्स म्हणतात.
00:24 स्क्रिप्ट फाईलमधील लिहिलेल्या कमांडस कार्यान्वित करण्यासाठी exec फंक्शन वापरून त्याच्या पुढे स्क्रिप्ट फाईलचे नाव लिहितात.
00:34 ह्या फाईलमधील घटकांप्रमाणे फाईलचे एक्सटेन्शन .sce किंवा .sci असते.
00:42 .sci हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब मधील किंवा युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात.
00:51 कार्यान्वित केलेल्या .sci फाईल्स सायलॅबमधे फंक्शन्स लोड करतात. परंतु ती कार्यान्वित करत नाहीत. त्याऐवजी,
01:00 .sce हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात .
01:08 लक्षात घ्या की, .sce आणि .sci एक्सटेन्शन्स देण्याच्या पध्दती हे काही नियम नसून सायलॅब कम्युनिटीने पाळलेले संकेत आहेत.
01:21 संगणकावर सायलॅब कन्सोल विंडो उघडू .
01:27 तुम्ही चालू डिरेक्टरीमधे आहात का हे तपासण्यासाठी कमांड प्रॉम्पटवर pwd टाईप करा.
01:35 सायलॅब कन्सोल च्या टास्क बारवर जाऊन सायलॅब एडिटर उघडण्यासाठी एडिटर वर क्लिक करा.
01:49 मी काही कमांडस, फाईलमधे आधीच टाईप करून ती फाईल helloworld.sceनावाने सेव्ह केलेली आहे. ती फाईल Open a file(ओपन अ फाइल) च्या शॉर्टकट आयकॉनवर क्लिक करून उघडणार आहे.
02:03 helloworld.sce फाईल सिलेक्ट करून Open(ओपन) क्लिक करा.
02:10 तुम्ही नव्या फाईलमधे कमांडस टाईप करून, फाईल मेनूमधून ही फाईल helloworld.sce नाव देऊन चालू डिरेक्टरीत सेव्ह करू शकता.
02:20 सायलॅब एडिटरच्या मेनूबारवरील Execute(एक्सेक्यूट) बटणावर जाऊन Load into( लोड इंटू) सायलॅब पर्याय निवडा.
02:29 हा सायलॅब कन्सोलवर ती फाईल लोड करेल.
02:34 फाईल कन्सोलवर लोड झाल्यानंतर ती स्क्रिप्ट आपल्याला हे आऊटपुट देईल.
02:43 ह्यामधे कमांडस आणि संबंधित कमांडसचे आऊटपुट, दोन्हींचा समावेश आहे.
02:49 आता a ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा.
02:55 एडिटरमधे File(फाइल) मेनूवर जाऊन Save(सेव) क्लिक करा.
03:02 तसेच exec(एग्ज़ेक) कमांड आणि स्क्रिप्ट फाईलचा पाथ देऊन सायलॅब इंटरप्रीटरवर स्क्रिप्ट थेट कार्यान्वित करता येते.
03:12 exec कंसात डबल कोटस मधे helloworld.sce म्हणजेच फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
03:31 स्क्रिप्ट फाईल exec(एग्ज़ेक) फंक्शनद्वारे तेच आऊटपुट देते.
03:37 आता फंक्शन्सबद्दल जाणून घेऊ.
03:39 फंक्शनची सुरूवात function( फंक्शन) ह्या कीवर्डपासून आणि शेवट endfunction(एण्ड फंक्शन) ह्या कीवर्डने होतो.
03:46 आपण सायलॅब एडिटरद्वारे function.sci ही फंक्शन फाईल आधीच सेव्ह केली होती.
03:57 ती फाईल उघडू.
04:03 येथे घोषित केलेले फंक्शन बघू शकता.
04:08 येथे डिग्रीज हे आऊटपुट आणि रेडियन्स हे इनपुट पॅरामीटर आहे.
04:21 radians2degrees हे संबंधित फंक्शनचे नाव आहे.
04:26 Execute(एक्सेक्यूट) ह्या मेनू पर्यायाद्वारे हे फंक्शन सायलॅब मधे लोड करूया.
04:40 हे सायलॅब कन्सोलवर लोड झाले आहे.
04:44 हे exec(एग्ज़ेक) ह्या कमांडद्वारे देखील लोड करता येते.
04:47 एकदा फंक्शन लोड झाले की इतर सायलॅब फंक्शनप्रमाणेच योग्य ती अर्ग्युमेंटस देऊन ते कॉल करता येते.
04:56 percent(पर्सेंट) चे चिन्ह देण्याचे व ते वापरण्याचे कारण लक्षात ठेवा.
05:02 आता radians2degrees कंसात %pi/2 आणि radians2degrees कंसात (%pi/4) च्या व्हॅल्यू काढू.
05:17  % pi/2 एंटर दाबा. आणि radians2degrees % pi/4 एंटर दाबा. ह्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत.
05:28 आता एकापेक्षा अधिक इनपुट आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू.
05:33 हे फंक्शन इनपुट अर्ग्युमेंट म्हणून पोलार कोऑर्डिनेटस आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस म्हणून रेक्टँग्युलर कोऑर्डिनेटस घेतात.
05:44 मी आधीच टाईप करून ठेवलेली फाईल उघडत आहे.
05:51 x आणि y हे आऊटपुट पॅरामीटर्स, r आणि theta हे polar2rect फंक्शनचे इनपुट पॅरामीटर्स असल्याचे दिसेल.
06:06 हे फंक्शन exec(एग्ज़ेक) ह्या कमांडद्वारे सायलॅबमधे लोड करत आहोत.
06:21 फंक्शन लोड झाल्यावर ते कॉल करणे गरजेचे आहे. ह्या फंक्शनला दोन इनपुट आणि दोन आऊटपुट अर्ग्युमेंटस ची गरज असते.
06:31 म्हणून r = 2;
06:37 theta = 45
06:44 आता ते कॉल करण्यासाठी टाईप करा. x1 कॉमा y1 हे आऊटपुट पॅरामीटर्स आहेत.is equal to फंक्शनचे नाव polar2rect कंसात r कॉमा theta आणि एंटर दाबा.
07:25 x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज दिसतील.
07:29 एका .sci फाईलमधे कितीही फंक्शन्स घोषित करू शकतो. हे सायलॅबचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
07:38 हे करताना लक्षात ठेवा की डिफॉल्ट रूपात फंक्शनमधे घोषित केलेले सर्व व्हेरिएबल्स लोकल असतात. एखाद्या फंक्शनमधे वापरलेल्या व्हेरिएबल्सच्या स्कोपचा शेवट endfunction (एण्ड फंक्शन) कीवर्डने होतो.
07:55 ह्या वैशिष्ट्याचा फायदा म्हणजे त्याच नावाचे व्हेरिएबल्स वेगळ्या फंक्शनमधे वापरू शकतो.
08:05 जोपर्यंत ग्लोबल हा पर्याय वापरत नाही तोपर्यंत ह्या व्हेरिएबल्सची सरमिसळ होत नाही.
08:10 ग्लोबल व्हेरिएबल्स विषयी जाणून घेण्यासाठी help global(हेल्प ग्लोबल) टाईप करा.
08:18 फंक्शनमधील एखाद्या व्हेरिएबलवर आपल्याला लक्ष ठेवायचे असेल तर disp(डिस्प ) वापरावे लागते.
08:26 फंक्शन फाईलमधे स्टेटमेंटच्या शेवटी सेमीकोलन टाईप करून त्याचा परिणाम काय होतो ते पाहा.
08:34 तसेच हे disp(डिस्प ) स्टेटमेंटसाठी देखील तपासा.
08:38 Inline ( इनलाइन ) फंक्शन्स.
08:39 हे कोडचे भाग असून त्यांना निश्चित असे इनपुटस, आऊटपुटस आणि लोकल व्हेरिएबल्स असतात.
08:46 अशी फंक्शन घोषित करण्याची सोपी पध्दत म्हणजे deff(डेफ्फ) कमांडचा वापर.
08:53 कोड छोटा असलेली फंक्शन्स in-line ( इन-लाइन )फंक्शन्स म्हणून तयार करण्याची सुविधा सायलॅब देते.
09:02 हे deff()(डेफ्फ) च्या मदतीने शक्य आहे.
09:07 हे दोन स्ट्रिंग पॅरामीटर्स घेते.
09:10 पहिली स्ट्रिंग फंक्शनचा इंटरफेस निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातील स्टेटमेंटस असतात.
09:19 deff(डेफ्फ) कमांड सायलॅबमधे फंक्शन घोषित करते. तसेच लोड देखील करते.
09:26 deff(डेफ्फ) कमांडद्वारे घोषित केलेले फंक्शन एक्झीक्यूट मेनूद्वारे लोड करण्याची गरज नाही .
09:34 ह्यासाठी एक उदाहरण पाहू.
09:41 आधीच बनवलेली inline( इनलाइन ) फंक्शनची फाईल inline.sci उघडू.
09:51 एडिटर विंडोच्या आकारात थोडा बदल करू.
09:57 आधी सांगितल्याप्रमाणे पहिली स्ट्रिंग फंक्शन डिक्लरेशन निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातली स्टेटमेंटस असतात.
10:13 आपण हे फंक्शन सायलॅब एडिटर मधे लोड करून त्याचा उपयोग degrees2radians of 90 आणि degrees2radians of 45 ह्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वापरू.
10:54 एखादे फंक्शन इतर फंक्शन्स कॉल करू शकते तसेच स्वतःला सुध्दा कॉल करते.
11:00 ह्याला फंक्शनचे "रिकर्सिव्ह" कॉलिंग म्हणतात.
11:03 पूर्णांक संख्येचे फॅक्टोरियल काढणारे फंक्शन लिहिण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
11:10 सायलॅबमधील फाईल फॉरमॅटबद्दल अधिक जाणून घेऊ.
11:14 आधी सांगितल्याप्रमाणे सायलॅब दोन प्रकारचे म्हणजेच SCE आणि SCI फाईल फॉरमॅट वापरते.
11:23 .sce फाईल एक्सटेन्शन असलेली फाईल ही स्क्रिप्ट फाईल असते. ज्यामधे सायलॅब सेशन दरम्यान आपण टाईप केलेल्या कमांडसचा समावेश असतो.
11:35 त्यात फंक्शन बद्दल माहिती देणा-या कमेंट लाईन्स असतात तसेच EXEC(एग्ज़ेक) कमांडने कार्यान्वित होणारे स्क्रिप्टही वापरलेले असतात.
11:52 .sci हे एक्सटेन्शन असलेली फाईल ही फंक्शन फाईल असते जिची सुरूवात फंक्शन स्टेटमेंटने होते.
12:00 एका .sci फाईलमधे अनेक फंक्शन्स घोषित केलेली असू शकतात ज्यात फंक्शन्सच्या अर्ग्युमेंटसवर कार्य करणारी अनेक सायलॅब स्टेटमेंटस असू शकतात. तसेच त्याद्वारे आऊटपुट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काढल्या जातात.
12:20 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
12:25 सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ.
12:31 सायलॅब लिंक्स बघत रहा.
12:33 हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.
12:40 FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता.
12:50 यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
12:56 अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
13:06 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
13:10 सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana