Scilab/C2/Vector-Operations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:46, 24 July 2014 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | वेक्टर ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | पाठाच्या शेवटी ह्या गोष्टी तुम्ही करू शकाल, |
00:11 | वेक्टरची व्याख्या, |
00:13 | वेक्टरची लांबी मिळवणे, |
00:15 | वेक्टर्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे. |
00:23 | मॅट्रिक्सची व्याख्या, |
00:25 | मॅट्रिक्सचा आकार मोजणे, |
00:28 | मॅट्रायसेसवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या गणिती क्रिया करणे. |
00:36 | त्यासाठी तुमच्या संगणकावर सायलॅब इन्स्टॉल केलेले असावे . |
00:41 | सायलॅब वरील गेटिंग स्टार्टेड हा पाठ ऐकलेला असावा. |
00:46 | तुम्हाला वेक्टर्स आणि मॅट्रायसेसचे प्राथमिक ज्ञान असायला हवे. |
00:50 | येथे विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि सायलॅब 5.2.2 वापरणार आहोत. |
00:58 | सायलॅब उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील सायलॅब शॉर्टकट आयकॉन क्लिक करा. |
01:03 | यामुळे सायलॅब कन्सोल विंडो उघडेल. |
01:06 | कमांड प्रॉम्प्टवर कर्सर दिसेल. |
01:10 | पाठाचा व्हिडिओ मधे मधे थांबवून सायलॅबवर त्याचा सराव करू. |
01:19 | वेक्टर डिफाईन करण्यापासून सुरूवात करू. |
01:22 | हे दोन प्रकारे करता येते. |
01:24 | स्पेसच्या सहाय्याने म्हणजेच p is equal to चौकोनी कंसामधे 1 space 2 space 3 आणि एंटर दाबा. |
01:37 | कॉमाद्वारे म्हणजेच q is equal to चौकोनी कंसामधे 2 कॉमा 3 कॉमा 4 आणि एंटर दाबा. |
01:53 | वेक्टर p ची लांबी मिळवण्यासाठी लेंथ कंसात p length of p टाईप करून एंटर दाबा. |
02:03 | वेक्टर्स वर गणिती क्रिया करू शकतो, |
02:08 | दोन वेक्टर्स ची बेरीज |
02:11 | दोन वेक्टर्स ची वजाबाकी इत्यादी. |
02:14 | वेक्टर चे ट्रान्सपोज मिळवण्यासाठी apostrophe(अपोस्ट्रोफी) म्हणजेच सिंगल कोट वापरतात. |
02:21 | p ट्रान्सपोज असे दिसेल. |
02:27 | आपण p-ट्रान्सपोज times q काढू शकतो. |
02:34 | p- times q ट्रान्सपोज हा गुणाकार स्कॅलर आऊटपुट देतो. |
02:43 | आता हा पाठ थांबवून व्हिडिओमधे दाखवलेला एक्झरसाईज 1 सोडवण्याचा प्रयत्न करा. |
02:50 | आता मॅट्रिक्स कसे डिफाईन करायचे ते पाहू. |
02:56 | मॅट्रिक्सच्या रो मधील एलिमेंटस हे वेक्टर प्रमाणे स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे डिफाईन करता येतात. |
03:04 | उदाहरणार्थ 2 by 3 आकाराचा मॅट्रिक्स P डिफाईन करू. capital P is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 2 स्पेस 3 सेमीकोलन |
03:20 | 4 स्पेस 5 स्पेस 6 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा. |
03:27 | मॅट्रिक्सची पुढची रो डिफाईन करण्यासाठी सेमीकोलन वापरतात. |
03:32 | सायलॅब हे केस सेन्सेटिव्ह आहे. |
03:34 | मॅट्रिक्स डिफाईन करण्यासाठी अप्पर केसमधे असलेले P व्हेरिएबल वापरले आहे. |
03:40 | जे वेक्टर दर्शवणा-या स्मॉल p पेक्षा वेगळे आहे. |
03:44 | आता स्मॉल p म्हणजे काय ते तपासू. |
03:48 | तसेच size(साइज़ ) कमांडद्वारे मॅट्रिक्सचा आकार कसा मिळवायचा ते पाहू. |
03:53 | त्यासाठी टाईप करा चौकोनी कंस रो कॉमा कॉलम चौकोनी कंस पूर्ण is equal to size of capital P जो मॅट्रिक्स आहे. एंटर दाबा. |
04:10 | हे आऊटपुट मिळेल. |
04:17 | length (लेंत) कमांड मॅट्रिक्स मधील एकूण एलिमेंटसची संख्या दाखवते. |
04:27 | transpose(ट्रॅनस्पोज़) कमांड मॅट्रायसेस साठीही वापरता येते. |
04:34 | P ट्रान्सपोज आपल्याला मॅट्रिक्स P चा ट्रान्सपोज देईल. |
04:41 - | 2 by 3 आकाराचे मॅट्रिक्स Q डिफाईन करू. |
04:45 | Capital Q is equal to चौकोनी कंस 1 स्पेस 5 स्पेस 3. पुढील रो साठी सेमीकोलन टाईप करा. |
04:56 | 2 स्पेस 4 स्पेस 8 चौकोनी कंस पूर्ण आणि एंटर दाबा. |
05:03 | तसेच पुन्हा एकदा P चा उपयोग करू. |
05:08 | गणितामधे करतो त्याप्रमाणे P आणि Q मॅट्रिक्स वापरून काही गणिती क्रिया करू शकतो. |
05:14 | उदाहरणार्थ E is equal to 2 times p plus 3 times q आणि एंटर दाबा. |
05:29 | उत्तर बरोबर आहे का ते तपासा. |
05:33 | पाठ थांबवून व्हिडिओ मधे दाखवलेला एक्झरसाईज 2 सोडवण्याचा प्रयत्न करा. |
05:44 | पाठात आपण शिकलो, |
05:47 | स्पेसेज किंवा कॉमाज द्वारे वेक्टर डिफाईन करणे . |
05:50 | length()(लेंत) फंक्शनद्वारे वेक्टरची लांबी काढणे. |
05:54 | apostrophe(अपोस्ट्रोफी) द्वारे वेक्टर किंवा मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज मिळवणे . |
05:59 | स्पेस किंवा कॉमाद्वारे कॉलम आणि सेमीकोलनद्वारे रो वेगळे करून मॅट्रिक्स डिफाईन करणे. |
06:07 | size()(साइज़) फंक्शनद्वारे मॅट्रिक्सचा साईज मिळवणे. |
06:11 | हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे. |
06:18 | FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा सायलॅब.in द्वारे मिळवू शकता. |
06:28 | यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
06:33 | अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या. |
06:43 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
06:46 | सहभागाबद्दल धन्यवाद. |