Geogebra/C3/Theorems-on-Chords-and-Arcs/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Theorems-on-Chords-and-Arcs
Author: Manali Ranade
Keywords: Geogebra
|
|
---|---|
00:01 | नमस्कार. Geogebra मधील जीवा( Chords) आणि कंस(Arcs) या वरील प्रमेयांच्या(Theorems) पाठात स्वागत. |
00:08 | ह्या पाठाच्या शेवटी तुम्ही, |
00:10 | वर्तुळाच्या जीवा आणि
कंस तपासण्यास सक्षम व्हाल. |
00:19 | Geogebra चे प्राथमिक ज्ञान आपल्याला आहे असे समजू. |
00:23 | नसल्यास संबंधित पाठासाठी http://spoken-tutorial.org ह्या वेबसाईटला भेट द्या. |
00:30 | ह्या पाठासाठी आपण, |
00:33 | Ubuntu Linux OS Version 11.10, Geogebra Version 3.2.47.0 वापरत आहोत. |
00:43 | आपण पुढील Geogebra टूल्स वापरू. |
00:47 | * Circle with Center and Radius |
00:50 | * Circular Sector with Center between Two Points |
00:53 | * Circular Arc with Center between Two points |
00:56 | * Midpoint आणि
|
01:00 | GeoGebra ची नवीन विंडो उघडू . |
01:02 | Dash home मधील Media Apps वर क्लिक करा. |
01:07 | Type खालील Education वर क्लिक करून GeoGebra वर क्लिक करा. |
01:15 | आता प्रमेय मांडू. |
01:18 | वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. |
01:23 | वर्तुळमध्य A मधून BC या जीवेवर टाकलेला लंब ती जीवा दुभागत. |
01:32 | प्रमेय तपासून पाहू. |
01:37 | ह्या पाठासाठी Axes ऐवजी 'Grid layout' वापरू. |
01:42 | ड्रॉईंग पॅड वर राईट क्लिक करा. |
01:44 | 'Graphic view' मधे |
01:45 | 'Axes' अनचेक करून |
01:47 | 'Grid' निवडा. |
01:52 | आता वर्तुळ काढू. |
01:54 | टूलबारवरील Circle with Center and Radius हे टूल निवडा. |
01:58 | ड्रॉईंग पॅडवर बिंदू 'A' काढा. |
02:01 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:03 | त्रिज्येसाठी( Radius) '3' टाईप करा. |
02:06 | OK क्लिक करा. |
02:07 | मध्यबिंदू 'A' आणि त्रिज्या '3सेंटीमीटर' असलेले वर्तुळ तयार होईल. |
02:14 | बिंदू 'A' हलवून वर्तुळाच्या हालचाली पाहु. |
02:19 | “Segment between two points” हे टूल निवडा. |
02:22 | वर्तुळाच्या परीघावर 'B' आणि 'C' हे बिंदू काढा. |
02:27 | जीवा 'BC' तयार होईल. |
02:30 | जीवा 'BC' वर बिंदू 'A' मधून जाणारा लंब काढू. |
02:36 | टुलबार वरील "Perpendicular line" टूलवर क्लिक करा. |
02:39 | जीवा 'BC', आणि बिंदू 'A' वर क्लिक करा. |
02:45 | बिंदू 'B' हलवून, बिंदू 'B' सोबत लंब देखील हलताना आपण पाहु. |
02:52 | लंब आणि जीवा 'BC', एका बिंदूत छेदतात. |
02:57 | “Intersect Two objects” वर क्लिक करा, |
02:59 | छेदनबिंदू 'D' म्हणून मार्क करा. |
03:04 | D हा जीवा BC चा मध्यबिंदू आहे का ते तपासू. |
03:09 | "Distance" tool... वर क्लिक करा |
03:12 | बिंदू 'B' 'D' आणि 'D' 'C' वर क्लिक करा. |
03:19 | 'BD' आणि 'DC' हे अंतर समान असल्याचे लक्षात येईल. |
03:24 | हे सुचवते, 'D' हा जीवा 'BC' चा मध्यबिंदू आहे. |
03:29 | आता कोन 'CDA' मोजू. |
03:33 | Angle tool वर क्लिक करा. |
03:36 | बिंदू 'C','D', 'A' वर क्लिक करा. |
03:42 | 'CDA' हा 90 अंशाचा कोन आहे. |
03:46 | प्रमेय सिध्द झाले आहे. |
03:50 | आता बिंदू 'C' हलवू. |
03:52 | बिंदू 'C' सोबत अंतर देखील बदलताना दिसेल. |
04:03 | फाईल सेव्ह करू. |
04:05 | “File”>> "Save As" वर क्लिक करा. |
04:08 | फाईलला "circle-chord" हे नाव देऊन “Save” वर क्लिक करा. |
04:21 | आता पुढील प्रमेय पाहू. |
04:28 | समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात. |
04:34 | BC या कंसाने आंतरलिखित केलेले BDC आणि BEC हे कोन समान असतात. |
04:44 | हे प्रमेय तपासून पाहू. |
04:51 | नवी Geogebra विंडो उघडू, |
04:54 | “File” खालील "New" वर क्लिक करा. |
04:55 | एक वर्तुळ काढू. |
04:57 | टूलबारवरील " Circle with Center through point टूल वर क्लिक करा. |
05:01 | मध्यबिंदू म्हणून बिंदू 'A' काढा. |
05:04 | बिंदू 'B' आणि 'C' मिळवण्यासाठी परिघावर पुन्हा एकदा क्लिक करा. |
05:09 | आता कंस 'BC' काढू. |
05:13 | "Circular Arc with Center between Two points" वर क्लिक करा. |
05:18 | परिघावरील बिंदू 'A' आणि बिंदू 'B' आणि 'C' वर क्लिक करा. |
05:24 | कंस 'BC' तयार झाला आहे. |
05:27 | कंस 'BC' च्या प्रॉपर्टीमधे बदल करू. |
05:30 | "Algebra View" मधे |
05:32 | object 'd' वर राईट क्लिक करा. |
05:35 | "Object Properties" निवडा. |
05:38 | हिरवा रंग निवडून close वर क्लिक करा. |
05:46 | new point टूल वर क्लिक करा. वर्तुळाच्या परिघावर बिंदू 'D' आणि 'E' काढा. |
05:56 | कंस BCवरून बिंदू 'D' आणि 'E' शी दोन कोन तयार करू. |
06:04 | "Polygon" टूलवर क्लिक करा. |
06:05 | बिंदू 'E', 'B', 'D', 'C' आणि आकृती पूर्ण करण्यासाठी पुन्हा 'E' वर क्लिक करा. |
06:18 | कोन 'BDC' आणि 'BEC' मोजू. |
06:27 | "Angle" टूलवर क्लिक करा. |
06:29 | बिंदू 'B', 'D', 'C' आणि 'B', 'E', 'C' वर क्लिक करा. |
06:40 | कोन 'BDC' आणि 'BEC' हे समान असल्याचे दिसेल. |
06:52 | पुढील प्रमेय पाहू. |
06:55 | कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो. |
07:06 | BC या कंसाने A शी केलेला BACहा कोन त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या BEC आणि BDC या कोनांच्या दुप्पट असतो. |
07:22 | हे प्रमेय तपासून पाहू. |
07:26 | वर्तुळखंड 'ABC' काढू. |
07:30 | "Circular Sector with Center between Two Points" टूल वर क्लिक करा. |
07:35 | बिंदू 'A', 'B', 'C' वर क्लिक करा. |
07:45 | वर्तुळखंड 'ABC' चा रंग बंदलू. |
07:48 | वर्तुळखंड 'ABC' वर राईट क्लिक करा. |
07:51 | "Object Properties" निवडा. |
07:54 | हिरवा रंग निवडून "Close" वर क्लिक करा. |
08:00 | कोन 'BAC' मोजू. |
08:04 | "Angle" टूल वर क्लिक करा. बिंदू 'B', 'A', 'C' वर क्लिक करा. |
08:15 | कोन 'BAC' हा कोन 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे. |
08:28 | बिंदू 'C' हलवून पाहू. |
08:32 | कोन 'BAC' हा कायमच 'BEC' आणि 'BDC' च्या दुप्पट आहे. |
08:41 | अशाप्रकारे ही प्रमेय सिध्द झाली आहेत. |
08:45 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:48 | थोडक्यात, |
08:53 | ह्या पाठात आपण सिध्द केले, |
08:57 | * वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. |
09:00 | * समान कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात |
09:06 | * कुठल्याही कंसाने वर्तुळमध्याशी केलेला कोन हा त्या कंसाने आंतरलिखित केलेल्या कोनाच्या दुप्पट असतो. |
09:15 | असाईनमेंट म्हणून तुम्ही हे तपासून पाहा. |
09:19 | वर्तुळाच्या समान जीवा मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात. |
09:24 | वर्तुळ काढा. |
09:26 | Segment with Given length from point टूल निवडा. |
09:29 | हे टूल दोन समान आकाराच्या दोन जीवा काढण्यासाठी वापरा. |
09:33 | त्या जीवांवर मध्यबिंदूपासून लंब काढा. |
09:37 | छेदनबिंदू मार्क करा. |
09:40 | लंबांचे अंतर मोजा. |
09:44 | असाईनमेंट अशाप्रकारे दिसणे गरजेचे आहे. |
09:48 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:51 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
10:00 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:03 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:07 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:14 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:29 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |