Geogebra/C2/Symmetrical-Transformation-in-Geogebra/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:54, 11 July 2014 by Gaurav (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Symmetrical Transformation in Geogebra

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Time Narration
00:00 नमस्कार. Geogebra च्या Symmetrical Transformation वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण Symmetrical Transformationबद्दल जाणून घेणार आहोत. जसे की,
00:11 रेषीय सममिती
00:12 चक्राकार सममिती
00:13 आकृती योग्य प्रमाणात मोठी करणे.
00:17 समजू या की तुम्हाला Geogebra ची ओळख आहे.
00:21 नसल्यास Introduction वरील ट्युटोरियल या वेबसाईटवर बघा.
00:26 या ट्युटोरियलसाठी आपण Ubuntu Linux OS Version 11.10
00:31 आणि Geogebra Version 3.2.47.0 वापरणार आहोत.
00:35 आपण येथे ही Geogebra tools वापरणार आहोत.
00:37 Reflect Object about Line
00:39 Rotate Object around a Point by Angle
00:42 Dilate object from a Point by Factor
00:45 Semicircle through Two points
00:47 Regular Polygon and
00:49 Perpendicular bisector
00:51 रूपांतरणाची व्याख्या.
00:53 भौमितिक आकृत्यांचे सममितीय रूपांतरण म्हणजे-
00:57 प्रतलावरील आकृतीची जागा, आकार व आकारमान यातील बदल.
01:02 मूळ आकृतीला Object म्हणतात.
01:04 रूपांतरित आकृतीला 'Image' म्हणतात.
01:07 Reflection symmetry म्हणजेच प्रतिबिंब सममिती
01:09 याला रेषीय सममिती असेही म्हणतात.
01:11 जेथे एक अर्धा भाग हा दुस-या अर्ध्याचे प्रतिबिंब असतो.
01:15 आकृती मध्यावर दुमडल्यास दोन्ही भाग तंतोतंत जुळतात.
01:20 आकृती ज्या रेषेवर दुमडली आहे त्याला सममितीची रेषा म्हणतात.
01:24 आता GeoGebra विंडोवर जाऊ या.
01:27 Dash home वरीलMedia Appsखालील Type खालील Educationमधून Geogebra निवडा.
01:37 या ट्युटोरियलसाठी आपण Algebric view बंद करू या.
01:40 त्यासाठी Algebric view वरील क्लोज बटणावर क्लिक करा.
01:47 रेषीय सममितीपासून सुरूवात करू या.
01:50 प्रथम आपण समभुज त्रिकोण काढू या.
01:53 टूलबारवरील Regular Polygon सिलेक्ट करा.
01:57 ड्रॉईंग पॅडवर A, B हे बिंदू काढा. आणि टेक्स्ट बॉक्समध्ये 3 हा आकडा टाईप करा.
02:08 आपल्याला ABC हा समभुज त्रिकोण दिसेल.
02:11 त्रिकोणाच्या एका बाजूवर लंबदुभाजक काढू या.
02:15 त्यासाठी Perpendicular Bisector Toolनिवडा आणि बाजू AC वर क्लिक करा.
02:26 आता Point tool सिलेक्ट करा. आणि त्रिकोणाच्या आत एक बिंदू काढा.
02:31 नंतर D हा बिंदू कुठल्याही एका शिरोबिंदूजवळ सरकवा.
02:38 D बिंदूवर राईट क्लिक करून Trace ON हा पर्याय निवडा.
02:43 आता टूलबारवरील Reflect Object about Line हे टूल निवडा.
02:48 D बिंदूवर क्लिक करा.
02:49 त्यामुळे D बिंदू हायलाईट होईल.
02:52 आता लंबदुभाजकावर क्लिक करा.
02:55 लंबदुभाजकाच्या दुस-या बाजूला D' प्रतिमा तयार होईल.
03:01 'D' हे D बिंदूचे प्रतिबिंब आहे.
03:04 D' बिंदूसाठी Trace On सेट करू या.
03:08 Move tool च्या सहाय्याने त्रिकोणात D बिंदू हलवू या.
03:11 त्यासाठी टूलबारवरील Move toolखालील पर्याय निवडा.
03:22 माऊसच्या सहाय्याने आकृतीवर क्लिक करा.
03:25 आणि ड्रॅग करत त्रिकोणात रेखाटा.
03:28 आता माऊसचे बटण सोडा.
03:31 आपल्याला काय दिसले?
03:32 येथे लंबदुभाजक ही सममितीय रेषा आहे.
03:36 D हे ऑब्जेक्ट असून D' ही इमेज आहे.
03:39 आता आपण अर्धवर्तुळाचे रेषेवर प्रतिबिंब घेऊ या.
03:43 एक अर्धवर्तुळ काढू या.
03:44 Semicircle through Two pointsया टूलवर क्लिक करून बिंदू E आणि नंतर F काढा.
03:56 segment Between two Points या टूलवर क्लिक करा.
04:02 बिंदू G आणि H काढून घ्या. आपल्याला एक रेष काढलेली दिसेल.
04:06 या रेषेचे गुणधर्म बदलू या.
04:08 रेषेवर राईट क्लिक करा. Object properties या विंडोमधील Style टॅब मध्ये जाऊन Style बदला.
04:21 टूलबारवरील Reflect Object about Line हे टूल सिलेक्ट करा.
04:27 अर्धवर्तुळ EF वर क्लिक करा.
04:31 मग GH वर क्लिक करा.
04:34 येथे आपल्याला रेषGH च्या दुस-या बाजूला आकृतीची प्रतिमा E'F' तयार झालेली दिसेल. आता ही आकृती आपल्याला वर्तुळासारखी दिसत आहे.
04:45 आता ही फाईल सेव्ह करा.
04:47 फाईल मेनूमधील Save As वर क्लिक करा.
04:50 फाईलला Line-symmetryअसे नाव देऊन “Save” वर क्लिक करा.
05:05 आता आपणRotate the Object around a Point by Angle बद्दल जाणून घेऊ.
05:12 चक्रीय भ्रमणाची व्याख्या.
05:15 चक्रीय भ्रमण म्हणजे आकृतीचे केंद्रबिंदू भोवती काही कोनातून फिरवण्याने झालेले रूपांतरण.
05:21 जर आकृतीत बदल झाला नाही तर त्यास चक्रीय सममिती असे म्हणतात.
05:29 तुम्ही आकृतीचे भ्रमण कितीही अंशातून clockwise किंवा counterclockwise दिशेने करू शकता.
05:39 Geogebra ची नवी विंडो उघडा.
05:41 फाईल मेनूमधील New वर क्लिक करा.
05:47 एक चौरस काढू या.
05:49 टूलबारवरील Regular Polygon टूलवर क्लिक करा.
05:55 ड्रॉईंग पॅडवर क्लिक करा.
05:57 'A' आणि 'B' हे बिंदू काढा.
05:59 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
06:01 OK वर क्लिक करा.
06:03 आपल्याला चौरस 'ABCD' दिसेल.
06:05 आता Rotate Object around a Point by Angle ह्या टूलवर क्लिक करा.
06:13 मग चौरस 'ABCD' वर क्लिक करा.
06:16 चौरस हायलाईट झालेला दिसेल.
06:18 मग कुठल्याही एका शिरोबिंदूवर क्लिक करा.
06:20 'A' वर क्लिक करू या.
06:23 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
06:25 Angle field मध्ये “60” टाईप करा.
06:30 ड्रॉप डाऊन मधून अंशाचे चिन्ह सिलेक्ट करा.
06:35 clockwise हा पर्याय निवडून OK वर क्लिक करा.
06:40 निवडलेल्या बिंदूभोवती 60° कोनात चौरसclockwise फिरेल.
06:44 “A B' C' D' " अशी फिरवलेली आकृती तयार होईल.
06:49 Move tool च्या सहाय्याने ही आकृती दुस-या बाजूला सरकवा.
07:00 आता पुढे Dilate or enlarge object from point by factor बद्दल जाणून घेऊ.
07:09 Dilation म्हणजेच विस्तार
07:11 किंवा enlargement प्रकारचे रूपांतरण
07:14 ज्यामध्ये दिलेल्या गुणोत्तराच्या सहाय्याने आकृतीचा आकार वाढवला जातो.
07:23 Polygon टूलच्या सहाय्याने एक त्रिकोण काढा.
07:28 त्रिकोण पूर्ण करण्यासाठी E , F , G हे बिंदू काढा. Eबिंदूवर क्लिक करा.
07:36 New point टूलवर क्लिक करा आणि
07:40 H बिंदू काढा.
07:44 Dilate Object from Point by Factor या टूलवर क्लिक करा.
07:51 त्रिकोण EFG वर क्लिक करा.
07:54 त्रिकोण हायलाईट झालेला दिसेल.
07:55 H बिंदूवर क्लिक करा.
07:57 एक डायलॉग बॉक्स उघडेल.
08:00 number field मध्ये 2 टाईप करा.
08:04 OK वर क्लिक करा.
08:09 यामुळे आकृती दुप्पट मोठी झालेली दिसेल.
08:16 Segment Between two Pointsया टूलवर क्लिक करून H,E,E' हे बिंदू जोडा.
08:33 H,G,G' हे बिंदू जोडा.
09:01 तसेच H,F,F' हे बिंदू जोडा.
09:15 येथे आपल्याला दिसेल की H हा dilation बिंदू आहे.
09:21 गुणोत्तराची व्हॅल्यू देऊन आपण आकृती आपल्याला हवी त्या प्रमाणात मोठी करू शकतो.
09:28 आता ही फाईल सेव्ह करू या.
09:30 फाईल मेनूमधील Save As वर क्लिक करा.
09:33 आपण फाईलला Dilate-triangle असे नाव देऊ या.
09:48 Save वर क्लिक करा. अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:55 या ट्युटोरियलमध्ये जे शिकलो
09:58 त्याबद्दल थोडक्यात.
10:00 रेषीय सममिती
10:02 बिंदूभोवती चक्राकार भ्रमण
10:05 आकृती दिलेल्या प्रमाणात मोठी करणे.
10:09 आता ही असाईनमेंट करू या.
10:11 एक बहुभुजाकृती काढा.
10:12 त्यासाठी Regular Polygon tool चा वापर करा. (:बाजू=5)
10:17 बहुभुजाकृतीच्या एका बाजूवर लंब दुभाजक काढा.
10:21 पंचकोनाच्या आत एक बिंदू काढा.
10:25 त्या बिंदूसाठी trace On सेट करा.
10:27 लंबदुभाजकाच्या दुस-या बाजूस त्या बिंदूचे प्रतिबिंब मिळवा.
10:31 या बिंदूसाठी देखील trace On सेट करा.
10:34 तुम्ही सममितीसाठी अचूक रेषा निवडली आहे की नाही हे पाहण्यासाठी पंचकोनात ड्रॅगने रेखाटा.
10:44 एका शिरोबिंदूभोवती मूळ पंचकोन 135°counter clockwise फिरवा.
10:49 एक बिंदू घेऊन 3 गुणोत्तराने पंचकोन विस्तारा.
10:56 तुमची असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
11:03 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:06 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:17 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:20 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:39 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Ranjana