Blender/C2/3D-Cursor/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:59, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:03 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:07 | हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 2.59 मधील 3D कर्सर विषयक आहे. |
00:15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:25 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3Dकर्सर म्हणजे काय? |
00:32 | ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि 3D कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय, हे शिकू. |
00:46 | मी असे गृहीत धरते की, तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे. |
00:51 | जर नसेल तर कृपया आमचे Installing Blenderवरील ट्यूटोरियल पहा. |
00:57 | 3D कर्सर क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता. |
01:06 | चला ब्लेण्डर मध्ये 3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल. |
01:12 | ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे. |
01:15 | पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा . ब्लेण्डर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर लेफ्ट क्लिक करा. |
01:27 | ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा. |
01:42 | हे ब्लेण्डर 2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे . |
01:54 | ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले सर्व पर्याय समजू शकता. |
02:01 | इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया, यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा. |
02:12 | यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात. |
02:20 | स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा |
02:25 | स्प्लॅश स्क्रीन च्या शिवाय, ब्लेण्डर इंटरफेस वर इतर कुठेही माउस लेफ्ट -क्लिक करा. |
02:32 | आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता. |
02:37 | 3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे. |
02:43 | आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही, म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल. |
02:48 | डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे. |
02:51 | यास डिलीट करण्यास, कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा , डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा. |
02:58 | येथे आता तुम्ही 3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल. |
03:04 | 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश, 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट करणे आहे. |
03:15 | ADDवर जा. Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा. |
03:19 | तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता. |
03:27 | 3D व्यू मध्ये नवीन क्यूब जुडलेली आहे. |
03:30 | तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे. |
03:38 | आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु. |
03:44 | प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे. |
03:48 | त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा. |
03:53 | मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे. |
03:59 | नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा. |
04:10 | 3D कर्सर च्या नवीन स्थानावर UV स्फियर दिसत आहे. |
04:15 | आता आपण 3Dकर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु. |
04:22 | Object वर जा. Snap वर जा. हे स्नॅप मेन्यू आहे. |
04:29 | येथे अनेक पर्याय आहेत. |
04:31 | तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता. |
04:38 | Selection to cursor - निवडलेले आइटम 3D कर्सर मध्ये आणते. |
04:45 | उदाहरणार्थ, 3D कर्सर मध्ये क्यूब ला आणू. |
04:50 | क्यूब वर राइट-क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. |
04:58 | Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये आले आहे. |
05:06 | आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा. |
05:17 | कीबोर्ड शॉर्टकट साठी Gआणि Y दाबा. |
05:23 | 3D व्यू मध्ये मूविंग ऑब्जेक्ट्स विषयक अधिक माहिती साठी Basic description of Blender interface हे ट्यूटोरियल पहा. |
05:35 | स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा. |
05:43 | 3D कर्सर नवीन स्थानामध्ये क्यूब च्या मध्यभागी आले आहे. |
05:50 | समजा तुमच्याकडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे, |
05:59 | Cursor to selected- 3D कर्सर ला दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्यभागी आणते. |
06:07 | मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे. |
06:12 | UVस्फियर निवडण्यासाठी Shift आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे. |
06:22 | स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा. |
06:30 | 3Dकर्सर दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी आले आहे. |
06:36 | lamp वर Shift आणि राइट क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S. |
06:47 | Cursor to Selected वर क्लिक करा. तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर आले आहे. |
06:58 | 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका बिंदू वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे. |
07:07 | स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S. |
07:12 | Cursor to Center वर क्लिक करा. 3Dकर्सर, 3D व्यू च्या मध्य भागी आले आहे. |
07:22 | ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा. |
07:28 | आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा. |
07:39 | स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S. |
07:44 | Cursor to active वर क्लिक करा. |
07:47 | 3Dकर्सर मागील सक्रिय निवड केलेल्या स्फियर च्या मध्य भागी दिसते. |
07:56 | 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते. |
08:03 | परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
08:08 | आता 3D व्यू मध्ये विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करा. |
08:16 | या नंतर स्नॅप मेन्यू मधील स्नॅपिंग पर्यायाचा शोध घ्या. शुभेच्छा. |
08:26 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08:31 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे. |
08:40 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
09:00 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
09:02 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:06 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
09:11 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09:17 | आमच्या सह जुडण्यासाठी, |
09:19 | धन्यवाद. |