Netbeans/C2/Handling-Images-in-a-Java-GUI-Application/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration
|
---|---|
00:01 | नमस्कार. |
00:02 | Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठात स्वागत. |
00:10 | आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच, |
00:15 | JFrame फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस, बटण्स, मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू. |
00:22 | नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:29 | ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती, |
00:34 | आणि त्यांच्यावर GUI ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे. |
00:39 | ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत. |
00:52 | जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे getResource() मेथड. |
00:59 | IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू. |
01:07 | आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल. |
01:13 | ह्या पाठात पाहू - |
01:15 | ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे. |
01:18 | इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे. |
01:20 | लेबलवर इमेज दाखवणे. |
01:22 | माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे. |
01:25 | ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे. |
01:28 | आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी IDE वर जाऊ. |
01:33 | फाईल मेनूतून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडा. |
01:37 | Categories(केटेगरीस) मधील Java(जावा), Projects(प्रॉजेक्ट्स) खालील Java Application (जावा अप्लिकेशन ) निवडून Next (नेक्स्ट) क्लिक करा. |
01:46 | Project Name(प्रॉजेक्ट नेम ) फिल्डमधे ImageDisplayApp टाईप करा. |
01:54 | Create Main Class (क्रियेट मेन क्लास) चेकबॉक्स क्लियर करा. |
01:58 | तसेच Set as Main Project(सेट अस मेन प्रॉजेक्ट) चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा. |
02:03 | Finish (फिनिश) क्लिक करा.IDE मधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल. |
02:08 | ह्या भागात Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवून त्यात Jlabel(जेलेबल ) समाविष्ट करणार आहोत. |
02:14 | प्रथम Jframe form(जेफ्रेम फॉर्म) बनवू. |
02:17 | Projects(प्रॉजेक्ट्स) विंडोत ImageDisplayApp नोड एक्सपांड करा. |
02:23 | Source Packages(सोर्स पॅकेजस) नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Jframe form(जेफ्रेम फॉर्म) पर्याय निवडा. |
02:30 | Class Name(क्लास नेम ) फिल्डमधे ImageDisplay टाईप करा. |
02:37 | Package (पॅकेज) फिल्डमधे org.me.myimageapp टाईप करा. |
02:45 | Finish(फिनिश) क्लिक करा. |
02:48 | आता Jlabel(जेलेबल) समाविष्ट करू. |
02:52 | IDE च्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील Label(लेबल) कॉम्पोनंट निवडून Jframe(जेफ्रेम) वर ड्रॅग करा. |
03:01 | आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे. |
03:06 | ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java(जावा) पॅकेज बनवतात. |
03:15 | लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते. |
03:19 | प्रोजेक्टस विंडोमधे org.me.myimageapp च्या नोडवर राईट क्लिक करून New(न्यू) मधील Java Package(जावा पॅकेज) निवडा. |
03:30 | New Package विझार्ड(न्यू पॅकेज विझार्ड) मधे org.me.myimageapp पुढे .resources टाईप करा. |
03:40 | त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता org.me.myimageapp.resources हे असेल. |
03:47 | Finish(फिनिश) क्लिक करा. |
03:49 | इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील org.me.myimageapp.resources ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे. |
03:59 | ऍप्लिकेशनमधे इमेज Jlabel कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे. |
04:04 | आता लेबलवर इमेज समाविष्ट करू. |
04:08 | GUI designer मधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा. |
04:14 | विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून Icon(आयकॉन) प्रॉपर्टीवर जा. |
04:23 | ellipsis(एलिप्सिस) म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा. |
04:30 | Icon प्रॉपर्टी(आइकान) डायलॉग बॉक्समधे Import to Project वर क्लिक करा. |
04:34 | फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा. |
04:42 | Next(नेक्स्ट) क्लिक करा. |
04:45 | विझार्डच्या Select Target Folder पेजमधे Resources(रिसोर्सस) फोल्डर निवडा. |
04:49 | Finish(फिनिश) क्लिक करा. |
04:52 | नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल. |
04:57 | ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या JAR फाईलमधे समाविष्ट होते. |
05:07 | OK क्लिक करा. |
05:11 | तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून Clean and Build(क्लीन अँड बिल्ड) पर्याय निवडा. |
05:18 | आता फाईल विंडोवर जाऊन build(बिल्ड) फोल्डर खालील, |
05:29 | dist(डिस्ट ) फोल्डर मधे jar फाईल बघू शकता. |
05:33 | imagedisplay(इमेजडिसप्ले) क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो. |
05:38 | तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते. |
05:43 | आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू. |
05:48 | Properties(प्रॉपर्टीस) विंडोमधे Text(टेक्स्ट) प्रॉपर्टी सिलेक्ट करा. |
05:56 | आणि jLabel1 डिलिट करा. |
06:04 | लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही GUI Builder ने तयार केलेली व्हॅल्यू आहे. |
06:10 | परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत. |
06:15 | त्यामुळे टेक्स्टची गरज नाही. |
06:18 | आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा. |
06:26 | GUI Designer मधे Source(सोर्स) टॅब क्लिक करा. |
06:30 | Generated Code असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा. |
06:33 | GUI Designer द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी Generated Code च्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा. |
06:42 | येथे ही कीलाईन आहे. |
06:49 | jLabel1 आयकॉन प्रॉपर्टीसाठी Property editor(प्रॉपर्टी एडिटर) वापरलेला असल्याने IDE ने setIcon मेथड बनवली आहे. |
06:57 | त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource() मेथडला ImageIcon च्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो. |
07:10 | एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की Design(डिज़ाइन) व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा. |
07:19 | Events(इवेंट्स) खालील Mouse(माउस) मधील mouseClicked(माउसक्लिक्ड ) क्लिक करा. |
07:24 | व्ह्यू बदलून Source मोडवर जाईल. |
07:28 | येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता. |
07:33 | GUI मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू. |
08:00 | आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत. |
08:05 | प्रथम पॉप अप साठी नवी Jframe बनवली आहे. |
08:12 | आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे. |
08:15 | आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे. |
08:24 | ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू. |
08:36 | import javax.swing.* |
08:45 | आणि import java.awt.* हे समाविष्ट करा. |
08:53 | ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील. |
08:59 | ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू. |
09:02 | इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे. |
09:07 | इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करा. |
09:12 | प्रथम प्रोजेक्टचा Main class(मेन क्लास) सेट करू. |
09:16 | प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लास मुळे IDE ला समजते . |
09:21 | याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना JAR फाईलमधे Main class(मेन क्लास) हा घटक तयार झाल्याची खात्री होते. |
09:33 | प्रोजेक्ट विंडोतील ImageDisplayApp प्रोजेक्ट नोड वर राईट क्लिक करून Properties(प्रॉपर्टीस) निवडा. |
09:41 | Project Properties(प्रॉजेक्ट प्रॉपर्टीस) च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील Run(रन) कॅटॅगरी सिलेक्ट करा. |
09:47 | Main Class (मेन क्लास) फिल्ड समोर असलेले Browse(ब्राउज़) बटण क्लिक करा. |
09:51 | org.me.myimageapp.ImageDisplay सिलेक्ट करून Select Main Class(सेलेक्ट मेन क्लास) क्लिक करा. |
10:01 | OK क्लिक करा. |
10:05 | आता Project नोड(प्रॉजेक्ट) वर राईट क्लिक करून Clean & Build(क्लीन & बिल्ड) सिलेक्ट करा. |
10:11 | Files(फाइल्स) विंडोमधे ऍप्लिकेशनच्या Build प्रॉपर्टीज बघू शकतो. |
10:20 | Build फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो. |
10:23 | dist फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो. |
10:32 | आता टूलबारवरील Run(रन) निवडा. |
10:34 | इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल. |
10:39 | ह्या इमेजवर क्लिक करा. |
10:42 | वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल. |
10:50 | आता असाईनमेंट करू. |
10:54 | ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा. |
11:01 | प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील इव्हेंट लिहा. |
11:12 | आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे. |
11:17 | ही कार्यान्वित करू. |
11:20 | असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
11:26 | आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत. |
11:34 | शिकलो ते थोडक्यात, |
11:36 | Jframe फॉर्म बनवला. |
11:39 | इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले. |
11:41 | लेबलवर इमेज दाखवली. |
11:44 | तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले. |
11:49 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
11:53 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:56 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
12:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:07 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
12:11 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
12:19 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
12:23 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:42 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
12:46 | सहभागासाठी धन्यवाद . |