Netbeans/C3/Connecting-to-a-MySQL-Database/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:08, 16 May 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00.00 | नमस्कार. |
00.02 | MySQL डेटाबेसला जोडणी करण्याच्या पाठात स्वागत. |
00.07 | या पाठात पाहू, |
00.09 | MySQL सर्व्हर प्रॉपर्टीज कॉनफिगर करणे. |
00.14 | MySQL सर्व्हर सुरू करणे. |
00.17 | डेटाबेस तयार करून त्याच्याशी जोडणी करणे. |
00.20 | डेटाबेस टेबल्स बनवणे. ज्याच्या दोन पध्दती पाहू. |
00.26 | sql एडिटरद्वारे आणि, |
00.29 | क्रीएट टेबल डायलॉग बॉक्सद्वारे. |
00.33 | आणि शेवटी, SQL स्क्रिप्ट कार्यान्वित करणे. |
00.37 | ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04, |
00.44 | आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत. |
00.48 | तसेच आपल्याला जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) v6 |
00.54 | आणि MySQL डेटाबेस सर्व्हरची गरज आहे. |
00.57 | हा पाठ जाणून घेण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंटचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. |
01.03 | अधिक जाणून घेण्यासाठी दाखवलेल्या लिंकवरील PHPआणि MySQL वरील स्पोकन ट्युटोरियल बघा. |
01.10 | या पाठात सर्वमान्य प्रोग्रॅमिंग परिभाषा वापरली आहे. |
01.16 | नेटबीन्स IDEमधून MySQL डेटाबेसला जोडणी करण्याची पध्दत येथे दाखवली जाईल. |
01.24 | एकदा जोडणी झाली की IDE च्या डेटाबेस एक्सप्लोरर द्वारे MySQL सोबत कार्य करू. |
01.31 | आता IDE वर जाऊ. |
01.36 | नेटबीन्स IDE मधे MySQL RDBMS चा आधार अंतर्भूत आहे. |
01.42 | नेटबीन्समधे MySQL डेटाबेस सर्व्हर ऍक्सेस करण्यापूर्वी त्याच्या सर्व्हर प्रॉपर्टीज कॉनफिगर करणे गरजेचे आहे. |
01.51 | Services विंडोमधे डेटाबेसेस नोडवर राईट क्लिक करा. |
01.56 | MySQL सर्व्हर प्रॉपर्टीजचा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी Register MySQL Server निवडा. |
02.05 | सर्व्हरच्या होस्ट नेम आणि पोर्ट योग्य असल्याची खात्री करा. |
02.10 | IDE ने डिफॉल्ट रूपात सर्व्हरचे होस्ट नेम localhost असे दिले आहे. |
02.18 | 3306 हा सर्व्हरचा डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे. |
02.23 | ऍडमिनीस्ट्रेटर युजरनेम दिलेले नसल्यास ते टाईप करा. |
02.27 | आपल्या सिस्टीमवर ऍडमिनीस्ट्रेटर युजरनेम root आहे. |
02.33 | ऍडमिनीस्ट्रेटर पासवर्ड द्या. |
02.36 | सिस्टीमवर पासवर्ड ब्लँक आहे. |
02.40 | डायलॉग बॉक्सच्या वरती असलेल्या Admin Properties टॅबवर क्लिक करा. |
02.45 | हे MySQL सर्व्हर नियंत्रित करण्यासाठी माहिती भरण्याची परवानगी देते. |
02.51 | Path/URL to admin toolफिल्डमधे, |
02.56 | टाईप करा किंवा MySQL ऍडमिनीस्ट्रेशन ऍप्लिकेशनचे लोकेशन ब्राऊज करा. |
03.02 | आपल्या सिस्टीमवर टूलचे लोकेशन /usr/bin/mysqladmin आहे. |
03.12 | Arguments फिल्डमधे adminटूलसाठी कोणतेही अर्ग्युमेंट टाईप करा . |
03.18 | हे रिकामे देखील ठेवता येते. |
03.22 | Path to start commandफिल्डमधे |
03.25 | टाईप करा किंवा MySQL स्टार्ट कमांडचे लोकशन ब्राऊज करा. |
03.29 | आपल्या सिस्टीमवर /usr/bin/mysqld_safe आहे. |
03.38 | स्टार्ट कमांडच्या Arguments फिल्डमधे कोणतेही अर्ग्युमेंट टाईप करू शकता. |
03.42 | येथे आपण -u space root space start टाईप करत आहोत. |
03.51 | Path to stop commandफिल्डमधे |
03.54 | टाईप करा किंवा MySQL स्टॉप कमांडचे लोकेशन ब्राऊज करा. |
03.58 | हा mysqladmin वर जाण्याचा पाथ ब-याचदा MySQL इन्स्टॉलेशनच्या bin फोल्डरमधे असतो. |
04.06 | आपल्या सिस्टीमवर ते /usr/bin/mysqladmin आहे. |
04.14 | mysqladminही कमांड असल्यास Arguments फिल्डमधे टाईप करा -u space root space stop. |
04.27 | हे पूर्ण झाल्यावर Admin Properties टॅब स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दिसला पाहिजे. |
04.33 | OK क्लिक करा. |
04.36 | प्रथम आपल्या मशीनवर MySQL डेटाबेस सर्व्हर सुरू असल्याची खात्री करू. |
04.42 | सर्व्हिस विंडोतील MySQL सर्व्हर नोड, MySQL डेटाबेस सर्व्हर कनेक्ट झाला आहे की नाही ते दर्शवते. |
04.52 | तो कार्यान्वित होत असल्याची खात्री झाल्यावर Databases खाली MySQL सर्व्हर नोड वर राईट क्लिक करून Connect निवडा. |
05.05 | MySQL सर्व्हर नोड एक्सपांड केल्यावर सर्व उपलब्ध MySQL डेटाबेसेस दिसतील. |
05.13 | डेटाबेसेस बरोबर देवाण-घेवाण करण्याची सर्वसामान्य पध्दत म्हणजे SQL एडिटर. |
05.19 | त्यासाठी नेटबीन्सकडे बिल्ट इन SQL एडिटर आहे. |
05.23 | कनेक्शन नोडवर राईट क्लिक करून हे ऍक्सेस करू शकतो. |
05.29 | SQL एडिटर द्वारे नवा डेटाबेस इन्स्टन्स बनवू . |
05.34 | Services विंडोमधे MySQL सर्व्हर नोडवर राईट क्लिक करून Create Database निवडा. |
05.44 | Create Database डायलॉग बॉक्समधे नव्या डेटाबेसचे नाव टाईप करा. |
05.50 | mynewdatabase नाव देऊ. |
05.56 | दिलेल्या युजरला पूर्ण ऍक्सेस तुम्ही प्रदान करू शकता. |
06.01 | डिफॉल्ट रूपात केवळ ऍडमिन युजरला विशिष्ट कमांडस कार्यान्वित करण्याची परवानगी असते. |
06.08 | ड्रॉप डाऊन लिस्टद्वारे तुम्ही या परवानगी विशिष्ट युजरला देऊ शकता. |
06.13 | drop tables या शिवाय बहुतांश परवानगी युजरला देणे योग्य ठरते. |
06.18 | फक्त त्यांच्या ऍप्लिकेशन्सने बनवलेले डेटाबेसस मॉडिफाय करण्याची परवानगी युजरला मिळेल. |
06.25 | आपण हा चेकबॉक्स सिलेक्ट करणार नाही. |
06.30 | OKक्लिक करा. |
06.34 | आता टेबल्स बनवून त्यात डेटा भरू. डेटामधे थोडे बदल करू. |
06.41 | आत्ता mynewdatabase रिकामा आहे. |
06.44 | टेबल्समधे डेटा भरण्याची पहिली पध्दत बघू. |
06.48 | डेटाबेस एक्सप्लोररमधे mynewdatabase कनेक्शन नोड एक्सपांड करा. |
06.58 | त्यामधे तीन सब फोल्डर्स आहेत. |
07.00 | Tables, Views आणि Procedures. |
07.04 | Tables फोल्डरवर राईट क्लिक करून Execute Command निवडा. |
07.11 | मुख्य विंडोच्या SQL एडिटरमधे एक रिकामा कॅन्व्हास उघडेल. |
07.16 | आता SQL एडिटरमधे एक साधी क्वेरी टाईप करू. |
07.30 | आपण SQL एडिटरमधे एक साधी क्वेरी टाईप केली आहे. |
07.36 | ही आपण बनवत असलेल्या Counselor टेबलची टेबल डेफिनेशन आहे. |
07.42 | ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी वरील टास्कबार मधीलRun SQL आयकॉनवर राईट क्लिक करा. |
07.51 | किंवा SQL एडिटर मधे राईट क्लिक करून Run Statement निवडा. |
08.00 | IDE डेटाबेसमधे Counselor नामक टेबल बनवेल. |
08.04 | आऊटपुट विंडोमधे हा मेसेज बघू शकतो. |
08.12 | जे आपल्याला कमांड यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे. |
08.17 | केलेले बदल तपासण्यासाठी डेटाबेस एक्सप्लोरर मधे Tables नोडवर राईट क्लिक करा. |
08.25 | Refresh निवडा. |
08.28 | हे दिलेल्या डेटाबेसची चालू स्थिती अपडेट करेल. |
08.32 | आता Counselor हे नवे टेबल Tables पर्यायाखाली दिसेल. |
08.40 | टेबल नोड एक्सपांड केल्यास आपण बनवलेले कॉलम्स दिसतील. |
08.46 | आता टेबल्समधे डेटा भरण्याची पुढील पध्दत पाहू, |
08.51 | म्हणजेच क्रीएट टेबल डायलॉग बॉक्स वापरू. |
08.54 | डेटाबेस एक्सप्लोरर मधे Tables नोडवर राईट क्लिक करून Create Table निवडा. |
09.03 | Create Table डायलॉग बॉक्स उघडेल. |
09.06 | Table नेमच्या टेक्स्ट फिल्डमधे Subject असे टाईप करा. |
09.13 | Add Column क्लिक करा. |
09.16 | Add Column डायलॉग बॉक्समधील नेम फिल्डमधे idअसे टाईप करा. |
09.22 | टाईपच्या ड्रॉप डाऊन मेनूतून SMALLINT हा डेटा टाईप निवडा. |
09.30 | Add Column डायलॉग बॉक्समधील Primary Keyचा चेकबॉक्स सिलेक्ट करा. |
09.35 | हे टेबलची प्रायमरी की घोषित करण्यासाठी आहे. |
09.39 | तुम्ही की चा चेकबॉक्स सिलेक्ट केल्यावर Index आणि Unique चे चेकबॉक्स आपोआप सिलेक्ट झालेले आहेत. |
09.49 | तसेच Null चेकबॉक्स डिसिलेक्ट झालेला आहे. |
09.53 | कारण प्रायमरी की चा उपयोग डेटाबेसमधील युनिक रो शोधण्यासाठी होतो. |
09.59 | OKक्लिक करा. |
10.03 | हीच कृती करून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उरलेले कॉलम्स समाविष्ट करा. |
10.09 | आता Name, Description, आणि Counselor ID चा डेटा ठेवण्यासाठी Subject नावाचे टेबल बनवले आहे. |
10.20 | OKक्लिक करा. |
10.23 | डेटाबेसवर SQL क्वेरीज कार्यान्वित करून त्यात डेटा समाविष्ट करू शकतो तसेच ते मॉडिफाय आणि डिलिट करू शकतो. |
10.32 | आता Counselor टेबलमधे नवे रेकॉर्ड समाविष्ट करू. |
10.35 | Tables नोडच्या कॉन्टेक्स्ट मेनूतून Execute कमांड निवडा. |
10.43 | मुख्य विंडोमधे नवे SQL एडिटर उघडेल. |
10.47 | SQL एडिटरमधे ही क्वेरी टाईप करा. |
11.00 | ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी सोर्स एडिटर मधे राईट क्लिक करून Run स्टेटमेंट निवडा. |
11.07 | आता नवे रेकॉर्ड टेबलमधे समाविष्ट झाले की नाही ते तपासू. |
11.12 | Counselor टेबलवर राईट क्लिक करून View Data निवडा. |
11.18 | नवा SQL एडिटर मुख्य विंडोमधे उघडेल. |
11.21 | टेबलमधील सर्व डेटा सिलेक्ट करण्यासाठीची क्वेरी आपोआप लिहिलेली दिसेल. |
11.27 | ह्या स्टेटमेंटचे आऊटपुट वर्कस्पेसच्या खाली टेबल व्ह्यू मधे दाखवले जाईल. |
11.41 | आत्ता दिलेल्या डेटासहित नवीन रो समाविष्ट झालेली दिसेल. |
11.46 | तसेच बाहेरील SQL स्क्रिप्ट थेट IDE मधून कार्यान्वित करू शकतो. |
11.52 | येथे दाखवण्यासाठी आपल्याकडे SQL क्वेरी आहे. |
11.59 | ही स्क्रिप्ट आधी पाहिल्याप्रमाणे दोन टेबल्स बनवेल. |
12.04 | म्हणजेच Counselor आणि Subject |
12.09 | स्क्रिप्ट ही टेबल्स ओव्हराईट करेल त्यामुळे, |
12.12 | आधीपासून उपलब्ध असल्यास दोन्ही टेबल डिलिट करू. |
12.16 | टेबल्स डिलिट करण्यासाठी Counselor टेबलवर राईट क्लिक करा. |
12.21 | Delete निवडा. |
12.24 | Confirm Object table Deletion डायलॉग बॉक्समधे Yes क्लिक करा . |
12.31 | हेच Subject टेबलसाठीही करा. |
12.38 | तुमच्या सिस्टीमवरील उपलब्ध असलेली SQL क्वेरीची फाईल उघडा. |
12.43 | File मेनूतील Open Fileनिवडा. |
12.48 | फाईल असलेले लोकेशन ब्राऊज करा. |
12.54 | स्क्रिप्ट आपोआपSQL एडिटरमधे उघडेल. |
12.59 | mynewdatabase साठी कनेक्शन सिलेक्ट केल्याची खात्री करा. |
13.03 | हे एडिटरच्या वरच्या भागात असलेल्या टूलबारमधील कनेक्शनच्या ड्रॉपडाऊनमधे तपासा. |
13.13 | टास्कबारमधील Run SQL बटण दाबा. |
13.17 | आणि सिलेक्ट केलेल्या डेटाबेसवर स्क्रिप्ट कार्यान्वित झाले आहे. |
13.22 | mynewdatabase कनेक्शन नोडवर राईट क्लिक करून Refresh दाबा. |
13.28 | हे दिलेल्या डेटाबेस घटकाची चालू स्थिती अपडेट करेल. |
13.34 | आता ह्यापैकी कुठल्याही टेबलवर राईट क्लिक करून View Data निवडा. |
13.41 | आणि वर्कस्पेसमधे खाली नव्या टेबल्समधे असलेला डेटा दिसेल. |
13.52 | या पाठात शिकलो, |
13.54 | संगणकावर MySQL कॉनफिगर करणे. |
13.57 | IDE मधून डेटाबेस सर्व्हरशी कनेक्शन सेट अप करणे. |
14.02 | डेटा बनवणे, डिलिट आणि मॉडिफाय करणे. |
14.06 | SQL क्वेरीज कार्यान्वित करणे. |
14.10 | असाईनमेंट म्हणून, |
14.11 | टेबल्स असलेला आणखी एक डेटाबेस इन्स्टन्स बनवा. |
14.15 | तुमच्या पुस्तकांच्या लायब्ररीची देखभाल करण्यासाठी टेबल्समधे आवश्यक डेटा समाविष्ट करा. |
14.21 | डेटा बघण्यासाठी SQL स्टेटमेंटस कार्यान्वित करा. |
14.29 | आपण अशाचप्रकारचा डेटाबेस बनवला आहे. ज्यात मुव्ही लायब्ररीची माहिती संचित केली आहे. |
14.37 | तुमची असाईनमेंट अशी दिसायला हवी. |
14.44 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
14.48 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
14.51 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
14.56 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
15.01 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
15.04 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
15.10 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
15.15 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15.20 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
15.27 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
15.30 | सहभागासाठी धन्यवाद . |