Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/Sending-Email-Part-1/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 221: Line 221:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:45  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 5:45  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद.5:50
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Revision as of 12:27, 21 November 2013

Title of script: Sending-Email-Part-1

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Visual Clue
Narration
0:00 नमस्कार. आपण email script कशी बनवायची ते शिकणार आहोत. विशेषतः युजरला वेबसाईटवर रजिस्टर करताना.
0:12 युजर रजिस्टर झाला आहे हे कळवणारा email कसा पाठवायचा? "Send me an email" ही स्क्रिप्ट बनवून हे करू.
0:24 हा HTML फॉर्म असेल ज्यामधे आपण विषय आणि मेसेज लिहू शकतो आणि दिलेल्या address वर पाठवू शकतो.
0:34 त्यासाठी address व्हेरिएबल बनवू.
0:39 मी येथे माझा "hotmail" address टाईप करत आहे.
0:48 मी माझे "hotmail" पेज उघडत आहे "Inbox" वर क्लिक केल्यावर माझ्याकडून काहीही ईमेल नाही हे दिसेल.
0:55 ह्याक्षणी कोणताही नवीन ईमेल नाही.
1:05 हा address माझ्या address व्हेरिएबलमधे आहे. त्याला "to" नावाने रिनेम करू.
1:13 हे पाठवण्यासाठी मेल फंक्शनचा वापर करू.
1:17 येथे from आणि subject असेल.
1:21 "Email from PHPAcademy" हा ठरवलेला सब्जेक्ट असेल .
1:32 सबमिट करण्यासाठी HTML फॉर्म हवा आहे. मी एक self submission फॉर्म बनविणार आहे.
1:39 येथे काही html code लिहू. "send me an email dot php" सहित हा फॉर्म पेजवर सबमिट होईल.
1:54 आपली मेथड POST ही असणार आहे.
1:59 येथे फॉर्मचा शेवट करू.
2:02 युजर येथे दिलेल्या email address वर काहीही लिहून पाठवू शकतात.
2:10 तुम्ही यास अकाउंट मधून घेऊ शकता, फॉर्म बनवताना तुम्ही सांगू शकता की तुम्हाला या विशिष्ट addressला मेल पाठवायचा आहे.
2:18 हे आपले "send me an email" script आहे. तुमच्या वेबसाईटवर हा इमेल ठेवलेला असेल.
2:27 आता आपण "text" इनपुट लिहू.
2:31 हे मला इमेल पाठविणा-या व्यक्तीचे नाव असेल.
2:34 आपल्याकडे "name" नावाचे आणि "text" टाईपचे इनपुट आहे.
2:39 आपण "max length" आत्तासाठी 20 घेत आहोत.
2:45 याच्याखाली आपण text area बनवू.
2:49 येथे "textarea" टाईप करून तो असा बंद करा.
2:53 त्याला "message" असे नाव द्या.
2:59 येथे पॅराग्राफची सुरूवात आणि येथे शेवट करू.
3:04 येथे खाली submit बटण बनवू. ज्याची व्हॅल्यू असेल "Send"
3:14 किंवा... "Send me this"
3:17 जर येथे येऊन आपण हे पेज निवडले,
3:21 ही नावासाठी आणि ही मेसेजसाठी दिलेली जागा आहे.
3:25 येथे "Name:" आणि येथे "Message:" असे लिहू.
3:31 आता हे नीट दिसत आहे. आपल्याकडे name box आणि message box आहे.
3:38 ह्या बटणावर क्लिक केल्यावर email पाठवला जाईल.
3:44 प्रथम आपण php कोडमधे हे सबमिट बटण प्रेस झाले आहे का ते तपासू.
3:53 त्यासाठी "if" स्टेटमेंट कंसात आहे आणि कंडिशन TRUE असेल तर काय करायचे ते ह्या curly brackets मधे असेल.
4:01 आपली कंडिशन ह्या कंसात असेल.
4:05 सबमिट बटणाचे पोस्ट व्हेरिएबल ही आपली कंडिशन असेल.
4:15 जोपर्यंत सबमिट बटणाला व्हॅल्यू आहे. येथे स्पेलिंग चुकले आहे.
4:19 सबमिट बटण दाबल्यावर त्याच्याकडे "Send me this" ही व्हॅल्यू असेल.
4:30 याचाच अर्थ फॉर्म सबमिट झाला आहे कारण बटण दाबले गेले आहे.
4:37 आता येथे आतमधे फॉर्ममधील डेटा घ्यायचा आहे.
4:44 तो म्हणजे फॉर्म सबमिट केल्यावर इमेल पाठविणा-या व्यक्तीचे नाव.
4:49 आणि ते नाव ह्या फिल्डमधे आहे. ज्याचे नाव "name" आहे.
4:56 तसेच आपल्याकडे मेसेज आहे. ही व्हेरिएबलची रचना आपण पुन्हा सहज बनवू शकतो. आणि येथे मेसेज लिहू.
5:08 हे तपासण्यासाठी आपण नेम एको करू.
5:12 आणि मेसेज त्यामधे concatenate करू.
5:17 हे तपासून पाहू. येथे "Alex" टाईप करा.
5:21 आणि येथे "Hi there!" टाईप करा.
5:23 "Send me this" क्लिक केल्यावर "Alex" आणि "Hi there!" मिळेल.
5:28 आपला फॉर्म डेटा योग्यप्रकारे सबमिट झाला आहे.
5:33 पुढील भागात हे validate करणे आणि हा मेल दिलेल्या email-id वर युजरला कसा पाठवायचा ते पाहू.
5:42 पुढच्या पाठात भेटू.
5:45 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble