Difference between revisions of "QGIS/C2/Installation-of-QGIS/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border=1 ||'''Time''' ||'''Narration''' |- ||00:01 ||QGIS च्या इंस्टॉलेशनवरील स्पोकन ट्युटोरियलमध...")
 
 
Line 8: Line 8:
 
|-
 
|-
 
||00:07
 
||00:07
||या ट्युटोरियलमध्ये आपण  क्यूजीआयएस उबंटू लिनक्स ,
+
||या ट्युटोरियलमध्ये आपण  क्यूजीआयएस हे उबंटू लिनक्स ,
  
 
|-
 
|-

Latest revision as of 15:40, 26 January 2022

Time Narration
00:01 QGIS च्या इंस्टॉलेशनवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण क्यूजीआयएस हे उबंटू लिनक्स ,
00:15 विंडोज आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टम वरती इन्स्टॉल करायला शिकू,
00:20 इंस्टॉलेशनसाठी, मी वापरत आहे, उबंटू लिनक्स व्हर्जन 16.04
00:28 विंडोज १०
00:30 Mac OS X 10.10 आणि
00:33 कार्यरत इंटरनेट कनेक्शन.
00:36 Ctrl, Alt आणि T की एकाच वेळी दाबून टर्मिनल उघडा.
00:43 प्रॉम्प्टवर, sudo space su टाइप करा आणि एंटर दाबा.
00:52 एक संदेश दिसेल जो तुम्हाला तुमचा सिस्टम पासवर्ड एंटर करण्यास सूचित करतो.
00:58 पासवर्ड टाइप करा आणि एंटर दाबा.
01:02 आता आपल्याला इंस्टॉलेशनसाठी काही कमांडस कार्यान्वित करायच्या आहेत.
01:08 येथे माझ्याकडे आवश्यक कमांडसची सूची असलेली फाइल आहे.
01:13 ही फाइल कोड फाइलस लिंकमध्ये QGIS इंस्टॉलेशन रिपॉझिटरीज नावाने प्रदान केली आहे.
01:21 आता sources.list फाइलमध्ये QGIS रेपॉजिटरीज जोडू.
01:28 खालील कमांड कॉपी करा. कॉपी करण्यासाठी Ctrl C वापरा.
01:34 टर्मिनल प्रॉम्प्टवर, राइट -क्लिक करा आणि पेस्ट निवडा.

आणि एंटर दाबा.

01:43 Gedit editor sources.list फाइलसह उघडेल.
01:48 QGIS इंस्टॉलेशन रिपॉझिटरीज फाइलवर परत जा.
01:53 आता Sources.list फाइलच्या शेवटी येथे हायलाइट केलेल्या दोन ओळी add करा .
02:00 येथे दर्शविलेल्या दोन ओळी कॉपी करा.
02:04 Sources.list फाइलच्या शेवटी पेस्ट करा.
02:09 फाइल सेव्ह करण्यासाठी Ctrl S दाबा.
02:13 आता तुमच्या विंडोच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात क्रॉसवर क्लिक करून ही फाईल बंद करा.
02:20 टर्मिनल प्रॉम्प्टवर, sudo space apt-get space update टाइप करा आणि एंटर दाबा.
02:32 या प्रक्रियेला काही वेळ लागू शकतो. अपडेट आता पूर्ण झाले आहे.
02:39 या टप्प्यावर आपल्याला आणखी काही कमांडस कार्यान्वित करायच्या आहेत.
02:44 चला QGIS इंस्टॉलेशन रेपॉजिटरीज फाइलवर परत जाऊ या.
02:49 खालील तीन कमांडस येथे दाखवल्या आहेत.
02:53 आपण त्यांना एकामागून एक कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
02:57 एका वेळी एक कमांड कॉपी करा आणि टर्मिनलमध्ये पेस्ट करा.
03:03 प्रॉम्प्टवर प्रत्येक कमांड पेस्ट केल्यानंतर एंटर दाबा.
03:27 तिसर्‍या कमांडची अंमलबजावणी केल्यानंतर, तुम्हाला ओके मेसेज दिसेल.
03:32 आता क्यूजीआयएस इन्स्टॉलेशन रेपॉजिटरीज फाइलमधून शेवटची कमांड कार्यान्वित करा.

खालील कमांड कॉपी करा.

03:41 ते टर्मिनल प्रॉम्प्टवर पेस्ट करा आणि एंटर दाबा.
03:47 सुरू ठेवण्यासाठी Y दाबा आणि एंटर दाबा.
03:53 या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल.
03:57 इंस्टॉलेशन आता पूर्ण झाली आहे.
04:01 तुमच्या कीबोर्डवरील विंडोज की दाबा आणि सर्च बारमध्ये QGIS टाइप करा.
04:09 तुम्ही QGIS डेस्कटॉप अॅप्लिकेशन पाहू शकाल.

QGIS उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.

04:18 हा QGIS इंटरफेस आहे.
04:22 आता विंडोजवरील QGIS इंस्टॉलेशनकडे वळू.
04:27 QGIS इंस्टॉलेशन रिपॉझिटरीज फाइलवर परत जा. खालील लिंक कॉपी करा.
04:35 तुमच्या सिस्टममध्ये कोणताही वेब ब्राउझर उघडा. मी Chrome उघडत आहे.
04:42 कॉपी केलेली लिंक वेब ब्राउझरमध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा.
04:49 या त्रुटी संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि ओके वर क्लिक करा.
04:55   Long term release repository most stable विभागापर्यंत खाली स्क्रोल करा.
05:01 तुमच्या सिस्टमनुसार 64 बिट किंवा 32 बिट यांच्यातील योग्य सेटअप निवडा.
05:09 संबंधित सेटअप फाइलच्या डाव्या बाजूला दिलेल्या डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा.
05:16 तुमच्या इंटरनेट गतीनुसार , इंस्टॉलर फाइल डाउनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल.
05:23 मी ही सेटअप फाइल आधीच डाउनलोड केली आहे आणि ती डाउनलोडस फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे.
05:30 आता डाउनलोडस फोल्डरवर नेव्हिगेट करू.
05:34 टास्क बारवर उपलब्ध असलेल्या सर्च बॉक्समध्ये, डाउनलोडस टाइप करा.
05:40 डाउनलोडस पर्यायावर क्लिक करा.
05:43 डाउनलोडस फोल्डर उघडेल.
05:46 QGIS इंस्टॉलर फाइल शोधा.
05:50 इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
05:55 तुमच्या सिस्टमवर एक डायलॉग बॉक्स उघडेल.

पुढे जाण्यासाठी येस वर क्लिक करा.

06:02 इंस्टॉलेशन विझार्ड उघडतो.
06:05 सूचना वाचा आणि Next बटणावर क्लिक करा.
06:10 सॉफ्टवेअर लायसन्स अग्ग्रेमेन्ट पेज मध्ये, आय अग्री बटणावर क्लिक करा.
06:16 सॉफ्टवेअर कुठे इंस्टॉल करायचे ते निवडा, खात्री नसल्यास डीफॉल्ट स्थान तसेच ठेवा.
06:24 तुम्हाला इंस्टॉलेशनसाठी कोणतेही अतिरिक्त घटक निवडण्याची गरज नाही, फक्त QGIS सह पुढे जा.
06:32 इंस्टॉल बटणावर क्लिक करा.
06:35 इंस्टॉलेशनला थोडा वेळ लागेल.
06:40 एकदा पूर्ण झाल्यावर, इंस्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी फिनिश बटणावर क्लिक करा.

QGIS आता तुमच्या सिस्टमवर इंस्टॉल केले जाईल.

06:51 टास्कबारवर उपलब्ध असलेल्या सर्च बॉक्समध्ये, QGIS टाइप करा.
06:57 सूचीमध्ये, तुम्ही QGIS डेस्कटॉप अॅप्लिकेशन पाहू शकाल.
07:04 QGIS उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
07:09 हा QGIS इंटरफेस आहे.
07:13 आता Mac OS वरील QGIS इंस्टॉलेशनकडे वळू.
07:19 आपण आधी उघडलेल्या QGIS डाउनलोड वेब पेजवर परत जा.
07:25 Mac OS X टॅबसाठी डाउनलोड उघडा.
07:29 Long term release most stable विभागापर्यंत खाली स्क्रोल करा.
07:34 संबंधित सेटअप फाइलच्या डाव्या बाजूला दिलेल्या डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा.
07:40 एक डायलॉग बॉक्स उघडतो.
07:43 डीफॉल्ट फाइलचे नाव बदलू नये.
07:47 ही फाइल सेव्ह करण्यासाठी एक स्थान म्हणून डाउनलोडस फोल्डर निवडा.
07:52 सेव्ह बटणावर क्लिक करा.
07:55 तुमच्या इंटरनेट गतीनुसार, इंस्टॉलर फाइल डाउनलोड होण्यास थोडा वेळ लागेल.
08:02 मी ही सेटअप फाइल आधीच डाउनलोडस केली आहे आणि ती डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे.
08:08 आता डाउनलोडस फोल्डरवर नेव्हिगेट करू.
08:12 स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या search चिन्हावर क्लिक करा.
08:18 डाउनलोडस टाइप करा, डाउनलोडस फोल्डर पर्यायावर डबल-क्लिक करा.
08:25 QGIS इंस्टॉलर फाइल शोधा, इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
08:33 अनेक फाइल्ससह सेटअप फोल्डर उघडते.
08:37 चार पॅकेजेस आहेत, प्रत्येक क्रमांकाने सुरू होतो.
08:42 हे तुम्हाला पॅकेजेस इंस्टॉल करण्याचा क्रम सांगते.
08:46 नॉन-ऍपल डेव्हलपर मान्यताप्राप्त सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन करण्याची परवानगी देण्यासाठी,प्रथम Mac Security Preferences बदलून allow apps downloaded from: Anywhere करा.
08:58 स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या  search icon वर क्लिक करा. System Preferences टाइप करा आणि एंटर दाबा.
09:09 system Preferenceसह विंडो उघडेल.
09:13 Security & Privacy वर क्लिक करा.
09:17 Security & Privacy विंडोमधून, General टॅबमध्ये. बदलांना अनुमती देण्यासाठी तळाशी-डाव्या कोपर्‍यातील लॉक चिन्हावर क्लिक करा.
09:28 डायलॉग बॉक्समध्ये तुमचा सिस्टम पासवर्ड एंटर करा.
09:32 त्यानंतर अनलॉक बटणावर क्लिक करा.
09:35   Allow apps downloaded from विभागामध्ये, Anywhere रेडिओ बटणावर क्लिक करा.
09:42 डायलॉग बॉक्स उघडेल, Allow from anywhere बटणावर क्लिक करा.
09:49 सेटिंग्ज लॉक करण्यासाठी तळाशी-डाव्या कोपर्यात उघडलेल्या लॉक चिन्हावर क्लिक करा.
09:55 विंडो बंद करा.
09:57 आता सेटअप फोल्डरवर जा आणि पॅकेज क्रमांक 1 वर डबल क्लिक करा.
10:03 या इंस्टॉलेशन विझार्डमधील सूचना फॉलो करा आणि पॅकेज इंस्टॉल करा.
10:09 Continue वर क्लिक करा.
10:12 दिलेल्या महत्त्वाच्या सूचना वाचा आणि Continue वर क्लिक करा.
10:17 license agreement वाचा आणि Continue वर क्लिक करा.
10:22 उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील Agree बटणावर क्लिक करून software license agreement मान्य करा.
10:30 इंस्टॉल वर क्लिक करा.
10:33 उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये सिस्टम पासवर्ड टाइप करा.
10:38 आणि इंस्टॉल सॉफ्टवेअर बटणावर क्लिक करा.
10:45 इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर,Close बटणावर क्लिक करा.
10:50 पॅकेज क्रमांक 2,3 आणि 4 साठी ही प्रक्रिया पुन्हा करा.
11:19 एकदा सर्व चार पॅकेजेसचे इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तुमच्या सिस्टमवर QGIS इंस्टॉल केले जाईल.
11:27 search चिन्हावर क्लिक करा. QGIS टाइप करा.
11:33 QGIS लाँच करण्यासाठी QGIS ऍप्लिकेशनवर डबल-क्लिक करा.
11:39 येथे QGIS इंटरफेस आहे.
11:43 इंटरफेस आणि वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती आगामी ट्यूटोरियलमध्ये समाविष्ट केली जाईल.
11:51 चला थोडक्यात बघू . या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो:
11:57 QGIS व्हर्जन 2.18 चे इंस्टॉलेशन Ubuntu Linux  व्हर्जन 16.04, Windows 10 आणि Mac OS X 10.10 वरती
12:11 असाइनमेंट म्हणून,

तुमच्या मशीनवर QGIS इंस्टॉल करा.

12:17 QGIS इंटरफेस उघडा आणि एक्सप्लोर करा.
12:21 मेनू आणि टूलबारमधून जा.
12:25 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.

कृपया डाउनलोड करून पहा.

12:34 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, कार्यशाळा आयोजित करते आणि आमच्या ऑनलाइन चाचण्या उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र देते.

तपशीलांसाठी, कृपया आम्हाला लिहा.

12:48 या स्पोकन ट्युटोरियलमध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या वेबसाइटला भेट द्या.

12:55 तुम्हाला जिथे प्रश्न असेल तो मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. आमच्या टीम मधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.

13:07 स्पोकन ट्युटोरियल फोरम या ट्युटोरियलमधील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
13:13 कृपया त्यावर असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.

हे गोंधळ कमी करण्यास मदत करेल.

13:21 कमी गोंधळासह, आम्ही या चर्चांचा उपदेशात्मक साहित्य म्हणून वापर करू शकतो.
13:27 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट NMEICT, MHRD, भारत सरकार द्वारे निधी दिला जातो.

या मिशनच्या तपशीलांसाठी, दर्शविलेल्या लिंकला भेट द्या.

13:40 आयआयटी बॉम्बे मधून मी राधिका आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Radhika