Difference between revisions of "Synfig/C3/Basic-bone-animation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 277: Line 277:
 
|-
 
|-
 
| 07:06
 
| 07:06
| शेवटी, '''Turn on animate editing mode''' आयकॉनवर क्लिक करा.
+
| शेवटी, '''Turn off animate editing mode''' आयकॉनवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 13:34, 6 November 2020

Time
Narration
00:01 Synfig वापरून “Basic bone animation” वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये Skeleton पर्याय वापरून एका कॅरक्टरला एनिमेट करणे शिकणार आहोत.
00:13 आपण हे देखील शिकू : बोन्स शरीरात टाकणे,
00:17 शरीराशी बोन्स जोडणे आणि बोन्स एनिमेट करणे.
00:22 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS,
00:31 Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:36 आता आपण सुरवात करूया. आपण Synfig मध्ये आहोत.
00:40 मी Synfig-character फाईल उघडेल जी माझ्या मशीनवर सेव्ह केली आहे.
00:47 ही फाईल तुम्हाला Code Files लिंक मध्ये दिली आहे. कृपया डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा.
00:57 शरीराच्या सर्व भागांमध्ये विविध layers आहेत याची खात्री करा.
01:02 Skeleton वापरून सांधे निश्चित करून शरीराच्या वरच्या भागाला रीग करणे शिकू.
01:11 त्यापूर्वी आपल्याला ग्रुप्स तयार करावे लागतील. उदाहरणार्थ – डावा हात हा, डावी वरची बाही, डावी खालची बाही आणि डाव्या तळहाताने बनलेला असावा.
01:25 तर, आपल्याला या तीन लेअर्सना (स्तरांना) ग्रुप करणे आणि त्यास L-hand असे नावे देणे गरजेचे आहे.
01:32 त्याचप्रमाणे, इतर लेअर्स (स्तर) ग्रुप करा.
01:36 येथे दाखवल्याप्रमाणे group layers ना L-hand, R-hand, Head, Neck आणि Trunk असे नाव द्या.
01:46 Save As पर्याय वापरून ही फाईल सेव्ह करू.
01:50 File वर जा आणि Save As वर क्लिक करा.
01:54 तुमच्या पसंतीचे लोकेशन निवडा आणि नंतर फाईलचे नाव Basic hyphen bone hyphen animation म्हणून टाईप करा.
02:03 नंतर Save बटणवर क्लिक करा.
02:06 आता Layers panel वर जा.
02:10 या सर्व ग्रुप केलेल्या लेअर्सचे आणखी एक ग्रुप बनवा आणि त्यास Character असे नाव द्या.
02:17 आता, त्रिकोणी आकारावर क्लिक करून Character ग्रुप उघडा.
02:23 Character layer च्या सर्वात वरच्या लेअरवर राईट क्लिक करा.
02:27 New layer वर जा, नंतर Other आणि Skeleton वर क्लिक करा.
02:33 आपल्याला कॅनव्हसवर एक bone मिळतो.
02:37 Transform tool वर क्लिक करा आणि bone चा हिरवा बिंदू निवडा.
02:42 माउसला धरून ड्रॅग करा आणि कॅरेक्टरच्या Trunk भागावर bone हलवा.
02:49 आता bone दर्शविल्याप्रमाणे ठेवा.
02:53 पुढे, bone च्या लांबीला समायोजित करण्यासाठी bone चा नारंगी बिंदू वापरा.
03:00 यानंतर, bone च्या नारंगी बिंदूवर राईट क्लिक करा.
03:04 आणि नंतर Create child bone पर्याय वर क्लिक करा.
03:10 आधी सांगितल्याप्रमाणे Trunk च्या वरील भागामध्ये child bone ची लांबी समायोजित करा.
03:17 अशाच प्रकारे, मान, डोके आणि हातांसाठी bones जोडा आणि समायोजित करा.
03:41 आता Skeleton layer शरीराच्या आत ठेवले आहे.
03:45 पुढे, आपण bones शरीराच्या प्रत्येक भागावर जोडू.
03:50 त्यासाठी Layers panel वर जा, R-upper-arm layer वर राईट क्लिक करा आणि नंतर Select all child layers वर क्लिक करा.
04:00 कॅनव्हसवर जा. शिफ्ट की वापरून, उजवी वरची बाहीच्या सर्व 'नोड्स' निवडण्यासाठी माऊसला धरून ड्रॅग करा.
04:11 Ctrl की दाबा आणि नंतर Skeleton layer निवडा.
04:18 R-upper-arm च्या bone च्या कोणत्याही नोडवर राईट क्लिक करा.
04:23 Link to bone पर्यायवर क्लिक करा.
04:28 त्याचप्रमाणे, आपल्याला Link to bone वापरून शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या bone ला जोडावे लागते.
04:50 शरीराच्या प्रत्येक भागास Skeleton जुडणे आवश्यक आहे.
04:56 तेव्हाच आपण शरीराच्या सर्व भागांना bones वापरुन ऍनिमेट करू शकतो.
05:02 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा.
05:06 आता आपण एनिमेट करायला सुरवात करू.
05:09 Layers panel वर जा आणि Skeleton layer निवडा.
05:13 Turn on the animate editing mode आयकॉन वर क्लिक करा.
05:16 Time track panel वर जा आणि cursor 20th फ्रेमवर ठेवा.
05:22 विविध रंगीत ठिपके(बिंदू) पहा.
05:25 निळा बिंदू रोटेशनसाठी आहे.
05:27 नारंगी बिंदू स्केलिंगसाठी आहे.
05:30 आणि हिरवा बिंदू Skeleton मध्ये विस्थापनासाठी आहे.
05:35 कॅनव्हसवर जाऊ.
05:38 bone चा निळा बिंदू निवडा, जो उजव्या हाताच्या खालच्या बाहीच्या भागात आहे.
05:44 दर्शविल्याप्रमाणे निळा बिंदूला हलवून खालची बाही bone ला हलवा.
05:49 Time track panel वर जा आणि कर्सर 32nd फ्रेमवर ठेवा.
05:56 कॅनव्हसवर परत जा आणि खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा.
06:02 पुन्हा Time track panel वर जा आणि कर्सर 48th फ्रेमवर ठेवा.
06:09 कॅनव्हसवर परत जा आणि खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा.
06:15 पुढे, त्याच फ्रेमवर तळहाताच्या bone चा निळा बिंदू निवडा.
06:21 नंतर तळहात bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा.
06:25 पुन्हा एकदा Time track panel वर जा आणि कर्सर 63rd फ्रेमवर ठेवा.
06:34 कॅनव्हसवर परत जा आणि खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा.
06:40 त्याच प्रकारे आपण L-hand एनिमेट करू.
06:43 कॅनव्हसवर परत जा आणि डाव्या हाताची खालची बाही bone चा निळा बिंदू निवडा.
06:50 Time track panel वर जा आणि cursor 20th फ्रेमवर ठेवा.
06:56 Canvas वर जा.
06:59 निळ्या बिंदूला ड्रॅग करा आणि डाव्या हाताची खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा.
07:06 शेवटी, Turn off animate editing mode आयकॉनवर क्लिक करा.
07:11 कॅनव्हसच्या तळाशी Seek to begin वर क्लिक करा.
07:15 Play बटणावर क्लिक करून एनिमेशन प्ले करा.
07:28 पुन्हा एकदा, फाईल सेव्ह करा.
07:31 आता आपण preview तपासू.
07:36 File वर जा आणि नंतर Preview वर क्लिक करा.
07:40 Quality 0.5 वर आणि Frame per second 24 वर सेट करा.
07:45 Preview बटणवर क्लिक करा आणि नंतर Play बटणवर क्लिक करा.
07:51 आपण स्क्रीनवर एनिमेशनचे पूर्वावलोकन पाहू शकतो.
07:56 Preview window बंद करू.
07:58 आता, एनिमेशन रेंडर करू.
08:02 हे करण्यासाठी File वर क्लिक करा आणि नंतर Render वर क्लिक करा.
08:08 Render setting विंडोवर जा.
08:10 Choose वर क्लिक करा आणि Save render as विंडो उघडा.
08:15 फाईल सेव्ह करण्यासाठी लोकेशन(स्थान) निवडा. मी Desktop निवडत आहे.
08:21 फाईलचे नाव Basic hyphen bone hyphen animation dot avi मध्ये बदला.
08:27 Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि ffmpeg म्हणून एक्सटेंशन निवडा.
08:35 Time टॅबवर क्लिक करा आणि End time 70 मध्ये बदला.
08:40 शेवटी, Render वर क्लिक करा.
08:45 आता आपले एनिमेशन तपासू.
08:48 Desktop वर जा आणि Basic-bone-animation. avi निवडा.
08:56 राईट क्लिक करा आणि Firefox web browser वापरून एनिमेशन प्ले करा.
09:03 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:10 या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये मूलभूत bone एनिमेशनबद्दल शिकलो.
09:16 आपण बोन्स जोडणे, bones ला शरीरात जोडणे आणि बोन्स एनिमेट करणे देखील शिकलो.
09:24 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
09:26 तुम्हाला Code files लिंकमध्ये दिलेली Synfig फाइल उघडा.
09:31 bones जोडा आणि हात एनिमेट करा.
09:35 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
09:40 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते पहा.
09:47 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

09:55 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
09:59 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:06 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Arthi, Ranjana