Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Football-hold-for-breastfeeding/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{| border=1 | Time | Narration |- |00:01 |स्तनपानासाठी '''Football''' स्थिती या वरील स्पोकन ट्युटोर...") |
|||
Line 425: | Line 425: | ||
|- | |- | ||
− | | 10: | + | | 10:56 |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
| आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | + | |- | |
|} | |} |
Latest revision as of 12:59, 14 August 2020
Time | Narration |
00:01 | स्तनपानासाठी Football स्थिती या वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत- आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे. |
00:15 | स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि Football स्थिती साठी संपूर्ण कार्य पद्धती. |
00:23 | आता सुरवात करूया. |
00:24 | जगभरात, सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असतांना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात. |
00:31 | मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती
ती आहे ज्यामध्ये- |
00:41 | आई आणि बाळ दोघांसाठीहि स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल. |
00:48 | बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल. आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल. |
00:56 | आता Football होल्ड ह्या स्थिती बद्दल जाणून घेऊ. |
01:01 | Football स्थिती खासकरून त्या आईंसाठी उपयोगी आहे: ज्यांची प्रसूती सी-सेक्शन द्वारे झाली आहे. |
01:08 | ज्यांचे स्तन मोठे आहेत. |
01:10 | ज्यांचे बाळ लहान किंवा योग्य वेळेपूर्वी जन्मलेले आहेत. |
01:14 | किंवा ज्यांचे जुळे बाळ आहेत. |
01:15 | नेहमी लक्ष्यात ठेवा आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी स्वतःचे हाथ स्वछ धुवून सुकुवून घ्यावेत. |
01:22 | मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे |
01:27 | स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिली लिटर दूध बनते. |
01:34 | म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. |
01:38 | आता आईने स्तनपान करतांना कसे बसावे ह्या वर चर्चा करू. |
01:43 | आईने पलंगावर किंवा फरशीवर मांडी घालून बसावे |
01:48 | किंवा खुर्ची वर बसावे पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावे. |
01:51 | जर खुर्ची इतक्या उंचीवर असेल कि तिचे पाय फरशीवर टेकत नसतील तर ती एक छोटे टेबल किंवा उशी फरशीवर ठेवून त्यावर आपले पाय टेकवू शकते. |
02:02 | बसताना तिने पुढील गोष्टी खात्री करून घाव्यात - बसताना तिची पाठ सरळ असावी जेणेकरून तिला पाठ दुखी होणार नाही |
02:09 | तिचे खांदे आरामशीर असावेत वर केलेले किंवा झुकलेले नसावे. |
02:13 | आणि हि आरामदायी स्थिती स्तनपान संपे पर्यंत अशीच ठेवावी. |
02:19 | आईने ३ ते ४ उश्या त्या स्तनाच्या बाजूस ठेवावेत ज्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे आहे. |
02:26 | सर्वात वरची उशी इतर उश्यांपेक्षा आणि आईच्या मांडी वर तिरपे ठेवावी. |
02:32 | मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान करायचे आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे. |
02:38 | आईने कपडे काढतांना खात्री करून घ्यावी कि तिच्या ब्लॉउज किंवा ब्रा मुळे स्तनांवर दबाव येऊ नये. |
02:45 | व्यवस्थित बसल्यानंतर, बाळाला आईजवळ आणावे. |
02:49 | आईने बाळाची पाठ उश्यांवर ठेवली पाहिजे. |
02:53 | तिने आपल्या बाळाच्या डोक्याला त्याच बाजूच्या हाथाने पकडले पाहिजे ज्या बाजूच्या स्तनातून तिला स्तनपान करावयाचे असेल. |
03:01 | बाळाचे पाय उश्यांवर त्याच हाताच्या काखेतून ठेवले पाहिजे. |
03:08 | आईने या हाताने आणि तिच्या बाळाचे पाय उश्यांवर सरळ ठेवावे. |
03:13 | या चित्रात आई आपल्या उजव्या स्तनातून आपल्या बाळाला दूध पाजेल. |
03:18 | म्हणून, बाळाचे पाय आईच्या उजव्या काखेतून बाहेर जातील. |
03:23 | आपल्या बाळाच्या डोक्याच्या खालील भागाला पकडण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि बोटांचे वापर करीत आहे. |
03:31 | लक्ष्यात ठेवा, आईने तिची पाठ वाकवून स्तनाला बाळाजवळ कधीही आणू नये. |
03:37 | यामुळे तिला त्रास होऊन पाठदुखी होईल. |
03:42 | नेहमी तिने तिची पाठ सरळ ठेवावी आणि बाळाला वर उचलून स्तनापर्यंत आणावे. |
03:48 | पुढे आपण बाळाच्या डोक्याला पकडण्यासाठी, आईच्या अंगठ्याची आणि बोटांची योग्य स्थिती पाहूया. |
03:56 | आईचा अंगठा बाळाच्या एका कानामागे आणि बाकीची बोटे दुसऱ्या कानामागे असावी. |
04:03 | तिने तिची बोटे व अंगठा बाळाच्या कानामागून हलवून माने पर्यंत आणू नये. |
04:09 | तिची मनगट बाळाच्या खांद्यांमध्ये असावे. |
04:13 | आईने बाळाच्या डोक्याच्या मागच्या बाजूस हाताने दाबू नये. यामुळे स्तनपान करताना बाळाला आरामदायी वाटणार नाही |
04:23 | पुढे आपण शिकू बाळाच्या शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती. |
04:27 | बाळाचा चेहरा आईच्या चेहेर्या समोर असला पाहिजे. |
04:31 | आईच्या शरीरावर बाळाच्या पोटामुळे थोडासा दबाव पडला पाहिजे. |
04:36 | जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील. |
04:41 | आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल. |
04:47 | बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे बाळाच्या शरीराची संरेखना. |
04:51 | जेव्हा आपण अन्न खातो, आपल डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते. |
04:57 | त्याच प्रमाणे- स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे. |
05:06 | यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल. |
05:10 | आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये तिसऱ्या मुद्यावर आलो आहोत. |
05:16 | आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा. |
05:22 | नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घावी लागेल. |
05:30 | पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू. |
05:34 | बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत. |
05:39 | आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी. |
05:44 | यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल. आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल. |
05:55 | कृपया लक्षात घ्या- Areola हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे. |
06:00 | आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्या नंतर, चला आपण शिकूया स्तनाला कसे पकडावे. |
06:07 | दुसऱ्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून C आकारात पकडावे. |
06:15 | या चित्रामध्ये आई तिच्या डाव्या हाताने उजवे स्तन पकडेल. |
06:21 | अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी- कल्पना करा कि आईच्या उजव्या स्तनावर एक घड्याळ आहे ज्याच्या मध्य भागी निप्पल आहे. |
06:30 | आईने तिचा डावा अंगठा या घडाळ्यावरील 12’O या अंकावर ठेवावा. |
06:35 | आणि अंगट्याच्या बाजूची दोन बोटे 6’O या अंकावर ठेवावीत. |
06:42 | आईची बोटे नेहमी बाळाच्या ओठांच्या दिशेने असावेत. |
06:47 | असे का? हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया. |
06:52 | जेव्हा आपण वडा पाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो. |
06:58 | आपण वडा पाव किंवा बर्गर आडवे पकडतो जेणेकरून आपण मोठ्ठा घास घेऊ शकू. |
07:03 | इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत. |
07:10 | जर आपण वडा पाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठ्ठा घास घेऊ शकणार नाही. |
07:16 | तसचे, इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशे कडे पाहुयात. |
07:21 | इथे त्याचे ओठ आडवे उघडलेले आहे. |
07:24 | म्हणून आईची बोटे आणि अंगठा स्तनावर आडवे ठेवणे गरजेचे आहे. |
07:32 | यामुळे बाळाला एरीओलाचा मोठ्ठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल. |
07:39 | बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पल पासून ३ बोटे अंतरावर असावी. |
07:50 | पुन्हा वडा पाव किंवा बर्गर खाताना आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठ्ठा घास घेऊ शकणार नाही. |
08:00 | आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल. |
08:07 | म्हणून आपण मोठ्ठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो. |
08:13 | तसेच या चित्रात दाखविल्या प्रमाणे, बाळासाठी स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे. |
08:21 | हे अंतर खात्री करेल कि- आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठ्ठा भाग तोंडात घेता येईल. |
08:31 | आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते. |
08:36 | आई एरीओलाच्या खालील मोठ्या दुगध नलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते. |
08:42 | आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते. |
08:50 | लक्षात ठेवा - आईचा अंगठा स्थानापासून तीन बोटे अंतरावर त्या बाजूस असावे जेथे बाळाचे नाक आहे |
08:55 | चित्रात दाखवल्याप्रमाणे, तिचे २ बोटे निप्पलच्या खालील बाजूस असावे. |
09:01 | वडा पाव किंवा बर्गरच्या उदाहरणाकडे परत जाऊ. |
09:06 | वडा पाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर आपण मोठ्ठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो. |
09:12 | त्याचप्रमाणे, आईने स्तनाच्या बाजूला C आकारात पकडून हळुवार पणे दबाव द्यावा. |
09:18 | यामुले बाळाला स्तनाचा मोठ्ठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल. |
09:23 | पण लक्षात ठेवा, आईने तिचे स्तन कात्रीच्या आकारात पकडून दाबू नये. |
09:30 | कात्रीच्या आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल. |
09:36 | हे सुद्धा खात्री करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा. |
09:43 | नाहीतर निप्पल वरच्या किंवा खालच्या बाजूस सरकवून बाळाची पकड अयोग्यरीत्या होईल. |
09:51 | कधीकधी, आई आपल्या बाळाला वेगळ्या स्थितीत पकडण्यास पसंत करू शकते. |
09:56 | या चित्रात, बाळाचा चेहरा आईकडे नाहीये. |
10:00 | बाळाचं डोकं स्तनाच्या बाजूने स्तनाकडे आणावे न कि स्तनाच्या खालून. |
10:07 | इथे बाळाचे ओठ लंबकार उघडलेले आहे. म्हणून, आईला U आकाराच्या पकड मध्ये स्तनावर लंबकार स्थितीत आपली बोटे ठेवली पाहिजे. |
10:17 | लक्षात ठेवा, कोणत्याही स्तनपानाच्या स्थितीसाठी स्तनाला पकडतांना आईची बोटे आणि अंगठा नेहमी बाळाच्या ओठांच्या दिशेने असावे. |
10:28 | आता बाळ Football स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे |
10:34 | स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये स्पष्ट केली आहेत. |
10:41 | एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरित्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील तर आई स्तनावरुन तिचे हाथ काढू शकते आणि तिचे हात मोकळेहि ठेवू शकते . |
10:53 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:56 | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |