Difference between revisions of "PhET/C2/Energy-Skate-park/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Edit Suggested by Pooja Moolya)
m
Line 231: Line 231:
 
|-  
 
|-  
 
||04:52
 
||04:52
||'''Speed of skater'''.  
+
||'''Speed''' of skater.  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 15:01, 17 January 2020

Time Narration
00:01 Energy Skate Park सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत.


00:06 या पाठात आपण Energy Skate Park, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
00:14 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,

00:22 जावा वर्जन 1.7,
00:26 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.


00:32 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:40 हे सिम्युलेशन वापरून तुम्ही शिकणार आहात:

1. उर्जा अक्षय्यतेचा नियम.

00:48 2. ऊर्जेतील बदलांसाठी पाय चार्ट आणि बार ग्राफ दाखवणे.
00:53 3. ट्रॅकवरील विशिष्ट स्थानावर उर्जेचे मूल्य दर्शविण्यासाठी Energy vs Position आलेख काढणे.
01:00 4. ट्रॅकच्या स्थानातील बदलानुसार उर्जेतील बदलांचे निरीक्षण करणे.
01:04 5. वस्तुमान आणि घर्षणात बदल झाल्यामुळे उर्जेत होणारे बदल बघणे.
01:09 ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार उर्जा निर्माण केली जाऊ शकत नाही किंवा नष्टही केली जाऊ शकत नाही.
01:17 ती केवळ एका रूपातून दुसर्‍या रूपात रूपांतरित केली जाऊ शकते.
01:22 परिवर्तन होण्यापूर्वीची आणि नंतरची एकूण उर्जा तेवढीच राहते.
01:27 स्थितिज उर्जा म्हणजे पदार्थाच्या स्थानामुळे त्याला प्राप्त झालेली ऊर्जा.
01:34 ज्यात PE = mgh जेथे m म्हणजे पदार्थाचे वस्तुमान , g हे गुरुत्वाकर्षणामुळे असलेले त्वरण आणि h ही उंची आहे.
01:43 पदार्थाला असलेल्या गतीमुळे त्याला गतिज उर्जा प्राप्त होते.
01:49 KE =1/2 mv2

येथे m हे पदार्थाचे वस्तुमान आणि v म्हणजे वेग.

01:57 प्रात्यक्षिक सुरू करूया.
02:00 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.


02:04 मी Downloads फोल्डरमधे Energy skate park हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.


02:11 सिम्युलेशन सुरू करण्यासाठी टर्मिनल उघडा.


02:15 प्रॉमप्टवर टाइप करा: cd Downloads आणि एंटर दाबा.
02:23 त्यानंतर टाईप करा: java space hyphen jar space energy hyphen skate hyphen park underscore en dot jar आणि एंटर दाबा.
02:37 Energy Skate Park सिम्युलेशन उघडेल.
02:41 हा Energy skate Park सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
02:46 हे सिम्युलेशन वापरून वास्तविक जगात उर्जेचे रूपांतरण कसे होतात ते पाहू.
02:54 स्क्रीनच्या मेनूबारमधे हे मेनू आयटम्स आहेत- File,
03:00 Tracks,
03:02 Help.
03:04 स्क्रीनमधे एक PhET स्केटर डीफॉल्ट रूपात loop आंदोलने घेत आहे.
03:09 skater चा ट्रॅक बदलण्यासाठी Tracks मेनूवर क्लिक करा.
03:14 मेनू निवडण्यासाठी ट्रॅक्सची सूची दाखवेल.
03:19 उजवीकडे कंट्रोल्स असलेले पॅनेल आहे.
03:24 हे कंट्रोल्स सिम्युलेशनमधे attributes बदलण्यासाठी वापरले जातात.
03:29 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset वर क्लिक करा. रिसेट या कृतीला पुष्टी देण्यासाठी Yes वर क्लिक करा.
03:37 पॅनेलवरील Choose Skater बटणावर क्लिक करा.
03:41 Choose Skater हे पॅनेल उघडेल.
03:44 हे पॅनेल विविध स्केटर्स त्यांच्या वस्तुमानासहित दाखवत आहे.
03:49 डीफॉल्ट रूपात, 75 किलो वस्तुमान असलेला PhET Skater निवडलेला आहे.
03:55 OK बटणावर क्लिक करा.
03:58 स्क्रीनच्या खालील भागात, ऍनिमेशनचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी Sim Speed हा स्लायडर,
04:06 Play/Pause आणि Step ही बटणे,
04:10 तसेच Zoom in आणि zoom out ही बटणे आहेत.
04:13 डीफॉल्ट रूपात, Sim Speed स्लायडर fast वर आहे.
04:17 Sim speed स्लायडर slow आणि fast या पर्यायांमधे ड्रॅग करा.
04:22 मार्ग दर्शवण्यासाठी पाथ या विभागातील Show Path बटणावर क्लिक करा.
04:27 मार्गावर जांभळ्या रंगाचे ठिपके दिसतील.
04:30 Stop बटणावर क्लिक करून नंतर सिम्युलेशन पॉज करा.
04:36 मार्गावरील कुठल्याही जांभळ्या ठिपक्यावर क्लिक करा.
04:40 पुढील माहिती दाखवली जाईल:
04:44 Kinetic Energy,
04:46 Potential Enrgy,
04:48 Total Energy,
04:50 Height,
04:52 Speed of skater.
04:54 मार्ग क्लियर करण्यासाठी Clear बटणावर क्लिक करा.
04:58 सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play बटणावर क्लिक करा.
05:02 उजवीकडे पॅनेलमधे Energy Graphs या विभागाखालील Show Pie Chart या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:09 with Thermal हा चेकबॉक्सदेखील सिलेक्ट झालेला दिसेल.
05:14 Pie chart तुम्हाला गतिज उर्जेचे स्थितिज उर्जेत व उलट रूपांतरण दाखवेल.
05:20 एनर्जी इंडीकेटर बॉक्स स्क्रीनच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात दिसत आहे.
05:26 Pie Chart मधील उर्जा बदल दाखवण्यासाठी हा बॉक्स उपयोगी आहे.
05:31 या उदाहरणात स्थितिज उर्जा ही गुरूत्वीय स्थितिज उर्जा आहे.
05:36 हा बदल गुरुत्वाकर्षण क्षेत्रात स्केटरची उंची बदलण्यामुळे होत आहे.
05:41 जसजसा स्केटर खाली सरकतो तसतशी त्याची स्थितिज उर्जा कमी होते आणि गतिज उर्जा वाढते.
05:49 जसा स्केटर वर सरकेल तशी त्याची स्थितिज उर्जा वाढते आणि गतिज ऊर्जा कमी होते.
05:56 sim speed स्लायडर Slow कडे ड्रॅग करा.
06:00 ट्रॅकच्या तळाशीही तुम्हाला थोडी स्थितिज उर्जा असलेली दिसेल.
06:06 याचे कारण ट्रॅक हा जमिनीच्या पातळीपासून वर आहे.
06:11 ट्रॅक ड्रॅग करून जमिनीच्या पातळीवर न्या.
06:15 स्केटरमध्ये ट्रॅकच्या तळाशी शून्य स्थितिज उर्जा आणि सर्वात वर शून्य गतिज ऊर्जा आहे हे पहा.
06:23 आता मी ट्रॅक जमिनीपासून वर ड्रॅग करत आहे.
06:27 Potential Energy Reference चेकबॉक्सवर क्लिक करा.
06:31 स्क्रीनच्या खालील भागात P.E=0 at this dotted line असे दाखवले जाईल.
06:37 Potential Energy Reference रेषा वरच्या दिशेने ड्रॅग करून ट्रॅकच्या तळाला स्पर्श करा.
06:43 तुम्हाला आता दिसेल की, स्केटरमध्ये ट्रॅकच्या तळाशी शून्य स्थितिज उर्जा आहे.
06:49 आता Bar Graph बटणावर क्लिक करा.
06:52 या बार आलेखावर चार उर्जा दाखवलेल्या आहेत.
06:56 स्केटर ट्रॅकवर मागे व पुढे सरकत असताना उर्जा बदलांची नोंद घ्या.
07:02 स्केटरची एकूण उर्जा स्थिर आहे.
07:06 म्हणजेच येथे उर्जा अक्षय्यतेचा नियम पाळला जात आहे.
07:10 ट्रॅकचा आकार आणि उंची बदलू या.
07:14 कोणत्याही एखाद्या निळ्या बिंदूवर क्लिक करून ड्रॅग करा.
07:17 ट्रॅकची उंची वाढल्यामुळे एकूण उर्जेत वाढ झाली आहे याची नोंद घ्या.
07:22 Bar Graph बंद करा.
07:24 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
07:29 नंतर Energy vs. Position बटणावर क्लिक करा.
07:33 Energy vs Position चा आलेख दिसेल.
07:37 आलेख आणि स्केटर एकाच वेळी दिसण्यासाठी ट्रॅक डावीकडे ड्रॅग करा.
07:43 स्केटरच्या स्थानानुसार उर्जेत कसे बदल होतात ते पहा.
07:48 येथे तुम्हाला dotted line हलताना दिसेल.
07:52 ही, ट्रॅकवरील विशिष्ट स्थानावर स्केटरची उर्जा दर्शवते.
07:58 आलेखाच्या तळाशी उर्जेसाठी चार चेकबॉक्सेस आहेत.
08:02 एखाद्या विशिष्ट प्रकारचा उर्जा आलेख बघण्यासाठी इतर चेकबॉक्सेस अनचेक करा.
08:09 सिम्युलेशन काही काळ थांबवण्यासाठी Pause बटणावर क्लिक करा.
08:13 Copy बटणावर क्लिक करा.
08:16 Copy बटणाद्वारे आपल्याला एखाद्या विशिष्ट स्थानासाठी उर्जेचे मूल्य आलेखावर दाखवता येते.
08:22 आलेख बंद करा.
08:25 Energy vs. Time बटणावर क्लिक करा.
08:29 Energy vs. Time चा आलेख उघडेल.
08:33 आलेखाच्या खालच्या भागात आपल्याकडे सिम स्पीड स्लायडर,
08:38 स्टॉप/गो, प्लेबॅक,
08:42 स्टेप, रिवाईंड, क्लियर ही बटणे आहेत.
08:49 सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play बटणावर क्लिक करा.
08:56 Stop बटणावर क्लिक करा.
08:59 सिम स्पीड स्लायडर स्लो आणि फास्ट यांच्या दरम्यान ड्रॅग करा.
09:04 नंतर प्लेबॅक बटण दाबा.
09:07 एक जांभळी उभी रेषा मार्गावर आडवी जाताना दिसेल.
09:12 दिलेल्या वेळेत गतिज, स्थितिज आणि एकूण उर्जेच्या व्हॅल्यूजचे निरीक्षण करा.
09:20 लक्षात घ्या एकूण उर्जा स्थिर आहे.
09:24 परंतु गतिज उर्जेचे स्थितिज ऊर्जेत आणि उलट असे बदल होत आहेत.
09:29 येथे घर्षण नसल्यामुळे औष्णिक उर्जा शून्य आहे.
09:33 Energy vs. Time आलेख बंद करा.
09:36 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
09:40 स्केटरच्या वस्तुमानानुसार एकूण उर्जेत होणारा बदल पाहू.
09:45 पॅनेलच्या तळाशी स्क्रॉल करा.
09:48 Edit skater बटणावर क्लिक करा.
09:51 Mass टेक्स्ट बॉक्स आणि Mass स्लायडर दिसेपर्यंत खाली स्क्रॉल करा.
09:57 डीफॉल्ट रूपात, Mass 75 किलो आहे.
10:01 आलेख उघडण्यासाठी Energy Vs. Time बटणावर क्लिक करा.
10:06 Mass स्लायडर हळूहळू 200 च्या दिशेने ड्रॅग करा.
10:10 आपण स्केटरचे वस्तुमान बदलत असता उर्जेत होणारे बदल आलेखावर पहा.
10:16 Energy Vs. Time हा आलेख बंद करा.
10:19 आता आपण स्केटरला विविध ग्रहांवर घेऊन जाऊ.
10:24 पॅनेलमधे वरच्या दिशेने स्क्रॉल करा.
10:27 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
10:31 Location भागात, डीफॉल्ट रूपात, Earth निवडलेली आहे.
10:35 Energy vs. Time बटणावर क्लिक करा.
10:39 Location विभागात, Moon रेडिओ बटण निवडा.
10:44 चंद्रावरील कमी गुरूत्वामुळे स्केटर उडून जाताना दिसेल.
10:50 Return Skater बटणावर क्लिक करा.
10:53 येथे Gravity चे मूल्य 1.62 N/kg आहे जे पृथ्वीवरील मूल्यापेक्षा कमी आहे.
11:00 ज्यामुळे स्केटरचा वेग कमी होईल.
11:04 पृथ्वीपेक्षा चंद्रावरील गुरूत्व कमी असल्याने येथे एकूण उर्जा कमी होईल.
11:10 अशाच प्रकारे गुरू (Jupiter) आणि अवकाश ( Space) या स्थानांसाठी उर्जा बदलांची तुलना करा.
11:17 Energy Vs. Time हा आलेख बंद करा.


11:21 आता आपण घर्षणासहित आणि घर्षणाशिवायच्या ट्रॅकवर उर्जेचे विभाजन पाहू.
11:26 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
11:30 पॅनेलवर खाली स्क्रॉल करा आणि Track Friction बटणावर क्लिक करा.
11:35 Coefficient of Friction स्लायडर दिसेपर्यंत खाली स्क्रॉल करा.
11:40 Energy vs.Time बटणावर क्लिक करा.
11:44 Coefficient of Friction स्लायडर हळूहळू None पासून Lots पर्यंत ड्रॅग करा.
11:50 उर्जेतील बदलांचे निरीक्षण करा.
11:53 येथे काही उर्जेचे घर्षणामुळे औष्णिक उर्जेत रूपांतर झाले आहे.
11:59 याचे कारण म्हणजे घर्षणामुळे गतीला झालेला विरोध.
12:04 स्केटरच्या गतीस घर्षण विरोध करते.
12:08 त्यामुळे त्याचा वेग कमी होऊन ऊर्जा कमी होते.
12:12 Energy Vs. Time हा आलेख बंद करा.


12:15 असाईनमेंट म्हणून:

Tracks मेनूमधून Double Well ट्रॅक निवडा आणि ऊर्जेतील बदलांचे निरीक्षण करा.

12:24 Double well ट्रॅक आणि Double Well Roller Coaster मोड यांच्यातील ऊर्जा बदलांची तुलना करा.
12:30 औष्णिक उर्जेत झालेले बदल पहा,
12:34 आणि स्पष्ट करा. (टीप- त्यासाठी ट्रॅकवर राईट क्लिक करून Roller Coaster Mode निवडा).
12:43 Tracks बॉक्स वापरून ट्रॅक्स तयार करा आणि ऊर्जेतील बदल बघा.
12:49 थोडक्यात,


12:52 या पाठात आपण शिकलो Energy Skate Park, हे PhET सिम्युलेशन कसे वापरावे.
13:01 हे सिम्युलेशन वापरून आपण,

1. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम.

13:08 2. ऊर्जेतील बदलांसाठी पाय चार्ट आणि बार ग्राफ दाखवणे.
13:13 3. ट्रॅकवरील विशिष्ट स्थानावर उर्जेचे मूल्य दर्शविण्यासाठी Energy vs Position आलेख काढणे.


13:20 4. ट्रॅकच्या स्थानातील बदलानुसार उर्जेतील बदलांचे निरीक्षण करणे.


13:24 5. वस्तुमान आणि घर्षणात बदल झाल्यामुळे उर्जेत होणारे बदल बघणे.


13:29 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
13:38 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
13:47 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


13:51 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
13:55 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
14:03 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:11 अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


14:16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Radhika