Difference between revisions of "PhET/C3/Gravity-and-Solar-system/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
m |
||
Line 646: | Line 646: | ||
|| 14:44 | || 14:44 | ||
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | ||
− | ऑनलाईन परीक्षा | + | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
|- | |- |
Latest revision as of 15:39, 9 January 2020
Time | Narration |
00:01 | Gravity and Solar System वरील पाठात आपले स्वागत.
|
00:06 | या पाठात, Gravity and Orbits आणि My Solar System, या PhET सिम्युलेशन्सचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. |
00:16 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, |
00:23 | जावा वर्जन 1.7,
|
00:27 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:34 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:42 | सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत -
1. सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि उपग्रह यांच्यातील संबंधाची माहिती. |
00:51 | 2. गुरुत्वाकर्षण बलावर वस्तुमान आणि अंतराच्या परिणामाचा अभ्यास. |
00:56 | 3. गुरुत्वाकर्षण आपल्या सूर्यमालेचे चलनवलन कसे नियंत्रित करते हे पाहणे. |
01:02 | 4. गुरुत्वीय बलावर परिणाम करणा-या व्हेरिएबल्सची निश्चिती, |
01:08 | 5. आणि गुरुत्वीय बल काढणे. |
01:12 | आपल्या सूर्यमालेतील सर्व आकाशीय घटक हे सूर्याभोवती फिरतात. |
01:18 | हे घटक म्हणजे ग्रह, चंद्र, धूमकेतू, लघुग्रह, उल्का आणि उल्काश्म. |
01:27 | सूर्य आणि आकाशीय घटक यांच्यामधे आकर्षण बल कार्य करत असते. |
01:34 | हे आकर्षण बल म्हणजे गुरुत्वीय बल. |
01:39 | आपण प्रात्यक्षिक सुरू करू. |
01:43 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
|
01:48 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Gravity and Orbits हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे. |
01:55 | सिम्युलेशन उघडण्यासाठी, gravity-and-orbits_en.html या फाईलवर राईट क्लिक करा. |
02:01 | Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा. |
02:06 | ब्राऊजरमधे सिम्युलेशन उघडेल. |
02:10 | हा Gravity and Orbits सिम्युलेशनचा इंटरफेस आहे. |
02:16 | इंटरफेसमधे दोन स्क्रीन आहेत-
Model आणि To Scale. |
02:22 | Model स्क्रीनच्या सहाय्याने प्रात्यक्षिक सुरू करू. |
02:26 | Model स्क्रीन उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
02:29 | स्क्रीनच्या उजवीकडे आपल्याला एक बॉक्स दिसेल. |
02:34 | यात सूर्यमालेसारखी चार मॉडेल्स आहेत. |
02:38 | मॉडेल्सच्या पुढे राखाडी रंगाचे Reset बटण आहे. |
02:43 | हे बटण सूर्यमाला पुन्हा मूळ स्थितीत आणून ठेवेल. |
02:48 | on आणि off या रेडिओ बटणांच्या सहाय्याने Gravity पर्याय निवडू शकतो. |
02:54 | Gravity खाली हे चेकबॉक्सेस आहेत-
Gravity Force, Velocity, Path आणि Grid . |
03:03 | सर्व चेकबॉक्सेसवर क्लिक करा. |
03:06 | या बॉक्सखाली आणखी एक बॉक्स आहे.
तारा आणि ग्रह यांचे वस्तुमान बदलण्यासाठी येथे स्लायडर्स आहेत. |
03:15 | स्क्रीनच्या खालच्या भागात ऍनिमेशनचा वेग बदलण्यासाठी Fast Forward, Normal आणि Slow motion ही रेडिओ बटणे आहेत. |
03:25 | डीफॉल्ट रूपात Normal वेग निवडलेला आहे. |
03:29 | तसेच येथे Rewind, Play/Pause आणि Step ही बटणे आहेत. |
03:35 | Earth Days ची संख्या रिसेट करण्यासाठी Clear बटणावर क्लिक करा. |
03:39 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटण दाबा. |
03:43 | डीफॉल्ट रूपात सूर्य आणि पृथ्वी ही सिस्टीम निवडलेली आहे. |
03:48 | आता Play बटणावर क्लिक करा. |
03:51 | लक्षात घ्या, पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे. |
03:57 | ही वर्तुळाकार गती केंद्रगामी(सेंट्रीपेटल) बलामुळे आहे. |
04:02 | केंद्रगामी बल, त्वरणामधे बदल करून पदार्थ वर्तुळाकार गतीत फिरत ठेवते. |
04:11 | हे बल केंद्राच्या दिशेने कार्य करते. |
04:15 | हा वर्तुळाकार मार्ग ही त्याची कक्षा आहे. |
04:19 | कक्षेच्या प्रत्येक बिंदूवर पृथ्वी तिच्या परिभ्रमणाची दिशा बदलत असते. |
04:25 | लक्षात घ्या, पृथ्वीचा वेग हा सूर्याच्या गुरुत्वीय बलाशी काटकोनात असतो. |
04:32 | आता Earth Days मोजू. |
04:35 | सूर्य आणि पृथ्वी, त्यांच्या मूळ जागेवर आणून ठेवण्यासाठी Reset arrow वर क्लिक करा. |
04:42 | पृथ्वी सूर्याभोवती फिरताना Earth Days मधील बदलाकडे लक्ष द्या. |
04:48 | दिवस अचूक मोजण्यासाठी आता ऍनिमेशन स्लो वर बदलू. |
05:00 | सिम्युलेशन काही काळ थांबवण्यासाठी Pause वर क्लिक करा. |
05:04 | पृथ्वी एका परिभ्रमणासाठी 365 दिवस घेते. |
05:09 | गुरुत्वीय बलाच्या अभावी पृथ्वीच्या गतीचे काय होईल ते पाहू. |
05:14 | off रेडिओ बटणावर क्लिक करा. |
05:17 | आता ऍनिमेशनचा वेग बदलून normal करणार आहोत. |
05:21 | Play बटणावर क्लिक करा. |
05:24 | गुरुत्वीय बलाच्या अभावी, पृथ्वी एका सरळ रेषेत निघून जाताना दिसेल. |
05:31 | ही गती वर्तुळाकार कक्षेची स्पर्शरेषा असते. |
05:35 | Return Objects बटणावर क्लिक करा. |
05:38 | पृथ्वी पुन्हा तिच्या मूळ जागी परत येईल. |
05:42 | आता वस्तुमानातील बदलाचा कक्षेवर होणारा परिणाम बघूया. |
05:48 | डीफॉल्ट रूपात Star Mass स्लायडर Our Sun वर आहे. |
05:53 | Star Mass स्लायडर ड्रॅग करून 1.5 वर न्या. |
05:58 | ड्रॅग केल्यावर लक्षात येईल की ताऱ्याचा आकार मोठा झाला आहे. |
06:03 | पुढे Gravity च्या on या रेडिओ बटणावर क्लिक करा आणि Play बटण दाबा. |
06:10 | कक्षेच्या मार्गाचे निरीक्षण करा. |
06:13 | आता पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत आहे. |
06:17 | कक्षेचा आकार देखील छोटा झाला आहे. |
06:21 | येथे सूर्य कक्षेच्या केंद्रस्थानी नाही. |
06:26 | सूर्याचे वस्तुमान वाढल्याने Earth Days कमी झालेले आहेत. |
06:32 | Planet Mass स्लायडर 1.5 वर ड्रॅग करा. |
06:37 | त्यांच्यामधील गुरुत्वीय बल वाढलेले दिसेल. |
06:42 | सिम्युलेशन काही काळ थांबवण्यासाठी Pause बटण दाबा. |
06:46 | ग्रहावर क्लिक करून तो सूर्यापासून लांब ड्रॅग करा. |
06:51 | Play बटणावर क्लिक करा. |
06:53 | ग्रह आणि सूर्य यांच्यातील अंतर वाढल्यास गुरुत्वीय बल कमी होते हे दिसेल. |
07:01 | Pause बटणावर क्लिक करा. सिस्टीम रिसेट करण्यासाठी Reset बटण दाबा. |
07:08 | सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ही सिस्टीम सिलेक्ट करा. |
07:12 | व्ह्यू झूम इन करण्यासाठी स्लायडर अधिक चिन्हाच्या दिशेने ड्रॅग करा. |
07:17 | Play बटणावर क्लिक करा. |
07:20 | लक्षात घ्या की चंद्र पृथ्वीच्या आवर्त (स्पायरल) कक्षेत आहे तर पृथ्वी सूर्याच्या वर्तुळाकार कक्षेत आहे. |
07:29 | येथे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. |
07:34 | असाईनमेंट म्हणून Model स्क्रीन वापरून पृथ्वी व चंद्र तसेच पृथ्वी व उपग्रह या सिस्टीम्स वापरून बघा. |
07:43 | आता To Scale या स्क्रीनवर जाऊ. |
07:47 | इंटरफेसच्या खालील भागातील To Scale स्क्रीनवर क्लिक करा. |
07:52 | To Scale स्क्रीनवर Model स्क्रीनसारखीच टूल्स आहेत. |
07:57 | या स्क्रीनवर अतिरिक्त चेकबॉक्सेस आहेत-
Mass आणि Measuring Tape. |
08:04 | Mass, Path आणि Grid चेकबॉक्सेसवर क्लिक करा. |
08:09 | डीफॉल्ट रूपात सूर्य आणि पृथ्वी ही सिस्टीम निवडलेली आहे. |
08:14 | येथे ताऱ्याचे वस्तुमान 333 thousand Earth masses असून ग्रहाचे वस्तुमान 1 Earth mass आहे. |
08:24 | परिभ्रमणाची कक्षा दाखवण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
08:28 | नंतर pause बटणावर क्लिक करा. |
08:31 | आता तारा आणि पृथ्वी यांतील अंतर मोजूया. |
08:35 | Measuring Tape चेकबॉक्सवर क्लिक करा. |
08:39 | वस्तुमान चेकबॉक्स अनचेक करा. |
08:42 | यामुळे आपल्याला अंतर अचूकपणे मोजता येईल. |
08:47 | व्ह्यू झूम इन करण्यासाठी स्लायडर अधिक चिन्हाच्या दिशेने ड्रॅग करा.
|
08:52 | Measuring Tape ताऱ्यावर ठेवा आणि त्याचे दुसरे टोक ड्रॅग करून ग्रहापर्यंत न्या. |
09:00 | तारा आणि ग्रह यांच्यामधील अंतर बघा. |
09:04 | हे 91503 thousand miles आहे. |
09:10 | या किंमतीत तुमच्याकडे थोडा बदल दिसेल कारण सूर्य गतिमान आहे. |
09:17 | आता पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वीय बल काढू. |
09:22 | वैश्विक गुरूत्वाकर्षण नियम- कुठल्याही दोन पदार्थांमधील आकर्षण बल हे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात असते. |
09:33 | आणि ते त्यांच्यातील अंतराळातल्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. |
09:38 | हे बल दोन्ही पदार्थांचे मध्य जोडणाऱ्या रेषेत काम करते. |
09:44 | गुरुत्वीय बल पुढील सूत्र वापरून काढता येईल. येथे G म्हणजे वैश्विक गुरुत्व स्थिरांक आहे. |
09:53 | कॅपिटल M म्हणजे सूर्याचे वस्तुमान, |
09:58 | स्मॉल m म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, |
10:02 | आणि d हे पृथ्वी आणि सूर्यातील अंतर आहे. |
10:07 | आता सूत्रात G, कॅपिटल M, स्मॉल m आणि d ची व्हॅल्यू घाला. |
10:15 | हे आपल्याला सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वीय बलाची व्हॅल्यू देईल. |
10:21 | ही व्हॅल्यू 3.6 गुणिले 10चा 22 वा घात N (न्युटन) इतकी आहे. |
10:28 | असाईनमेंट म्हणून To Scale स्क्रीन वापरून पृथ्वी आणि उपग्रह यांतील गुरुत्वीय बल काढा. |
10:37 | आता My Solar System या PhET सिम्युलेशन वर जाऊ. |
10:43 | मी डाऊनलोडस फोल्डरमधे My Solar System हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे. |
10:50 | सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा.
प्रॉम्प्टवर: cd Downloads टाईप करून एंटर दाबा. |
11:01 | नंतर java space hyphen jar space my-solar-system_en.jar टाईप करून एंटर दाबा. |
11:17 | My Solar System हे सिम्युलेशन उघडेल. |
11:21 | हा My Solar System सिम्युलेशनचा इंटरफेस आहे. |
11:26 | स्क्रीनच्या उजवीकडे सिस्टीम ड्रॉपडाऊन बॉक्स आहे. |
11:30 | येथे आपल्या आवडीची सूर्यमालेची जोडी निवडू शकतो. |
11:36 | ड्रॉपडाऊन बॉक्सखाली आणखी एक बॉक्स आहे. |
11:40 | त्यामधे Start, Stop आणि Reset ही बटणे आहेत. |
11:45 | तसेच System Centered, Show Traces, Show Grid आणि Tape Measure हे चेकबॉक्सेस आहेत. |
11:55 | आवश्यकतेप्रमाणे त्या चेकबॉक्सेसचा उपयोग करा. |
11:59 | ऍनिमेशनचा वेग नियंत्रित करण्यासाठी हा स्लायडर आहे. |
12:03 | स्क्रीनच्या खालच्या भागात Initial Settings दिल्या आहेत. |
12:08 | येथे mass, position आणि velocity यांच्या संबंधित बॉक्सेसमधे व्हॅल्यूज भरू शकतो. |
12:16 | तसेच number of bodies निवडण्यासाठी रेडिओ बटणांचा उपयोग करू शकतो. |
12:20 | ड्रॉपडाऊन ऍरोवर क्लिक करा. |
12:24 | Sun, planet, comet पर्यायावर क्लिक करा. |
12:28 | आपल्याला ग्रह, सूर्य आणि धूमकेतू हे तीन रंगीत ऑब्जेक्टस दिसतील. |
12:37 | लाल रंगाचा बाण वेग दर्शवते. |
12:41 | ही सदिश राशी असून ती एका गोलात V अक्षराने दर्शवली आहे. |
12:46 | Start बटणावर क्लिक करून भ्रमणकक्षेचे निरीक्षण करा. धूमकेतू सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. |
12:55 | Stop बटणावर क्लिक करा. |
12:57 | माऊस पॉईंटर सूर्य, ग्रह आणि धूमकेतूवर नेल्यावर प्रत्येकाचे वस्तुमान, सध्याची स्थिती आणि वेग दिसेल. |
13:09 | start बटणावर क्लिक करा. |
13:12 | थोड्या परिभ्रमणांनंतर धूमकेतू सूर्यावर आदळून दिसेनासा होईल. |
13:19 | Four star ballet हा पर्याय निवडून Start बटणावर क्लिक करा. |
13:25 | भ्रमणकक्षेचे निरीक्षण करा. नंतर Stop बटणावर क्लिक करा. |
13:31 | या वस्तूंचे वस्तुमान, स्थिती आणि वेग जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर माऊस पॉईंटर न्या. |
13:39 | असाईनमेंट म्हणून, विविध सिस्टीम्स सिलेक्ट करून भ्रमणकक्षांचे निरीक्षण करा. |
13:46 | Initial settings मधे बदल करून कक्षेत होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा आणि आपले निरीक्षण समजावून सांगा. |
13:54 | थोडक्यात, |
13:57 | या पाठात आपण,
Gravity and Orbits आणि My Solar System, या PhET सिम्युलेशन्सची प्रात्यक्षिके पाहिली |
14:07 | ही सिम्युलेशन्स वापरून आपण सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि उपग्रह यांच्यातील संबध पाहिला. |
14:15 | वस्तुमान आणि अंतर याचा गुरुत्वीय बलावरील परिणाम पाहिला. |
14:20 | गुरुत्वीय बलाचा सूर्यमालेच्या चलनवलनावरील परिणाम पाहिला. |
14:25 | गुरुत्वीय बलावर परिणाम करणारे व्हेरिएबल्स निश्चित केले. |
14:30 | आणि गुरुत्वीय बल काढले. |
14:35 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
14:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
14:54 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
14:58 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
15:03 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
15:12 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
15:25 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |