Difference between revisions of "PhET/C3/Rutherford-Scattering/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
m |
||
Line 410: | Line 410: | ||
|- | |- | ||
|| 09:00 | || 09:00 | ||
− | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा | + | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
|- | |- |
Latest revision as of 15:29, 9 January 2020
Time | Narration |
00:01 | Rutherford Scattering simulation वरील पाठात आपले स्वागत.
|
00:06 | या पाठात आपण, Rutherford Scattering या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
|
00:13 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,
|
00:20 | जावा वर्जन 1.7,
|
00:25 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:31 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:39 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत,
Plum pudding आणि Rutherford ही अणूंची मॉडेल्स, |
00:48 | Rutherford gold foil प्रयोगाचे चित्र उभे करणे, |
00:52 | alpha कणांच्या वर्तनाची माहिती, |
00:56 | आणि अल्फा कणांच्या विचलनावर परिणाम करणारे घटक ओळखणे. |
01:02 | आता प्रात्यक्षिक सुरू करू. |
01:06 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू. |
01:11 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Rutherford Scattering simulation आधीच डाऊनलोड केले आहे. |
01:18 | सिम्युलेशन उघडण्यासाठी, Rutherford Scattering html file वर राईट क्लिक करा. |
01:26 | Open with Firefox Web Browser पर्याय निवडा.
|
01:30 | फाईल ब्राऊजरमधे उघडेल. |
01:33 | हा Rutherford Scattering simulation चा इंटरफेस आहे.
|
01:38 | इंटरफेसमधे दोन स्क्रीन्स आहेत:
Rutherford Atom, Plum Pudding Atom. |
01:45 | Plum Pudding Atom स्क्रीनने सुरूवात करूया. |
01:49 | J. J. Thomson यांनी अणूचे Plum Pudding मॉडेल सुचवले. |
01:53 | हे मॉडेल रुदरफोर्ड यांच्या अणूच्या मॉडेलपूर्वी सुचवले गेले होते. |
01:58 | Plum Pudding Atom स्क्रीन उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
02:02 | Plum Pudding अणूचे मॉडेल दाखवणारा प्रायोगिक संच स्क्रीनवर डावीकडे आहे. |
02:09 | यामधे अल्फा कणांच्या स्त्रोताच्यावर धातूचा पातळ पत्रा आहे. |
02:15 | स्क्रीनच्या मध्यावर view box आहे. |
02:19 | यात 3 गुणिले 10 चा वजा 10 वा घात मीटर मापाचा एक अणू दाखवला आहे. |
02:26 | अणूमधील लाल भाग हा धनभार असून तो सर्वत्र एकसारखा पसरलेला आहे. |
02:33 | निळे छोटे गोल अणूत अंतर्भूत असलेले इलेक्ट्रॉन्स दर्शवतात. |
02:39 | अणूमधील धनभार आणि त्यातील इलेक्ट्रॉन्स यामधे काही अंतर नाही. |
02:44 | स्क्रीनच्या उजवीकडे 2 बॉक्सेस दिसत आहेत, Legend आणि Alpha particle. |
02:53 | Legend बॉक्स अणूचे मुख्य घटक दाखवेल. |
02:58 | Alpha Particle बॉक्समधे Energy स्लायडर आहे ज्याद्वारे आपण येणाऱ्या अल्फा कणांची उर्जा बदलू शकतो. |
03:06 | Traces चेकबॉक्स द्वारे आपण अल्फा कणांचा गतीमार्ग बघू शकतो. |
03:11 | Traces चेकबॉक्स चेक करा. |
03:14 | स्क्रीनच्या तळाशी आपल्याकडे Play/Pause, |
03:19 | Step आणि Reset ही बटणे आहेत. |
03:23 | Alpha Particles स्त्रोत सुरू करण्यासाठी निळे बटण क्लिक करा. |
03:28 | अल्फा कणांचा झोत धातूच्या पातळ पत्र्यावर आपटत आहे असे दिसेल. |
03:33 | अणूच्या अंतर्भागात अल्फा कणांच्या मार्गाकडे लक्ष द्या. |
03:37 | सर्व अल्फा कण अणूतून विचलन न होता बाहेर पडतील. |
03:42 | याचे कारण इलेक्ट्रॉन्स सर्व अणूत समप्रमाणात पसरले आहेत. |
03:47 | अणूतील धन व ऋणभाराचे परिमाण सारखेच आहे. |
03:53 | हे आपल्याला अतिशय स्थिर electrostatic रचना देते. |
03:57 | त्यामुळे आपल्या अणूवरील विद्युतभार न्युट्रल आहे. |
04:01 | Plum Pudding मॉडेलमुळे अणूवरील विद्युतभार शून्य का आहे हे सांगता येते. |
04:07 | अणूचे Plum Pudding मॉडेल काही गोष्टी स्पष्ट करण्यात अयशस्वी ठरते-
अणूची स्थिरता, |
04:15 | केंद्रकाचे अणूतील स्थान. |
04:19 | Plum Pudding मॉडेल अणूची रचना सांगू शकत नव्हते. |
04:24 | परंतु त्यानी अणूची इतर मॉडेल्स विकसित करण्याचा पाया घालून दिला. |
04:31 | आता Rutherford Atom स्क्रीनवर जाऊ. |
04:35 | स्क्रीन उघडण्यासाठी Rutherford Atom वर क्लिक करा. |
04:39 | Rutherford Atom चा स्क्रीन रुदरफोर्डच्या गोल्ड फॉईल प्रयोगाची कल्पना देईल. |
04:45 | Rutherford Atom स्क्रीनवर Plum Pudding ऍटम स्क्रीनवर असलेलीच टूल्स आहेत. |
04:51 | याशिवाय Alpha Particle बॉक्सच्या खाली Atom बॉक्स आहे. |
04:56 | Atom बॉक्समधे केंद्रकाचे घटक बदलण्यासाठी प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्स स्लायडर्स आहेत. |
05:04 | येथे प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सची संख्या सोन्याच्या अणूप्रमाणे आहे. |
05:09 | स्क्रीनच्या मध्यभागी तुम्हाला एक बॉक्स दिसेल. |
05:13 | हे सोन्याच्या पत्र्यामधील भिन्न अणूंचे झूम इन चित्र दाखवत आहे. |
05:19 | स्क्रीनच्या डाव्या बाजूला, |
05:23 | atomic view आणि nuclear view अशी 2 मॉडेल दिसत आहेत.
|
05:27 | डीफॉल्ट रूपात atomic view निवडलेले आहे. |
05:31 | अणूमधून अल्फा कण जात असताना त्यांच्या वर्तनाबद्दल Atomic view कल्पना देते. |
05:38 | अल्फा कण स्त्रोत चालू करण्यासाठी निळ्या बटणावर क्लिक करा. |
05:43 | अल्फा कणांचा झोत धातूच्या पातळ पत्र्यावर आपटत असल्याचे दिसेल. |
05:48 | अल्फा कणांचे गतीमार्ग बघण्यासाठी Traces चेक बॉक्स चेक करा. |
05:54 | अणूंच्या केंद्रकाच्या दिशेने अल्फा कण जात असताना निरीक्षण करा. |
06:00 | सिम्युलेशन पॉज करून Step बटणावर क्लिक करा. |
06:06 | येथे, बहुतांश अल्फा कणांचे विचलन झालेले नाही. |
06:11 | थोड्या अल्फा कणांचे थोडेसेच विचलन झालेले आहे. |
06:15 | फारच थोडे अल्फा कण उलट्या दिशेने फेकले जातात, म्हणजे सुमारे 180 ° ने त्यांचे विचलन होते. |
06:22 | nuclear view वापरून अल्फा कणांचे वर्तन पाहू. |
06:27 | nuclear view वर क्लिक करा. |
06:29 | zoom in view, मधे अणूची जागा त्यांच्या अणूकेंद्रकाने घेतली आहे याकडे लक्ष द्या. |
06:35 | आता सिम्युलेशन सुरू करा. |
06:38 | अल्फा कण केंद्रकाच्या जवळ येत असता त्यांच्यातील विचलन पहा. |
06:44 | येथे सोन्याच्या अणूचा n/p रेशो 1.5 आहे. म्हणून अल्फा कणांचे विचलन मोठ्या प्रमाणावर होते. |
06:53 | अल्फा कणांच्या विकिरणावर (स्कॅटरिंग) परिणाम करणारे घटक पाहू. |
06:59 | Energy स्लायडर minimum कडे ड्रॅग करा. |
07:03 | कणांची उर्जा कमी झाल्यास विचलनाचा कोन वाढतो याकडे लक्ष द्या. |
07:09 | अणू केंद्रकाचे घटक बदलल्यावर अल्फा कणांच्या विचलनावर होणारा परिणाम पाहू. |
07:16 | छोट्या आकाराच्या अणू केंद्रकाने सुरूवात करू ज्यात प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सची संख्या कमी आहे. |
07:22 | Energy स्लायडर त्याच्या डीफॉल्ट स्थितीत नेऊन ठेवू. |
07:27 | नंतर प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्स स्लायडर 20 कडे ड्रॅग करा. |
07:32 | अणू केंद्रकाचा आकार छोटा झालेला दिसेल. |
07:35 | अल्फा कणांच्या विचलन कोनांकडे लक्ष द्या. |
07:39 | प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्सची संख्या कमी झाल्यावर विचलन कोन कमी होतो. |
07:45 | येथे n /p रेशो 1 असल्यामुळे अणू स्थिर आहे. |
07:50 | केंद्रकापासून दूर असणाऱ्या अल्फा कणांमधे विचलन जवळजवळ झालेले नाही हे लक्षात घ्या. |
07:57 | केंद्रकाच्या जवळ असलेले अल्फा कण मात्र विचलित झालेले आहेत. |
08:02 | असाईनमेंट म्हणून: केंद्रकात प्रोटॉन्स आणि न्युट्रॉन्स विविध संख्येने घेऊन अल्फा कणांचे विचलन पहा. |
08:10 | अल्फा कणांच्या वर्तनातील बदलाचे स्पष्टीकरण द्या. |
08:16 | थोडक्यात,
|
08:19 | या पाठात आपण, Rutherford Scattering या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघितले.
|
08:28 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकलो:
Plum pudding आणि Rutherford या अणू मॉडेल्सची माहिती, |
08:37 | Rutherford gold foil प्रयोगाचे चित्र उभे करणे,
|
08:41 | अल्फा कणांचे वर्तन, |
08:45 | अल्फा कणांच्या विचलनावर परिणाम करणारे घटक शोधणे. |
08:51 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
09:00 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
09:09 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
09:13 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
|
09:17 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. |
09:25 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
09:38 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |