Difference between revisions of "PhET/C2/Energy-forms-and-changes/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
m |
||
Line 538: | Line 538: | ||
|- | |- | ||
|| 11:52 | || 11:52 | ||
− | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा | + | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
Latest revision as of 15:16, 9 January 2020
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात दाखवणार आहोत: Energy Forms and Changes वरील PhET simulation. |
00:15 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, |
00:23 | जावा वर्जन 1.7, |
00:27 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:33 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:41 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:
1. वास्तविक जीवनातील उर्जेची अक्षय्यता. |
00:50 | 2. विविध पदार्थांच्या औष्णिक वाहकतेची तुलना करणे. |
00:55 | 3. उर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती घेणे. |
00:58 | हे सिम्युलेशन वापरून:
1. पदार्थ गरम किंवा थंड केले असता ऊर्जेचे वहन कसे होते ते पाहू. |
01:07 | 2. उर्जा प्रणालीचा आराखडा बनवू. |
01:10 | 3. ऊर्जा एका रूपातून दुसर्या रूपात कशी बदलते याचा अभ्यास करू. |
01:15 | ऊर्जा म्हणजे वस्तूंवर कार्य करण्याची क्षमता. |
01:20 | ही एक आदिश राशी आहे. |
01:23 | SI सिस्टीममध्ये ती ज्यूल्समध्ये मोजली जाते. |
01:27 | निसर्गात उर्जा अनेक प्रकारांमध्ये अस्तित्वात आहे. जसे की- |
01:32 | यांत्रिक ऊर्जा, |
01:35 | विद्युत ऊर्जा, |
01:38 | औष्णिक ऊर्जा, |
01:40 | प्रकाश ऊर्जा आणि |
01:42 | रासायनिक ऊर्जा.
|
01:45 | सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा. |
01:50 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे आधीच Energy Forms and Changes simulation डाउनलोड केले आहे. |
01:57 | सिम्युलेशन चालू करण्यासाठी, टर्मिनल उघडा. |
02:01 | प्रॉम्प्टवर टाइप करा: cd Downloads आणि एंटर दाबा. |
02:08 | टाइप करा: java space hyphen jar space energy hyphen forms hyphen and hyphen changes underscore en dot jar आणि एंटर दाबा. |
02:24 | एनर्जी फॉर्म्स अँड चेंजेस सिम्युलेशन उघडेल. |
02:28 | सिम्युलेशन स्क्रीनला वरती 2 टॅब आहेत- Intro आणि Energy Systems |
02:35 | डीफॉल्ट स्वरूपात, इंट्रो स्क्रीन उघडेल. |
02:39 | इंट्रो स्क्रीन आपल्याला पदार्थ गरम किंवा थंड केल्यास औष्णिक उर्जा कशी वाहते हे सांगेल. |
02:47 | स्क्रीनच्या डाव्या बाजूला तीन थर्मामीटर्सचा संच आहे. |
02:52 | स्क्रीनच्या उजव्या बाजूला Energy Symbols चा चेक बॉक्स आहे. |
02:57 | Energy Symbols च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
03:01 | Iron ब्लॉक, Brick ब्लॉक आणि Water कंटेनरमधे उर्जा भाग दिसतील. |
03:08 | प्रत्येक पदार्थातील उर्जेच्या प्रमाणात त्यातील उर्जा भागांची संख्या असते. |
03:14 | या सेटअपमध्ये, औष्णिक उर्जेच्या स्वरूपात ऊर्जेचे संक्रमण होत आहे. |
03:19 | सिस्टीम गरम किंवा थंड करण्यासाठी दोन हीट रेग्युलेटर्स आहेत. |
03:24 | हीट रेग्युलेटर्स स्टँडसह दिले आहेत. |
03:28 | स्क्रीनच्या तळाशी ऍनीमेशनची गती नियंत्रित करण्यासाठी Normal आणि Fast Forward ही रेडिओ बटणे, |
03:37 | Play / Pause बटण,
Step बटण आणि Reset All बटण आपल्याकडे आहे. |
03:42 | स्टँडवर Water कंटेनर ड्रॅग करा. |
03:46 | थर्मामीटर ड्रॅग करून कंटेनरला जोडा. |
03:50 | आता पाणी तापविण्यासाठी हीट रेग्युलेटरचा slider वरच्या दिशेने ड्रॅग करून धरून ठेवा. |
03:57 | तापमान वाढत असताना, पाण्याचे बाष्पीभवन होते आणि वाफ दिसून येते. |
04:04 | हेही लक्षात घ्या की काही ऊर्जा भाग वातावरणात पसरतात. |
04:09 | नंतर, पाणी थंड करण्यासाठी हीट रेग्युलेटरचा slider खालच्या दिशेने ड्रॅग करून धरून ठेवा. |
04:16 | तापमान कमी होत असताना, पाणी गोठते आणि बर्फ बनते. |
04:22 | कंटेनर ड्रॅग करा आणि workbench वर ठेवा. |
04:26 | आता Iron ब्लॉक ड्रॅग करा आणि पहिल्या स्टँडवर ठेवा. |
04:31 | थर्मामीटर ड्रॅग करून Iron ब्लॉकवर ठेवा. |
04:35 | Brick ब्लॉक आणि Water कंटेनर एका बाजूला हलवा. |
04:40 | गरम करायला सुरू करण्यापूर्वी, Iron ब्लॉकमधील उर्जा भागांची संख्या लक्षात ठेवा. |
04:46 | थर्मामीटरवर तापमानाचे निरीक्षण करा. |
04:50 | Iron ब्लॉक गरम करण्यासाठी हीट रेग्युलेटरचा स्लाइडर वरच्या दिशेने ड्रॅग करून होल्ड करा. |
04:56 | लक्षात घ्या, उष्णतेपासून उर्जा Iron ब्लॉकमधील उर्जा भागांमधे संक्रमित केली जाते. |
05:03 | येथे, Iron ब्लॉकची अंतर्गत उर्जा वाढते. |
05:08 | हे उष्णतेच्या स्त्रोतापासून Iron ब्लॉककडे जाणाऱ्या उष्णतेच्या प्रवाहामुळे होते. |
05:13 | Iron ब्लॉकमधील काही उर्जा भाग वातावरणात पसरल्याचे लक्षात घ्या. |
05:19 | त्यामुळे Iron ब्लॉकचे तापमान कमी होते. |
05:25 | पुन्हा Iron ब्लॉकला जास्तीत जास्त तापमानात गरम करा. |
05:29 | गरम केलेला Iron ब्लॉक ड्रॅग करा आणि Water कंटेनरमध्ये ठेवा. |
05:34 | उर्जा भाग गरम Iron ब्लॉककडून पाण्यात प्रवास करतात. |
05:39 | यामुळे Iron ब्लॉकचे तापमान कमी होते. |
05:44 | पाणी गरम होऊन पाण्याचे तापमान वाढते. |
05:49 | ही उष्णता संक्रमण प्रक्रिया पदार्थांमधे औष्णिक संतुलन होईपर्यंत चालूच राहते. |
05:55 | प्रक्रिया वेगाने करण्यासाठी Fast Forward पर्याय निवडू. |
06:03 | आता पुन्हा हीट रेग्युलेटरवर Iron ब्लॉक ठेवा. |
06:08 | Iron ब्लॉक थंड करण्यासाठी स्लाइडर खाली ड्रॅग करून होल्ड करा. |
06:13 | थर्मामीटर किमान तापमानात पोहोचेपर्यंत Iron ब्लॉक थंड करा. |
06:19 | पुन्हा थंड झालेला Iron ब्लॉक Water कंटेनरमध्ये ठेवा. |
06:23 | तापमानात झालेले बदल आणि ऊर्जा भागांचे झालेले संक्रमण लक्षात घ्या. |
06:29 | आता दोन्ही ब्लॉक्स स्टँडवर ठेवा. |
06:33 | थर्मामीटर ड्रॅग करून Brick ब्लॉकवर ठेवा. |
06:37 | तापमानात जास्तीत जास्त वाढ होताना दिसेपर्यंत ब्लॉक एक-एक करून गरम करा. |
06:44 | थर्मल संतुलन स्थापित होईपर्यंत प्रतीक्षा करा. तापमान कमी होत असल्याचे निरीक्षण करा. |
06:53 | Iron ब्लॉकमध्ये Brick ब्लॉकपेक्षा जास्त संख्येने उर्जा भाग आहेत हे लक्षात घ्या. |
06:59 | Iron मध्ये Brick पेक्षा जास्त औष्णिक वाहकता असल्याचे सूचित होते. |
07:05 | असाईनमेंट म्हणून:
Iron ब्लॉक आणि Brick ब्लॉक यांना एकाच वेळी उष्णता द्या. |
07:13 | गरम Brick ब्लॉकच्यावर गरम Iron ब्लॉक ठेवा आणि निरीक्षण करून स्पष्टीकरण द्या. |
07:20 | आता आपण Energy Systems स्क्रीनवर जाऊ. |
07:24 | Energy Systems टॅबवर क्लिक करा. |
07:27 | Energy Systems स्क्रीन उघडेल. |
07:31 | हा स्क्रीन दररोजच्या जीवनातील उर्जेच्या अक्षय्यतेबद्दल कल्पना देतो. |
07:38 | स्क्रीनच्या तळाशी उर्जा स्त्रोतांचा एक संच, |
07:43 | विद्युत ऊर्जानिर्मिती प्रणाली आणि रिसीव्हर्स आहेत. |
07:50 | Reset All बटण स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात उपलब्ध आहे. |
07:56 | डीफॉल्ट स्वरूपात, स्क्रीनमध्ये ऊर्जा स्त्रोत म्हणून नळ, |
08:02 | विद्युत ऊर्जानिर्मिती प्रणाली म्हणून टर्बाइन आणि थर्मामीटर बसवलेला Water कंटेनर रिसीव्हर म्हणून दाखवला जातो. |
08:10 | Energy Symbols चेकबॉक्सवर क्लिक करा. |
08:14 | Forms of Energy पॅनेल दिसेल. |
08:18 | Forms of Energy पॅनेल आपल्याला उर्जेचे विविध प्रकार ओळखण्यास मदत करते. |
08:24 | नळ चालू करण्यासाठी आता निळा स्लायडर ड्रॅग करा. |
08:28 | नळातून वाहणार्या पाण्यात यांत्रिक ऊर्जा आहे हे लक्षात घ्या. |
08:34 | या यांत्रिक ऊर्जेमुळे टर्बाइन फिरते ज्यामुळे विद्युत ऊर्जा तयार होते. |
08:40 | या उर्जेमुळे पाण्याचे तापमान वाढते. |
08:45 | तापमान वाढत असताना, पाण्याचे बाष्पीभवन होते आणि वाफ दिसते. |
08:51 | हे वातावरणात अधिक औष्णिक ऊर्जा देते. |
08:56 | येथे, सिस्टीमची संपूर्ण ऊर्जा स्थिर राहिल्यामुळे ऊर्जा अक्षय्यता पाळली गेली आहे. |
09:02 | चला आणखी एक ऊर्जा प्रणाली स्थापित करूया. |
09:06 | येथे आपण सूर्य हा उर्जा स्त्रोत म्हणून निवडू. |
09:11 | टर्बाइन काढून तिथे सोलर पॅनेल लावा. |
09:14 | आता Water कंटेनरऐवजी इनकँडेसंट बल्ब निवडा. |
09:20 | या प्रणालीमध्ये सुरुवातीला ढग नसतो. |
09:24 | येथे, सूर्य हा प्रकाश उर्जेचा स्रोत आहे. |
09:28 | ही उर्जा सोलर पॅनेलद्वारे विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी शोषली जाते. |
09:34 | या विद्युत उर्जेमुळे बल्ब प्रकाशमान होतात. |
09:38 | इनकँडेसंट बल्ब विद्युत ऊर्जेचे अधिक प्रमाणात औष्णिक उर्जेत आणि अगदी कमी प्रमाणात प्रकाश ऊर्जेत रूपांतर करतो. |
09:47 | कारण फिलामेंट गरम होत असते. |
09:51 | आता इनकँडेसंट बल्बच्या जागी फ्लोरोसंट बल्ब लावा. |
09:56 | फ्लोरोसंट बल्बच्या उर्जा निर्मितीचे निरीक्षण करा. |
10:00 | लक्षात घ्या की फ्लोरोसंट बल्ब अधिक प्रकाश उर्जा आणि कमी औष्णिक ऊर्जा देत आहे. |
10:07 | म्हणून फ्लोरोसंट बल्ब अधिक कार्यक्षम आहे. |
10:11 | आता सोलर पॅनेलवर ढगांचा परिणाम पाहूया. |
10:15 | Clouds स्लायडर None ते Lots असा हळूहळू ड्रॅग करा. |
10:20 | स्लाइडर ड्रॅग करताच ढग दिसू लागतील. |
10:24 | ढगांच्या उपस्थितीमुळे, सोलर पॅनेलवर प्रकाश उर्जा पोहोचत नाही. |
10:30 | म्हणून विद्युत उर्जेची निर्मिती थांबते. |
10:34 | असाईनमेंट म्हणून:
cycle-generator system निवडा. |
10:41 | पायडल मारण्यासाठी सायकलस्वाराने खाणे का गरजेचे आहे हे सांगा. |
10:47 | वेगवेगळ्या सिस्टीम्स सेट करा आणि त्या काही काळ चालू राहू द्या. |
10:52 | प्रत्येक यंत्रणेतील उर्जेतील बदलांचे निरीक्षण करा आणि आपली निरीक्षणे तक्त्यात लिहा. |
10:59 | थोडक्यात, |
11:02 | एनर्जी फॉर्म्स आणि चेंजेस यावरील PhET सिम्युलेशन कसे वापरायचे हे या पाठात पाहिले. |
11:11 | सिम्युलेशन वापरून आपण शिकलो,
1. वास्तविक जीवनातील उर्जेची अक्षय्यता. |
11:19 | 2. विविध पदार्थांच्या औष्णिक वाहकतेची तुलना करणे.
|
11:24 | 3. उर्जेच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल माहिती घेणे.
|
11:27 | सिम्युलेशन वापरून आपण,
1. पदार्थ गरम किंवा थंड होत असता ऊर्जेचे वहन कसे होते हे पाहिले.
|
11:35 | 2. उर्जा प्रणालीचा आराखडा बनवला. |
11:38 | 3. ऊर्जा एका रूपातून दुसर्या रूपात कशी बदलते हे अभ्यासले. |
11:43 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
11:52 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
|
12:01 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
12:05 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
12:09 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. |
12:17 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:29 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |