Difference between revisions of "PhET/C2/Equation-Grapher/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
m |
||
Line 276: | Line 276: | ||
|| 07:24 | || 07:24 | ||
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | ||
− | ऑनलाईन परीक्षा | + | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. | ||
Latest revision as of 15:09, 9 January 2020
Time | Narration |
00:01 | Equation Grapher वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात, Equation Grapher या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
|
00:13 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04, |
00:21 | जावा वर्जन 1.8,
|
00:25 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे.
|
00:31 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील गणिताचे ज्ञान असावे.
|
00:36 | हे सिम्युलेशन वापरून आपण बघणार आहोत-
y = bx + c आणि y = c या प्रकारातल्या रेषा |
00:47 | Quadratic बहुपदी y बरोबर a x चा वर्ग अधिक bx अधिक c |
00:53 | Binomial म्हणजे द्विपदी प्रमेय
a आणि b ह्या वास्तव संख्या असून index n हा धन पूर्णांक आहे. |
01:02 | r हा शून्य आणि n च्या मधे असतो. Binomial प्रमेय सांगते की a अधिक b चा n वा घात दाखवल्याप्रमाणे विस्तारित करता येतो. |
01:14 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
|
01:19 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Equation Grapher हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
|
01:26 | jar फाईल उघडण्यासाठी टर्मिनल उघडा. |
01:30 | टर्मिनल प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा. |
01:37 | java space hyphen jar space equation-grapher_en.jar टाईप करून
एंटर दाबा. |
01:50 | ब्राऊजरमधे html फॉरमॅटमधे फाईल उघडेल. |
01:55 | हा Equation Grapher सिम्युलेशनचा इंटरफेस आहे. |
02:00 | हा इंटरफेस x आणि y अक्षांची कार्टेशियन को-ऑर्डिनेट सिस्टीम दर्शवेल. |
02:07 | पहिल्या क्वाड्रंटमधे लाल रंगात y बरोबर ax चा वर्ग अधिक bx अधिक c हे वर्ग समीकरण आहे. |
02:16 | तीन स्लायडर्स आणि ax2, bx आणि c खाली डिस्प्ले बॉक्सेस आहेत. |
02:24 | स्लायडर्सद्वारे, a, b आणि c ह्या सहगुणकांच्या व्हॅल्यूज बदलता येतात. |
02:32 | डिस्प्ले बॉक्सेस ह्या व्हॅल्यूज दाखवतात तसेच त्यामधे आपण व्हॅल्यूज भरू शकतो. |
02:39 | लाल रंगाचे Zero हे बटण सर्व स्लायडर्स शून्यावर सेट करते. |
02:44 | समीकरण सेव्ह करण्यासाठी हिरव्या रंगाचे Save बटण आहे. |
02:48 | स्लायडर्सखाली लाल रंगात नवे तयार झालेले समीकरण दिसेल. |
02:53 | चौथ्या क्वाड्रंटमधे y = ax2+bx+c हे वर्ग समीकरण आहे. |
03:01 | ax2, bx आणि c खाली तीन चेकबॉक्स आहेत. |
03:07 | लक्षात घ्या, a x चा वर्ग हे पद जांभळ्या रंगात, bx हिरव्या आणि c हे निळ्या रंगात आहे. |
03:15 | पहिल्या क्वाड्रंटमधे, a x चा वर्ग या पदाखालील डिस्प्ले बॉक्समधे 1 टाईप करा. |
03:21 | a x चा वर्ग या पदाखालचा स्लायडर कसा 1 वर सरकला याचे निरीक्षण करा. |
03:27 | शून्य कॉमा शून्य या आरंभबिंदूवर शिरोबिंदू असलेला एक लाल रंगाचा पॅराबोला विंडोमधे दिसेल.
हा वरती उघडत आहे. |
03:37 | पहिल्या क्वाड्रंटमधे bx खालील डिस्प्ले बॉक्समधे 1 टाईप करा. |
03:43 | पॅराबोला डाव्या बाजूला खाली सरकलेला दिसेल. |
03:49 | पहिल्या क्वाड्रंटमधे c खालील डिस्प्ले बॉक्समधे 1 टाईप करा. |
03:55 | पॅराबोला वरच्या बाजूला सरकलेला दिसेल. |
03:59 | चौथ्या क्वाड्रंटमधे जांभळ्या रंगात असलेल्या a x चा वर्ग या पदाखालील बॉक्सवर क्लिक करा. |
04:06 | लाल रंगाच्या पॅराबोलापुढे जांभळ्या रंगाचा पॅराबोला दिसेल. |
04:11 | हा जांभळा पॅराबोला, लाल रंगाच्या y बरोबर ax चा वर्ग या समीकरणाच्या भागाशी संबंधित आहे. |
04:20 | जांभळ्या रंगाच्या पॅराबोलाचे y बरोबर x वर्ग हे समीकरण आहे.
|
04:26 | आता चौथ्या क्वाड्रंटमधे हिरव्या रंगाच्या bx या पदाखालील चेकबॉक्सवर क्लिक करा.
|
04:32 | कार्टेशियन प्रतलात हिरव्या रंगाची रेष आपल्याला दिसेल. |
04:38 | ही आरंभबिंदू शून्य कॉमा शून्य मधून जात आहे.
तिचा संबंध y बरोबर x समीकरणातील x पदाशी आहे. |
04:50 | आता चौथ्या क्वाड्रंटमधे निळ्या रंगातील c या पदाखालील चेकबॉक्सवर क्लिक करा. |
04:56 | कार्टेशियन प्रतलात निळ्या रंगाची रेष आपल्याला दिसेल.
|
05:01 | तिचे समीकरण y बरोबर c आहे आणि तिचा संबंध समीकरणातील स्थिर पदाशी आहे. |
05:12 | हिरव्या Save बटणावर क्लिक करा. |
05:15 | हे y बरोबर x चा वर्ग अधिक x अधिक 1 हे समीकरण सेव्ह करेल. |
05:22 | a, b आणि c च्या व्हॅल्यूज बदला. |
05:30 | तुम्ही स्लायडर्स वापरू शकता किंवा पदांखाली दिलेल्या डिस्प्ले बॉक्सेसमधे टाईप करू शकता. |
05:36 | या बदलांचे परिणाम आलेखांवर पहा. |
05:41 | लक्षात घ्या, जरी a, b आणि c च्या व्हॅल्यूजमधे बदल केला तरी तुम्ही अजूनही y बरोबर x चा वर्ग अधिक x अधिक 1 हा पॅराबोला बघू शकता.
कारण आपण हे समीकरण सेव्ह केले होते. |
05:58 | a, b आणि c च्या परिणामांची तुलना बघण्यासाठी इतर आलेख सेव्ह करा.
आपण एकावेळी केवळ एक समीकरण सेव्ह करू शकतो. |
06:09 | समीकरण सेव्ह केल्यानंतर निळ्या रंगाचे Erase बटण दिसेल.
हे सेव्ह केलेले समीकरण पुसेल. |
06:19 | लाल रंगाच्या Zero बटणावर क्लिक करा.
हे a, b आणि c हे सर्व सहगुणक शून्यावर रिसेट करेल. |
06:30 | असाईनमेंट म्हणून, वेगवेगळी काँबिनेशन्स वापरून पॅराबोलाची तुलना करा:
a <0 आणि a >0 b <0 आणि b >0 c <0 आणि c >0 |
06:51 | या पाठात, Equation Grapher या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक पाहिले. |
06:58 | सिम्युलेशन वापरून आपण पाहिले,
y = bx + c आणि y = c या प्रकारातल्या रेषा |
07:08 | y = ax2+ bx + c ही Quadratic बहुपदी |
07:15 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
07:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
|
07:37 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
07:41 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. |
07:49 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
08:02 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |