Difference between revisions of "PhET/C3/Fluid-pressure-and-flow/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
m
Line 578: Line 578:
 
|-
 
|-
 
|| 12:44
 
|| 12:44
|| दिलेली  गणिते सोडवू.
+
|| दिलेले गणित सोडवू.
  
 
|-
 
|-

Revision as of 14:26, 10 December 2019

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Fluid Pressure and Flow या पाठात आपले स्वागत.


00:06 या पाठात, Fluid Pressure and Flow , या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.


00:12 या पाठासाठी मी वापरत आहे. :

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04


00:19 जावा वर्जन 1.8.0
00:23 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:30 हे सिम्युलेशन वापरून, वातावरणाच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत दाबात झालेला बदल पाहू.
00:39 वेगवेगळ्या घनतेच्या द्रवांच्या दाबांतील बदल पाहू.
00:43 बर्नौलीचा सिद्धांत बघू.
00:46 टाकीच्या तळाशी असलेला दाब काढू.


00:50 द्रव प्रवाहाचा गतीमार्ग (trajectory) पाहू.


00:54 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.


00:58 मी डाउनलोड्स फोल्डरमधे सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.
01:03 हे सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा.
01:07 प्रॉम्प्टवर cd space Downloads टाईप करून एंटर दाबा.


01:15 java space hyphen jar space fluid hyphen pressure hyphen and hyphen flow underscore en dot jar टाईप करून एंटर दाबा.
01:29 Fluid Pressure and Flow simulation उघडेल.
01:33 इंटरफेसमध्ये तीन टॅब आहेत.
01:36 स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपल्याकडे तीन बटणे आहेत.
01:40 प्रत्येक बटणावर क्लिक केल्यावर एक वेगळी भूमिगत टाकी उघडेल.
01:45 पहिल्या बटणावर क्लिक करा.
01:48 नळ आणि टाकी दिसणारा स्क्रीन उघडेल.
01:53 पाण्याने टाकी भरण्यासाठी नळाच्या स्लाइडरवर क्लिक करून ड्रॅग करा.
01:58 द्रवपदार्थ काढून टाकण्यासाठी टाकीच्या तळाशी दिलेले आउटलेट पहा.
02:04 द्रवपदार्थ काढून टाकण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा.
02:08 टाकीमध्ये प्रेशर गेज ड्रॅग करून द्रवाला स्पर्श करून ठेवा.


02:14 Fluid Density बॉक्सचा विस्तार करण्यासाठी हिरव्या प्लस बटणावर क्लिक करा.
02:20 लक्षात घ्या की Fluid Density स्लाइडरमध्ये तीन भिन्न द्रव आहेत.
02:26 स्लाइडर पेट्रोलवरून मधापर्यंत ड्रॅग करा.
02:30 ड्रॅग करत असताना Fluid Density मधील बदलाचे निरीक्षण करा.
02:36 Fluid density बॉक्समध्ये 700 ते 1420 किलो प्रति घनमीटर पर्यंत किंमती बदलू शकतो.
02:45 Fluid density बॉक्स बंद करण्यासाठी मायनसच्या लाल बटणावर क्लिक करा.
12:50 Gravity बॉक्स मोठा करण्यासाठी प्लसच्या हिरव्या बटणावर क्लिक करा.
12:55 येथे कमी पासून जास्तपर्यंत Gravity बदलण्यासाठी स्लाइडर देण्यात आला आहे.
03:02 स्लाइडर पृथ्वीवर सेट केला आहे.
03:05 Gravity स्लाइडर ड्रॅग करत असताना दाबात झालेले बदल पहा.
03:11 गुरुत्वाचे मूल्य 1.0 पासून 20 मीटर प्रति सेकंद वर्ग असे बदलले जाऊ शकते.
03:18 Reset All बटणावर क्लिक करा.
03:21 नळाचा स्लाइडर ड्रॅग करून टाकी काठोकाठ भरा.
03:26 लक्षात घ्या की एकदा टाकी पूर्ण भरली की नळाचा स्लाइडर निष्क्रिय होईल.
03:32 ग्रीड रेषा दर्शविण्यासाठी Grid बॉक्स निवडा.
03:36 प्रेशर गेज 0 मीटर रेषेवर ड्रॅग करून ठेवा.
03:41 येथे वातावरणाचा दाब 101.325 kiloPascal आहे.
03:49 Atmosphere Off रेडिओ बटणावर क्लिक करा.
03:53 दाबाचे मूल्य 0.00 KiloPascal आहे.
03:58 Atmosphere On रेडिओ बटणावर क्लिक करा.
04:02 हे वातावरणाच्या उपस्थितीत दाब मोजल्याचे सूचित करते.
04:08 पुढे आपण वेगवेगळ्या द्रवपदार्थांमध्ये दाब मोजू.
04:13 Fluid Density, Depth, आणि Pressure यासाठी सारणी बनवू.
04:19 मापनासाठी प्रेशर गेज 1 मीटरवर ड्रॅग करा.
04:24 मूल्याची नोंद करा.
04:27 तसेच प्रेशर गेज 2 आणि 3 मीटरपर्यंत ड्रॅग करा आणि मूल्यांची नोंद करा.
04:36 मी टेबलमधे मूल्यांची नोंद केली आहे.
04:40 स्लाइडर पेट्रोलच्या दिशेने ड्रॅग करा.
04:44 आपण घनतेमध्ये बदल केल्यामुळे दाबातील बदलाचे निरीक्षण करा.
04:49 पेट्रोलमधील दाब मोजण्यासाठी प्रेशर गेज 1 मीटरपर्यंत ड्रॅग करा.
04:56 असाइनमेंट म्हणून, द्रवातील विविध खोलीसाठी (depth) दाबांच्या मूल्यांमधील बदल लक्षात घ्या.
05:03 आपले निरीक्षण समजावून सांगा.
05:07 Reset All बटणावर क्लिक करा.
05:10 आता टाकीचा आकार बदलल्यामुळे दाबात झालेला बदल पाहू.
05:16 तिसर्‍या टँक बटणावर क्लिक करा.
05:19 एक भूमिगत बेसिन उघडेल.
05:22 बेसिन दोन भागांमध्ये विभागले गेले आहे.
05:26 लक्षात घ्या की बेसिनच्या डावीकडे नळाऐवजी तीन वजने आहेत.
05:31 500 किलोचे एक आणि 250 किलोची दोन वजने आहेत.
05:37 Units खालील Atmospheres या रेडिओ बटणावर क्लिक करा.
05:42 प्रेशर गेजवरील मूल्य पहा.
05:45 हे 101.300 kiloPascal वरून 0.9998 atmospheres असे बदलले आहे.
05:55 बेसिनमधील उजवीकडील भागात पाण्याला स्पर्श करून प्रेशर गेज ठेवा.
06:00 प्रेशर गेजवरील मूल्य पहा.
06:04 Grid चेक बॉक्स निवडा.
06:07 बेसिनच्या डाव्या भागात 250 किलोचे वजन ठेवा.
06:13 उजव्या भागातील पाण्याच्या पातळीत होणारे बदल पहा.
06:18 डाव्या भागात 500 किलो आणि 250 किलो वजनांची भर घालत रहा.
06:25 आपण वजने वाढवत असताना, उजव्या भागातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे लक्षात घ्या.
06:31 हे हायड्रॉलिक लिफ्टचे तत्व दर्शवते.
06:36 आपण आता Flow टॅब पाहू.
06:39 स्क्रीन उघडण्यासाठी Flow टॅब निवडा.
06:43 या स्क्रीनवर पाण्याची नळी आणि एंड पाईप्स आहेत.
06:49 प्रत्येक एंड पाईपला तीन हँडल्स आहेत.
06:54 एंड पाईपच्या वरच्या आणि खालच्या हँडल्सचा वापर करून पाईपची उंची बदलता येऊ शकते.
07:02 पाईप वर आणि खाली हलविण्यासाठी एंड पाईपच्या मधल्या हँडलवर क्लिक आणि ड्रॅग करू शकतो.
07:09 Flow Rate स्लाइडर ड्रॅग करून आपण फ्लो रेट नियंत्रित करू शकतो.
07:14 आता Flux meter चेक बॉक्स निवडा.
07:17 स्क्रीनवर निळ्या रंगाचे वर्तुळ(रिंग) पिवळ्या रंगाच्या बॉक्ससह दिसत आहे.
07:23 हा बॉक्स Flow Rate, Area आणि Flux च्या किंमती दाखवतो.
07:30 Flux meter वापरुन आपण दिलेल्या क्षेत्रात प्रवेश करणारा एकूण प्रवाह मोजू शकतो.
07:37 पाईपमधून Flux meter ड्रॅग करा.
07:40 वॉटर पाईपच्या आकाराशी जुळवून घेत निळी रिंग आकार बदलते हे पहा.
07:46 रिंग ड्रॅग करत असताना, त्यामधून जात असलेल्या फ्लक्सचे मूल्य पहा.
07:52 रिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाचे प्रमाण रिंगच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
07:59 Flux meter चेकबॉक्स अनचेक करा.
08:03 Friction चेक बॉक्स निवडा.
08:06 ठिपक्यांचा प्रवाह मंदावलेला दिसेल.
08:10 रेड डॉट्स बटण वापरुन काळे ठिपके द्रवात टाकू शकतो.
08:16 Reset All बटणावर क्लिक करा.
08:19 Dots चेक बॉक्स अनचेक करा आणि लाल बटणावर क्लिक करा.
08:26 पाण्याच्या पाइपमध्ये स्पीडमीटर ड्रॅग करा आणि ठेवा.
08:30 तसेच प्रेशर गेज ड्रॅग करून पाण्याच्या पाईपच्या आत ठेवा.
08:35 पाण्याच्या पाईपमधून सर्व ठिकाणी प्रेशर गेज आणि स्पीड मीटर ड्रॅग करा.
08:42 वेगाचे आणि दाबाचे मूल्य एकसमान राहताना दिसेल.
08:48 कारण पाण्याचा प्रवाह सुवाही आहे.
08:52 आकार बदलण्यासाठी पाण्याच्या पाईपच्या दोन्ही बाजूंच्या हँडल्सवर क्लिक आणि ड्रॅग करा.
09:00 खवळलेल्या प्रवाहामध्ये गती आणि दाबातील बदल पहा.
09:05 Flow Rate जास्तीत जास्त वाढवूया.
09:09 अगदी डावीकडे स्पीडमीटर ड्रॅग करा.
09:14 आणि स्पीड 3.5 मीटर प्रति सेकंद असल्याचे पहा.
09:19 स्पीड अदिश परिमाण आहे हे लक्षात घ्या.
09:23 निळा सदिश वेगाच्या दिशेचे प्रतिनिधित्व करतो.
09:27 प्रेशर गेज ड्रॅग करा आणि स्पीड मीटरवर ठेवा.
09:32 दाब 115.896 kiloPascal असल्याचे पहा.
09:38 साधनांमधून आणखी एक स्पीडमीटर ड्रॅग करा आणि पहिल्या रुंद भागात ठेवा.
09:44 रुंद भागातील स्पीड आणि व्हेलॉसिटीतील बदलाकडे लक्ष द्या.
09:49 स्पीड 1.4 मीटर प्रति सेकंदपर्यंत कमी झाला आहे आणि सदिश व्हेलॉसिटी देखील कमी झाली आहे.
09:58 साधनांमधून आणखी एक प्रेशर गेज ड्रॅग करा आणि पहिल्या रुंद भागात ठेवा.


10:04 लक्षात घ्या की दाब 121.528 kiloPascal पर्यंत वाढला आहे.
10:11 येथे असे म्हणू शकतो की दाब वाढत असताना, स्पीड कमी होतो.
10:18 असाईनमेंट म्हणून, पेट्रोल आणि मध वापरल्याने द्रवाची घनता बदलते तेव्हा वेग आणि दाबामधील बदल पहा.
10:29 Water Tower उघडण्यासाठी टॅबवर क्लिक करा.
10:33 या स्क्रीनमध्ये टाकीच्या तळाशी असलेला दाबा मोजू.
10:38 या स्क्रीनमध्ये आपण नळ आणि वॉटर टॉवर पाहू शकतो.
10:43 नळावर दोन रेडिओ बटणे आहेत.
10:47 पाण्याचा प्रवाह सुरू करण्यासाठी Manual आणि प्रवाह थांबविण्यासाठी Match Leakage.
10:53 स्क्रीनच्या उजव्या बाजूस असलेला Measuring Tape चेक बॉक्स निवडा.
10:59 टेपच्या सहाय्याने टँकची उंची मोजा.
11:04 उंचीच्या मूल्याची नोंद करा.
11:07 टाकी पूर्ण भरण्यासाठी Fill बटणावर क्लिक करा.
11:12 दाब मोजण्यासाठी टाकीच्या इनलेटवर प्रेशर गेज ठेवा.
11:17 पृष्ठभागावरील दाबाचे मूल्य लक्षात घ्या.
11:22 दिलेले गणित सोडवू.
11:25 घन आकाराची टाकी 10.42 मी उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे.
11:32 टाकीच्या तळाशी कार्य करणारा दाब शोधा.
11:36 वातावरणाचा दाब 102.3 kPa आहे.
11:40 पाण्याची घनता 1000 kg/m3 आहे. g= 9.81 m/sec2 घ्या.
11:51 टाकीच्या तळाशी प्रेशर गेज क्लिक करून ड्रॅग करा.
11:56 टाकीच्या तळाशी 198.1 kiloPascal दाब दिसेल.
12:05 P=P0+hρg हे सूत्र वापरून टाकीच्या तळाशी असलेला दाब मोजा.
12:14 दिलेल्या सूत्रात गणितातील किंमती लिहा.
12:19 लक्षात घ्या की दाबाचे मूल्य न्यूटन मध्ये रूपांतरित झाले आहे.
12:24 टाकीच्या तळाशी असलेल्या दाबाची किंमत 204.5 kPa आहे.
12:32 आता आपण मोजलेल्या मूल्याची तुलना निरीक्षण केलेल्या दाबाशी करू.
12:37 लक्षात घ्या सिम्युलेशनमधे पाहिलेला दाब आणि सूत्राने काढलेली किंमत जवळपास सारखी आहे.
12:44 दिलेले गणित सोडवू.
12:47 Reset All बटणावर क्लिक करा.
12:51 आता Hose ची स्थिती बदलून पाण्याचा प्रवाह पाहू.
12:57 टाकी भरण्यासाठी Fill बटणावर क्लिक करा.
13:00 प्रथम केशरी स्लाइडरशी Hose अलाइन करा.
13:04 केशरी स्लाइडर उघडा.
13:07 Hose आधी वर आणि नंतर खाली ड्रॅग करा.
13:11 द्रव प्रवाहाचा गती मार्ग पहा.
13:15 येथे द्रवाची खोली कमी होत असताना द्रवाचा गती मार्ग बदलतो.
13:22 थोडक्यात,
13:24 या पाठात, Fluid Pressure and Flow , या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघितले.


13:31 हे सिम्युलेशन वापरून, वातावरणाच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत दाबात झालेला बदल पाहिला.


13:39 वेगवेगळ्या घनतेच्या द्रवांचा दाब पाहिला.
13:43 बर्नौलीचा सिद्धांत पाहिला.
13:46 टाकीच्या तळाशी असलेल्या दाबाची गणना केली.
13:50 द्रवाचा गतीमार्ग बघितला.


13:54 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
13:59 हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


14:02 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


14:11 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


14:15 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
14:19 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


14:27 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


14:34 अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


14:39 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.


14:42 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali