Difference between revisions of "Arduino/C2/Display-counter-using-Arduino/Marathi"
(Created page with "{| Border = 1 | '''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | ''' Display counter using Arduino''' वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये...") |
|||
Line 162: | Line 162: | ||
| 05:07 | | 05:07 | ||
| जेव्हा तुम्ही बटण सोडता, तेव्हा स्थिती '''LOW''' असते आणि ते '''while loop''' च्या बाहेर येईल. | | जेव्हा तुम्ही बटण सोडता, तेव्हा स्थिती '''LOW''' असते आणि ते '''while loop''' च्या बाहेर येईल. | ||
− | |||
|- | |- |
Latest revision as of 18:19, 6 December 2018
Time | Narration |
00:01 | Display counter using Arduino वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकणार आहोत:
Arduino बोर्डला LCD आणि Push button जोडणे. जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा गणना वाढवण्यासाठी एक प्रोग्रॅम लिहिणे. |
00:22 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे आणि C किंवा C++ प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. |
00:34 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Arduino UNO Board, उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Arduino IDE वापरत आहे. |
00:47 | आधीच्या ट्युटोरियलमध्ये, या सिरीजमध्ये Arduino आणि LCD वापरून एक सर्किट तयार केले होते. या ट्युटोरिअलमध्ये आपण तोच circuit वापरूया. |
01:00 | इथे आपण एक pushbutton जोडूया आणि एक साधा counter बनवूया. |
01:06 | आधीच्या ट्युटोरिअलमध्ये आपण pushbutton च्या कामाबद्दल आधीच शिकलो आहोत. |
01:12 | आता circuit तपशीलचे कनेक्शन शिकूया. |
01:17 | pushbutton 100 ohm resistor शी जोडलेले आहे. |
01:22 | pushbutton हे पिन क्रमांक 7 शी जोडलेले आहे आणि 100 ohm resistor ground शी जोडलेले आहे. |
01:31 | इतर सर्व कनेक्शन्स अगदी आपल्यला मागील प्रयोगाप्रमाणेच आहेत. |
01:37 | सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हे कनेक्शनचे थेट सेटअप आहे. |
01:44 | आता आपण Arduino IDE मध्ये एक प्रोग्राम लिहू. त्यामुळे आपण Arduino IDE वर जाऊ. |
01:54 | प्रथम आपल्याला Liquid crystal library समाविष्ट करण्याची गरज आहे. |
01:59 | दाखवल्याप्रमाणे code टाईप करा. |
02:02 | मी lcd चा प्रकार LiquidCrystal व्हेरिएबलच्या सुरूवात केली आहे. |
02:08 | येथे सुरवातीस पिन क्रमांक 12 रजिस्टर मध्ये निवडतांना पिन क्रमांक 11 पण सक्षम होते. |
02:19 | पुढचे 4 पॅरामीटर्स LCD चे डेटा लाईन्स प्रतिनिधित्व करतात. |
02:25 | दाखवल्याप्रमाणे void setup फंक्शनमध्ये टाईप करा: lcd.begin 16 comma 2
हे कमांड LCD ला रोज आणि कॉलम्ससह सुरवात करते. |
02:41 | पुढे आपण INPUT म्हणून पिन क्रमांक 7 सेट अप केले आहे. दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. |
02:49 | दुसर्या प्रकारे, आपण पिन क्रमांक pbutton व्हेरिएबलमध्ये संग्रहित करू शकतो.
दर्शविल्याप्रमाणे pbutton व्हेरिएबल परिभाषित करू. |
03:01 | आता आपण void loop साठी कोड लिहू.
जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा LCD वर एक संख्या वाढवली जाते. |
03:11 | pushbutton दाबले आहे कि नाही हे तपासण्यासाठी आपण एक साधा 'if' statement लिहू. |
03:19 | गणना दर्शविण्यापूर्वी, बटणांची स्थिती तपासू. |
03:25 | हा कमांड कर्सरची स्थिती LCD मध्ये सेट करेल.
lcd.print हे मेसेज प्रिंट करेल. |
03:35 | आता आपण प्रोग्रॅम कंपाइल करून अपलोड करू. आता मी pushbutton दाबेल. |
03:43 | इथे आपल्याला LCD मध्ये “button pressed” मेसेज दिसेल.
हे दर्शविते की pushbutton यशस्वीरित्या कार्यरत आहे. |
03:54 | पुढे आपण counter सेट करण्यासाठी प्रोग्राम बदलू. |
03:58 | आपल्याला काउंटरसाठी व्हेरिएबलची गरज आहे. आता आपण व्हेरिएबलचा count शुन्यवर सुरूवात करू या. |
04:08 | येथे दर्शविल्याप्रमाणे print स्टेटमेंट बदला.
count++ हे बटण दाबल्यावर प्रत्येक वेळी मोजणी एकने वाढेल. |
04:21 | आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करू. आता मी pushbutton दाबेल. |
04:29 | अपेक्षेप्रमाणे ते काम करत नाही. येथे दाखवल्याप्रमाणे गणना वेगळी दिसते.
असे का आहे? |
04:37 | याचे कारण असे की आपण दाबलेल्या बटणाची स्थिती निर्दिष्ट केली आहे.
पण आपण बटण सोडण्यासाठी स्थितीचा उल्लेख केलेला नाही. |
04:46 | आउटपुट हे बटण दाबलेल्या वेळेवर आधारित वाढीव संख्या दर्शविते. |
04:52 | तर येथे दर्शविल्याप्रमाणे आपण while statement लिहू. |
04:57 | जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा गणना प्रदर्शित होईल.
याचा अर्थ pin 7 HIGH मोडमध्ये आहे. |
05:07 | जेव्हा तुम्ही बटण सोडता, तेव्हा स्थिती LOW असते आणि ते while loop च्या बाहेर येईल. |
05:14 | मी प्रोग्राम समजावून सांगते. |
05:17 | प्रोग्राम LCD च्या सुरूवातीस सुरु होतो. आपल्याकडे व्हेरिएबल pbutton आणि count आहे. |
05:26 | void setup फंक्शनच्या आत, आम्ही 16 कॉलम्ससह आणि 2 रोजसह LCD सुरू केले आहे.
नंतर pinMode, पिन क्रमांक 7 साठी इनपुट आहे. |
05:42 | void loop फंक्शनमध्ये, आम्ही pushbutton, HIGH आहे की नाही हि स्थिती तपासत आहोत. |
05:49 | जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा कर्सरची स्थिती जिरो कॉमा जिरो वर सेट केले जाते. |
05:56 | lcd.print स्टेटमेंट काउन्ट व्हॅल्यू प्रिंट करेल.
सुरवातीचा count शुन्य आहे. Count plus plus 1 असेल. |
06:09 | जेव्हा बटण सोडले जाते, तेव्हा ते while loop खंडित करते आणि लूपमधून बाहेर पडते. |
06:15 | पुन्हा, तुम्ही बटण दाबल्यास, पुढील आयट्रेशन सुरू होते आणि ते गणना वाढवते. |
06:23 | आपण प्रोग्रॅम कंपाइल करून अपलोड करू. |
06:27 | आता मी एकदा बटण दाबेल आणि त्यास सोडून देईल. |
06:32 | पुन्हा मी बटण दाबेन आणि सोडून देईल. तुम्ही पाहू शकता की जेव्हा बटण दाबले जाते तेव्हा गणना वाढते. |
06:42 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात |
06:47 | या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो:
Arduino बोर्डला LCD आणि Push button जोडणे. जेव्हा pushbutton दाबले जाते तेव्हा गणना वाढवण्यासाठी एक प्रोग्रॅम लिहिणे. |
07:03 | पुढील असाइन्मेंट करा.
काउन्ट 2,4,6 इतका प्रदर्शित करण्यासाठी समान प्रोग्राम बदला. प्रोग्रॅम कंपाइल करून अपलोड करा. आणि LCD मध्ये प्रदर्शित काउन्टला पहा. |
07:21 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
07:29 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम:
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:38 | कृपया या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
07:42 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:53 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |