Difference between revisions of "Linux-Old/C2/Synaptic-Package-Manager/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (Nancyvarkey moved page Linux/C2/Synaptic-Package-Manager/Marathi to Linux-Old/C2/Synaptic-Package-Manager/Marathi without leaving a redirect)
 
(No difference)

Latest revision as of 17:01, 6 September 2018

Time Narration
00:00 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरवरील या स्पोकन ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमधे आपण, उबंटू मध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून applications Install करण्यास शिकणार आहोत.
00:17 हे ट्युटोरियल समजावून घेण्यासाठी आपण उबंटू १०.०४ आणि GNOME चा डेस्कटॉप वापरणार आहोत.
00:24 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरण्यासाठी तुम्हाला administrativeअधिकार असायला हवा.
00:29 तसेच यासाठी इंटरनेट connection चालू असणे आवश्यक आहे. प्रथम आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडू या.
00:36 त्यासाठी सिस्टिममधून Administration ला जाऊन सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वर क्लिक करा.
00:47 येथे Authentication डायलॉग बॉक्स आला असून Password विचारला आहे.
00:55 पासवर्ड Type करून एंटर की दाबूया.
01:06 आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर प्रथमच वापरत असाल तर त्याचा परिचय करून देणारी dialog box दिसेल.
01:13 त्यामध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरचा उपयोग कसा करावा याची माहिती आहे.
01:20 application किंवा package स्थापित म्हणजेच Install करण्यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमधे प्रॉक्झी आणि रिपॉझिटरीची योजना करू या.
01:29 यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर विंडोमधे जाऊ या.
01:36 कृपया सेटींगमधे जाऊन प्रेफरन्सेस वर क्लिक करा.
01:44 प्रेफरन्स विंडोमधे असणारे अनेक टॅब्ज स्क्रीनवर दिसतील. प्रॉक्झी सेटींग कॉंन्फिगर करण्यासाठी ’नेटवर्क’वर क्लिक करा.
01:55 प्रॉक्झी सर्व्हर अंतर्गत ‘डायरेक्ट कनेक्शन’ व ‘मॅन्युअल प्रॉक्झी कनेक्शन’ असे दोन पर्याय असतात. मी इथे ‘मॅन्युअल प्रॉक्झी कनेक्शन’ वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडून ऑथेंटिकेशन बटणावर क्लिक करा. आता HTTP ऑथेंटिकेशन विंडो स्क्रीनवर येईल.
02:21 आवश्यकता भासल्यास User चे नाव व Password टाईप करून ‘ओके’ बटण क्लिक करा. आता बदल लागू होण्यासाठी ‘अप्लाय’ हा पर्याय निवडा. विंडो बंद करण्यासाठी ‘ओके’ बटण क्लिक करा.
02:38 आता परत ‘सेटिंग’ मधे जाऊन ‘रिपॉझिटरीज’ वर क्लिक करा.
02:46 सॉफ्टवेअर सोर्सेस ही विंडो स्क्रीनवर येईल.
02:51 डाऊनलोड करण्यासाठी उबंटू सॉफ्टवेअर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. ‘डाऊनलोड फ्रॉम’ या ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. माऊसचे बटण तसेच दाबून ठेवा. रिपॉझिटरीजची यादी दिसेल.
03:05 ‘Other..’ मधून जगभरातील सर्व्हर्सची यादी बघता येते.
03:12 ही विंडो बंद करण्यासाठी ‘कॅन्सल’ हा पर्याय निवडा. मी इथे दाखवल्याप्रमाणे ‘सर्व्हर फॉर इंडीया’ वापरत आहे. ‘सॉफ्टवेअर सोर्सेस’ ही विंडो बंद करण्यासाठी ‘क्लोज’ वर क्लिक करा.
03:26 हे टूल कसे वापरावे हे शिकवताना उदाहरण म्हणून मी व्ही.एल.सी.प्लेअर Install करत आहे.
03:34 जर तुम्ही सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर पहिल्यांदा वापरत असाल, तर तुम्हाला पॅकेजेस रीलोड करावी लागतील. हे करण्यासाठी टूलबार वरील ‘रीलोड’ चे बटण दाबा. यासाठी काही सेकंद लागतील. येथे इंटरनेटवरून पॅकेजेस स्थलांतरीत आणि updatedहोताना दिसतील.
03:59 रीलोडींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, टूलबारवर असणाऱ्या quick search बॉक्समध्ये जाऊन व्ही.एल.सी असे लिहा.
04:14 इथे आपल्याला व्ही.एल.सी. च्या सर्व पॅकेजेसची यादी मिळेल.
04:19 व्ही.एल.सी. पॅकेज निवडण्यासाठी चेक बॉक्सवर क्लिक करा, आणि मेनूबारमधून ‘मार्क फॉर इनस्टॉलेशन’ हा पर्याय निवडा.
04:34 रीपॉझिटरी पॅकेजेसची यादी दाखवणारा डायलॉग बॉक्स येईल. सर्व संबंधीत आवश्यक पॅकेजेस आपोआप निवडली जाण्यासाठी ‘मार्क’ चा पर्याय निवडा.
04:46 टूलबारवर जाऊन ‘अप्लाय’ चा पर्याय निवडा.
04:52 Install करायच्या सर्व पॅकेजेसचा तपशील दाखवणारी विंडो दिसेल. Installation सुरू करण्यासाठी ‘अप्लाय’ या बटणावर क्लिक करा.
05:05 पॅकेजेसची संख्या व आकार यानुसार Installation प्रक्रियेस काही मिनिटांचा अवधी लागेल.
05:25 Installation प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ’डाऊनलोडिंग पॅकेज फाईल’ अशा मजकूराची विंडो बंद होईल.
05:43 बदल घडून येत असल्याचे आपल्याला दिसेल.
06:00 व्ही.एल.सी. हे Application स्थापित झालेले आपल्याला दिसेल. ‘सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर’ बंद करुया.
06:09 आता व्ही.एल.सी प्लेअर यशस्वीपणे स्थापित झाला आहे का ते पाहू.
06:15 यासाठी अॅ्प्लिकेशन्समधून साऊंड अॅण्ड व्हिडिओ मध्ये जाऊ या. इथल्या यादीत आपल्याला व्ही.एल.सी. मिडिया प्लेअर दिसेल. अर्थात, व्ही.एल.सी यशस्वीपणे स्थापित झालेला आहे. यापद्धतीने सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून आपण कोणतेही Application Install करू शकतो.
06:36 थोडक्यात, या ट्युटोरियलमधे आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमध्ये प्रॉक्झी आणि रिपॉझिटरी कॉन्फिगर करणे, तसेच सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून Application अथवा पॅकेजची स्थापना करणे या गोष्टी शिकलो.
06:51 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.याबाबतची आधिक माहिती http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro या लिंकवर उपलब्ध आहे.
07:19 या ट्युटोरियलचे भाषांतर मैत्रेयी जोशी यांनी केले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आम्ही आपला निरॊप घेतॊ, धन्यवाद!

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Sneha