Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Breast-crawl/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| border = 1 | ''' Time ''' | '''Narration''' |- | 00:00 | '''Breast crawl''' वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले...")
 
Line 370: Line 370:
  
 
|-
 
|-
| 10:01 - redo
+
| 10:01  
| हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे. ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहेt डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक आणि डॉक्टर तरू जिंदल, एमएस प्रसूतितज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ.
+
| हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे. ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक आणि डॉक्टर तरू जिंदल, एमएस प्रसूतितज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ.
  
  

Revision as of 11:01, 27 June 2018

Time Narration
00:00 Breast crawl वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत, ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय?
00:10 ब्रेस्ट क्रॉलची प्रक्रिया आणि
00:13 ब्रेस्ट क्रॉलचे महत्व.
00:18 प्रथम आपण समजून घेऊ, ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय?
00:23 बाळ जन्मताच दूध पिण्याच्या स्वाभाविक सवयीने जन्म घेतो.
00:28 प्रसूतीनंतर लगेच, बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवल्यास बाळ आईचे स्तन शोधू शकते आणि स्तनपान करण्यास सुरवात करू शकते.
00:40 ह्या संपूर्ण प्रक्रियेला Breast Crawl म्हटले जाते.
00:46 हे लक्षात घ्या की पूर्ण-वेळेत जन्मलेले , स्थिर बाळ जे नैसर्गिक किंवा सिजेरियन प्रसुतीमुळे जन्माला आले आहे,
00:58 आणि जे जन्मानंतर लगेचच `रडतात, ब्रेस्ट कॅरोल त्यांच्या द्वारे केले जाऊ शकते.
01:03 कमी वजन असलेल्या बाळांसाठी ब्रेस्ट कॅरोल केले जात नाही, कारण ते श्वासनाच्या समस्यांमुळे त्रासलेले असतात जसे कि श्वास घेण्यात त्रास.
01:15 आता, आपण ब्रेस्ट कॅरोलची प्रक्रिया आणि नंतर त्याचे महत्व शिकूया.
01:22 सर्व प्रथम खात्री करून घ्या कि, डिलिव्हरी रूमचे तापमान 26 अंश सेल्सियसच्या जवळपास असावे.
01:29 आता बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून स्वच्छ करावयाचे आहे.
01:35 बाळाचे हाथ सोडून संपूर्ण शरीर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
01:42 लक्षात ठेवा - बाळाचे हात ओले ठेवावे.
01:46 पुसताना तिच्या त्वचेवरचा संरक्षणात्मक पांढरा थर काढू नका.
01:53 तापमान थंड असल्यास, ते बाळाचे रक्षण करेल.
01:56 बाळाला पुसल्यानंतर ओला कपडा काढून टाका.
02:01 बाळाला पुसुन घेतल्यानंतर, जन्म सेविकाने बाळाच्या नाळची नाडी जाणून घेतली पाहिजे.
02:08 एकदा का धड धड थांबली कि, तिने नाळ कापली पाहिजे.
02:13 नंतर, बाळाला तुम्ही आईच्या उघड्या पोटावर अश्या पद्धतीने ठेवा कि जेणेकरून बाळाचे पोट आईच्या पोटाला स्पर्श करेल.
02:22 बाळाचं डोकं आईच्या न धुतलेल्या स्तनांमध्ये ठेवले पाहिजे.
02:26 बाळाचं तोंड आईच्या स्तनाखाली असावे.
02:30 आता breast crawl करण्यासाठी बाळ अगदी योग्य ठिकाणी आहे.
02:37 नवजात बाळासाठी पुढे सरकणे फार नैसर्गिक आहे, त्यामुळे ती सहजपणे आईच्या स्तनाकडे सरकू शकते.
02:46 पुढे काय करायचे आहे कि - बाळ आणि आई दोघांना उबदार ठेवण्यासाठी स्वच्छ कोरडा कपडा पांघरावा.
02:54 बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी.
02:57 कृपया लक्ष्यात घ्या - आम्ही नंतरच्या प्रतिमांमध्ये टोपी आणि कपडा दाखवलेला नाही.
03:04 हे आपल्याला breast crawl च्या दरम्यान बाळाला स्पष्टपणे पाहण्यास मदत करेल.
03:10 बाळाला कपड्यात गुंडल्यानंतर - आईला तिच्या हाताने बाळाच्या पाठीस आधार द्याचा आहे.
03:18 आता बाळाच्या क्षमतांबद्दल चर्चा करू जे ब्रेस्ट कॅरोल करण्यात मदत करतात.
03:24 प्रसूतीनंतर बाळ खूप सावध आणि स्वाभाविक असतात.
03:29 तिच्या अस्वच्छ हाथांचा वास तिला लाळ गाळण्यास उत्तेजित करतो.
03:35 तसेच बाळ तिची कमी दृष्टी वापरून, तिच्या आईचा चेहरा आणि एरीओला पाहू शकते.
03:43 एरीओला हा निप्पलभोवतीचा गडद भाग आहे.
03:47 अखेरीस, हात आणि पाय वापरुन बाळ सरकू लागते, हळूहळू तिच्या आईच्या स्तनाकडे रांगत जाते.
03:57 काही बाळ ताबडतोब रांगणे सुरू करतात आणि काही वेळ घेतात.
04:04 स्तनापर्यंत पोहोचल्यावर, सर्वात पहिले बाळ आपल्या हाताने स्तनाला पकडण्याचा प्रयत्न करतो.
04:12 जोपर्यंत बाळ तिचे पहिले स्तनपान घेत नाही तो पर्यंत आई आणि बाळात अडथळा आणू नका.
04:20 जन्म सेविका आणि आईने या प्रक्रियेदरम्यान संयम राखला पाहिजे.
04:27 बाळाला तिच्या पहिल्या स्तनपानासाठी आईच्या स्तनापर्यंत पोहोचण्यास 30 ते 60 मिनिटे लागू शकतात.
04:35 स्तनपानाच्या सुरुवातीस- बाळ तिचे तोंड रुंद उघडेल आणि आईच्या स्तनाशी योग्य पकड करेल.
04:45 स्तनपान पूर्ण केल्यानंतर, बाळाला एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ त्याच स्थितीत राहू द्या.
04:52 असे केल्याने, आई आणि बाळ यांच्यात संबंध वाढण्यास मदत होते.
04:58 आईने कोणतीही औषधे घेतली असल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
05:05 कधीकधी असे होऊ शकते की प्रसूतीनंतर आईला प्रसूती खोली मधून दुस-या खोलीत हलवावे लागेल.
05:13 अशा परिस्थितीत, आईला दुसर्या खोलीत हलविल्यानंतर- बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून लगेचच दोघांमध्ये त्वचेचा स्पर्श होऊ द्या .
05:29 आता सिजेरियनद्वारे जन्माला आलेल्या बाळांसाठी breast crawl बद्दल चर्चा करू या-
05:35 अश्या स्थितीत: बाळाला आईच्या पोटाऐवजी छातीवर अश्या पद्धतीतीने ठेवा, कि बाळाचे पाय आईच्या डोक्याकडे असले पाहिजे.
05:47 बाळाची छाती आणि पोट आईच्या खांद्यावर आणि तोंड आईच्या स्तनावर असावे.
05:54 ऑपरेशन रूममध्ये शक्य असेल तोपर्यंत बाळाला स्तनपान करू द्या.
05:59 लक्षात ठेवा - प्रसूतीनंतर लगेचच अन्य नवजात शिशु काळजी पेक्षा आईच्या त्वचेचा स्पर्श बाळाच्या त्वचेशी सर्वात महत्वाचा आहे.
06:09 लक्षात ठेवा - breast crawl पूर्ण झाल्यानंतरच, प्रसूती नंतर नवजात शिशु काळजी दिली पाहिजे.
06:17 आता, नवजात शिशुसाठी breast crawl च्या महत्त्वबद्दल चर्चा करूया.
06:23 ब्रेस्ट कॅरोल बाळाला आईचे पहिले दूध मिळण्यास मदत करते ज्याला colostrum म्हटले जाते.
06:29 हे रंगात पिवळसर आणि घट्ट असते.
06:33 लक्षात ठेवा की, प्रसूतीनंतर – प्रत्येक स्तनपानादरम्यान बाळ जेवढे कॉलेस्ट्रॅम घेईल त्याच्या पिण्याच्या प्रमाणात हळूहळू वाढ होईल.
06:43 दर वेळी स्तनपानादरम्यान बाळ प्रत्येक स्तनांमधून पहिल्या दिवशी ५ मिलीलिटर,
06:47 दुसर्या दिवशी 10 मिलीलिटर,
06:50 तिसर्या दिवशी 25 मिलीलीटर,
06:53 चौथ्या दिवशी 40 मिलीलीटर आणि पाचव्या दिवशी 55 मिलीलीटर दूध पिईल.
07:05 हे नवजात बाळासाठी पुरेसे आहे.
07:09 म्हणूनच बाळाला कोलोस्ट्रम ऐवजी अन्य काहीही खायला देऊ नये.
07:15 कोलोस्ट्रम हे बाळासाठी पहिले लसीकरण मानले जाते, आणि ह्यात सौंसर्गाशी लढणारे प्रथिने समाविष्ट असतात ज्यामुळे बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
07:27 आईच्या प्रसूतीनंतर बाळासाठी ऊर्जेचा हा पहिला स्त्रोत आहे.
07:33 तसेच Colostrum, glucose रक्ताची पातळी कमी होऊ देत नाही.
07:37 हे बाळाची अन्य शरीरक्रियांना व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.
07:42 हे मेंदूचा आरोग्यदायी विकास करण्यात मदत करते.
07:46 हे बाळाचे प्रथम मल बाहेर येण्यात मदत करते.
07:50 Breast crawl मुळे आई आणि बाळ या दोघांमधील त्वचेचा स्पर्श बाळाला उबदार ठेवतो.
07:57 बाळ स्वतःच शिकतो की आपल्या आईच्या स्तनाशी योग्य पकड कशी करावी .
08:04 Breast crawl मुळे आईचे स्वस्थ जीवाणू बाळाच्या शरीरात जातात.
08:08 हे जीवाणू बाळाच्या आतड्यांमध्ये जातात आणि संसर्गांशी लढतात.
08:13 अखेरीस यामुळे बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
08:18 Breast crawl हे बाळाला प्रेम आणि सुरक्षिततेची भावना देखील देते आणि आई व तिच्या बाळाच्या दरम्यान संबंध जोडते.
08:29 breast crawl आईसाठी देखील फायदेशीर आहे.
08:34 बाळाच्या पायाच्या हालचालीमुळे आईच्या गर्भावर दाब पडते, ह्या दाबामुळे गर्भाशयाच्या आकुंचनात आणि नाळ बाहेर पडण्यास मदत होते.
08:45 स्तनपान सुरू केल्याने आईच्या शरीरात oxytocin वाढते.
08:51 oxytocin च्या वाढल्यामुळे नाळ बाहेर पडण्यास देखील मदत होते.
08:56 म्हणून breast crawl मुळे रक्त कमी जाते आणि आईमध्ये anaemia होण्यापासून थांबवते.
09:03 Anaemia हि एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते.
09:08 यामुळे आईमध्ये थकवा आणि कमजोरी येऊ शकते.
09:13 म्हणूनच,breast crawl आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक प्रक्रिया आहे.


09:21 आपण breast crawl ह्या स्पोकन ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:26 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो, ब्रेस्ट कॅरोल म्हणजे काय?
09:30 ब्रेस्ट कॅरोलची प्रक्रिया आणि त्याचे महत्व.
09:37 या ट्यूटोरियलचे योगदान स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट आयआयटी बॉम्बे द्वारे करण्यात आले आहे.
09:43 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला भारत सरकारच्या NMEICT, MHRD, यांच्याकडून योगदान मिळाले आहे.
09:49 ह्या मिशन विषय अधिक माहिती ह्या लिंक वर उपलब्ध आहे.
09:54 या ट्युटोरिअलला अंशतः व्हील्स ग्लोबल फाऊंडेशन यांच्याकडून देखील उदार अनुदान मिळालेले आहे.
10:01 हे ट्युटोरिअल माँ और शिशु पोषण या प्रोजेक्टचा भाग आहे. ह्या ट्युटोरिअलचे कार्यक्षेत्र परीक्षक आहेत डॉक्टर रुपल दलाल, एमडी बालरोगचिकित्सक आणि डॉक्टर तरू जिंदल, एमएस प्रसूतितज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ.


10:12 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Ranjana