Difference between revisions of "LaTeX/C2/Report-Writing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या रिपोर्ट रायटिंग '''LaTeX'''...")
 
 
Line 134: Line 134:
 
| 03:45
 
| 03:45
 
| सोर्सफाईलमधील रिकाम्या ओळी विचारात न घेता, आऊटपुट तसेच राहते.
 
| सोर्सफाईलमधील रिकाम्या ओळी विचारात न घेता, आऊटपुट तसेच राहते.
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 14:45, 12 August 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या रिपोर्ट रायटिंग LaTeX वरील पाठात आपले स्वागत. मी याचा उच्चार latek करत आहे latex नव्हे.
00:09 कन्नन मौदगल्या ह्या ट्युटोरिअलचे प्रमुख आहेत.
00:13 या पाठात डॉक्युमेंट कसे तयार करावे हे जाणून घेऊ.
00:19 विशेषतः, रिपोर्ट आणि आर्टिकल क्लास कसा वापरावा, सेक्शन्स कसे तयार करावे, सेक्शन्सना स्वयंचलित क्रमांक देणे, अनुक्रमणिका आणि टायटल पेज तयार करणे.
00:38 हा पाठ मी 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या लॅपटॉपवर तयार करत आहे.
00:44 आणि यासाठी मीउबंटु लिनक्स, TeXworks आणि LaTeX वापरत आहे.
00:51 तुम्ही TeXworks विंडोज किंवामॅकवर सुध्दा याचप्रकारे वापरू शकता.
00:57 आपण LaTeX हे TeXworks शिवायही वापरू शकतो.
01:02 तुम्ही यासाठी जास्त किंमतीचे लिनक्स संगणकही वापरू शकता.
01:07 यासाठी पुढील पूर्वतयारीची गरज आहे: या पाठाचा सराव करण्यासाठी LaTeX ची ओळख करून देणारे स्पोकन ट्युटोरियल, report dot tex ही फाईल, side-by-side method ची माहिती असावी.
01:23 spoken tutorial dot org या वेबसाईटवर या सर्वांबद्दल माहिती उपलब्ध आहे.
01:32 आता आपण TeXworks विंडोवर जाऊ.
01:36 मी report.tex ही फाईल आधीच उघडली आहे. कृपया ही डाऊनलोड करून माझ्याबरोबर सराव करा.
01:44 मी 12 point हा फाँट साईज, ‘a4 paper’ आणि article class वापरत आहे.
01:55 'usepackage' कमांडद्वारे समास सेट करण्यासाठी मी geometry package वापरत आहे.
02:02 प्रत्येक कमांडच्या सुरूवातीला reverse slash चिन्ह वापरले जाते.
02:07 मी दरवेळी ह्याचा स्पष्टपणे उल्लेख केला नाही तरी तुम्ही reverse slash देण्यास विसरू नका.
02:13 तसेच मी कंसांचा उल्लेख दरवेळी केला नाही तरी तुम्हाला ते वापरायचे आहेत.
02:20 व्हिडिओमधे दाखवल्याप्रमाणेच तुम्ही कृती करा.
02:25 usepackage कमांडमधे चौकटी कंसात पर्यायी पॅरामीटर्स आहेत.
02:31 पॅकेजचे नाव महिरपी कंसात असते.
02:35 मी आडवा आणि उभा समास प्रत्येकी 4.5 सेमीवर सेट केला आहे.
02:41 डाव्या कोप-यात बाजूला वर असलेल्या "TexWorks" या विंडोमधे पहा.
02:47 pdfLaTeX हा पर्याय निवडलेला नसल्यास कृपया ड्रॉपडाऊन मेनूमधून तो निवडा.
02:55 डाव्या बाजूला बाण असलेले हिरव्या रंगाचे एक वर्तुळ आहे.
02:59 त्या बाणावर क्लिक करून ही फाईल कंपाईल करा.
03:04 ‘report.pdf’ ही फाईल मिळेल जी आपण उजव्या बाजूला बघू शकतो.
03:09 आऊटपुट फाईलमधील सेक्शन, सब-सेक्शन आणि सब-सब-सेक्शन ही टायटल्स पहा.
03:18 हे सोर्सफाईलमधे दिलेल्या कमांडस वापरून तयार केले गेले आहे.
03:23 'pdf' फाईलमधील ‘सेक्शन’ या टायटल्सच्या विविध वैशिष्ट्यांकडे लक्ष द्या.
03:30 या टायटल्सचे आकार प्रमाणात आणि आपोआप तयार केले जातात.
03:37 तसेच सेक्शनटायटल सर्वात मोठे आहे आणि सब-सब-सेक्शनटायटल सर्वात लहान आहे.
03:45 सोर्सफाईलमधील रिकाम्या ओळी विचारात न घेता, आऊटपुट तसेच राहते.
03:50 येथील एक ओळ डिलिट करूनकंपाईल करू.
03:55 येथे काहीही बदल झालेला नाही.
03:57 मी पेपरचा साईज बदलून a5 करत आहे.
04:02 हे आऊटपुटमधील प्रत्येक ओळीची रुंदी कमी करेल.
04:06 मागे केल्याप्रमाणे हे टेक्स्ट कंपाईल करू.
04:10 आऊटपुट नीट दिसण्यासाठी control + दाबून हे मोठे करून घेत आहे.
04:17 आता हे मध्यभागी आणू.
04:20 उर्वरित पाठासाठी आपण a5 पेपरच वापरणार आहोत. तुम्ही तो बदलून a4 करू शकता.
04:28 कृपया लक्षात घ्या, मी फाईल सेव्ह केलेली नव्हती. याचे कारण TexWorks कंपाईल करण्यापूर्वी फाईल आपोआप सेव्ह करून घेते.
04:37 आता फाँटचा आकार कमी करून तो 10 point ठेवा आणि कंपाईल करा.
04:44 अरेच्या, फाँटचा आकार लहान झाला- आश्चर्य वाटले? पण, आकार प्रमाणबध्द आणि अंतर समान राहिले.
04:54 फाँटचा आकार पुन्हा 12 point करू.
04:59 आता आपण सेक्शनटायटल्सच्या आणखी एका महत्वाच्या घटकाबद्दल जाणून घेऊ.
05:04 हे सेक्शन क्रमांक आपोआप दिले गेलेले आहेत.
05:09 हे अधिक स्पष्ट करण्यासाठी मी इन्सर्टेड सेक्शन हा नवा सेक्शन समाविष्ट करणार आहे.
05:18 कंपाईल केल्यावर येथे अंक योग्य क्रमाने आलेले दिसतील. अशाप्रकारे LaTeX नंबरिंगची देखील काळजी घेते.
05:29 LaTeX टेबल ऑफ कंटेन्टससाठी toc एक्सटेन्शनची फाईल तयार करते.
05:36 ‘टेबल ऑफ कंटेन्टस’ हे शब्द येथे समाविष्ट करू.
05:42 कंपाईल करा.
05:44 कंटेन्टस या शब्दाव्यतिरिक्त आऊटपुट फाईलमधे काही दिसत नाही.
05:50 पुन्हा एकदा कंपाईल करू.
05:53 आता टेबल ऑफ कंटेन्टसमधे पेज नंबर सहित सर्व टायटल्स उपलब्ध आहेत.
05:59 योग्य पेज नंबर मिळण्यासाठी आपल्याला तिस-यांदा कंपाईल करणे आवश्यक आहे.
06:05 तीन वेळा कशासाठी? त्यासाठी कृपया असाईनमेंट पहा.
06:09 एकच सांगतो, ‘table of contents’ याची आवश्यकता आहे.
06:14 LaTeX मधे किती आश्चर्यकारक क्षमता आहे.
06:17 टेबल ऑफ कंटेन्टससाठी LaTeX वापरत असलेल्या toc एक्सटेन्शनद्वारे हे केले जाते.
06:24 अनेकवेळा कंपायलेशनच्या प्रक्रियेद्वारे टायटल्समधले बदलही केले जातात.
06:30 सेक्शनटायटल बदलून मॉडिफाईड सेक्शन असे करा.
06:36 हे कंपाईल करा. टेबल ऑफ कंटेन्टस बदलणार नाही.
06:42 पुन्हा एकदा कंपाईल करा आणि हा प्रश्न सुटेल.
06:46 आता येथे मॉडिफाईड सेक्शन आहे.
06:49 आपण या डॉक्युमेंटसाठी टायटल बनवणार आहोत. हे आपण ‘begin document’ च्या आधी बनवू या.
06:57 हे मी टायटल, लेखकाची माहिती आणि तारीख असे बनवणार आहे.
07:13 त्यासाठी मी या तीन कमांडस समाविष्ट केल्या आहेत.
07:17 ह्या कोणत्या क्रमाने येतात किंवा कोणत्या ठिकाणाहून आल्या आहेत ह्याने काही फरक पडत नाही.
07:22 परंतु त्या ‘begin document’ कमांडच्या आधी असल्या पाहिजेत.
07:26 सर्व कमांडस मधे reverse slash द्यायला विसरू नका.
07:31 येथे Double slash म्हणजे पुढील ओळ. हे आपण कंपाईल करू.
07:38 ‘pdf’ फाईलमधे कोणताही बदल झालेला नाही.
07:42 याचे कारण आपण LaTeX ला या माहितीचे काय करायचे हे सांगितलेले नाही.
07:47 म्हणून मी ‘begin document’ कमांडच्या लगेच नंतर ‘make title’ हा एक शब्द कमांड म्हणून समाविष्ट करणार आहे.
07:55 हे कंपाईल करू या.
07:58 ज्या ठिकाणी आपण ही कमांड समाविष्ट केलेली होती तेथे आऊटपुटमधे टायटल दिसेल.
08:03 जसे की, डॉक्युमेंटच्या सुरूवातीला.
08:07 आता आपण या डॉक्युमेंटचा article हा class बदलूनतो report करू.
08:15 त्याचबरोबर, 'Chapter First Chapter' कमांडने chapter घोषित करणार आहोत.
08:24 Report style साठी किमान एक chapter असणे आवश्यक आहे.
08:27 हे कंपाईल करून आऊटपुट पाहू.
08:31 आऊटपुटमधे झालेले बदल लक्षात घ्या.
08:35 संपूर्ण पेजवर टायटल दिसत आहे, ज्याला पेज नंबर नाही.
08:40 Contents देखील संपूर्ण पेजवर दिसत आहेत, ज्याचा पेज नंबर 1 आहे.
08:47 येथे कृपया पॉज करा आणि 'Contents' मधील किती एंट्रीज चुकीच्या आहेत ते शोधा.
08:54 आता पुढील पेजवर जाऊ या. chapter ची सुरूवात कशाप्रकारे झाली आहे याकडे लक्ष द्या.
09:00 आपण किती वेगवेगळी वैशिष्ट्ये ओळखू शकता? तुम्हाला किमान 5 तरी शोधता आली पाहिजेत.
09:08 हे दुस-यांदा कंपाईल करू या.
09:12 आता Contents पेजवर योग्य माहिती आली आहे हे बघा. आता पेज नंबर्स बरोबर दिसत आहेत.
09:21 आता ‘New Chapter’ नावाचा chapter समाविष्ट करू या.
09:32 हे कंपाईल करा.
09:34 हे पुन्हा एकदा कंपाईल करा आणि हे नवीन पेजवर आलेले बघा.
09:47 appendix ही कमांड या नवीन chapter च्या आधी समाविष्ट करा.
09:53 कंपाईल केल्यावर आपल्याला Appendix हा शब्द आलेला दिसेल.
09:59 chapter चा नंबर A आहे.
10:02 आता स्लाईडसवर जाऊ या.
10:05 थोडक्यात, आपण या पाठात काय शिकलो ते पाहू.
10:08 LaTeX मधे डॉक्युमेंट लिहिणे, चॅप्टर आणि सेक्शन टायटल्स स्वयंचलित पध्दतीने तयार करणे, स्वयंचलित नंबरिंग, टेबल ऑफ कंटेंन्टस, टायटल पेज तसेच Appendix तयार करणे.
10:21 ह्या काही असाईनमेंटस करून बघा.
10:24 ही असाईनमेंट a4 पेपर आणि letter paper वर करायची आहे.
10:29 व्हिडिओ पॉज करून स्लाईड वाचा आणि असाईनमेंट करा.
10:35 ही असाईनमेंट font size वर आहे.
10:41 ही report dot toc वर आहे.
10:47 ही कंपायलेशनच्या संख्येवर आधारित आहे.
10:52 ही Table of Contents च्या स्थानावर आधारित आहे.
10:59 ही असाईनमेंट रिपोर्ट आणि आर्टिकलमधे 'chapter' कमांड वापरण्यासंदर्भात आहे.
11:07 ही असाईनमेंट रिपोर्ट class मधे 'appendix' कमांडचा परिणाम बघण्याच्या संदर्भातील आहे.
11:15 ही असाईनमेंट आधी केलेल्या असाईनमेंट सारखीच आहे, परंतु ती article class मधे करायची आहे.
11:22 ही geometry package संदर्भातील आहे.
11:27 ही असाईनमेंट सर्वसाधारण LaTeX classes संदर्भातील आहे.
11:34 अशाप्रकारे आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
11:38 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
11:46 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवितो.प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:53 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
11:56 कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
12:03 तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
12:09 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
12:13 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
12:19 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
12:28 या पाठात न आलेल्या टॉपिक्ससाठी या पत्त्यावरील stack exchange वापरावे.
12:35 LaTeX वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही उत्तम जागा आहे. तुम्हाला कार्यशाळा, प्रमाणपत्र इत्यादी संबंधीही प्रश्न असतील.
12:45 त्यासाठी आमच्याशी इमेलद्वारे संपर्क साधा.
12:50 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेलेआहे.
12:56 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना उके यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana