Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C2/Working-with-data/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 406: Line 406:
 
| |  09:23  
 
| |  09:23  
 
| |  सहभागासाठी धन्यवाद.  
 
| |  सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Latest revision as of 16:38, 20 April 2017

Time Narration
00:00 कॅल्कच्या Working with Data वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:09 Fill Tools आणि Selection List चा उपयोग.
00:13 शीटमधील डेटा स्थलांतरीत करून वापरणे.
00:16 डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे
00:23 इथे आपण उबंटु लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:32 स्प्रेडशीटमध्ये डेटा एंटर करणे हे थोडे कष्टाचे काम आहे. परंतु हे काम सोपे करण्यासाठी कॅल्कमध्ये विविध टूल्स देण्यात आलेली आहेत.
00:42 एक प्राथमिक पध्दत म्हणजे माऊसच्या सहाय्याने एका सेल मधील घटक दुस-या सेलमध्ये ड्रॉप करणे
00:49 परंतु कॅल्कमधे अशाही अनेक सोयी आहेत ज्याद्वारे अनेकवार कराव्या लागणा-या क्रिया Automatic होऊ शकतात.
00:57 त्यासाठी “Fill Tool” व “Selection Lists” या नावांची टूल्स आहेत.
01:01 ह्यांनी एकाच वेळी अनेक शीटस् मध्ये माहिती भरता येते.
01:06 आपण ह्या प्रत्येकाबद्दल एकेक करून माहिती घेऊ.
01:09 आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या.
01:14 Fill Tool वापरून शीटमधील घटक डुप्लिकेट करता येतात.
01:19 समजा, आपल्या Personal Finance Tracker.ods मध्ये "Cost” या हेडिंगखाली असलेला डेटा आपल्याला त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी करायचा आहे
01:30 प्रथम कॉपी करायचा सर्व Data Select करून घ्या. त्यासाठी "6000” अशी एंट्री असलेल्या सेलवर क्लिक करा.
01:38 आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून "2000” अशी एंट्री असलेल्या सेलपर्यंत ड्रॅग करा.
01:46 जिथे तुम्हाला हा डेटा कॉपी करायचा आहे ते सिलेक्ट करा.
01:51 आता माऊसचे डावे बटण सोडा.
01:53 मेनूबारवरील Edit Optionवर क्लिक करून Fill Option वर क्लिक करा.
01:59 पॉप अप मेनूमधील Write Option वर क्लिक करा.
02:03 तुम्हाला "Cost” Heading खालील डेटा त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी झालेला दिसेल.
02:09 केलेले सर्व बदल undo करू.
02:12 Fill Tools चा जास्त गुंतागुंतीचा उपयोग म्हणजे शीटमधे अंकांची Series, डेटा म्हणून एंटर करणे
02:20 कॅल्कमधे आठवड्यातील वारांची तसेच वर्षातील महिन्यांची यादी उपलब्ध आहे.
02:27 इथे userला स्वतःची यादी देखील तयार करता येऊ शकते.
02:34 शीटमध्ये Days हे नवीन हेडिंग इन्सर्ट करू.
02:38 या खाली आठवड्यातले दिवस Automatically लिहू.
02:43 Days या हेडिंगखाली पहिले सात सेल्स सिलेक्ट करा.
02:48 आता मेनूबार वरील Edit या ऑप्शनवर क्लिक करून Fill या ऑप्शनवर क्लिक करा.
02:53 त्या मेनूमधील 'Series' या ऑप्शनवर क्लिक करा.
02:57 “Fill Series Heading" असलेला डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल.
03:02 आता "Series Type” या हेडिंगखालील "Auto Fill” Optionवर क्लिक करा.
03:07 नंतरStart Value फिल्डमध्ये पहिला दिवस म्हणजे Sunday टाईप करा.
03:13 Increment हे आधीपासूनच सेट केलेले आहे. आता "OK” बटणावर क्लिक करा.
03:18 तुम्हाला सेल्समध्ये दिवस Automatically एंटर झालेले दिसतील.
03:23 अशा प्रकारे आठवड्याचे दिवस, महिने किंवा वर्ष एंटर करू शकता. कारण ते कॅल्कमध्ये pre-defined आहेत.
03:32 अनुक्रमिक डेटा Auto Fill करण्याची दुसरी पध्दत पुढीलप्रमाणे
03:37 सेल्समध्ये "Sunday” असे टाईप करून एंटर दाबा. त्यामुळे कॉलममध्ये पुढच्या सेलवर फोकस येईल.
03:46 आता पुन्हा Sunday असे टाईप केलेल्या सेलवर जा. त्या सेलच्या उजव्या बाजूला खाली कोप-यात एक छोटा काळा बॉक्स तुम्हाला दिसेल.
03:55 त्या बॉक्सवर माऊसने क्लिक करा.
03:57 तुम्हाला Display Box मध्ये Saturday असे दिसेपर्यंत खालच्या दिशेने ड्रॅग करा.
04:04 आता माऊसचे बटण सोडा.
04:06 Cells मध्ये आठवड्याचे दिवस Automaticallyभरले जातील.
04:10 अनुक्रमित असलेल्या सर्व डेटासाठी ही पध्दत उपयोगी पडते. आपण केलेले बदल undo करू.
04:17 आपण Start, End आणि Increment Value एंटर करून अंकांची one time series सुध्दा बनवू शकतो.
04:24 हे कसे ते दाखविण्यासाठी प्रथम आपण सेल्स A 1 पासून A 7 पर्यंत आधी भरलेला डेटा delete करु या.
04:33 आकडे डिलिट केल्यानंतर सेल्स A2 पासून A7 पर्यंत सिलेक्ट करा.
04:40 आता मेनूतील "Edit” क्लिक करा. मग "Fill” व “Series” क्लिक करा.
04:46 आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल. आता डिफॉल्ट रूपात सिलेक्ट केलेले नसल्यास "Series Type” ह्या हेडिंग खालील "Linear” ह्या ऑप्शनवर क्लिक करा.
04:57 “Start Value” ह्या फिल्डमध्ये आपण पहिला सिरियल नंबर म्हणजेच "1” टाईप करू.
05:03 “End Value” ह्या फिल्डमध्ये “6” ही शेवटची व्हॅल्यू टाईप करू.
05:08 आता आपण इनक्रिमेंट व्हॅल्यू "1” सेट करून शेवटी " “OK” ह्या बटणावर क्लिक करा.
05:14 तुम्हाला सेल्समध्ये अनुक्रमित सिरियल नंबर्स आपोआप आलेले दिसतील.
05:21 Fill Tool ने प्रस्थापित केलेला संबंध तात्पुरता असतो. Fill क्रिया संपल्यावर ह्या विविध सेल्समधे कुठलेही नाते रहात नाही.
05:32 "Selection List” एक असे टूल आहे ज्याचा वापर केवळ टेक्स्टपुरताच मर्यादित आहे.
05:40 आपण त्याबद्दल पुढील ट्युटोरियल्समध्ये चर्चा करू.
05:45 आता एका शीटमधील Data दुस-या शीटमध्ये कसा वापरायचा किंवा स्थलांतरीत करायचा ते आपण पाहू.
05:52 Calc मध्ये युजरला अनेक शीट्सवर समान सेलमध्ये डेटा एंटर करता येतो.
05:58 म्हणजेच प्रत्येक शीटमध्ये तोच डेटा एंटर करण्यापेक्षा सर्व शीटस् मध्ये समान डेटा एकाचवेळी एंटर होतो.
06:07 आपला संपूर्ण डेटा Personal Finance Tracker.ods या फाईल मधील "Sheet 1” वर आहे.
06:14 आता "sheet 1” मधील डेटा "Sheet 2” आणि "Sheet 3” मधे दाखवायचा आहे.
06:21 त्यासाठी मेनूबारवरील "Edit” ऑप्शनवर क्लिक करून मग "Sheet” या ऑप्शनवर क्लिक करा.
06:27 आता "Select” वर क्लिक करा.
06:30 एक डायलॉग बॉक्स उघडेल ज्यामध्ये तुम्ही Shift Key च्या सहाय्याने "Sheet 1”, “Sheet 2 आणि “Sheet 3” हे ऑप्शन सिलेक्ट करा.
06:40 "OK” वर क्लिक करा.
06:42 हे तुम्हाला "Sheet 1” वर घेऊन जाईल.
06:45 आता "Sheet 1” वर काही डेटा एंटर करा.
06:49 उदाहरणार्थ सेल रेफरन्स F12 मध्ये आपण "This will be displayed on multiple sheet” असे टाईप करा.
06:57 आता "Sheet 2” व “Sheet 3” या टॅबवर एकेक करून क्लिक करा.
07:02 तुम्हाला प्रत्येक शीटमधील सेल रेफरन्स F 12 मध्ये समान डेटा दिसेल.
07:09 आपण केलेले बदल undo करा.
07:12 आता डेटामध्ये बदल करण्याच्या आणि डिलिट करण्याच्या पध्दती शिकू.
07:18 सेलचे कुठलेही फॉरमॅटिंग काढून न टाकता त्यातील डेटा डिलिट करण्यासाठी तो सेल सिलेक्ट करा.
07:25 सेलमधील डेटा "Input Line” या फिल्डमध्ये दिसत आहे.
07:30 आता कीबोर्डवरील "Backspace” बटण दाबा.
07:35 तुम्हाला डेटा डिलिट झालेला दिसेल.
07:37 केलेले बदल undo करू.
07:39 सेलमधील डेटा बदलण्यासाठी केवळ तो सेल सिलेक्ट करून सेलमधील जुन्या डेटावर टाईप करा.
07:46 नवीन डेटासाठी त्याचे मूळ फॉरमॅटींग तसेच राहिल. केलेले बदल undo करू.
07:52 सेलमधील सर्व घटक (डेटा) काढून न टाकता त्यातील एखादा भाग बदलण्यासाठी त्या सेलवर डबल क्लिक करा.
08:01 आता कर्सरच्या सहाय्याने तुम्ही सेलमध्ये बदल करू शकता.
08:07 केलेले बदल undo करून घ्या.
08:09 आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत.
08:15 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
08:17 Fill Tools आणि Selection List चा उपयोग.
08:20 शीटमधील डेटा स्थलांतरीत करून वापरणे.
08:23 डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे
08:29 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:35 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:43 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:46 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:49 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:55 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:00 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:07 यासंबंधी माहिती
09:11 पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:18 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:23 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha