Difference between revisions of "Inkscape/C2/Fill-color-and-stroke/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 513: | Line 513: | ||
|- | |- | ||
|14:31 | |14:31 | ||
− | |'''Fill and Stroke''' पर्याय वापरुन ऑब्जेक्ट्स मध्ये रंग भरणे | + | |'''Fill and Stroke''' पर्याय वापरुन ऑब्जेक्ट्स मध्ये रंग भरणे आकृत्यांना स्ट्रोक किंवा बाह्यरेखा देणे, विविध प्रकारचे '''gradients''' आणि '''स्ट्रोक पेंट''' आणि '''स्ट्रोक स्टाईल'''. |
− | आकृत्यांना स्ट्रोक किंवा बाह्यरेखा देणे, विविध प्रकारचे '''gradients''' आणि '''स्ट्रोक पेंट''' आणि '''स्ट्रोक स्टाईल'''. | + | |
|- | |- |
Latest revision as of 13:10, 17 April 2017
Time | Narration |
00:00 | Inkscape वापरून Fill color and stroke वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत, ऑब्जेक्ट्स मध्ये रंग भरणे, ऑब्जेक्ट्स ना बाह्यरेखा देणे, विविध प्रकारचे gradients आणि स्ट्रोक पेंट आणि स्टाईल. |
00:20 | या पाठासाठी वापरणार आहोत- उबंटु लिनक्स 12.04 OS, इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:29 | इंकस्केप उघडू. या साठी, डॅश होम वर जाऊन "Inkscape" टाईप करा. |
00:35 | लोगो वर क्लिक करून तुम्ही इंकस्केप उघडू शकता. |
00:40 | आपण पुर्वी तयार केलेली Assignment.svg फाईल उघडू. मी ती Documents फोल्डर मध्ये सेव्ह केली आहे. |
00:50 | हे तीन आकृत्या आहेत जे पूर्वीच्या असाईनमेंट मध्ये तयार केले होते. |
00:54 | आठवा की आपण इंटरफेसच्या तळाशी color palette वापरुन रंग बदलणे शिकलो होतो. |
01:01 | आता Fill and Stroke वापरुन विविध प्रकारच्या रंगांना कसे भरणे हे शिकू. |
01:08 | Object मेनू वर जा, आणि ड्रॉप डाउन सूची मधून Fill and Stroke वर क्लिक करा. |
01:13 | लक्ष द्या की Fill and Stroke डायलॉग बॉक्स इंटरफेसच्या उजव्या बाजूला उघडला आहे. |
01:20 | येथे ह्या डायलॉग बॉक्स मध्ये 3 टॅब्स आहेत: Fill, Stroke paint आणि Stroke style. |
01:27 | आता, आपण कॅनव्हास क्षेत्रात आयात वर क्लिक करूयात. पहा की Fill and stroke डायलॉग बॉक्स मध्ये ऑप्षन्स आणि आयकन्स एनेबल होतात. |
01:38 | प्रथम, आपण Fill टॅब बद्दल जाणून घेणार आहोत. |
01:41 | लक्षात घ्या की Fill टॅब खाली 6 आयकन्स आहेत. हे आयकन्स काय करतात हे शिकू. |
01:48 | पहिल्या आइकनला No paint असे म्हणतात. हे सूचित करते की ऑब्जेक्ट्स कोणत्याही रंगाने भरले जाणार नाही. |
01:56 | आइकन वर क्लिक करा आणि आयतमध्ये होणाऱ्या बदलाकडे पहा. आयताचा रंग काढलेला आहे. |
02:03 | पुढील आइकन Flat color आहे. हे ऑब्जेक्ट्स मध्ये सॉलिड रंग भरण्यासाठी मदत करते. |
02:11 | Flat color आइकन वर क्लिक करा आणि आयताच्या आकृतीमध्ये रंगात बदल पहा. |
02:17 | Flat color च्या खाली, पहा की येथे 5 सब-टॅब्स आहेत. |
02:21 | डिफॉल्ट रूपात, RGB टॅब निवडलेले आहे. |
02:25 | RGB टॅब अंतर्गत, येथे 4 स्लाइडर्स आहेत. |
02:29 | पहिल्या 3 स्लाइडर्स लाल, हिरवा आणि निळ्या रंगाची गडदपणा दर्शवते. |
02:36 | आपण ह्या स्लाइडर्सना डाव्या किंवा उजव्या दिशांमध्ये हलवून रंगात बदल करू शकतो. आयात मध्ये रंगात बदल पहा जसे मी केले आहे. |
02:46 | चौथा स्लायडर Alpha स्लायडर आहे. या सह, आम्ही अपारदर्शकता पासून पूर्णपणे पारदर्शकता मध्ये रंगाचे opacity स्तर कमी किंवा वाढवू शकतो. |
02:57 | जसे ही मी ह्या 4 स्लाइडर्स हलवेन, लक्ष द्या की ह्या बॉक्समध्ये दाखविले गेले रंगाची RGBA वॅल्यू आपोआप बदलते. |
03:06 | मी स्लाइडर्स पुन्हा एकदा हलवेन, जेणेकरून तुम्ही हा बदल पाहू शकता. |
03:12 | आपण स्लाइडर्सच्या उजव्या बाजूला बॉक्समध्ये प्रत्येक रंगाची वॅल्यू बदलून स्वतः रंग बदलू शकता. |
03:20 | मी लाल रंगाची वॅल्यू 100, हिरव्याला 50 आणि निळ्या रंगाच्या वॅल्यूला 150 शी बदलते. पहा की आयतचा रंग आता गर्द जांभळा मध्ये बदलला आहे. |
03:32 | मी Alpha चे स्तर 255 करते, कारण की मी opacity(अपारदर्शकता) ची स्तर कमी करू इच्छित नाही. |
03:40 | पुढील टॅब HSL आहे आणि हे अनुक्रमे Hue, Saturation आणि Lightness साठी आहे. |
03:49 | आपण मुळ रंग प्राप्त करण्यासाठी Hue स्लाईडर वापरु शकतो. मी हिरव्या रंग चे मूळ रंग प्राप्त करण्यासाठी स्लाइडर डाव्या दिशेने हलवेन. |
03:59 | आपण Saturation स्लाइडर वापरुन मूळ रंगाची संपृक्तता व्यवस्थित करू शकतो. |
04:04 | स्लाईडर डाव्या किंवा उजव्या बाजूला फिरवल्याने सैचुरेशन पातळी मध्ये बदल पहा. |
04:12 | Lightness स्लाइडर मूळ रंगाची चमक व्यवस्थित करतो. |
04:16 | ह्या पर्यायासह, आपण मूळ रंगाची सावली पूर्ण पंढर्या पासून पूर्ण काळ्या किंवा दोघांमध्ये कोणत्याही सावलीत बदलू शकतात. |
04:26 | पूर्वीप्रमाणेच Alpha स्लायडरचा वापर अपारदर्शकता पासून पूर्णपणे पारदर्शकता करण्यास opacity स्तर कमी किंवा वाढवण्यास केले जाते. |
04:35 | पुढील टॅब CMYK आहे, जे अनुक्रमे Cyan, Magenta, Yellow आणि Black दर्शवतो. |
04:44 | ह्या स्लाइडर्सला हलवुन, आपण मूळ रंगाची तीव्रता किंवा सखोलता कमी किंवा वाढवू शकतो. |
04:52 | हे कलर मिक्सिंग पर्याय उपयुक्त आहे, जेव्हा डिझाइन प्रॉजेक्ट्स व्यावसायिक प्रेसवर प्रिंट केले जाते. |
05:00 | पुढील Wheel टॅब आहे. हे HSL कलर मिक्सरचा एक पर्यायी रिप्रेजेंटेशन आहे. |
05:07 | आपण कलर रिंग वर क्लिक करून मूळ Hue निवडू शकता, जे मानक कलर व्हील वर आधारित आहे. |
05:14 | तर मी पिवळ्या रंगाचे मूळ स्तर निवडण्यास पिवळ्या रंगाची सावली वर क्लिक करेल. |
05:19 | कलर सर्कलच्या आत, येथे ह्याच्या आत एका लहान वर्तुळात त्रिकोण आहे. फक्त त्यावर क्लिक करा आणि त्रिकोणाच्या आत ड्रॅग करा आणि आयतमध्ये रंगात बदल पहा. |
05:31 | CMS टॅब केवळ रंग व्यवस्थापित वातावरणात काम करणार्या लोकांसाठी आहे ज्यांना खर्या रूपात आवड असेल. |
05:38 | आतासाठी, आपण ह्या टॅबला सोडून देऊ. |
05:43 | पुढे, जाणून घेऊ की Linear gradient कसे तयार करतात. |
05:47 | कॅनव्हास वर जाऊन वर्तुळावर क्लिक करा. |
05:50 | आता, Fill and Stroke डायलॉग बॉक्स वर परत येऊन Linear gradient आइकन वर क्लिक करा. |
05:57 | वर्तुळात gradientच्या भरण्यात लक्ष द्या. |
06:00 | gradient यादृच्छिक संख्यांची श्रेणी सह नाव दिले जाईल. |
06:05 | माझ्या इंटरफेसमध्ये संख्या linearGradient3794 आहे. आपल्याकडे हे भिन्न असू शकते. |
06:14 | आपण Edit बटणावर क्लिक करून ग्रेडियेंट बदलू शकतो जो linear gradient नंबर बटणाच्या अगदी उजव्या बाजूस खाली आहे. |
06:21 | Gradient editor डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:26 | या बॉक्समध्ये सर्वात वरती काही यादृच्छिक संख्या नंतर stop बटण आहे आणि ह्याच्यात एक ड्रॉप-डाऊन मेन्यू आहे. |
06:34 | जर तुम्ही ह्या ड्रॉप डाउनच्या एरो वर क्लिक केल्यास, तुम्हाला दोन stop पर्याय दिसेल. |
06:39 | पहिला पूर्ण मूळ रंग दर्शवतो. दुसरा half checker board आहे, जो दर्शवतो की हे पारदर्शी आहे. |
06:48 | दुसरा पर्याय निवडा, जे की पारदर्शी stop पर्याय आहे. |
06:53 | खालील Stop Color वर जा. स्लाइडर्स मूव करून RGB वॅल्यू बदला ज्या रंगाची आवड तुम्हाला आहे. |
07:00 | gradient पूर्णपणे दिसण्यासाठी Alpha वॅल्यूच्या रूप मध्ये 255 ठेवा. Gradient editor डायलॉग बॉक्स बंद करा. |
07:09 | आता आपण gradient angle बदलू शकतो. असे करण्यासाठी इंटरफेसच्या डावीकडील टूल बॉक्स मधून Node टूल वर क्लिक करा. हे Selector टूलच्या खाली उजव्या बाजूस आहे. |
07:21 | हे वर्तुळावर एक ओळ प्रदर्शित करेल. ही ओळ gradient दर्शवते. |
07:29 | हे सध्या वर्तुळाच्या square हॅंडल आणि arc हॅंडल्स सह ओवरलॅप होत आहे. |
07:33 | आपल्याला ग्रेडियेंट लाइन हॅंडल्स थोडेसे हलवायला पाहिजे, जेणेकरून आपण हॅंडल्स स्पष्टपणे पाहू शकतो. |
07:40 | जेथे ग्रेडियेंट सुरू होते आणि संपते त्याचे पोजिशन बदलण्यासाठी circular हॅंडल किंवा square हॅंडल क्लिक करून ड्रग करा. |
07:50 | जसे दाखवले गेले आहे त्याप्रमाणे आपण circular हॅंडल मूव करून ग्रेडियेंटची दिशा देखील बदलू शकतो. |
07:58 | आता जाणून घेऊ की Radial gradient कसे वापरणे. आइकन वर क्लिक करून वर्तुळामध्ये gradient च्या बदलाकडे पहा. |
08:06 | Radial gradient वर्तुळाकार आकृतीमध्ये तयार होतो. |
08:10 | लक्ष द्या 1 square handle आणि 2 circular handles. |
08:15 | gradientsला सुरुवातीच्या बिंदू पासून हलवण्यासाठी मध्यम square हँडल वर क्लिक करा. मी हे खाली डावीकडे हलवेन. |
08:22 | gradient मध्ये बदल करण्यासाठी कोणत्याही 'circular handles वर क्लिक करून ड्रग करा. |
08:28 | gradient आकृतीची उंची आणि रुंदी मध्ये झालेल्या बदलाकडे बघा. |
08:37 | आपल्याला टूल बॉक्स मध्ये देखील Gradient tool भेटू शकतो. |
08:42 | त्यावर क्लिक करून आपल्या वर्तुळावर परत येऊ. |
08:45 | लक्षात घ्या की कर्सर आता कॅपिटल I सह plus चिन्ह मध्ये बद्दले आहे. |
08:51 | आता, वर्तुळाच्या आत कुठेही क्लिक करून ड्रग करा. gradient मध्ये बदलाकडे पहा. |
09:00 | आता, वर्तुळाच्या बाहेर कुठेही क्लिक करून ड्रग करा. |
09:04 | gradient मध्ये बदलाकडे पहा. |
09:06 | पुढे, आपण आकृत्यांवर विविध पॅटर्न्स कसे ओवरले करायचे ते शिकू. |
09:11 | Tool box वर जा, Selector टूल वर क्लिक करून नंतर स्टार आकृतीवर क्लिक करा. |
09:17 | Fill and stroke डायलॉग बॉक्स मध्ये, Pattern आइकन वर क्लिक करा. लक्ष द्या की, स्टारचा रंग स्ट्रिप पॅटर्न मध्ये बदलला आहे. |
09:26 | येथे Pattern fill मध्ये ड्रॉप डाउन मेनू आहे, उपलब्ध पॅटर्न्स पाहण्यासाठी एरोज वर क्लिक करा. |
09:32 | Checkerboard वर क्लिक करा आणि स्टार आकृतीमध्ये बदल पहा. येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही उपलब्ध पॅटर्न्स वापरु शकता. |
09:44 | आपण Swatch बद्दल अन्य ट्युटोरियलमध्ये जाणून घेणार आहोत. |
09:48 | Unset paint नामक अंतिम आइकनचा वापर निवड्लेल्या ऑब्जेक्ट्स काळ्या रंगात अनसेट करण्यास केला जातो. |
09:54 | आइकन वर क्लिक करून स्टार मध्ये रंगाच्या बदलाकडे बघा. हे काळ्या मध्ये बदलले आहे. |
10:01 | आता, जाणून घेऊ की एक ऑब्जेक्ट्सला स्ट्रोक किंवा आउटलाइन कसे देऊ. असे करण्यास, आपल्याला Stroke paint टॅब वापरावे लागेल. |
10:09 | आता, Stroke paint टॅब वर क्लिक करून आयतवर क्लिक करा. |
10:14 | Stroke paint टॅब मध्ये आइकन्स Fill टॅब म्हणून समान आहे. |
10:19 | ते तसेच समान रीतीने कार्य करते. |
10:22 | पहिल्या आइकन सह, जे की No paint आहे, आपण आकृतीची आउटलाइन काढून टाकतो. |
10:26 | पुढे, आपण Flat color आइकन वर क्लिक करूया. आपण आयताकार अकराच्या भवती एक काळ्या रंगाची आउटलाइन पाहू. |
10:33 | आपण Stroke style टॅब वापरुन, आउटलाइन ची जाडी कमी किंवा वाढवू शकतो. |
10:44 | width पॅरमीटर 10 ठेवू. आपण आपल्या आवश्यकतेनुसार यूनिट्स पर्सेंटेज, पॉइण्ट्स मध्ये देखील बदलू शकतो. |
10:54 | मी यूनिट Pixels म्हणून ठेवते. |
10:56 | पुन्हा Stroke paint टॅब वर जा. आपण RGB टॅब मधील स्लाइडर मूव करून स्ट्रोकचे रंग बदलू शकतो. |
11:04 | आउटलाइन मध्ये रंगात झालेल्या बदलाकडे पहा. |
11:09 | स्वतःहून अन्य Flat color पर्यायांना पहा, जसे HSL, CMYK, Wheel आणि CMS. |
11:17 | आता, मी Linear gradient वर क्लिक करते. हे आयताकार आकृतीला gradient आउटलाइन देतो. |
11:24 | ग्रेडीयंट चिन्ह आपण पूर्वी वापरले, येथे ड्रॉप-डाऊन सूचीमध्ये दिसून येईल. आपण त्यामधून कोणत्याही वापरू शकतो. |
11:32 | मी माझ्या आयताला लाल आणि निळा gradient आउटलाइन देते. |
11:38 | त्याच प्रकारे, आपण उर्वरित स्ट्रोक आइकन्स वापरु शकतो आणि आपल्या ऑब्जेक्ट्सला काही मनोरंजक पॅटर्न्स आणि gradient आउटलाइन्स देऊ शकतो. |
11:46 | पुढे आपण Stroke style बद्दल जाणून घेऊ. त्यावर क्लिक करा. |
11:50 | आपण आधीच जाणून घेतले की स्ट्रोक च्या रुंदी मध्ये बदल कसे करायचे. |
11:54 | आता, 3 Join आइकन पाहू, Miter join, Round join आणि Bevel join. डिफॉल्ट रूपात स्ट्रोक Miter join मध्ये आहे. |
12:08 | मी चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी आयताच्या कोणत्याही एका कोपऱ्यावर जुम-इन करते. |
12:12 | आता, स्ट्रोक ला गोल कोपरा देण्यास Round join वर क्लिक करा. स्ट्रोकच्या कडांमध्ये बदलाकडे बघा. |
12:21 | आता, Bevel कोपरा तयार करण्यास Bevel join पर्याय वर क्लिक करा. |
12:26 | Dashes ड्रॉप-डाउन मेनूमध्ये विविध डॅश पॅटर्न्स उपलब्ध आहेत. ह्यांचा वापर करून, आपण स्ट्रोकला भिन्न डॅश पॅटर्न्स देऊ शकतो आणि भिन्न रुंदी देखील देऊ शकतो. |
12:38 | पुढे Cap पर्याय आहे. हे मुळात लाइन स्ट्रोक वर कार्य करते. |
12:44 | Tool box वर जा. Freehand टूल वर क्लिक करा. त्यामुळे, Freehand टूलच्या मदतीने एक ओळ ड्रॉ करून घेऊ. |
12:50 | आता, ओळीच्या शेवटी जुम-इन करा. |
12:54 | डिफॉल्ट रूपात, Butt cap निवडलेले आहे आणि हे शेवटी सरळ कडा देतो. |
12:59 | आता, मी गोलाकार कडा देण्यासाठी Round cap वर क्लिक करेल. |
13:04 | पुढे Square cap आहे, जो की ओळीच्या टोकापर्यंत एक सरळ आणि विस्तारित कडा देतो. |
13:13 | Dashes टॅब खाली हे 3 Markers आहेत, जो पाथच्या मध्य मध्ये मार्कर्स ठेवतो. |
13:20 | उपलब्ध यादी पाहण्यासाठी मार्करच्या प्रत्येक ड्रॉप-डाउन मेन्यू वर क्लिक करा. |
13:25 | Start Markers मध्ये, मी Torso निवडते. |
13:29 | आपण Mid markers म्हणून Curvein निवडूया. |
13:33 | End Markers साठी, आपण Legs निवडू. |
13:39 | कॅन्वस वर तयार झालेल्या कार्टूनची आकृती पहा. |
13:44 | शेवटी, Fill and stroke डायलॉग बॉक्सच्या तळाशी 2 स्लाइडर्स Blur आणि Opacity वर लक्ष द्या. |
13:53 | पहिले आयतला पुन्हा निवडा. |
13:56 | Blur स्लाइडरचा वापर ऑब्जेक्ट्सला ब्लर इफेक्ट देण्यासाठी केला जातो. मी स्लाइडर वर क्लिक करेल आणि ह्याला उजवीकडे घेऊन जाईल. |
14:04 | बघा जसे मी स्लाइडरला जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जाते, आयत ब्लर होत आहे. |
14:15 | Opacity स्लाइडरचा वापर आकृतीला स्पष्टता देण्यासाठी केला जातो, स्लाइडरला उजवीकडे हलवा आणि आकृतीत होणाऱ्या बदलांकडे पहा. |
14:27 | थोडक्यात. या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: |
14:31 | Fill and Stroke पर्याय वापरुन ऑब्जेक्ट्स मध्ये रंग भरणे आकृत्यांना स्ट्रोक किंवा बाह्यरेखा देणे, विविध प्रकारचे gradients आणि स्ट्रोक पेंट आणि स्ट्रोक स्टाईल. |
14:44 | तुमच्यासाठी असाइनमेंट. |
14:47 | 5 पिक्सेल रुंदीचे निळ्या स्ट्रोक सह लाल आणि पिवळ्या रंगाचा Linear gradient भरला आहे, एक पंचकोन तयार करा. |
14:57 | Wavy पॅटर्न सह एक लंबवर्तुळ काढा आणि opacity 70% करा. |
15:04 | Start Markers Arrow1Lstart आणि End Markers Tail सह 10 रुंदी असलेली एक ओळ काढा. |
15:15 | आपली पूर्ण असाईनमेंट अशी दिसली पाहिजे. |
15:18 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
15:28 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
15:37 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15:55 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
16:05 | आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |