Difference between revisions of "Git/C2/Overview-and-Installation-of-Git/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
| <center>'''Time'''</center>
+
| '''Time'''
<center>'''Narration'''</center>
+
|  '''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 20: Line 20:
  
 
|-
 
|-
|00:28
+
| 00:28
 
| या पाठासाठी वर नमूद केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम्सपैकी कुठल्याही एकीचे ज्ञान असावे.
 
| या पाठासाठी वर नमूद केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम्सपैकी कुठल्याही एकीचे ज्ञान असावे.
  

Latest revision as of 11:37, 17 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Overview and Installation of Git वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: वर्जन कंट्रोल सिस्टीम, Git आणि उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम्सवर Git चे इन्स्टॉलेशन.
00:17 या पाठासाठी इंटरनेटची गरज आहे.
00:22 तुमच्याकडे उबंटु लिनक्स किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम्स असावी.
00:28 या पाठासाठी वर नमूद केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम्सपैकी कुठल्याही एकीचे ज्ञान असावे.
00:36 प्रथम वर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजेच VCS जाणून घेऊ.
00:39 वर्जन कंट्रोल सिस्टीम ही बॅकप प्रणाली प्रमाणे असते.
00:44 ही डॉक्युमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रॅम आणि वेबसाईटमधील बदलांचे व्यवस्थापन करते.
00:51 तुम्ही पूर्वी केलेल्या बदलांविषयी तपशील पुरवते.
00:55 VCS ही रिविजन कंट्रोल, सोर्स कंट्रोल आणि सोर्स कोड मॅनेजमेंट (SCM) म्हणूनही ओळखली जाते.
01:03 RCS, Subversion आणि Bazaar ही VCS ची काही उदाहरणे आहेत.
01:11 पुढे Git पासून सुरूवात करू.
01:13 Git हे एक डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सॉफ्टवेयर आहे.
01:16 हे एक मुक्त आणि open source software आहे.
01:19 हे फाईल किंवा फाईलच्या संचामधे केलेल्या बदलांची नोंद ठेवते.
01:24 हे अनेक डेव्हलपर्सना एकत्रितपणे कार्य करण्याची मुभा देते.
01:28 हे प्रोजेक्टसची अनेक वर्जन्स संचित करून त्यांचे व्यवस्थापन करते,
01:32 प्रोजेक्टच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करते.
01:37 Git ची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत:
01:42 मागे जाऊन आपण आपल्या कामाची मागील वर्जन्स मिळवू शकतो.
01:47 आपण सर्व बदलांची संपूर्ण हिस्ट्री पाहू शकतो.
01:52 Git द्वारे दिल्या गेल्या सूचनांच्या सहाय्याने गोंधळ किंवा समस्या सोडवता येऊ शकतात.
01:58 काही डेटा नष्ट झाल्यास कुठल्याही client रिपॉझिटरी मधून परत मिळवता येऊ शकतो.
02:05 Git चा उपयोग प्रोग्रॅमर्स, वेब डेव्हलपर्स, प्रोजेक्ट मॅनेजर्स, लेखक असे इतर अनेकजण करू शकतात.
02:14 ज्या कोणाला टेक्स्ट फाईल्स, शीटस, डिझाईन फाईल्स, ड्रॉईंग्ज इत्यादींची वर्जन्स ट्रॅक करावी लागतात.
02:22 ज्या लोकांना एखाद्या कामावर किंवा प्रोजेक्टवर एकत्रितपणे काम करावे लागते.
02:28 Git कसे कार्य करते ते पाहू.
02:31 वास्तविक पाहता Git संपूर्ण प्रोजेक्टचा स्नॅपशॉट संचित करते.
02:36 स्नॅपशॉट घेणे हे त्याक्षणी सर्व फाईल्सचे चित्र घेण्यासारखे आहे.
02:42 काही फाईल्समधे कुठलेही बदल केलेले नसल्यास Git त्या पुन्हा संचित करत नाही.
02:47 त्या आधीच्या वर्जनशी लिंक केल्या जातात.
02:50 फेल्यूअरच्या स्थितीत डेटा स्नॅपशॉटवरून मिळवला जातो.
02:56 या मालिकेत सांगितल्या गेलेल्या वैशिष्ट्यांची झलक पाहू-
03:01 Git च्या मूलभूत कमांडस
03:04 git चेकआउट कमांड
03:06 Git चे परीक्षण, तुलना आणि
03:09 Git मधील टॅगिंग.
03:11 पुढील काही भागात आपण शिकणार आहोत: Git मधील ब्रँचिंग, ब्रँचेस डिलिट किंवा एकत्र करणे , स्टॅशिंग आणि क्लिनिंग.
03:22 Git हे उबंटु लिनक्सवर उबंटु सॉफ्टवेयर सेंटरच्या सहाय्याने इन्स्टॉल करता येते.
03:27 उबंटु सॉफ्टवेयर सेंटरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या साईटवरील लिनक्सचे पाठ बघा.
03:35 माझ्या सिस्टीमवर Git चे इन्स्टॉलेशन आधीच पूर्ण झाले आहे. आता ते तपासून पाहू.
03:42 टर्मिनलवर जाऊन टाईप करा: git space hyphen hyphen version. एंटर दाबा.
03:50 Git चा वर्जन नंबर आपण बघू शकतो.
03:53 याचा अर्थ Git यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे.
03:57 विंडोज OS वर Git इन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ.
04:01 वेब ब्राउजर उघडा आणि www.git-scm.com या लिंकवर जा.
04:09 डावीकडील Downloads या लिंकवर क्लिक करा.
04:13 विंडोजसाठी Git डाउनलोड करण्यासाठी विंडोजच्या आयकॉनवर क्लिक करा.
04:17 Save As चा डायलॉग बॉक्स उघडेल. Save File बटणावर क्लिक करा.
04:22 डिफॉल्ट रूपात Downloads फोल्डरमधे इन्स्टॉलर फाईल डाउनलोड होईल.
04:26 Git इन्स्टॉल करण्यासाठी "exe" फाईलवर डबल क्लिक करा.
04:30 उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील Run वर क्लिक करून Yes वर क्लिक करा.
04:35 Next क्लिक करा. "General Public License" च्या पानावरील Next वर क्लिक करा.
04:41 डिफॉल्ट रूपात Git प्रोग्रॅम फाईल्समधे इन्स्टॉल केले जाते. Next वर क्लिक करा.
04:46 इन्स्टॉल करायचे घटक आपण निवडू शकतो.
04:49 Additional icons च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
04:52 नंतर Next वर क्लिक करा. पुन्हा Next वर क्लिक करा.
04:57 येथे Git कमांडस रन करण्याचे पर्याय निवडू शकता.
05:00 मी Use Git Bash only हा पर्याय निवडणार आहे. Next क्लिक करा.
05:04 मी डिफॉल्ट रूपात निवडलेला हा पर्याय तसाच ठेवत आहे. Next क्लिक करा.
05:09 Git इन्स्टॉल होत आहे. हे इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून असल्याने काही वेळ घेईल.
05:15 इन्स्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी Finish वर क्लिक करा.
05:19 आता Git रिलीज नोट आपोआप उघडेल. ती बंद करू.
05:24 डेस्कटॉपवर Git Bash शॉर्टकट आयकॉन दिसेल. ते उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
05:32 किंवा 'Start' मेनूतील All programs मधील Git वर क्लिक करा. नंतर Git Bash वर क्लिक करा.
05:41 आता Git Bash उघडेल.
05:44 हे इन्स्टॉल केलेल्या Git चा वर्जन नंबर दाखवेल.
05:48 अशाप्रकारे Git यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे.
05:51 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05:55 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: वर्जन कंट्रोल सिस्टीम, Git आणि उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम्सवर Git चे इन्स्टॉलेशन.
06:10 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
06:29 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:41 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana