Difference between revisions of "Digital-Divide/D0/How-to-apply-for-a-PAN-Card/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 219: | Line 219: | ||
| आयटम 12 – मध्ये, | | आयटम 12 – मध्ये, | ||
|- | |- | ||
− | | 06: 43 | + | | 06:43 |
| भारतातील नागरिकांनी त्यांचा '' 'आधार''' क्रमांक, दिला असेल तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. | | भारतातील नागरिकांनी त्यांचा '' 'आधार''' क्रमांक, दिला असेल तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. | ||
|- | |- | ||
Line 308: | Line 308: | ||
| 09:18 | | 09:18 | ||
| पेमेंट | | पेमेंट | ||
− | + | Demand Draft(डिमांड ड्राफ्ट) | |
− | + | Cheque(चेक) द्वारे-केले जाऊ शकते. | |
− | + | ||
|- | |- | ||
| 09:23 | | 09:23 | ||
Line 399: | Line 398: | ||
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. | | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. | ||
|- | |- | ||
− | | 11 :49 | + | | 11:49 |
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. | ||
|- | |- |
Revision as of 13:02, 9 March 2017
Time | Narration |
00:01 | पॅनकार्ड साठी अर्ज कसा करावा या वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण खालील प्रक्रिया शिकू. |
00:09 | पॅन कार्ड साठी अर्ज करणे. |
00:12 | ओळखीचा पुरावा म्हणून कागदपत्रे. |
00:15 | आणि अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेणे. |
00:18 | पॅन कार्ड आर्जाच्या फॉर्म ला Form 49A. म्हणतात. |
00:24 | हा फॉर्म खालील लिंक वरुन डाउनलोड केल्या जाऊ शकतो. |
00:28 | फॉर्म डाउनलोड केल्यावर, त्याची एक प्रिंट आऊट घ्या. |
00:35 | पुढील स्टेप फॉर्म भरणे आहे. |
00:38 | फॉर्म केवळ इंग्रजीमध्ये 'ब्लॉक लेटर्समध्ये सुवाच्यपणे भरावा. |
00:45 | काळा शाई चा पेन फॉर्म भरण्यासाठी अधिक श्रेयस्कर आहे. |
00:49 | प्रत्येक बॉक्समध्ये, फक्त एक वर्ण म्हणजेच (वर्णमाला / संख्या / विरामचिन्ह ) भरा. |
00:58 | प्रत्येक शब्द नंतर एक रिकामा बॉक्स सोडणे आवश्यक आहे. |
01:03 | व्यक्तीविशिष्ट अर्जदारांना पांढऱ्या पार्श्वभूमीमधे असलेले दोन अलीकडच्या काळातील रंगीत फोटो आवश्यक आहे. |
01:09 | हा फोटो फॉर्म वर पुरविलेल्या मोकळ्या जागे मध्ये पेस्ट, म्हणजेच चिकटवावा. |
01:14 | फोटो चा आकार 3.5cm X 2.5cm असावा. |
01:21 | फॉर्म मध्ये फोटो ला स्टेप्लर किंवा क्लिप लावलेले नसावे. |
01:26 | डावीकडील फोटो च्या मागे एक सही / अंगुठ्याचा ठसा असावा. |
01:32 | उजव्या बाजूच्या फोटो साठी, एक सही / अंगुठ्याचा ठसा त्याखाली असावा. |
01:39 | अंगठ्याचा ठसा नोटरी पब्लिक किंवा प्राधिकृत अधिकारी सह कार्यालयीन सील किंवा शिक्क्या द्वारे साक्षांकीत करून घेणे आवश्यक आहे. |
01:48 | आता, फॉर्म भरण्यास सुरुवात करा. |
01:51 | सर्व प्रथम, 'करनिर्धारण अधिकारी' तपशील भरा. |
01:58 | करनिर्धारण अधिकाऱ्याचा तपशील या वेब पेज वर मिळू शकतो, |
02:08 | 1 विभागात, तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील भरावा लागेल. |
02:13 | येथे तुमचे, जसे की, श्री, श्रीमती इत्यादी शीर्षक निवडा. |
02:19 | पूर्ण स्वरूपात आपले आडनाव, नाव आणि मधले नाव, लिहा. |
02:25 | हे कोणत्याही आद्याक्षरे शिवाय भरावे. |
02:29 | तुमच्या नवा अगोदर श्रियुत/ श्रीमती, डॉक्टर, कुमारी इत्यादी कोणतेही शीर्षक उपसर्ग नसावे. |
02:37 | व्यक्तीविशिष्ट नसल्यास, जर पुरविलेल्या जागे पेक्षा नाव मोठे असेल तर काय? |
02:42 | त्या बाबतीत, पहिल्या किंवा मध्य नावा साठी पुराविलेल्या जागेत ते निरंतर केल्या जाऊ शकते. |
02:50 | एका कंपनीच्या बाबतीत, नावात कोणतेही संक्षेपाक्षर नसावे. |
02:55 | उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड' पूर्ण लिहिलेले असावे. |
03:00 | Pvt Ltd, Private Ltd, P. Ltd इत्यादी सारख्या वेरीयेशन्स ला अनुमती नाही. |
03:10 | एकमेव मालकी बाबतीत, पॅन अर्ज, मालकाच्या स्वत: च्या नावाने असावा. |
03:16 | हे पॅन कार्ड वर छापले जाईल. |
03:19 | लक्षात ठेवा, आडनाव त्याच्या पूर्ण स्वरूपात लिहीणे आवश्यक आहे. |
03:24 | पुढील विभाग इतर नावे विचारतो, जसे एखादा कोणत्या नावाने ओळखला जातो किंवा ओळखला जायचा. |
03:30 | अर्जदार "yes" निवडतो तर ते लिहिणे आवश्यक आहे, आयटम 1साठी खालील सूचना लागू होतात. |
03:38 | आयटम 4, Gender फील्ड, केवळ वैयक्तिक अर्जादारा द्वारे भरली असावी. |
03:44 | आयटम 5, जन्म दिनांक विचारली असते. |
03:48 | अर्जदाराच्या विविध श्रेणींमध्ये अपेक्षित तारखा फॉर्ममध्ये दर्शविल्या आहेत. |
03:54 | उदाहरणार्थ: कंपनी ने त्याच्या अंतर्भावाची (Incorporation )दिनांक पुरवावी. |
04:00 | नंतर, अर्जादाराने त्याच्या वडिलांचे नाव भरावे. |
04:05 | आयटम 1 मधील नाव संदर्भात सूचना येथे लागू होते. |
04:10 | लक्षात ठेवा, विवाहित महिलेने तिच्या वडिलांचे नाव देखील द्यावे, पती चे नाव नाही. |
04:17 | आयटम 7 आपला पत्ता विचारते. |
04:20 | निवासी पत्ता, फक्त व्यक्ती द्वारे भरलेला असावा. HUF, AOP, BOI किंवा AJP. |
04:29 | जर व्यक्ती कडे उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास, उदाहरणार्थ समजा, जर व्यवसाय किंवा व्यापार करणारा असेल तर, कार्यालायाचा पत्ता (Office Address ) येथे द्यावा. |
04:38 | एक फर्म, LLP, कंपनी, स्थानिक अधिकारी किंवा ट्रस्ट बाबतीत, संपूर्ण कार्यालय पत्ता अनिवार्य आहे. |
04:49 | सर्व अर्जदारांनी दिलेल्या पत्त्या मध्ये हे तपशिल समाविष्ट असले पाहिजे- |
04:54 | म्हणजेच, गाव / शहर / जिल्हा, |
04:57 | राज्य / केंद्रशासित प्रदेश, आणि |
05:00 | पिनकोड |
05:02 | विदेश पत्त्या (Foreign addresses ) मध्ये त्याच्या झिप कोड सोबत देशाचे नाव असणे आवश्यक आहे. |
05:07 | आयटम 8, म्हणजेच 'कम्युनिकेशन साठी पत्ता' - |
05:11 | 'व्यक्ती / HUFs / AOP / BOI / AJP'' 'Residence'(रेसिडेन्स) किंवा 'Office'(ऑफीस) पत्त्यावर टिक म्हणजेच खूण करू शकतात. |
05:21 | इतर अर्जदारांनी त्यांच्या' कार्यालयाचा ' पत्ता लिहावा. |
05:25 | सर्व सुसंवाद येथे लेखी पत्त्यावर पाठवले जातील. |
05:30 | ' 'दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी तपशील आयटम 9 मध्ये भरले जातील. |
05:37 | दूरध्वनी तपशील मध्ये 'देश कोड (आयएसडी कोड) आणि 'क्षेत्र / एसटीडी कोड चा समावेश असला पाहिजे. |
05:46 | उदाहरणार्थ. दिल्ली दूरध्वनी 23557505 क्रमांक चा तपशील असा भरलेला असावा, |
05:54 | 91 देशाचा कोड |
05:56 | 11 STD कोड |
06:00 | क्रमांक आणि ईमेल आयडी आवश्यक आहेत. |
06:04 | अर्जा मध्ये काही चुका असल्यास, अर्जादारांना संपर्क करण्यासाठी, |
06:09 | ईमेल द्वारे पॅन कार्ड पाठविण्यासाठी, |
06:12 | स्थिती अद्ययावत साठी, एसएमएस |
06:16 | आयटम 10 मध्ये वर्ग स्थिती निवडा जी लागू होते. |
06:21 | 'मर्यादित दायित्व भागीदारी बाबतीत ' 'पॅनसाठी एक 'फर्म दर्जा दिला जाईल. |
06:28 | आयटम 11, कंपन्यांची रजिस्ट्रार द्वारे जारी केलेल्या, कंपन्यांच्या नोंदणी क्रमांक, विचारतो. |
06:35 | इतर अर्जदारांनी राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकार्यांनी दिलेला नोंदणी क्रमांकका चा उल्लेख करू शकतात. |
06:42 | आयटम 12 – मध्ये, |
06:43 | भारतातील नागरिकांनी त्यांचा 'आधार' क्रमांक, दिला असेल तर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. |
06:48 | ते 'Aadhaar' पत्र / कार्ड च्या एक प्रत द्वारे समर्थित असावे. |
06:53 | आयटम 13 मध्ये अर्जदाराने त्यांचा व्यवसाय कोड वापरून त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत सूचित करणे आवश्यक आहे. |
07:01 | हे कोड्स फॉर्मच्या पृष्ठ 3 वर उपलब्ध आहेत. |
07:05 | उदाहरणार्थ: वैद्यकीय व्यवसाय आणि व्यवसाय यांचे कोड 01 आहे. |
07:10 | अभियांत्रिकी चा 02 आहे. |
07:13 | आयटम 14 करप्राप्त व्यक्तीची (representative assessees ) माहिती विचारतो. |
07:19 | केवळ जे 'आयकर अधिनियम, 1961 च्या 'कलम 160 मध्ये निर्दिष्ट केलेले आहेत ते करप्राप्त व्यक्ती म्हणून काम करू शकतो. |
07:29 | त्या पैकी काही आहेत, |
07:31 | अनिवासी चा एक एजंट, |
07:33 | पालक किंवा व्यवस्थापक, वेडा किंवा मूर्ख, न्यायालय प्रभाग इत्यादी. |
07:41 | रिप्रेझेंटेटिव्ह असेसी अल्पवयीन, मानसिकरीत्या अपंग, मृत, मूर्ख किंवा वेडा आहेत त्या अर्जदारांनी अनिवार्य आहेत. |
07:54 | रिप्रेझेंटेटिव्ह असेसी वैयक्तिक माहिती येथे भरली जाते. |
08:00 | आयटम 15, पॅन कार्ड अर्ज सादर करणाच्या कागदपत्रा बद्दल आहे. |
08:06 | व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा एक पॅन च्या अर्जासह संलग्न करणे अनिवार्य आहे. |
08:13 | या कागदपत्रात अर्जदाराचे नाव असणे आवश्यक आहे. |
08:18 | रिप्रेझेंटेटिव्ह असेसी देखील या कागदपत्रा सह संलग्न करणे आवश्यक आहे. |
08:24 | कागदपत्रांची यादी जी, ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करते ती पॅन अर्जाचा फॉर्म मध्ये पृष्ठ 4 वर दिलेली आहे. |
08:33 | अर्जदारांनी फॉर्म मध्ये नमुद पर्याय पासून कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. |
08:39 | उदाहरणार्थ, व्यक्तिविशिष्ट अर्जादार आणि HUF च्या ओळखीसाठी पुरावा आहे पुढीलपरमाणे- |
08:45 | शाळा सोडल्याचा दाखला |
08:47 | रॅशन कार्ड |
08:49 | चालक परवाना इत्यादी. |
08:53 | पत्त्याचा पुरावा साठी कागदपत्रे आहेत - |
08:56 | वीज बिल |
08:57 | टेलिफोन बिल |
08:59 | पासपोर्ट इत्यादी |
09:01 | आता आपण अर्ज संबंधित काही सामान्य माहिती ची चर्चा करूया. |
09:06 | पॅन आर्जाच्या प्रक्रीये साठी शुल्क आहे, Rs.96.00 ( Rs.85.00 + 12.36% सेवा कर ). |
09:18 | पेमेंट
Demand Draft(डिमांड ड्राफ्ट) Cheque(चेक) द्वारे-केले जाऊ शकते. |
09:23 | भारताबाहेर पत्त्यांसाठी, प्रक्रिया शुल्क Rs. 962,00 |
09:28 | म्हणजेच [ (अप्लिकेशन फीस Rs.85.00 + डिस्पॅच फीस Rs.771.00 ) + 12.36% सेवा कर ]. |
09:40 | परदेशी पत्त्यांसाठी शुल्क भरण्यासाठी फक्त मुंबईत डिमांड ड्राफ्ट द्वारे भरली जाऊ शकते. |
09:48 | फॉर्म शेवटचा बॉक्स अर्जदाराच्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण विचारते. |
09:54 | रिप्रेझेंटेटिव्ह असेसी च्या स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण, अल्पवयीन, मृत, वेडा आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना दिलेल्या असाव्यात. |
10:04 | स्वाक्षरी किंवा आंगठा मुद्रण नसेल तर अर्ज नाकारला जाईल. |
10:09 | अर्जदारांना हा फॉर्म स्वीकारल्यानंतर पोचपावती प्राप्त होईल. |
10:14 | यात युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतील. |
10:18 | हा क्रमांक अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. |
10:23 | तुम्ही आयकर विभाग वेबसाइट किंवा या वेबसाइट वापरून त्याच्या स्थिती ट्रॅक करू शकता |
10:32 | या वेबसाईटवर, 'Status Track'(स्टेटस ट्रॅक) शोध हे कार्य सुरू करेल. |
10:38 | या शोधास एकतर आपला, |
10:40 | # पोचपावती क्रमांक, किंवा |
10:42 | तपशील जसे नाव आणि जन्मतारीख लागेल. |
10:46 | SMS द्वारे पॅनसाठी स्थिती तपशील मिळवू शकता. |
10:50 | >SMS- NSDLPAN<space>15-digit पोचपावती क्रमांक . आणि 57575 वर पाठवा. |
11:01 | पोस्टल पत्ता म्हणून दर्शवले आहेत. |
11:05 | ही माहिती उपयुक्त होती अशी आशा आहे. |
11:08 | संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो - |
11:13 | पॅनकार्ड साठी अर्ज करण्याची प्रक्रिया. |
11:15 | व्यक्तीची च्या ओळखेचा पुरावा साठी कागदपत्रे आणि, |
11:19 | पॅन स्थिती ट्रॅक करण्यास. |
11:22 | प्रकल्पाची माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial |
11:25 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:28 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
11:33 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
11:35 | स्पोकन ट्यूटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:38 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:42 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
11:49 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:53 | यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:01 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
12:11 | या ट्युटोरियलमध्ये आपण समाप्तीपर्यंत आलो आहोत. |
12:13 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केल असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |