Difference between revisions of "Linux-Old/C2/Ubuntu-Desktop-10.10/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (moved Linux-Ubuntu/C2/Ubuntu-Desktop/Marathi to Linux/C2/Ubuntu-Desktop/Marathi: Combining Linux & Linux-Ubuntu FOSS Categories.)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!निवेदन
+
|'''Narration'''
 
|-
 
|-
 
|0.00     
 
|0.00     

Revision as of 19:24, 3 March 2017

Time Narration
0.00 उबंटू डेस्कटॉपवरील या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
0.04 या ट्युटोरियलद्वारे आपण GNOME च्या पार्श्वभूमीवर उबंटू डेस्कटॉपचा परीचय करून घेऊया.
0.12 यासाठी मी उबंटू १०.१० या version चा वापर करत आहे.
0.19 आता तुम्हाला उबंटूचा डेस्कटॉप दिसत आहे.
0:24 तुम्हाला डावीकडे वरच्या बाजूला मेन मेन्यू दिसेल.
0:31 तुम्ही Alt+F1 वापरून, किंवा ‘अप्लिकेशन’ मधील त्या पर्यायावर क्लिक करून तो उघडू शकता.
0:40 अप्लिकेशन मेनूमध्ये, पूर्वीच इन्स्टॉल असलेल्या सर्व अप्लिकेशन्सचे वर्गीकरण आहे
0:48 या अप्लिकेशन मेनू मधील काही महत्त्वाच्या अप्लिकेशन्सची ओळख करून घेऊ या.
0:55 यासाठी अप्लिकेशन मधून अक्सेसरिजमध्ये व तेथून कॅल्क्युलेटर मध्ये जा.
1:04 कॅल्क्युलेटर गणितीय, शास्त्रीय व आर्थिक आकडेमोड करण्यास उपयोगी पडतो.
1:12 'कॅल्क्युलेटर' या पर्यायावर क्लिक करा.
1:18 काही सोप्या आकडेमोडी करून बघूया.
1:22 ५ (गुणिले) ८ असे टाईप करून नंतर ‘बरोबर’ या चिन्हाची कळ दाबा.
1:32 ‘बरोबर’ चिन्हाऐवजी तुम्ही एन्टर की दाबू शकता.
1:39 आता ‘क्लोज’ बटन दाबून कॅल्क्युलेटरमधून बाहेर पडा.
1:46 आता आपण आणखी एक अप्लिकेशन पाहू या.
1:50 त्यासाठी पुन्हा अप्लिकेशन्स मधून अक्सेसरिज मध्ये जा.
1:59 अक्सेसरिजमधील ‘टेक्स्ट एडिटर’ उघडण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
2:09 आता तुम्हाला स्क्रीनवर जी-एडिट हा टेक्स्ट एडिटर दिसत आहे.
2:16 आता मी इथे काही वाक्ये टाईप करून ती सेव्ह करते. हॅलो वर्ल्ड असे टाईप करा.
2:28 Ctrl आणि s वापरून अथवा ‘File’ मधील ‘Save’ वर क्लिक करून हे सेव्ह करता येईल. आपण फाईल मेनूमध्ये जाऊन हे सेव्ह करुया.
2:45 आता एक छोटा ‘डायलॉग बॉक्स’ दिसेल. त्यात फाईलचे नाव व ती सेव्ह करण्याचे स्थान विचारले असेल.
2:56 तर, आता मी Hello.txt असे नाव type करते व फाईल सेव्ह करण्यासाठी ‘Desktop’ पर्याय निवडून ‘Save’ हे बटन दाबते.
3:15 आता जी-एडिट बंद करून आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे का ते पाहू या. जी-एडिट बंद करा.
3:24 आता डेस्कटॉपवर तुम्हाला ‘Hello.txt’ ही फाईल दिसेल.
3:30 याचा अर्थ आपली टेक्स्ट फाईल व्यवस्थित सेव्ह झाली आहे.
3:35 आता मी Double क्लिक करून ही फाईल उघडते.
3:40 वा! आपण लिहिलेल्या मजकुरासह आपली फाईल उघडली गेली आहे.
3:44 इंटरनेटवर जी-एडिट टेक्स्ट एडिटरबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे.
3:50 या विषयावरचे स्पोकन ट्युटोरियल http://spoken-tutorial.org/ या लिंकवर मिळेल.
4:00 आता टेक्स्ट एडिटर बंद करून अॅक्सेसरिजमधील ‘Terminal’ हे अॅप्लिकेशन पाहू या.
4:12 पुन्हा एकदा अॅप्लिकेशन्समधील अॅक्सेसरिजमध्ये जाऊन, तिथून टर्मिनलमध्ये जाऊ या.
4:19 टर्मिनलला कमांड लाईन असेही म्हटले जाते, कारण इथून तुम्ही कॉम्प्युटरला आज्ञा देऊ शकता.
4:25 खरे तर टर्मिनल हे जी.य़ू.आय. पेक्षा अधिक प्रभावी आहे.
4:30 टर्मिनल म्ह्णजे काय हे समजण्यासाठी एखादी सोपी आज्ञा देऊन पाहू.
4:36 त्यासाठी ‘ls’ टाईप करून एंटर दाबा.
4:41 यात Current डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स आणि फोल्डर्सची यादी तयार झालेली तुम्हाला दिसेल.
4:48 त्यामुळे आता तुम्हाला होम फोल्डरमधील सर्व फाईल्स व फोल्डर्सची ही यादी दिसत आहे.
4:55 होम फोल्डर म्हणजे काय ते आपण याच ट्युटोरियलमध्ये पुढे पाहू या.
5:01 आता आपण टर्मिनलमध्ये आणखी वेळ न घालवता पुढे जाऊया. http://spoken-tutorial.org/ या लिंकमधील लिनक्सवरील स्पोकन ट्युटोरियलमधे टर्मिनल कमांड्स विस्ताराने दिल्या आहेत.
5:17 टर्मिनल बंद करा.
5:20 आता पुढच्या अप्लिकेशनकडे म्हणजेच फायरफॉक्स वेब-ब्राऊझरकडे वळू या.
5:27 त्यासाठी अप्लिकेशन्समधून इंटरनेटमध्ये जा, व फायरफॉक्स वेब-ब्राऊझरवर क्लिक करा.
5:36 'वर्ल्ड वाईड वेब’मध्ये पोहोचण्यास फायरफॉक्सचा उपयोग होतो. आता तुम्हाला फायरफॉक्स उघडलेले दिसेल.
5:43 आता आपण जी-मेलच्या site वर जाऊ या. त्यासाठी address bar वर जा किंवा F6 दाबा. आपण F6 दाबू या.
5:53 आता आपण address bar वर पोहोचलो आहोत. बॅकस्पेस ही की दाबल्याने address bar कोरा होईल.
6:00 मी आता "www.gmail.com" टाईप करत आहे.
6:04 टाईप करत असतानाच फायरफॉक्स काही पर्याय सुचवेल.
6:09 त्यापैकी एखादा पर्याय निवडा किंवा site addressपूर्ण टाईप करून एंटर दाबा.
6:15 फायरफॉक्स एकतर तुम्हाला थेट वेबसाईटला जोडून देईल किंवा Login आणि Password विचारेल.
6:22 आता User name आणि Password टाईप करून एंटर दाबा.
6:36 आता तुम्हाला स्क्रीनवर जी-मेलचे पान दिसेल. ते बंद करून पुढे जाऊ या.
6:45 आता अप्लिकेशन्स मधून ऑफिस मेनूमध्ये जाऊया.
6:53 या ऑफिस मेनू मध्ये आपल्याला ‘ओपनऑफिस’ हा वर्ड-प्रोसेसर, स्प्रेडशीट, आणि प्रेझेंटेशन दिसेल
7:03 या विषयांवरची भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
7:07 आपल्या वेबसाईटवरही या विषयांवरची स्पोकन ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत.
7:12 आता साऊंड आणि व्हिडिओ मेनूमध्ये काय आहे ते पाहू या. त्यासाठी अप्लिकेशन्स मधून साऊंड and व्हिडिओमध्ये जा.
7:21 यामधे मूव्ही-प्लेअर नावाचे एक application आहे. ते व्हिडीओ व गाणी दोन्हीसाठी वापरले जाते. मूव्ही-प्लेअर हे ओपन फॉरमॅट व्हिडीओ साठीचे सॉफ्टवेअर आहे.
7:35 आता मी माझ्या पेन-ड्राईव्हवरील एक नमुना फाईल दाखवते. मी माझा पेन-ड्राईव्ह यू.एस.बी. स्लॉटमध्ये घातला आहे. पेन-ड्राईव्ह वाचला जात आहे.
7:48 तो न उघडल्यास, डेस्कटॉपवरूनही त्यात प्रवेश मिळवता येईल.
7:53 डावीकडील खालच्या कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करू या. त्यावर एकदा क्लिक केल्यास फक्त डेस्कटॉप दिसेल. पण पुन्हा क्लिक केल्यास सध्या ओपन असलेल्या फाईल्ससह डेस्कटॉप दिसेल.
8:08 ’विंडोज-की’ आणि ‘डी’ एकत्र दाबूनसुद्धा आपण डेस्कटॉपवर जाऊ शकतो. तुम्हाला आठवत असेलच, उबंटूच्या जुन्या versions मधे डेस्कटॉप उघडण्यासाठी Clt+Alt+D याच कीज वापरल्या जात. User ने अशा प्रकारचे फरक हाताळण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. आपण विंडॊज की आणि ‘डी’ एकत्र दाबू या.
8:37 इथे तुम्हाला तुमचा पेन-ड्राईव्ह डेस्कटॉपवर आलेला दिसेल.
8:42 त्यावर डबल-क्लिक करून तो उघडू या.
8:46 आता मी तुम्हाला दाखविण्यासाठी ‘उबंटू ह्यूमॅनिटी डॉट ओजीव्ही’ ही व्हिडिओ फाईल निवडत आहे.
8:57 ही पहा माझी फाईल. आता ती उघडण्यासाठी मी त्यावर डबल-क्लिक करत आहे.
9:09 ती सामान्यतः मूव्ही-प्लेअर मध्ये चालू होते. सध्या आपण ती बंद करू या.
9:13 आता या डेस्कटॉपवरील अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू या.
9:18 त्यासाठी यावेळी आपण ‘प्लेसेस’ मेनू मध्ये जाऊ या. इथे आपल्याला होम फोल्डर दिसेल.
9:27 तो उघडण्यासाठी होम फोल्डरवर क्लिक करा.
9:29 उबंटूमधे प्रत्येक User चा वेगळा फोल्डर असतो.
9:34 होम फोल्डर हे जणू आपले घरच आहे. तिथे आपण आपल्या फाईल्स व फोल्डर्स store करू शकतो.
9:42 आपण परवानगी दिल्याशिवाय कोणीही तो बघू शकत नाही. ‘फाईल परमिशन’ बद्द्लची आणखी माहिती spoken-tutorial.org या लिंकवरील लिनक्स स्पोकन ट्युटोरियल्समधे उपलब्ध आहे.
9:56 आपल्या होम फोल्डरमधे आपल्याला डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, डाऊनलोड्स आणि व्हिडिओ इत्यादि फोल्डर्स दिसतील.
10:08 लिनक्स मध्ये प्रत्येक गोष्ट फाईलच्याच स्वरुपात पाहिली जाते. डेस्कटॉप फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू या.
10:16 ही पाहा, आपण टेक्स्ट एडिटर मधून सेव्ह केलेली ‘Hello.txt’ फाईल आपल्याला इथे दिसत आहे.
10:25 म्हणजेच हा फोल्डर आणि डेस्कटॉप हे दोन्ही एकच आहेत. आता मी हा फोल्डर बंद करत आहे.
10:31 डेस्कटॉपची एकच थीम बघून तुम्हाला कंटाळा आला असेल ना? चला, आपण ती थीम बदलू या.
10:37 त्यासाठी सिस्टिम मधून प्रेफ्ररन्सेस आणि तिथून अपिअरन्स मध्ये जा आणि तिथे क्लिक करा.
10:44 इथे थीम्स टॅबखाली आधीच इन्स्टॉल केलेल्या अनेक थीम्स आहेत. आपण त्यातील ‘क्लिअरलुक्स’ही थीम घेऊ.
10:52 तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर, लगेच तुम्हाला तसे बदल झालेले दिसून येतील.
10:58 डावीकडे खाली कोपऱ्यात असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला हे पाहता येईल. याच आयकॉनवर पुन्हा क्लिक करून परत फोल्डरमधे जाऊ या.
11:10 अशाप्रकारे यातील कोणतीही थीम निवडण्याची मजा तुम्हाला लुटता येईल. हवी ती थीम निवडा आणि मग बाहेर पडण्यासाठी ‘एक्झिट’ वर क्लिक करा.
11:18 याबरोबरच आपण आपल्या या ट्युटोरियलचा शेवट करु या.
11:21 आतापर्यंत या ट्युटोरियलमध्ये आपण उबंटू डेस्कटॉप, मेन मेनू आणि उबंटू स्क्रिनवर उपलब्ध असणारे अन्य सर्व आयकॉन्स यांची माहिती करुन घेतली.
11:31 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
11:41 याबाबतची आधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
11:47 या ट्युटोरियलचे भाषांतर मैत्रेयी जोशी यांनी केले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आम्ही आपला निरॊप घेतो, धन्यवाद!

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Sneha