Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C3/Basics-of-Layers-Password-Encryption-PDF/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 29: | Line 29: | ||
|- | |- | ||
|00:33 | |00:33 | ||
− | | '''Layers''' म्हणजे काय? | + | | '''Layers''' म्हणजे काय?'''Layers''' हे एकावर एक ठेवलेल्या पारदर्शक कागदाप्रमाणे असतात. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 393: | Line 389: | ||
|- | |- | ||
|08:00 | |08:00 | ||
− | | | + | | ड्रॉ फाईल '''PDF''' मधे रूपांतरित करणे |
|- | |- | ||
|08:03 | |08:03 | ||
− | | | + | | पासवर्ड एन्क्रीप्शनच्या सहाय्याने ती प्रोटेक्ट करणे. |
|- | |- | ||
Line 445: | Line 441: | ||
|- | |- | ||
|08:42 | |08:42 | ||
− | | | + | | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
|- | |- | ||
|08:45 | |08:45 | ||
− | | | + | | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
|- | |- |
Latest revision as of 18:41, 3 March 2017
Time | Narration |
00:01 | लिबर ऑफिस ड्रॉच्या Basics of Layers and Password Encryption PDF वरील पाठात आपले स्वागत. |
00:09 | यामधे layers ची प्राथमिक माहिती जाणून घेऊ. |
00:12 | तसेच password encryption च्या सहाय्याने Draw फाईल प्रोटेक्ट करणे आणि |
00:18 | ती PDF मधे Export करणे हे जाणून घेऊ. |
00:21 | येथे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू. |
00:30 | 'Route Map' फाईल उघडा. |
00:33 | Layers म्हणजे काय?Layers हे एकावर एक ठेवलेल्या पारदर्शक कागदाप्रमाणे असतात. |
00:42 | प्रत्येक ड्रॉ फाईलमधे तीन लेयर्स असतात. |
00:44 | डिफॉल्ट रूपात लेआऊट लेयर दाखवला जातो. |
00:48 | बहुतांश ग्राफिक्स आपण येथे बनवतो. |
00:51 | बटणे आणि फॉर्म्ससारखी कंट्रोल एलिमेंटस संचित करण्यासाठी Control layer चा उपयोग केला जातो. |
00:57 | किचकट ड्रॉईंगमधे मोजमापाच्या रेषा दाखवण्यासाठी Dimensions layer वापरली जाते. |
01:06 | उदाहरणार्थ घराच्या नकाशात भिंतींचे अचूक मोजमाप तसेच विजेच्या वायरिंगच्या जागा इत्यादी दाखवण्यासाठी. |
01:19 | घरापासून शाळेपर्यंत जाणारा रस्ता दाखवणारे तीन नकाशे प्रिंट करू. |
01:26 | त्यांना Map 1, Map 2 आणि Map 3 अशी नावे देऊ. |
01:31 | Map 1 त्या भागातील सर्व मुख्य स्थळे दाखवेल. |
01:35 | Map 2 मधे दोन तलाव, स्टेडियम आणि व्यापारी संकुल या व्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत. |
01:43 | Map 3 मधे बागेव्यतिरिक्त इतर सर्व स्थळे दाखवणार आहोत. |
01:48 | हे दाखवण्यासाठी आपल्याला तीन स्वतंत्र नकाशे बनवणे आवश्यक आहे का? |
01:51 | गरज नाही. ड्रॉने उपाय म्हणून यावर लेयर्स ही सुविधा प्रदान केली आहे. |
01:58 | त्यामुळे माहितीच्या अनेक लेयर्स असलेली केवळ एकच मॅप फाईल असेल. |
02:03 | एका ड्रॉ पेजच्या सहाय्याने लेयर्समधील माहिती एकत्रितपणे बघू शकतो किंवा प्रिंट करू शकतो. |
02:10 | RouteMap मधे काही लेयर्स समाविष्ट करू. |
02:13 | Layout layer वर क्लिक करा. |
02:15 | राईट क्लिक करून Select Insert layer वर क्लिक करा. |
02:18 | Insert layer चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:22 | “Name” फिल्डमधे टाईप करा: “Layer four”. |
02:24 | तुमच्या ड्रॉईंगशी संबंधित असलेले कोणतेही टायटल आणि डिस्क्रीप्शन येथे देऊ शकता. |
02:30 | “Visible” आणि “Printable” हे चेकबॉक्स निवडा. |
02:34 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा. |
02:37 | पुन्हा एकदा Layout layer वर क्लिक करा. |
02:40 | ड्रॉ पेजवरील नकाशा सिलेक्ट करून तो अनग्रुप करा. |
02:44 | आता Lakes सिलेक्ट करा. |
02:46 | Shift बटण दाबून Stadium आणि Commercial complex सिलेक्ट करा. |
02:52 | पुढे राईट क्लिक करून Cut वर क्लिक करा. |
02:55 | नंतर “Layer four” लेयरवर क्लिक करून ते येथे पेस्ट करा. |
02:59 | Layout layer वरील त्यांच्या जागांवरच ते या लेयरवरही पेस्ट होतील. |
03:04 | Layer Four वर पुन्हा क्लिक करा. |
03:07 | context menu साठी राईट क्लिक करून Modify Layer वर क्लिक करा. |
03:12 | Modify Layer चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:15 | “Visible” चा बॉक्स अनचेक करून OK वर क्लिक करा. |
03:18 | Layer Four मधील ऑब्जेक्टस आता दिसणार नाहीत. |
03:21 | ही ऑब्जेक्टस प्रत्यक्षात उपस्थित आहेत. परंतु आपल्याला ती दिसू शकत नाहीत. |
03:26 | Layout Layer वर क्लिक करा. टॅब दिसत नसल्यास Layout layer चा टॅब दिसेपर्यंत लेफ्ट ऍरोचे बटण दाबून ठेवा. |
03:35 | आपला Map 2 तयार झाला आहे! अशाप्रकारे Map 3 देखील बनवू शकतो. |
03:42 | पाठ थांबवून ही असाईनमेंट करा. |
03:45 | घरापासून शाळेपर्यंत जाणारे दोन मार्ग बनवा. |
03:49 | RouteMap मधे प्रत्येक मार्ग वेगळ्या लेयरमधे बनवा. त्यामुळे एका मॅपमधे एक मार्ग अशाप्रकारे दोन वेगळे मॅप प्रिंट करता येतील. |
04:01 | आता ड्रॉ फाईल PDF फाईल म्हणून एक्सपोर्ट कशी करायची आणि ती पासवर्ड प्रोटेक्टेड कशी करायची ते पाहू. |
04:10 | प्रथम “RouteMap” ही ड्रॉ फाईल 'PDF' फॉरमॅट मधे सेव्ह करू. |
04:14 | मुख्य मेनूतील File खालील “Export as PDF” वर क्लिक करा. |
04:19 | PDF डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:21 | प्रथम “General” खालील पर्याय सेट करू. |
04:24 | “General” वर क्लिक करा. |
04:26 | ड्रॉ फाईलमधील सर्व पाने 'PDF' करण्यासाठी Range खालील All पर्याय निवडा. |
04:34 | Images खालील “JPEG compression” पर्याय निवडा. |
04:38 | काँप्रेशनसाठी सर्वसामान्यपणे हाच फॉरमॅट वापरला जातो. |
04:42 | पुढे Initial View टॅबवर क्लिक करा. |
04:45 | डायलॉग बॉक्समधे दाखवलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण तशाच ठेवणार आहोत. |
04:49 | आता Links टॅबवर क्लिक करा. |
04:52 | आपण ड्रॉ फाईलमधे लिंक्स समाविष्ट केलेल्या असू शकतात. |
04:55 | Links साठी सेट केलेल्या डिफॉल्ट व्हॅल्यूज त्याच ठेवणार आहोत. |
04:59 | 'PDF' डॉक्युमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला पासवर्ड देऊ. |
05:03 | त्यासाठी “Security” टॅबवर क्लिक करा. |
05:07 | Set open password वर क्लिक करा. |
05:10 | Set open password डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:14 | “Password” फिल्डमधे कुठलाही पासवर्ड टाईप करा ज्याने तुम्हाला फाईल प्रोटेक्ट करायची आहे. |
05:20 | मी “Protect101” पासवर्ड सेट करत आहे. |
05:24 | Confirm ह्या फिल्डमधे मी “Protect101” हा पासवर्ड पुन्हा टाईप करत आहे. OK क्लिक करा. |
05:31 | पुढे डॉक्युमेंटमधे बदल करण्याची किंवा ते प्रिंट करण्याची परमिशन सेट करू. |
05:37 | Set permission password वर क्लिक करा. |
05:41 | Password फिल्डमधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा. मी “ProtectAgain0” देत आहे. |
05:49 | Confirm फिल्डमधे “ProtectAgain0” हा पासवर्ड पुन्हा टाईप करून OK वर क्लिक करा. |
05:57 | Printing आणि Changes च्या परमिशनचे पर्याय आता ऍक्टिव्ह झाले आहेत. |
06:03 | आकडे आणि स्पेशल कॅरॅक्टर्स घेऊन तयार केलेला कमीत कमी सहा अक्षरी पासवर्ड सेट करणे कधीही चांगले. |
06:14 | Printing खालील Not Permitted हा पर्याय निवडा. |
06:18 | आता योग्य पासवर्ड दिल्यावरच 'PDF' ची प्रिंट घेता येऊ शकेल, अन्यथा नाही. |
06:25 | Changes खालील Not Permitted हा पर्याय निवडा. |
06:29 | योग्य पासवर्ड दिल्यावरच 'पासवर्ड' मधे बदल करता येऊ शकतील, अन्यथा नाही. |
06:36 | आता खालील Export वर क्लिक करा. |
06:41 | Export डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:43 | डाव्या पॅनेलमधे Places खाली जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्यावर क्लिक करा. मी Desktop निवडत आहे. |
06:53 | File type खाली PDF - Portable Document Format वर क्लिक करा. |
06:57 | Save वर क्लिक करा. |
07:01 | ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित होऊन ती डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे. |
07:07 | आता डेस्कटॉपवर जाऊ. |
07:09 | डेस्कटॉपवर जाऊन 'RouteMap PDF' फाईलवर डबल क्लिक करा. |
07:14 | Enter password हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:17 | पासवर्ड फिल्डमधे "Protect111" असा चुकीचा पासवर्ड टाईप करू. |
07:23 | Unlock Document वर क्लिक करा. |
07:26 | पासवर्ड फिल्ड रिकामे झाल्याचे दिसेल आणि आपल्याला पुन्हा पासवर्ड टाईप करायला सांगितले जात आहे. |
07:35 | पासवर्ड फिल्डमधे "Protect101" हा योग्य पासवर्ड द्या. |
07:40 | Unlock Document वर क्लिक केल्यावर PDF फाईल उघडेल. |
07:46 | ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित करून ती यशस्वीरित्या पासवर्ड प्रोटेक्टेड बनवली आहे. |
07:53 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:57 | आपण शिकलो- लेयर्सची प्राथमिक माहिती. |
08:00 | ड्रॉ फाईल PDF मधे रूपांतरित करणे |
08:03 | पासवर्ड एन्क्रीप्शनच्या सहाय्याने ती प्रोटेक्ट करणे. |
08:08 | असाईनमेंट. |
08:11 | RouteMap फाईलची आणखी एक PDF बनवा. |
08:14 | PDF डायलॉग बॉक्समधे “Initial View” टॅब खालील पर्याय बदला. |
08:17 | झालेले बदल लक्षात घ्या. |
08:20 | “User Interface” खालील सर्व पर्याय वापरून बघा. |
08:23 | permission passwords सेट करा. |
08:25 | PDF प्रिंट करा. |
08:28 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:31 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:34 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:42 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:45 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:50 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08:58 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:03 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:11 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
09:23 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |