Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C2/Working-with-data/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 1: | Line 1: | ||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
{| border=1 | {| border=1 | ||
− | || | + | || '''Time''' |
− | || | + | || '''Narration''' |
|- | |- |
Revision as of 17:27, 3 March 2017
Time | Narration |
00:00 | कॅल्कच्या Working with Data वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
00:09 | Fill Tools आणि Selection List चा उपयोग. |
00:13 | शीटमधील डेटा स्थलांतरीत करून वापरणे. |
00:16 | डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे |
00:23 | इथे आपण उबंटु लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:32 | स्प्रेडशीटमध्ये डेटा एंटर करणे हे थोडे कष्टाचे काम आहे. परंतु हे काम सोपे करण्यासाठी कॅल्कमध्ये विविध टूल्स देण्यात आलेली आहेत. |
00:42 | एक प्राथमिक पध्दत म्हणजे माऊसच्या सहाय्याने एका सेल मधील घटक दुस-या सेलमध्ये ड्रॉप करणे |
00:49 | परंतु कॅल्कमधे अशाही अनेक सोयी आहेत ज्याद्वारे अनेकवार कराव्या लागणा-या क्रिया Automatic होऊ शकतात. |
00:57 | त्यासाठी “Fill Tool” व “Selection Lists” या नावांची टूल्स आहेत. |
01:01 | ह्यांनी एकाच वेळी अनेक शीटस् मध्ये माहिती भरता येते. |
01:06 | आपण ह्या प्रत्येकाबद्दल एकेक करून माहिती घेऊ. |
01:09 | आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या. |
01:14 | Fill Tool वापरून शीटमधील घटक डुप्लिकेट करता येतात. |
01:19 | समजा, आपल्या Personal Finance Tracker.ods मध्ये "Cost” या हेडिंगखाली असलेला डेटा आपल्याला त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी करायचा आहे |
01:30 | प्रथम कॉपी करायचा सर्व Data Select करून घ्या. त्यासाठी "6000” अशी एंट्री असलेल्या सेलवर क्लिक करा. |
01:38 | आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून "2000” अशी एंट्री असलेल्या सेलपर्यंत ड्रॅग करा. |
01:46 | जिथे तुम्हाला हा डेटा कॉपी करायचा आहे ते सिलेक्ट करा. |
01:51 | आता माऊसचे डावे बटण सोडा. |
01:53 | मेनूबारवरील Edit Optionवर क्लिक करून Fill Option वर क्लिक करा. |
01:59 | पॉप अप मेनूमधील Write Option वर क्लिक करा. |
02:03 | तुम्हाला "Cost” Heading खालील डेटा त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी झालेला दिसेल. |
02:09 | केलेले सर्व बदल undo करू. |
02:12 | Fill Tools चा जास्त गुंतागुंतीचा उपयोग म्हणजे शीटमधे अंकांची Series, डेटा म्हणून एंटर करणे |
02:20 | कॅल्कमधे आठवड्यातील वारांची तसेच वर्षातील महिन्यांची यादी उपलब्ध आहे. |
02:27 | इथे userला स्वतःची यादी देखील तयार करता येऊ शकते. |
02:34 | शीटमध्ये Days हे नवीन हेडिंग इन्सर्ट करू. |
02:38 | या खाली आठवड्यातले दिवस Automatically लिहू. |
02:43 | Days या हेडिंगखाली पहिले सात सेल्स सिलेक्ट करा. |
02:48 | आता मेनूबार वरील Edit या ऑप्शनवर क्लिक करून Fill या ऑप्शनवर क्लिक करा. |
02:53 | त्या मेनूमधील 'Series' या ऑप्शनवर क्लिक करा. |
02:57 | “Fill Series Heading" असलेला डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल. |
03:02 | आता "Series Type” या हेडिंगखालील "Auto Fill” Optionवर क्लिक करा. |
03:07 | नंतरStart Value फिल्डमध्ये पहिला दिवस म्हणजे Sunday टाईप करा. |
03:13 | Increment हे आधीपासूनच सेट केलेले आहे. आता "OK” बटणावर क्लिक करा. |
03:18 | तुम्हाला सेल्समध्ये दिवस Automatically एंटर झालेले दिसतील. |
03:23 | अशा प्रकारे आठवड्याचे दिवस, महिने किंवा वर्ष एंटर करू शकता. कारण ते कॅल्कमध्ये pre-defined आहेत. |
03:32 | अनुक्रमिक डेटा Auto Fill करण्याची दुसरी पध्दत पुढीलप्रमाणे |
03:37 | सेल्समध्ये "Sunday” असे टाईप करून एंटर दाबा. त्यामुळे कॉलममध्ये पुढच्या सेलवर फोकस येईल. |
03:46 | आता पुन्हा Sunday असे टाईप केलेल्या सेलवर जा. त्या सेलच्या उजव्या बाजूला खाली कोप-यात एक छोटा काळा बॉक्स तुम्हाला दिसेल. |
03:55 | त्या बॉक्सवर माऊसने क्लिक करा. |
03:57 | तुम्हाला Display Box मध्ये Saturday असे दिसेपर्यंत खालच्या दिशेने ड्रॅग करा. |
04:04 | आता माऊसचे बटण सोडा. |
04:06 | Cells मध्ये आठवड्याचे दिवस Automaticallyभरले जातील. |
04:10 | अनुक्रमित असलेल्या सर्व डेटासाठी ही पध्दत उपयोगी पडते. आपण केलेले बदल undo करू. |
04:17 | आपण Start, End आणि Increment Value एंटर करून अंकांची one time series सुध्दा बनवू शकतो. |
04:24 | हे कसे ते दाखविण्यासाठी प्रथम आपण सेल्स A 1 पासून A 7 पर्यंत आधी भरलेला डेटा delete करु या. |
04:33 | आकडे डिलिट केल्यानंतर सेल्स A2 पासून A7 पर्यंत सिलेक्ट करा. |
04:40 | आता मेनूतील "Edit” क्लिक करा. मग "Fill” व “Series” क्लिक करा. |
04:46 | आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल. आता डिफॉल्ट रूपात सिलेक्ट केलेले नसल्यास "Series Type” ह्या हेडिंग खालील "Linear” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. |
04:57 | “Start Value” ह्या फिल्डमध्ये आपण पहिला सिरियल नंबर म्हणजेच "1” टाईप करू. |
05:03 | “End Value” ह्या फिल्डमध्ये “6” ही शेवटची व्हॅल्यू टाईप करू. |
05:08 | आता आपण इनक्रिमेंट व्हॅल्यू "1” सेट करून शेवटी " “OK” ह्या बटणावर क्लिक करा. |
05:14 | तुम्हाला सेल्समध्ये अनुक्रमित सिरियल नंबर्स आपोआप आलेले दिसतील. |
05:21 | Fill Tool ने प्रस्थापित केलेला संबंध तात्पुरता असतो. Fill क्रिया संपल्यावर ह्या विविध सेल्समधे कुठलेही नाते रहात नाही. |
05:32 | "Selection List” एक असे टूल आहे ज्याचा वापर केवळ टेक्स्टपुरताच मर्यादित आहे. |
05:40 | आपण त्याबद्दल पुढील ट्युटोरियल्समध्ये चर्चा करू. |
05:45 | आता एका शीटमधील Data दुस-या शीटमध्ये कसा वापरायचा किंवा स्थलांतरीत करायचा ते आपण पाहू. |
05:52 | Calc मध्ये युजरला अनेक शीट्सवर समान सेलमध्ये डेटा एंटर करता येतो. |
05:58 | म्हणजेच प्रत्येक शीटमध्ये तोच डेटा एंटर करण्यापेक्षा सर्व शीटस् मध्ये समान डेटा एकाचवेळी एंटर होतो. |
06:07 | आपला संपूर्ण डेटा Personal Finance Tracker.ods या फाईल मधील "Sheet 1” वर आहे. |
06:14 | आता "sheet 1” मधील डेटा "Sheet 2” आणि "Sheet 3” मधे दाखवायचा आहे. |
06:21 | त्यासाठी मेनूबारवरील "Edit” ऑप्शनवर क्लिक करून मग "Sheet” या ऑप्शनवर क्लिक करा. |
06:27 | आता "Select” वर क्लिक करा. |
06:30 | एक डायलॉग बॉक्स उघडेल ज्यामध्ये तुम्ही Shift Key च्या सहाय्याने "Sheet 1”, “Sheet 2 आणि “Sheet 3” हे ऑप्शन सिलेक्ट करा. |
06:40 | "OK” वर क्लिक करा. |
06:42 | हे तुम्हाला "Sheet 1” वर घेऊन जाईल. |
06:45 | आता "Sheet 1” वर काही डेटा एंटर करा. |
06:49 | उदाहरणार्थ सेल रेफरन्स F12 मध्ये आपण "This will be displayed on multiple sheet” असे टाईप करा. |
06:57 | आता "Sheet 2” व “Sheet 3” या टॅबवर एकेक करून क्लिक करा. |
07:02 | तुम्हाला प्रत्येक शीटमधील सेल रेफरन्स F 12 मध्ये समान डेटा दिसेल. |
07:09 | आपण केलेले बदल undo करा. |
07:12 | आता डेटामध्ये बदल करण्याच्या आणि डिलिट करण्याच्या पध्दती शिकू. |
07:18 | सेलचे कुठलेही फॉरमॅटिंग काढून न टाकता त्यातील डेटा डिलिट करण्यासाठी तो सेल सिलेक्ट करा. |
07:25 | सेलमधील डेटा "Input Line” या फिल्डमध्ये दिसत आहे. |
07:30 | आता कीबोर्डवरील "Backspace” बटण दाबा. |
07:35 | तुम्हाला डेटा डिलिट झालेला दिसेल. |
07:37 | केलेले बदल undo करू. |
07:39 | सेलमधील डेटा बदलण्यासाठी केवळ तो सेल सिलेक्ट करून सेलमधील जुन्या डेटावर टाईप करा. |
07:46 | नवीन डेटासाठी त्याचे मूळ फॉरमॅटींग तसेच राहिल. केलेले बदल undo करू. |
07:52 | सेलमधील सर्व घटक (डेटा) काढून न टाकता त्यातील एखादा भाग बदलण्यासाठी त्या सेलवर डबल क्लिक करा. |
08:01 | आता कर्सरच्या सहाय्याने तुम्ही सेलमध्ये बदल करू शकता. |
08:07 | केलेले बदल undo करून घ्या. |
08:09 | आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. |
08:15 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
08:17 | Fill Tools आणि Selection List चा उपयोग. |
08:20 | शीटमधील डेटा स्थलांतरीत करून वापरणे. |
08:23 | डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे |
08:29 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:32 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:35 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08:43 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:46 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:49 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08:55 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:00 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:07 | यासंबंधी माहिती |
09:11 | पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:18 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
09:23 | सहभागासाठी धन्यवाद. |