Difference between revisions of "Drupal/C3/Modifying-the-Page-Layout/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
m |
||
Line 365: | Line 365: | ||
|- | |- | ||
| 08:21 | | 08:21 | ||
− | या पाठात शिकलो, | + | | या पाठात शिकलो, |
* 'Layouts' | * 'Layouts' | ||
* 'Block Configuration', | * 'Block Configuration', |
Revision as of 07:20, 10 September 2016
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या 'Modifying the Page Layout' वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोतः
|
00:16 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
|
00:26 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:30 | प्रथम 'layout' बद्दल जाणून घेऊ. |
00:33 | येथे Themes आणि Blocks ची ओळख करून घेऊ. |
00:37 | 'Themes' आपल्या साईटला एक सामान्य लेआउट आणि चेहरामोहरा देते. |
00:42 | Themes बद्दल थोड्या वेळाने जाणून घेऊ. |
00:47 | कंटेंट बदलल्याशिवाय ड्रुपल साईटवर Theme लागू करता येतात हे लक्षात घ्या. |
00:54 | आणि हे ब्लॉक्सची कलर स्कीम आणि लोकेशन तसेच टेक्स्ट आणि इमेजेस साठीचे सर्व फॉरमॅटिंग दाखवते. |
01:03 | याआधी ब्लॉकस ही एकप्रकारची माहिती असते जी साईटच्या विविध भागात ठेवू शकतो हे आपण शिकलो. |
01:10 | Blocks हे Block regions मधे असून Block regions ला Theme द्वारे निर्धारित केले जाते. |
01:15 | डिजाइनिंगच्या विश्वात,
|
01:23 | पूर्वी आपण Themes बद्दल आणि त्या लागू करण्याबद्दल जाणून घेतलेले नाही. |
01:29 | साईट तयार करत असताना Theme कधीही लागू करू शकतो हे दाखवण्यासाठी असे करण्यात आले. |
01:36 | हे करण्यासाठी आपण आत्तापर्यंत थांबलो कारण Theme लागू करण्यासाठी शेवटपर्यंत थांबू शकतो हे दाखवायचे होते. |
01:42 | परंतु माझी Theme तयार होताच ती लागू करणे मी पसंत करते. |
01:49 | आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. |
01:52 | Blocks आणि Block regions असलेल्या layout मधे जाऊ. |
01:58 | Blocks आपणास माहिती कुठल्याही ठिकाणी ठेवायला सक्षम करतात. |
02:03 | 'Structure' खालील 'Block layout' वर जा. |
02:06 | चालू theme मधे उपलब्ध असलेले सर्व ब्लॉक्स येथे आहेत. |
02:11 | उदाहरणार्थ : 'Header, Primary Menu, Secondary Menu' इत्यादी. |
02:18 | आपण त्यापैकी काही आधीच स्थानबध्द केले आहेत. |
02:22 | आपण साईडबारमधे Welcome To Drupalville हा custom block स्थानबध्द केल्याचे आठवत असेल. |
02:28 | ह्या विशिष्ट theme मधे डावीकडील साईडबारमधे हे दिसत आहे. |
02:33 | आपण डावीकडील साईडबारमधे Recent Events Added हा view देखील समाविष्ट केला आहे. |
02:39 | आता ब्लॉक्स कसे कॉनफिगर करायचे आणि परमिशन्स कशा द्यायच्या हे जाणून घेऊ. |
02:44 | प्रथम कोणता ब्लॉक कशासाठी आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. |
02:48 | येथे वरती 'Demonstrate Block Regions' आहे. |
02:52 | त्यावर क्लिक करा. |
02:53 | जिथे ब्लॉक्सचा भाग असतो तिथे ड्रुपलमधील प्रत्येक theme अशाप्रकारचे चित्र दाखवते. |
03:00 | 'Block' हा भाग 'themes' वर अवलंबून असतो. |
03:04 | Bartik मधे हे पर्याय आहेत. |
03:07 | 'Secondary Menu, Header', |
03:09 | 'Primary Menu, Highlighted, Featured top, Breadcrumb, Sidebar first, Content' |
03:16 | 'Sidebar second' |
03:18 | आपण कोणताही ब्लॉक कुठल्याही भागात ठेवू शकतो. |
03:21 | जसे की Content हा ब्लॉक कंटेंट भागात डावीकडे असला पाहिजे. |
03:27 | 'Exit' क्लिक करा. |
03:30 | Breadcrumbs ब्लॉक्स Breadcrumb भागातच राहू द्या. |
03:34 | परंतु इतर काही गोष्टींचे स्थान आपण इतर ठिकाणी हलवू शकतो. |
03:38 | Search हा ब्लॉक हलवण्यासाठी त्यावर क्लिक करून तो ड्रॅग करा किंवा |
03:43 | ड्रॉपडाउन क्लिक करून Header हा पर्याय निवडा. ते वरच्या बाजूला स्थानांतरित होईल. |
03:49 | अशाप्रकारे Welcome to Drupalville हे Sidebar first च्या वरच्या भागात ठेवा. |
03:55 | 'Save' बटनावर क्लिक करून केलेले बदल सेव्ह करा. |
03:59 | केलेले बदल बघण्यासाठी Homepage वर जा. |
04:03 | येथे header मधे वरती आपला सर्चबार आहे. |
04:06 | आणि Welcome to Drupalville हा ब्लॉक सर्वात वरच्या बाजूला आहे. |
04:11 | अशाप्रकारे आपण ब्लॉक्सची जागा आणि क्रम ठरवू शकतो. |
04:15 | आता Blocks च्या configurations आणि permissions बद्दल जाणून घेऊ. |
04:20 | 'Structure' खालील 'Block layout' वर क्लिक करा. |
04:24 | आणि Recent Events Added ब्लॉक शोधा. |
04:27 | सध्या हे Sidebar first या ब्लॉकमधे असून ते प्रत्येक पेजवर दिसत आहे. |
04:33 | 'Configure' क्लिक करा. |
04:35 | सध्या Recent Events Added ब्लॉक प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. |
04:40 | परंतु आपल्याला ते केवळ event page वर बघायचे आहे. |
04:44 | 'Events' या चेकबॉक्सवर क्लिक करून 'Save Block' क्लिक करा. |
04:49 | पुन्हा खाली स्क्रोल करा. आणि Save Block वर क्लिक करा. |
04:54 | 'Back to site' क्लिक करा. |
04:56 | आता Recent Events Added ब्लॉक तेथे उपलब्ध नाही. |
05:00 | परंतु event वर गेल्यावर आपण Recent Events Added बघू शकतो. |
05:05 | आता येथे Welcome to Drupalville ब्लॉकखाली आपण वेलकम मेसेज बघू शकतो जो एकदा लॉगिन केल्यावर पुन्हा त्याची आवश्यकता नाही. |
05:15 | हे लपवूया. |
05:17 | येथे या छोट्या pencil वर क्लिक करून Configure block निवडा. |
05:22 | ड्रुपलमधली महत्वाची गोष्ट म्हणजे, पेन्सिल किंवा गियरचा उपयोग करून 'front end' एडिट करू शकतो. |
05:29 | 'Content type' द्वारे मर्यादा घालण्याऐवजी, यास एका पेजपुरते मर्यादित ठेवू. |
05:35 | येथे पहा, ’Specify pages by using their paths..’. |
05:40 | फ्रंट पेजवर काही दाखवण्यासाठी किंवा काही लपवण्यासाठी angle bracket- front- angle bracket चा उपयोग करा. |
05:47 | 'Copy' करून 'paste' करा. आता "Show for the listed page" पर्याय निवडा. |
05:52 | आपला welcome block केवळ Homepage वर असेल. |
05:58 | आता एक टप्पा पुढे जाऊ. |
06:00 | 'Roles' वर क्लिक करून 'Anonymous user' पर्याय निवडा. |
06:05 | आणि 'Save block' क्लिक करा. |
06:07 | आता तुम्ही जेव्हा लॉगिन केलेले नसेल केवळ तेव्हा हे दिसेल. |
06:12 | आता आपल्याला हा मेसेज दिसत नाही कारण आपण लॉगिन केलेले आहे. |
06:16 | लॉगआउट करा 'Welcome to Drupalville' block पुन्हा दिसत आहे. |
06:21 | परंतु लॉगिन करून जेव्हा 'Home' वर क्लिक करतो, ते येथे दिसत नाही. |
06:27 | अशाप्रकारे Block मधे कॉनफिगर करणे, त्यांचे स्थान बदलणे आणि पर्मिशन्स देणे खूपच सोपे आहे. |
06:34 | याचा आणखी सराव करा. |
06:36 | 'Structure' क्लिक करून 'Blocks' वर क्लिक करा. |
06:40 | 'Primary menu' block मधे Main navigation आहे. |
06:44 | आपण त्याचे स्थान बदलल्यास, Main navigation पूर्णपणे वेगळ्या स्थानी गेलेले असेल. |
06:51 | येथे खाली आपल्याकडे 'Featured bottom first, second' आणि 'third' तसेच, |
06:58 | 'Footer first, second, third, fourth' आणि 'fifth' हे ब्लॉक्स आहेत. |
07:03 | 'Footer fifth' मधे 'Powered by Drupal' आणि 'Footer' मेनू आहेत. |
07:08 | येथे एकही डिसेबल केलेले 'blocks' नाहीत. |
07:12 | 'Footer first' या block मधे आपला एखादा मेनू समाविष्ट करू. |
07:17 | वरच्या बाजूला स्क्रोल करा. |
07:19 | आपले 'User account menu' शोधून ते 'Footer first' मधे समाविष्ट करा. |
07:25 | ते लगेच खालच्या बाजूला जाईल. |
07:28 | आता 'Save blocks' वर क्लिक करा. |
07:31 | साईट वर परत जाऊ. |
07:33 | खाली स्क्रोल करा. दिसेल की user account वरती असण्याऐवजी खाली footer मधे आले आहे. |
07:40 | म्हणजेच कोणत्याही block ला कोणत्याही हेतूने कोठेही ठेवता येते. |
07:45 | 'Structure' खालील Block layout वर परत जा. |
07:49 | आता 'block' काढून टाका. |
07:52 | 'Footer fifth block' मधून 'Powered by Drupal' काढून टाका. |
07:57 | केवळ ड्रॉप-डाउनवर क्लिक करा आणि None निवडा. नंतर Save blocks क्लिक करा. |
08:04 | खाली स्क्रोल करा. |
08:06 | 'Powered by Drupal' हा block आता 'disabled या भागात बघायला मिळेल. |
08:12 | हे पूर्णपणे काढून टाकले गेले आहे हे पाहण्यासाठी 'Back to site' क्लिक करा. |
08:16 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:19 | थोडक्यात, |
08:21 | या पाठात शिकलो,
|
08:42 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे |
08:50 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
08:56 | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:04 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:15 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |