Difference between revisions of "Drupal/C2/Configuration-Management-in-Admin-Interface/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 353: Line 353:
 
|-
 
|-
 
| 08:52
 
| 08:52
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
+
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 09:03
 
| 09:03
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
+
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.
  
 
|-
 
|-
 
| 09:11
 
| 09:11
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
+
  
  

Revision as of 11:26, 2 September 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या “कॉनफिगरेशन मॅनेजमेंट इन ऍडमिन इंटरफेस” वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात आपण काही मेनू आयटम्सबद्दलही पाहू. जसे की,


00:13 एक्सटेंड
00:15 कॉनफिगरेशन
00:16 पीपल आणि
00:18 रिपोर्ट
00:20 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
  • उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
  • Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर
00:29 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:34 आपण आधी बनवलेली वेबसाईट उघडू.


00:38 आधी उल्लेख केल्याप्रमाणे ड्रुपल हे फ्रेमवर्कप्रमाणे आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात फारसे काही करत नाही.
00:45 आपण आपली साईट बनवायला सुरूवात करतो तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारवरील Extend ही लिंक अतिशय महत्वाची असते.
00:53 Extend वर क्लिक करा. हे आपल्याला साईटवरील सर्व Modules चा आढावा देईल.
01:00 Modules ही फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये आहेत.
01:02 आपण त्याबद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ.
01:06 ड्रुपल सोबत आलेल्या काही Modules ची ही सूची आहे.
01:11 चेकमार्क्समुळे आपल्याला कळू शकते की त्यापैकी कोणती एनेबल्ड आहेत आणि कोणती नाहीत.
01:18 आपल्या ड्रुपल साईटवर एनेबल केलेली सर्व Modules किंवा वैशिष्ट्ये Extend मेनूमधे पाहू शकतो.
01:26 या संपूर्ण मालिकेत आपण साईटमधे अनेक Modules समाविष्ट करणार आहोत.
01:32 आता कॉनफिगरेशन मेनूबद्दल जाणून घेऊ. हा भाग केवळ साईटचे ऍडमिनिस्ट्रेटर्सच ऍक्सेस करू शकतात.
01:41 आपण सुपर युजर किंवा युजर नंबर एक असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींना ऍक्सेस आहे.
01:47 आपण स्क्रीनवर लाल रंगाचा पॉपअप बघू शकतो.
01:51 तुम्हाला हा स्क्रीन कदाचित दिसणार नाही.
01:54 हे स्टेटस रिपोर्ट कार्यान्वित नसल्याचे आणि मला माझी ड्रुपल साईट अपडेटेड आहे का हे तपासण्यास सांगत आहे.
02:03 याकडे आत्ता दुर्लक्ष करू. Reports स्क्रीन बद्दल बघताना त्याकडे पाहू.
02:09 या मेनूद्वारे आपल्याला साईटचे विविध पैलू कॉनफिगर करण्यास ऍक्सेस मिळतो.
02:16 जसे की - Site information, Account settings, Text formats and editors, Performance issues, Maintenance mode, Image styles, इत्यादी.
02:30 आपण पुढील भागात याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
02:35 सध्या आपण आपल्या साईटची माहिती अपडेट करू.
02:39 Site information वर क्लिक करा. आपल्या साईटचे नाव बदलून Drupalville करा आणि

Slogan, मधे टाईप करा - "A Great Place to Learn All About Drupal."

02:53 जेव्हा जेव्हा आपण अशाप्रकारचे बदल करतो ते बदल पूर्ण साईटमधे होतात.
02:58 कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम्सची ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे.
03:04 त्यामुळे आता आपल्या साईटमधे एक पान असेल किंवा हजार पाने असली तरी साईटच्या प्रत्येक पानाच्या वरच्या भागात Drupalville हे नाव दिसेल.
03:16 static HTML च्या तुलनेत ही खूप मोठी सुधारणा आहे.
03:21 तसेच या पानावर आपल्याला Email address देता येईल जो स्वचलित इमेल्ससाठी From address असेल.
03:29 आपण वेगळे मुखपृष्ठ आणि डिफॉल्ट 403 आणि 404 पाने तयार करू शकतो.
03:37 लक्षात घ्या ड्रुपलमधील प्रत्येक पेज हा वेबफॉर्म आहे.
03:41 त्यामुळे प्रत्येक वेळी ड्रुपल पेज बदलल्यावर Submit किंवा Save क्लिक करणे आवश्यक आहे.
03:49 खालच्या भागात असलेल्या Save configuration बटणावर क्लिक करा.
03:54 नंतर Back to site वर क्लिक करा.
03:58 आता आपल्या साईटचे नाव Drupalville झाले असून साईटच्या प्रत्येक पानावर स्लोगन दिसत आहे.
04:06 पुढील पाठात कॉनफिगरेशन मेनूबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
04:12 ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरील People वर क्लिक करा.
04:16 हे आपल्याला ड्रुपल साईटच्या People या भागात घेऊन जाईल.
04:20 आपल्याला List, Permissions आणि Roles हे टॅब्ज दिसतील.
04:26 आत्ता केवळ परिचय करून घेऊ. त्याबद्दल सविस्तर माहिती नंतर जाणून घेऊ.
04:32 Roles सेक्शनमधे आपल्याला युजर अकाऊंटस बनवता येतात, लोकांना साईटवर काय पाहता येईल आणि ते काय करू शकतील याच्या पर्मिशन्स देता येतात.
04:44 येथे admin हे युजरनेम आहे.
04:47 Edit वर क्लिक केल्यावर आपण स्वतःच्या युजर अकाउंट बद्दल सर्व काही येथे पाहू शकतो.
04:54 तुम्हाला सध्याचा पासवर्ड माहित असल्यास तुम्ही तो बदलू शकता.
04:59 तुम्हाला तो माहित नसल्यास त्यासाठी येथे reset चा पर्याय आहे. येथे हे आपल्याला Administrator चा Role असल्याचे सांगत आहे.
05:09 माझे स्टेटस Active असून आपल्याकडे स्वतःचा Personal contact form आणि आपले LOCATION SETTINGS आहे.
05:21 Picture खालील Browse वर क्लिक करून तुम्ही स्वतःचे चित्र बदलू किंवा समाविष्ट करू शकता.
05:29 म्हणजेच आपण येथे आपल्या स्वतःच्या प्रोफाईलचे व्यवस्थापन करू शकतो. Save वर क्लिक करा.
05:37 थोडक्यात - Roles टॅबद्वारे आपण विविध रोल्स समाविष्ट करू शकतो.
05:42 Permissions टॅबमधे त्या रोल्सना आपण काही पर्मिशन्स प्रदान करू शकतो.


05:48 आणि List टॅबमधे आपण त्या रोल्सना युजर असाईन करू शकतो.
05:54 त्यांना काही पर्मिशन्स मिळतील ज्याद्वारे ते ड्रुपल साईटवरील काही भाग पाहू शकतील आणि काही विशिष्ट काम करू शकतील.
06:04 People या भागात आपण आपल्या ड्रुपल साईटवरील सर्व युजर्सचे व्यवस्थापन करू शकतो.
06:10 शेवटी आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबार वरचा Reports हा भाग बघणार आहोत.
06:16 Reports वर क्लिक करा.
06:18 हे काही महत्वाच्या गोष्टींची सूची दाखवेल ज्या आपल्याला ड्रुपल साईटबद्दल माहित असणे गरजेचे आहे.
06:25 उदाहरणार्थ – काही अपडेटस उपलब्ध आहेत का?
06:28 अलीकडील लॉग मेसेजेस
06:31 entity types मधील सर्व फिल्डसची सूची
06:36 स्टेटस रिपोर्टस,
06:37 “access denied” आणि "Page not found” या मुख्य एरर्स
06:42 मुख्य search phrases, आणि काही plugins ज्या आपल्या Views साठी गरजेच्या असतात.
06:49 Available updates वर क्लिक करा. हे अपडेट करण्याची आवश्यकता असलेल्या सर्व गोष्टींची सूची दाखवेल.
06:58 48 मिनिटांपूर्वी शेवटचे अपडेट असल्याचे आपल्याला दिसत आहे.
07:04 हे Cron द्वारे मॅनेज केले जाते. आपल्या सर्व्हरवर याचा सेटप करणे गरजेचे आहे.
07:10 सध्या केवळ Check manually वर क्लिक करा.
07:15 आता ड्रुपल आपण इन्स्टॉल केलेल्या सर्व गोष्टी तपासेल आणि अप-टू-डेट आहोत का हे सांगेल.
07:24 आपल्या साईटवर आणखी Modules किंवा वैशिष्ट्ये समाविष्ट केल्यास येथे ही मोठी सूची असेल.
07:32 हया पाठांत आपण हे नंतर परत बघणार आहोत.
07:37 आपल्या साईटच्या Status report साठी Reports वर क्लिक करा.
07:42 उदाहरणार्थ आपल्याकडे ड्रुपलचे कोणते वर्जन आहे आणि Cron शेवटचे केव्हा कार्यान्वित केले गेले.
07:49 येथे ही लिंक पाहू शकतो जिच्या सहाय्याने आपण Cron बाहेरून कार्यान्वित करू शकतो.
07:55 आपली डेटाबेस सिस्टीम, डेटाबेस वर्जन इत्यादी.
08:00 तुमच्या साईटच्या Reports सेक्शनवर बारीक नजर ठेवावी,
08:05 विशेषतः तुमच्यावर ड्रुपलचे आणि तुम्ही डाऊनलोड केलेल्या सर्व Modules चे अपडेटस कायम राखण्याची जबाबदारी असल्यास.
08:14 शेवटी आपल्याकडे Help पर्याय आहे. Help आपल्याला आपल्या साईटच्या हेल्प पेजच्या लिंक्स देतील.
08:22 अशाप्रकारे आपण ऍडमिनिस्ट्रेशन टूलबारबद्दल जाणून घेतले.
08:26 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,


08:32 आपण या पाठात हे मेनू आयटम्स जाणून घेतले.
  • एक्सटेंड
  • कॉनफिगरेशन
  • पीपल आणि
  • रिपोर्ट
08:52 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
09:03 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.
09:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.


09:19 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


09:32 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana