Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C3/Flow-Charts-Connectors-Glue-Points/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 550: Line 550:
 
|12:05
 
|12:05
  
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|-
 
|-
 
|}
 
|}

Revision as of 11:41, 19 October 2015

Time Narration
00:01 लिबर ऑफिस ड्रॉच्या Flowcharts, Glue Points आणि Beizer curves वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात Beizer curvesआणि Flowcharts काढायला शिकू.
00:14 तसेच Connectors आणि Glue points च्या सहाय्याने Flowcharts कसे जोडायचे हे जाणून घेऊ.
00:20 येथे उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू.
00:29 प्रथम Bezier Curves जाणून घेऊ.
00:33 कॉम्प्युटर ग्राफिक्समधे Bezier Curves मुख्यत्वे कर्व्हज (वक्ररेषा) सफाईदार काढण्यासाठी वापरतात.
00:40 हे कर्व्हज वापरून तुम्हाला विविध आकाराच्या लहान मोठ्या वक्ररेषा काढता येतील.
00:45 सर्व वक्ररेषांना आरंभ आणि अंतिम बिंदू असतो.
00:50 वक्र रेषांवरील बिंदूंना नोडस म्हणतात.
00:54 Routemap फाईलवर जाऊ.
00:58 आता Home वरून Commercial Complex कडे जाऊ.
01:03 त्यासाठी Parking Lot वरून उजवीकडे वळणे आवश्यक आहे.
01:08 याआधी ह्या आकृत्यांचा आपण ग्रुप केला होता. आता अनग्रुप करू.
01:14 आता ड्रॉईंग टूलबारवरील Curve वर क्लिक करून Curve सिलेक्ट करा.
01:20 ड्रॉ पेजवर मार्गाच्या आरंभ बिंदूवर म्हणजेच Home वर क्लिक करा.
01:27 माऊसचे डावे बटण दाबून ठेवा आणि कर्सर Play Ground पर्यंत ड्रॅग करा.
01:32 एक सरळ रेष दिसेल.
01:36 माऊसचे बटण सोडून द्या.
01:39 माऊसचा पॉईंटर Commercial Complex वर न्या.
01:43 माऊस सरकेल त्याप्रमाणे रेषा वक्र झालेली दिसेल.
01:47 अंतिम बिंदू म्हणजेच Commercial Complex वर डबल क्लिक करा.
01:52 अशाप्रकारे आपण वक्र रेषा काढली.
01:55 लक्षात घ्या की वक्र रेषा सफाईदार आली आहे.
01:59 Edit Points टूलबारच्या सहाय्याने या वक्ररेषेवरील बिंदू एडिट करू.
02:05 curve वर क्लिक करा.
02:07 Edit Points टूलबार उघडण्यासाठी कर्व्हवर राईट क्लिक करून Edit Points पर्याय निवडा.
02:14 कर्व्हच्या दोन्ही कडेच्या बिंदूवर निळे बॉक्स दिसले की आपण कर्व्ह एडिट करू शकतो.
02:21 कर्व्हच्या आरंभ बिंदूवर क्लिक करा.
02:24 कंट्रोल पॉईंट असलेली एक तुटक रेषा दिसेल.
02:29 कर्व्हचा आकार गरजेप्रमाणे कमी जास्त करण्यासाठी तुम्ही ही तुटक रेषा ड्रॅग करू शकता.
02:35 एकदा बदल करून झाला की ड्रॉच्या पानावर कुठेही डबल क्लिक करा.
02:41 सफाईदार कर्व्ह काढण्यासाठी Edit Points टूलबारने कर्व्हवर बिंदू समाविष्ट, डिलीट करू शकता किंवा ते हलवू शकता.
02:50 ही असाईनमेंट करा.
02:54 Bezier curve काढा आणि Edit Points टूलबारवरील
02:59 सर्व पर्याय वापरून बघा.
03:02 आता Flowcharts कसे काढायचे ते पाहू.
03:05 RouteMap फाईलमधे दोन नवी पाने समाविष्ट करा.
03:10 ड्रॉ मधील ड्रॉईंग टूलबारमधे Flowcharts साठी स्वतंत्र पर्याय आहेत.
03:17 हा फ्लो चार्ट स्पोकन ट्युटोरियलच्या कार्यपध्दतीतील सर्व पाय-या दाखवेल.
03:22 हा फ्लो चार्ट बनवू.
03:26 ड्रॉईंग टूलबारवरील Flowcharts वर क्लिक करा.
03:30 छोट्या काळ्या त्रिकोणावर क्लिक करून Flowchart: Process पर्याय निवडा.
03:37 ड्रॉ पेजवर कर्सर नेऊन माऊसचे डावे बटण दाबून ते खाली ड्रॅग करा.
03:44 आपण Process बॉक्स काढला आहे.
03:47 प्रोसेस बॉक्स संपूर्ण प्रक्रियेतील एखादा टप्पा किंवा घटना दाखवते.
03:54 आपण फ्लोचार्ट ऑब्जेक्टसमधेही टेक्स्ट समाविष्ट करू शकतो.
03:59 प्रोसेस बॉक्सवर डबल क्लिक करून त्यात Create the Tutorial Outline to chunk content into 10-minute scripts असे टाईप करा.
04:13 Flowcharts मधील फॉरमॅटिंग पर्याय इतर ऑब्जेक्टसप्रमाणेच आहेत.
04:20 आता Process बॉक्समधील टेक्स्ट अलाईन करू.
04:24 टेक्स्ट सिलेक्ट करू.
04:27 काँटेक्स्ट मेनू बघण्यासाठी राईट क्लिक करून Text वर क्लिक करा.
04:32 Text डायलॉग बॉक्स उघडेल.
04:35 Text डायलॉग बॉक्समधील Resize shape to fit text width चा चेकबॉक्स सिलेक्ट करा. OK क्लिक करा.
04:43 तुम्हाला दिसेल की Process बॉक्सचा आकार टेक्स्ट सामावून घेण्यासाठी बदलेल!
04:49 ही क्रिया undo करण्यासाठी CTRL+Z दाबा.
04:55 पुन्हा सिलेक्ट करा.
04:59 मुख्य मेनूतील Format मेनूखालील Text पर्यायावर क्लिक करा.
05:05 Text डायलॉग बॉक्स उघडेल.
05:08 Word wrap text in shape हा पर्याय निवडून OK क्लिक करा.
05:15 टेक्स्ट चा आकार बदलेल आणि ते Process बॉक्स सामावून घेईल.
05:21 अशाच प्रकारे पहिल्या बॉक्स खालोखाल आणखी एक Process बॉक्स काढू.
05:28 त्यात Create Scripts असे टेक्स्ट समाविष्ट करू.
05:33 आता Decision बॉक्स काढून त्यामधे Review Okay? असे टेक्स्ट टाईप करा.
05:42 निर्णय घेण्याची क्रिया दाखवण्यासाठी Decision बॉक्स वापरतात.
05:46 घेतलेल्या निर्णयावर आधारित हा आपल्याला पुढील प्रोसेसवर घेऊन जाईल.
05:52 आता डिसीजन बॉक्सच्या खाली आणखी एक प्रोसेस बॉक्स काढा.
05:58 त्यामधे Record Video हे टेक्स्ट टाईप करा.
06:04 पुढे Review Okay? असे टेक्स्ट लिहिलेल्या डिसीजन बॉक्सची आवश्यकता आहे
06:12 आपण काढलेला डिसीजन बॉक्स कॉपी करून तो येथे पेस्ट करू.
06:18 त्यासाठी डिसीजन बॉक्स सिलेक्ट करून कीबोर्डवरील CTRL+C दाबा.
06:25 आता CTRL+V दाबा.
06:29 हा बॉक्स या प्रोसेस बॉक्सच्या खाली नेऊन ठेवू.
06:35 त्यामधे Review Okay असे टेक्स्ट टाईप करा.
06:40 शेवटी flowchart-connector काढून त्यामधे A टाईप करा.
06:48 फ्लो चार्ट कनेक्टर फ्लो चार्टचे दोन भाग एकमेकांना जोडतो.
06:53 समजा फ्लो चार्टचा पहिला भाग पहिल्या पानावर आहे.
06:58 आणि दुसरा भाग दुस-या पानावर आहे.
07:02 आपण पहिल्या पानावर फ्लो चार्टच्या शेवटी फ्लो चार्ट कनेक्टर काढणार आहोत.
07:08 नंतर आपण तसाच कनेक्टर दुस-या पानाच्या सुरवातीला काढणार आहोत.
07:13 ऑब्जेक्टस जोडण्यापूर्वी ड्रॉ मधील Connector Lines आणि Glue Points बद्दल जाणून घेऊ.
07:21 Connectors हे रेषा किंवा बाण असतात ज्यांची टोके दुस-या ऑब्जेक्टला जोडलेली असतात.
07:28 Glue points हे त्यांच्या नावाप्रमाणे कनेक्टर्स ऑब्जेक्टला चिकटवतात.
07:35 सर्व ऑब्जेक्टसना ग्लू पॉईंटस असतात.
07:39 ते आपल्याला दिसत नाहीत;
07:41 ड्रॉईंग टूलबारमधून कनेक्टर सिलेक्ट केल्यावर किंवा माऊस पॉईंटर ऑब्जेक्ट वरून फिरवल्यास ते आपल्याला दिसू शकतात.
07:51 Glue points हँडल्सप्रमाणे नसतात.
07:54 आपण हँडल्सचा उपयोग ऑब्जेक्टसचा आकार बदलण्यासाठी करतो.
07:58 ग्लू पॉईंटसचा उपयोग ऑब्जेक्टला कनेक्टर चिकटवण्यासाठी केला जातो.
08:02 आता फ्लो चार्टमधील ऑब्जेक्टस कनेक्टर्सच्या सहाय्याने जोडू.
08:07 ड्रॉईंग टूलबारवर जाऊन कनेक्टर या पर्यायावर क्लिक करा.
08:12 कनेक्टर्सचे विविध प्रकार बघण्यासाठी काळ्या रंगाच्या छोट्या त्रिकोणावर क्लिक करा.
08:18 Straight Connector ends with Arrow हा पर्याय निवडा.
08:23 कनेक्टर सिलेक्ट केल्यावर ड्रॉ पेज मधील सर्व ऑब्जेक्टस वर फुलीचे चिन्ह दिसेल.
08:31 हे glue points आहेत.
08:34 आता पहिल्या प्रोसेस बॉक्सच्या ग्लू पॉईंटपासून त्याच्या पुढील प्रोसेस बॉक्सच्या ग्लू पॉईंटपर्यंत एक रेषा काढा.
08:44 आपण फ्लो चार्टमधील सर्व ऑब्जेक्टस कनेक्टर्सच्या सहाय्याने वरून खाली अशा पध्दतीने जोडणार आहोत.
08:52 तुम्हाला दिसेल की कर्सर कुठेही नेऊन ठेवला तरी प्रत्येक रेष तिच्या जवळच्या ग्लू पॉईंटला आपोआप जोडली जात आहे.
09:03 आता प्रोसेस आणि डिसीजन बॉक्सेस एकमेकांना जोडू.
09:08 ड्रॉईंग टूलबारवरील Connector ends with Arrow पर्याय निवडा.
09:14 आता प्रोसेस बॉक्स त्याच्या पुढील डिसीजन बॉक्सला जोडा.
09:19 तसेच पुढील प्रोसेस बॉक्स देखील खालील डिसीजन बॉक्सला जोडा.
09:25 तुम्ही कनेक्टरवर देखील टेक्स्ट लिहू शकता.
09:29 डिसीजन बॉक्सपासून प्रोसेस बॉक्सपर्यंत काढलेल्या कनेक्टरवर No टाईप करू.
09:35 कनेक्टर सिलेक्ट करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.


09:39 end control points कार्यरत होत आहेत.
09:43 तसेच टेक्स्ट कर्सर आलेला दिसेल.
09:46 No हे टेक्स्ट टाईप करा.
09:49 आता हेच सगळे दुस-या कनेक्टरसाठी करू.
09:54 आपण साधा फ्लो चार्ट बनवला आहे!
09:57 Ctrl+S ही बटणे दाबून फ्लो चार्ट सेव्ह करू.
10:03 रेषा आणि बाणांच्या सहाय्याने तुम्ही ऑब्जेक्टस देखील जोडू शकता.
10:08 परंतु यावेळी ऑब्जेक्टसचा ग्रुप करणे गरजेचे असते.
10:11 ह्याचे कारण बाण हे ऑब्जेक्टसशी जोडलेले रहात नाहीत.
10:16 कनेक्टर्स हे रेषा आणि बाणांपेक्षा वेगळे कसे?
10:21 कनेक्टर्स ह्या अशा प्रकारच्या रेषा किंवा बाण आहेत.
10:24 ज्याचे अंतिम बिंदू ऑब्जेक्टच्या
10:28 ग्लू पॉईंटसला आपोआप जोडले जातात.
10:31 परंतु रेषा किंवा बाण आपोआप जोडले जात नाहीत.
10:36 हा पाठ थांबवून असाईनमेंट करा.
10:40 स्पोकन ट्युटोरियच्या फ्लो चार्टचा दुसरा भाग तयार करा.
10:45 processes बॉक्सेसला रंग द्या.
10:48 कनेक्टर काढून त्यात A हे अक्षर टाईप करा.
10:51 हे ह्या फ्लो चार्टमधील पहिले ऑब्जेक्ट असले पाहिजे.
10:55 हे असे दिसले पाहिजे.
10:59 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.


11:02 या पाठात आपण फ्लो चार्टस, कनेक्टर्स, आणि ग्लू पॉईंटस बद्दल शिकलो.


11:09 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:13 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:17 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.


11:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:24 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:28 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:32 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:45 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


11:53 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
12:05 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana