Difference between revisions of "BASH/C2/Conditional-Loops/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 483: | Line 483: | ||
|- | |- | ||
| 09:28 | | 09:28 | ||
− | | हे स्क्रिप्ट FOSSEE | + | | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
|- | |- | ||
| 09:34 | | 09:34 | ||
− | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
|- | |- |
Revision as of 11:35, 19 December 2014
Title of script: Basic If loop in BASH Author: Manali Ranade Keywords: video tutorial, for loop, while loop
Time | Narration |
---|---|
00:01 | नमस्कार. loops in BASH वरील पाठात आपले स्वागत.
. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत, |
00:09 | * for लूप आणि |
00:11 | काही उदाहरणांच्या सहाय्याने while लूप. |
00:15 | ह्या पाठासाठी आपण वापरू, |
00:18 | * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00:22 | * GNU BASH वर्जन 4.1.10 |
00:26 | पाठाच्या सरावासाठी कृपया GNU bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00:34 | आता लूपची प्राथमिक ओळख करून घेऊ. |
00:37 | स्टेटमेंटसचा संच पुन्हा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी लूप वापरतात. |
00:43 | सिंटॅक्स पाहू. |
00:45 | for expression 1, 2, 3 |
00:49 | statement 1, 2, 3 |
00:51 | आणि for लूप येथे पूर्ण झाले. |
00:55 | for लूपचा दुसरा सिंटॅक्स असा आहे: |
00:58 | for variable in sequence/range |
01:03 | statement 1, 2, 3 |
01:06 | for लूप येथे पूर्ण झाले. |
01:09 | पहिला सिंटॅक्स वापरलेले for लूपचे उदाहरण पाहू. |
01:14 | प्रोग्रॅममधे आपण पहिल्या n अंकांची बेरीज मिळवणार आहोत. |
01: 20 | for.sh हे आपले फाईलनेम आहे. |
01: 25 | ही shebang line आहे. |
01: 28 | number ह्या व्हेरिएबलमधे युजरने दिलेली व्हॅल्यू संचित होईल. |
01: 34 | ही व्हॅल्यू पूर्णांक संख्या असेल. |
01: 37 | आता sumव्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ. |
01: 42 | येथे for लूप सुरू होईल. |
01: 45 | प्रथम i ला 1ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ. |
01: 48 | नंतर i is less than or equal to number आहे का ते तपासू. |
01: 54 | येथे sum बरोबर sum plus i असे लिहू. |
02: 00 | नंतर ते प्रिंट करू. |
02: 03 | नंतर i ची व्हॅल्यू 1 ने वाढवू. |
02: 08 | नंतर ही कंडिशन false होईपर्यंत कंडिशन तपासू. |
02: 14 | for लूप मधून बाहेर पडताना हा मेसेज प्रिंट केला जाईल. |
02: 19 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू आणि काय होते ते पाहू. |
02: 24 | टर्मिनलवर टाईप करा - chmod +x for.sh |
02: 31 | नंतर टाईप करा: ./for.sh |
02: 36 | इनपुट म्हणून मी 5 ही संख्या देत आहे. |
02: 40 | i ची प्रत्येक व्हॅल्यू घेऊन मिळवलेली बेरीज दाखवली जाईल. |
02: 46 | नंतर हे आऊटपुट दाखवले जाईल: |
02: 50 | Sum of first n numbers is 15 |
02: 54 | आता प्रोग्रॅम कसे कार्य करतो ते पाहू. |
02: 57 | विंडोचा आकार बदलून घेऊ. |
03: 00 | प्रथम i ची व्हॅल्यू 1 आहे. |
03: 04 | नंतर 1 ही व्हॅल्यू 5 एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासू. |
03: 10 | कंडिशन true असल्यामुळे sum बरोबर 0 + 1 मिळेल. |
03: 16 | आता sum ची व्हॅल्यू 1आहे. |
03: 20 | sum ची व्हॅल्यू 1 अशी प्रिंट करू. |
03: 24 | पुढे i ची व्हॅल्यू 1 ने वाढेल आणि i ला 2 ही नवी व्हॅल्यू मिळेल. |
03: 31 | नंतर 2 ही व्हॅल्यू 5 एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासू. |
03: 36 | कंडिशन true आहे आणि आता ही व्हॅल्यू 1 + 2 म्हणजे 3 होईल. |
03: 44 | i ची व्हॅल्यू 1 ने वाढेल आणि i ला 3 ही नवी व्हॅल्यू मिळेल. |
03: 51 | sum ची 6 ही व्हॅल्यू मिळेल. |
03: 55 | अशाप्रकारे हे स्क्रिप्ट i च्या व्हॅल्यूज एकने वाढवत जाऊन त्याची बेरीज पूर्वीच्या
sum मधे करेल. |
04: 02 | हे i<=5 कंडिशन false होईपर्यंत चालू राहिल. |
04: 09 | for लूप मधून बाहेर पडताना अंतिम मेसेज प्रिंट होईल. |
04: 14 | दुसरा सिंटॅक्स वापरलेले for लूपचे आणखी एक उदाहरण पाहू. |
04: 20 | मी for-loop.sh नावाच्या फाईलमधे कोड लिहून ठेवला आहे. |
04: 27 | हा प्रोग्रॅम डिरेक्टरीमधील फाईल्सची सूची दाखवेल. |
04: 32 | ही shebang line आहे. |
04: 35 | आपल्याकडे for लूप आहे. |
04: 37 | ls कमांड डिरेक्टरीतील घटकांची सूची दाखवेल. |
04: 41 | -1 (hyphen one) एका ओळीवर एक फाईल दाखवेल. |
04: 46 | हे तुमच्या होम डिरेक्टरी मधे उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्सची सूची दाखवेल. |
04: 51 | येथे for लूप पूर्ण होईल. |
04: 53 | टर्मिनलवर स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा - |
04: 58 | chmod +x for-loop.sh |
05: 04 | ./for-loop.sh |
05: 09 | हे होम डिरेक्टरीमधे उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स दाखवेल. |
05: 14 | आता while लूपबद्दल जाणून घेऊ. |
05: 18 | प्रथम सिंटॅक्स समजून घेऊ. |
05: 21 | while condition
statement 1, 2, 3 while लूप पूर्ण. |
05: 27 | याचा अर्थ कंडिशन true असेपर्यंत while लूप कार्यान्वित होईल. |
05: 34 | while लूपचे उदाहरण पाहू. |
05: 37 | मी फाईलला while.shअसे नाव दिले आहे. |
05: 42 | या उदाहरणात आपण दिलेल्या श्रेणीतील समसंख्यांची बेरीज मिळवणार आहोत. |
05: 49 | कोड समजून घेऊ. |
05: 52 | येथे युजरकडून संख्या स्वीकारून ती number या व्हेरिएबलमधे संचित करू. |
05: 59 | पुढे i आणि sum व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ. |
06: 06 | आता ही while कंडिशन आहे. |
06: 08 | येथे i ची व्हॅल्यू numberच्या व्हॅल्यू एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का हे तपासू. |
06:17 | नंतर i ची व्हॅल्यू sumच्या व्हॅल्यूत मिळवून sumची व्हॅल्यू लिहू. |
06:24 | नंतर i ची व्हॅल्यू 2ने वाढवू. |
06: 28 | ह्यामुळे केवळ सम संख्यांची बेरीज करत असल्याची खात्री मिळेल. |
06: 33 | i ची व्हॅल्यू numberच्या व्हॅल्यू पेक्षा जास्त होईपर्यंत while लूप कार्यान्वित होत राहिल. |
06: 40 | while लूपमधून बाहेर पडल्यावर दिलेल्या श्रेणीतील सर्व सम संख्यांची बेरीज प्रिंट करू. |
06:47 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
06:50 | टर्मिनलवर टाईप करा: |
06:52 | chmod +x while.sh |
06:56 | ./while.sh |
07:00 | मी इनपुट म्हणून 15 टाईप करत आहे. |
07:04 | असे आऊटपुट दाखवले जाईल. |
07:06 | Sum of even numbers within the given range is 56. |
07:11 | विंडोचा आकार बदलून आऊटपुट समजून घेऊ. |
07:14 | प्रथम i जो 0 आहे तो 15एवढा किंवा त्यापेक्षा कमी आहे हे तपासू. |
07:24 | कंडिशन true असल्याने sum बरोबर 0+0 म्हणजेच 0असेल. |
07:31 | आता i ची व्हॅल्यू 2 ने वाढेल आणि i ची नवी व्हॅल्यू
2होईल. |
07:37 | नंतर 2 हा 15एवढा किंवा त्यापेक्षा कमी आहे का हे तपासू. |
07:43 | पुन्हा कंडिशन true आहे. त्यामुळे 0+2 करू. |
07:49 | आता sum ची व्हॅल्यू 2आहे. |
07:52 | पुन्हा i ची व्हॅल्यू 2 ने वाढवू. |
07:56 | त्यामुळे आता i ची व्हॅल्यू 2+2 म्हणजे 4होईल. |
08:03 | आणि पुढे sum ची व्हॅल्यू 4+2 म्हणजे 6होईल. |
08:09 | अशाप्रकारे हे स्क्रिप्ट i ची व्हॅल्यू 2 ने वाढवून ती 15 पेक्षा जास्त होईपर्यंत त्याची पूर्वीची व्हॅल्यू sumमधे मिळवेल.
|
08:18 | आणि आपल्याला sum मधे 56 ही एकूण व्हॅल्यू मिळेल. |
08:24 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:27 | थोडक्यात, |
08:28 | पाठात,
for लूपचे दोन वेगळे सिंटॅक्स आणि while लूप शिकलो. |
08:37 | असाईनमेंट म्हणून, |
08:38 | पहिल्या "n" मूळ संख्यांची बेरीज करा. |
08:43 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:46 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:50 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:54 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:56 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:00 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:04 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09:11 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:14 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:22 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:28 | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
09:34 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
09:38 | सहभागासाठी धन्यवाद. |