Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/User-Password-Change-Part-1/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 20: | Line 20: | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:13 | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:13 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे जास्त वेळ घेणार नाही. हे 3 भागात पूर्ण होईल. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे जास्त वेळ घेणार नाही. हे 3 भागात पूर्ण होईल. | ||
Revision as of 15:56, 21 July 2014
Title of script: User-Password-Change-Part-1
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
Time | Narration |
0:00 | नमस्कार. या पाठात युजर त्याचा पासवर्ड कसा बदलू शकतो हे शिकू. |
0:08 | युजरला पासवर्ड बदलण्यासाठी पर्याय कसा द्यायचा ते पाहू. |
0:13 | हे जास्त वेळ घेणार नाही. हे 3 भागात पूर्ण होईल. |
0:18 | युजरला एक फॉर्म देऊ त्यात जुना पासवर्ड आणि नवा पासवर्ड दोन वेळा टाईप करायला सांगू. |
0:27 | डेटाबेसमधील त्याचा जुना पासवर्ड तपासू. |
0:31 | तो encrypted आहे. |
0:33 | नंतर दोन्ही नव्या पासवर्डसची तुलना करू. ते समान आहेत, त्यात फरक नाही हे तपासू. |
0:39 | नंतर नव्या sql कोडस द्वारे डेटाबेस अपडेट करू. |
0:44 | माझ्या "member" पेजवर माझे "session" सुरू करेन. येथे "session_start" दिसत आहे. |
0:53 | मी ते कॉपी करून पेजच्या सुरूवातीला पेस्ट करत आहे. आपण सेशन सुरू केले आहे. |
0:59 | येथे "user" हे व्हेरिएबल वापरु . ज्याची व्हॅल्यू underscore SESSION ['user name']च्या समान असेल. |
1:09 | प्रथम युजरने त्याचा पासवर्ड बदलण्यापूर्वी log in केले आहे का ते तपासू. आपण ह्या कोडबद्दल बोलत आहोत. |
1:19 | हे "user" व्हेरिएबल "session" नावाच्या रूपात येथे सेट करू. |
1:24 | येथे लिहू “ if the user exists”, तर त्याचा पासवर्ड बदलणार आहोत. अन्यथा हे पेज kill करून लिहू “You must be logged in to change your password". |
1:41 | “User logged in” असेल तर त्यासाठी हा block आहे . आता युजरने log in केले आहे याची खात्री केल्यावर युजरला भरण्यासाठी फॉर्म देणे आवश्यक आहे. |
1:49 | येथे कोड एको करणार आहोत जो आपला फॉर्म आहे. हा स्वतः सबमिट होणारा फॉर्म आहे. म्हणजे हा "change password dot php" वर परत जाईल. येथे फॉर्म संपवू. |
2:14 | तर आपण या पेजवर आहोत. आता आपण सर्व तपशील तपासू. |
2:21 | URL वर पासवर्डची कोणतीही माहिती दिसू द्यायची नसल्यामुळे फॉर्मसाठी POST मेथड वापरू. |
2:30 | पुढे काही input boxes बनवू. पहिला “Old password:” जो पासवर्ड प्रकारचा नसल्याने गुप्त ठेवला जाणार नाही, तो "text" टाईप ठेवून त्याला "password" हे नाव देऊ. |
2:48 | येथे paragraph breakदेऊ. पुढे "New password:". याचा इनपुट टाईप "password"असेल ज्यामुळे तो गुप्त राहिल. याचे नाव new password असेल. |
3:02 | येथे line break देऊन ओळ कॉपी पेस्ट करू आणि त्यात काही बदल करू. येथे “Repeat new password” असे लिहून नाव "repeat new password" करा आणि पुढे paragraph break द्या. |
3:23 | शेवटी “submit" बटणाची गरज आहे. त्याचे नाव "submit" असेल. ते दाबले जाते का ते पाहू. त्याची व्हॅल्यू "Change password" असेल. |
3:33 | पेजवर जाऊ. पासवर्ड बदलण्यासाठी सोय व्हावी म्हणून members.phpमधे एक लिंक देणार आहे. |
3:40 | आता login करू. “abc हा माझा पासवर्ड आणि “Alex” हे युजरनेम आहे. |
3:48 | login क्लिक केल्यावर "Welcome Alex" दिसेल. हे मेंबर पेज आहे. session सेट झाले आहे. log outकरायचे असल्यास तुम्ही करू शकता. परंतु पासवर्ड बदलण्यासाठी दुस-या पर्यायाची गरज आहे. |
4:01 | त्यासाठी "member dot php" वर जाऊन तिथे आणखी link बनवू. |
4:08 | ती म्हणजे “Change password”. |
4:11 | ही लिंक “change password dot php" ला जोडलेली असेल. |
4:14 | हे रिफ्रेश केल्यावर एक पर्याय दिसेल. येथे क्लिक केल्यावर मागे बनवलेला आपला फॉर्म मिळेल. येथे जुना आणि येथे नवा पासवर्ड टाईप करू. |
4:26 | "Change password" वर क्लिक करा. काहीच झाले नाही. हे सबमिट झाले की नाही हे तपासू. जास्तीच्या ओळी डिलिट करू. |
4:38 | येथे आपल्याला एक If स्टेटमेंट द्यावे लागणार आहे. लिहा “if POST submit” म्हणजेच युजरने सबमिट बटण प्रेस केले आहे काय? याचे नाव submit असेल. येथे सबमिट लिहू. |
4:52 | युजरनी सबमिट केलेले असल्यास येथे पासवर्ड बदलू शकतो. |
4:59 | सबमिट केलेले नसल्यास हा कोड एको करणार आहोत. |
5:05 | युजरने आधी सबमिट केलेले नसल्यास फॉर्म सबमिट करण्यासाठी त्यांना फॉर्म द्यावा लागेल. |
5:12 | आता हे टेस्ट करू. हे कार्य करते की नाही हे बघण्यासाठी “test” एको करू. |
5:18 | आता मागे जाऊन हे भरू. प्रत्यक्षात आपल्याला काही भरण्याची गरज नाही. सबमिटवर क्लिक करू. आणि “test” असे एको झालेले दिसेल. जे आपला फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला दाखवेल. |
5:34 | आता पासवर्ड बदलण्याची गरज आहे. हे डिलिट करून येथे “check fields” लिहा. |
5:40 | येथे काही व्हेरिएबल्स सेट करण्याची गरज आहे. variable “old password” equal to underscore POST आणि ते नाव फॉर्ममधे खाली दिले आहे. |
5:55 | ज्या व्हॅल्यूज सबमिट करायच्या आहेत त्या आपण येथे लिहिणार आहोत. |
6:00 | पुढे “new password” आणि “repeat new password” आहे. हे देखील बदलणार आहोत. |
6:10 | हे कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी “old password”, “new password” आणि ”repeat new password” एको करण्याचे मी सुचवेन. |
6:25 | हे फॉर्मची उपलब्धता तसेच तो सबमिट झाला का ते तपासेल तसेच आपले व्हेरिएबल व पोस्ट व्हेरिएबल variable nameमधे आले का ते पाहिल. |
6:38 | हे कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी box मधे टाईप केलेले सर्व एको करू. |
6:40 | “abc” हा जुना पासवर्ड आणि “123” हा नवा पासवर्ड आहे. "Change password" क्लिक केल्यावर abc, 123 आणि 123 एको झालेले दिसेल. |
6:52 | म्हणजे फॉर्मची माहिती नीट सबमिट झाली आहे. स्पेलिंगची चूक नाही. युजर नवा पासवर्ड सेट करू शकतो. |
7:00 | हा पाठ येथे संपला. पुढील भागात डेटाबेसमधील जुन्या पासवर्ड बरोबर नवा पासवर्ड कसा तपासायचा, नवा व पुन्हा लिहिलेला नवा पासवर्ड जर बरोबर असतील तर युजरचा पासवर्ड कसा बदलायचा हे पाहू. |
7:24 | सहभागासाठी धन्यवाद. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |