Difference between revisions of "KiCad/C2/Designing-printed-circuit-board-in-KiCad/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 1: | Line 1: | ||
− | |||
− | ''' | + | {| border=1 |
− | + | |'''Time''' | |
− | ''' | + | | '''Narration''' |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 14:38, 11 July 2014
Time | Narration |
00:01 | प्रिय मित्रांनो, |
00:02 | KiCad मधील Designing printed circuit board या पाठात स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:09 | KiCad मधे printed circuit boardचे डिझाईन बनवणे. |
00:12 | आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम, |
00:16 | आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत. |
00:25 | तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. |
00:30 | यूज़र ला circuit schematic design बनवणे, तसेच |
00:35 | electric rule check करणे, |
00:37 | netlist बनवणे, |
00:39 | footprints सहित components mapकरणे माहिती असावे. |
00:43 | संबंधित पाठा साठी spoken hyphen tutorial.org ला भेट द्या. |
00:50 | KiCad सुरू करण्यासाठी, |
00:52 | ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा. |
00:56 | Dash home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:01 | सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा. |
01:09 | हे KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल. |
01:12 | EEschemaउघडण्यासाठी वरील पॅनेलवर जाऊन EEschema टॅबवर क्लिक करा. |
01:19 | it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल. |
01:25 | OK वर क्लिक करा. |
01:28 | आधी बनवलेल्या Astable multivibratorचे सर्किटschematic आपण वापरू. |
01:35 | असे करण्यास File मेनूवरील Open वर क्लिक करा. |
01:42 | फाईल सेव्ह केलेला फोल्डर निवडा. |
01:49 | project1.sch निवडा. Openवर क्लिक करा. |
01:56 | मी विंडोचा आकार बदलेल. |
02:00 | आता मी Open वर क्लिक करेल . |
02:06 | हे सर्किट schematic उघडेल. |
02:08 | माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू. |
02:13 | ह्या सर्किटसाठी आधीच netlist बनवली आहे. |
02:16 | संबंधित componentsशी फूटप्रिंट मॅप केलेले आहेत. |
02:20 | आता पुढे printed circuit board layout बनवू. |
02:26 | हे सुरू करण्यासाठी EEschema विंडोच्या वरील पॅनेल मधील Run PCBnew बटण क्लिक करा. |
02:36 | PCBnew विंडो उघडेल. |
02:39 | it did not find project1.brd असा मेसेज असलेला info dialog box उघडेल. |
02:44 | dialog box बंद करण्यासाठी OK वर क्लिक करा. |
02:49 | PCBnew विंडोच्या वरील पॅनेल मधील Read netlist बटण क्लिक करून फूटप्रिंटस import करू. |
02:57 | येथे netlist विंडो उघडली आहे. |
03:01 | सर्व default settings आहेत तशीच ठेवा. |
03:03 | Browse netlist Files बटण क्लिक करा. |
03:07 | हे Select netlist विंडो उघडेल. |
03:13 | नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू. |
03:20 | संबंधित डिरेक्टरीतून project1.net फाईल सिलेक्ट करा. Openवर क्लिक करा. |
03:27 | Read Current Netlist बटणावर क्लिक करा. |
03:30 | project1.cmp not found अशी वॉर्निंग देईल. |
03:35 | OK वर क्लिक करा. |
03:37 | netlist विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
03:42 | सर्व इंपोर्ट झालेल्या फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या डाव्या कोप-यात वरती ठेवलेल्या दिसतील. |
03:49 | सर्व फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या मध्यभागी ठेवणे गरजेचे आहे. |
03:56 | त्यासाठी PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधे असलेल्या Manual and Automatic move and place of modules बटणावर क्लिक करा. |
04:08 | PCBnew विंडोच्या मध्यभागी एकदा राईट क्लिक करा. |
04:14 | Glob Move and Placeवर जाऊन Move All Modules वर क्लिक करा. |
04:22 | हे Confirmation विंडो उघडेल. Yes क्लिक करा. |
04:28 | स्पष्ट दिसण्यासाठी माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू. |
04:35 | footprintsच्या टर्मिनल्स जोडणा-या पांढ-या रंगाच्या वायर्स कदाचित तुम्हाला दिसत असतील किंवा नसतील. |
04:39 | जर दिसत नसतील तर PCBnew विंडोच्या डाव्या पॅनेलमधे असलेल्या Show or Hide board ratsnest बटणावर क्लिक करा. |
04:51 | पांढ-या वायर्सला airwires म्हणतात. |
04:55 | अशा पध्दतीने modules मांडू की कमीत कमी airwires एकमेकांना ओलांडतील. |
05:01 | IC 555 footprintवर राईट क्लिक करा. |
05:07 | Footprint ऑप्शन्स वर जाऊन Moveवर क्लिक करा. |
05:12 | footprint कर्सरला जोडला गेला आहे. |
05:16 | तुम्ही पाहु शकता , पार्श्वभूमीवर दिसत असलेल्या grid नुसार component हलतात. |
05:25 | एकदा क्लिक करून तुम्हाला हवा तिथे component ठेवा. मी तो येथे ठेवत आहे. |
05:33 | PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधील Grid options ह्या ड्रॉप डाऊन मेनूद्वारे ग्रीड स्पेसिंग बदलता येते. |
05:44 | आता Grid 1.270 ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूसहित पुढे जाऊ. |
05:53 | components हलवण्यासाठी M ही शॉर्टकट की देखील वापरू शकतो. |
05:58 | उदाहरणार्थ capacitor कसा हलवायचा ते पाहू. |
06:02 | कर्सरcapacitor वर ठेवा. |
06:05 | M दाबा. ते module कर्सरला जोडले जाईल. गरजेनुसार हे कुठेही हलवू शकता. |
06:14 | component ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा. |
06:17 | component फिरवण्यासाठी R दाबा. |
06:22 | उदाहरणार्थ resistor फिरवू. resistor वर कर्सर ठेवा R दाबा. |
06:29 | अशाप्रकारे सर्व componentsची मांडणी करू शकतो. |
06:32 | आपण फूटप्रिंट अशापध्दतीने मंडळी मांडली आहे की, कमीत कमी airwiresएकमेकांना ओलांडतील. हे येथे दाखवले आहे. |
06:41 | आता ह्या airwires चे actual tracks मधे रूपांतरित करणे गरजेचे आहे. |
06:46 | PCBnew विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या Layer टॅब खालील Back layer सिलेक्ट करा. Back layer हिरव्या रंगाने दाखवली जाते. |
07:01 | निवडलेली Layer छोट्या निळ्या बाणाने दाखवली जाते. |
07:06 | tracksबनवण्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील पॅनेलमधे असलेले Add tracks and vias बटण निवडा. |
07:17 | R1च्या एका nodeवर क्लिक करा. |
07:22 | त्या नंतर R2 च्या node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे. |
07:31 | तसेच आणखी एक वायर Resistor R3 आणि capacitor C1 मधे जोडणार आहोत. |
07:38 | R3 च्या एका nodeवर क्लिक करा. |
07:41 | वायरची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा. |
07:46 | नंतर C1 च्या node वर जिथे वायर जोडणे गरजेचे आहे तिथे डबल क्लिक करा. |
07:51 | येथील बनलेला हिरवा ट्रॅक printed circuit boardवर बनणारा तांब्याचा मार्ग दाखवतो. |
07:59 | तसेच track ची रूंदीही बदलता येते. |
08:02 | PCBnew विंडोच्या मेनूबारमधील Design Rulesपर्यायावर क्लिक करून हे करता येते. |
08:11 | Design Rulesवर क्लिक करा. |
08:14 | Design Rules Editor उघडेल. जिथे trackची रूंदी बदलू शकतो. |
08:19 | आपणtrack ची रूंदी बदलून 1.5 करू. त्यासाठी Track Widthच्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा. 1.5 टाईप करून एंटर दाबा. |
08:34 | trackबनवण्यासाठी कीबोर्डवरील Xबटण वापरू शकतो. |
08:39 | मी हे तुम्हाला दाखविते, LED D1च्या एका nodeवर कर्सर ठेवा आणि X बटण दाबा. |
08:48 | नंतर R3 node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे. |
08:54 | track ची रूंदी वाढलेली दिसेल. अशाप्रकारे board वरील डिझाईन पूर्ण करू शकतो. |
09:03 | मी अगोदरच board साठी डिझाईन पूर्ण करून ठेवले आहे. |
09:08 | आपण पूर्ण केलेली डिझाईन board file उघडू. |
09:19 | हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी PCB edges काढणे गरजेचे आहे. |
09:25 | त्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील Layer tab मधील PCB Edges हा पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
09:34 | layout editor विंडोच्या उजव्या पॅनेलवर असलेल्या Add graphic line or polygon बटणावर क्लिक करा . |
09:44 | ह्या Printed circuit Boardच्या भोवती आयत काढू. |
09:49 | layoutच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करा. |
09:52 | कर्सर आडवा उजवीकडे हलवा. |
09:56 | रेषेची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा. |
10:00 | कर्सर उभा खालच्या दिशेने सरकवा. |
10:04 | अशा पध्दतीने आयत पूर्ण करू शकतो. |
10:11 | आपण आयत पूर्ण करू. |
10:16 | माऊसचे डावे बटण डबल क्लिक करून आयत पूर्ण करा. |
10:24 | File मेनूवर क्लिक करून Save वर क्लिक करा. ही फाईल extension .brd अशी सेव्ह होईल हे लक्षात घ्या. |
10:38 | अशाप्रकारे Astable multivibrator सर्किटचे board layout पूर्ण झाले आहे. |
10:44 | ह्या पाठात PCBnew द्वारे printed circuit board चे डिझाईन बनवायला शिकलो. |
10:50 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:54 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:00 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
11:03 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:06 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:10 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11:15 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:19 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:29 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
11:35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
11:38 | सहभागासाठी धन्यवाद. |