Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Overview-of-Library-Management-System/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 294: | Line 294: | ||
|- | |- | ||
| 04.52 | | 04.52 | ||
− | | | + | | http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro |
|- | |- |
Revision as of 11:06, 9 July 2014
Title of script: Overview-of-Library-Management-System
Author: Manali Ranade
Keywords: Java-Business-Application
Time | Narration
|
---|---|
00.00 | Overview of the Web Application – Library Management System वरील पाठात आपले स्वागत. |
00.08 | या पाठात वेब ऍप्लिकेशनची माहिती घेऊ. |
00.13 | या मालिकेत, प्राथमिक इनव्हेन्टरी सिस्टीम बनवायला शिकणार आहोत. |
00.19 | येथे ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे उदाहरण पाहू. |
00.24 | ही मालिका समजून घेण्यासाठी, |
00.27 | Netbeans IDE मधून Core Java वापरण्याचे आणि |
00.31 | HTML चे ज्ञान असावे. |
00.32 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.38 | आता ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब ऍप्लिकेशन पाहू. |
00.43 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम ही, |
00.46 | ग्रंथालयाच्या सदस्यांना दिलेल्या व परत आलेल्या पुस्तकांचे |
00.50 | आणि ग्रंथालयाच्या सदस्यांच्या माहितीचे व्यवस्थापन करते. |
00.54 | आपल्याला ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम का आवश्यक आहे? |
00.58 | अशी सिस्टीम वापरल्याने - |
01.00 | ग्रंथपालाला ग्रंथालयातील पुस्तकांचे व्यवस्थापन सहज करता येते. |
01.05 | एखाद्या मध्यवर्ती सर्व्हरवर सभासदांची माहिती व्यवस्थित सांभाळली जाते. |
01.10 | वेळ आणि साधनसामुग्रीची बचत होते. |
01.13 | कामाचा भार हलका होतो. |
01.15 | आता आपण ही सिस्टीम पाहू. |
01.17 | त्यासाठी Netbeans IDEवर जाऊ. |
01.22 | आपल्याकडे ही अतिशय साधी सिस्टीम आहे. |
01.24 | MyFirstProject हे प्रोजेक्ट कार्यान्वित करू. |
01.30 | ब्राऊजर विंडो उघडेल. |
01.33 | तुम्ही ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमचे होम पेज बघू शकता. |
01.38 | येथे अगदी सोपा लॉगिन फॉर्म दिसेल. |
01.42 | Visitor’s Home Pageवर जाण्यासाठी एक लिंक आहे. |
01.46 | त्यावर क्लिक करा. |
01.48 | तुम्ही ग्रंथालयामधे उपलब्ध असलेल्या सर्व पुस्तकांची सूची बघू शकता. |
01.53 | ग्रंथालयाचे अनेक सभासद असतात. |
01.56 | सभासद म्हणून लॉगिन करू या; म्हणजे असे युजर ज्यांनी आधीच येथे रजिस्टर केले आहे. |
02.03 | मी “mdhusein” म्हणून लॉगिन करत आहे. पासवर्ड देऊन एंटर दाबा. |
02.10 | आपण Success Greeting Page बघू शकता. |
02.13 | तसेच आपल्याकडे युजरनी सध्या घेतलेल्या पुस्तकांची यादी देखील आहे. |
02.18 | आता logout करू. |
02.21 | पुढे आपण ग्रंथपाल म्हणजेच admin म्हणून लॉगिन करणार आहोत . |
02.26 | लॉगिन केल्यावर Admin Section page दिसेल. |
02.31 | येथे 4 पर्याय दिसतील. |
02.33 | प्रत्येक पर्याय वापरून त्याचा रिझल्ट पाहू. |
02.37 | पहिला पर्याय आहे List Books. |
02.41 | येथे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी मिळेल. |
02.46 | पुढचा पर्याय List Borrowed Books. |
02.50 | येथे वेगवेगळ्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल. |
02.54 | आणि परतीची तारीख उलटून गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल. |
02.59 | पुढील पर्याय List Users. |
03.03 | येथे ग्रंथालयामधे रजिस्टर्ड असलेल्या सर्व युजर्सची यादी मिळेल . |
03.08 | शेवटचा पर्याय म्हणजे Checkout/Return a Book. |
03.12 | या पर्यायावर क्लिक करा. |
03.15 | हा Checkout/Return Bookचा इंटरफेस आहे. |
03.20 | आता लॉगिन पेजवर परत जाऊ. |
03.23 | लक्षात घ्या, येथे नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्याचा पर्याय आहे. |
03.28 | त्यासाठी येथे क्लिक करा. |
03.31 | हा नवीन युजर रजिस्टर करण्यासाठी registration form आहे. |
03.35 | आपण असा साध्या वेब ऍप्लिकेशनचा संक्षिप्त आढावा घेतला. |
03.39 | या मालिकेत तुम्ही साधी ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीम बनवायला शिकणार आहात. |
03.46 | तसेच त्यामधे अधिक कार्यप्रणाली समाविष्ट करू शकणार आहात जसे की एखादे पुस्तक शोधणे. |
03.53 | पुढील पाठांत - |
03.54 | वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी JSP आणि servlets वापरणार आहोत. |
03.59 | आपण MVC architecture सविस्तर जाणून घेणार आहोत. |
04.04 | आणि MVC पध्दतीचा वापर होणारे कुठलेही ऍप्लिकेशन आपल्याला बनवता येईल. |
04.10 | स्पोकन ट्युटोरिअल विषयी अधिक माहितीसाठी, |
04.13 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
04.16 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
04.20 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
04.24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
04.26 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04.29 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
04.32 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
04.38 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
04.42 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
04.49 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
04.52 | http://spoken-tutorial.org/NMEICT- Intro |
04.59 | ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे. |
05.08 | त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे. |
05.13 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद. |